पन्हाळगड ते पावनखिंड 15 व 16 जुलै 2017, Panhalgad To Pawankhind

      ठरल्याप्रमाणे माझा भाचा अजित गवेकर मुंबईहुन शुक्रवारी 14 जुलै रोजी चिंचवडला 7:00 वाजता माझ्याकडे आला, येथुन आम्ही दोघे बालाजीनगरला शैलेश चिंदके कडे जेवायला गेलो. त्याने खास कोल्हापुरी आख्खा मसुर जेवणाचा बेत केला होता, जेवन ऊरकुन आम्ही तिघे कात्रजला गेलो. एव्हाना रात्रीचे 12:30 वाजले होते, तेथे सागर थोरात आमची वाट पाहत होता. येथुन आम्ही चौघे कोल्हापुरला जाणारी बस पकडुन निघालो, पहाटे 5:30 वाजता कोल्हापुरला पोहचलो. तेथेच फ्रेश होऊन 7:15 ची पन्हाळा गाडी पकडुन गडावरती पोहचलो.
     पन्हाळगडावरती पोहताच वीर शिवा काशीद व वीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्याला वंदन करून तीन दरवाजा येथे आलो, तेथे आमचा मित्र धर्मदास मोटे आला होता. त्याच्यासोबत नाश्ता ऊरकुन आम्ही पाच जण राजदिंडी दरवाजाकडे निघालो, भग्न अवस्थेतील दरवाजा पाहुन मन खिन्न झाले. याच दरवाजा मधुन महाराज विशाळगडाकडे गेले होते.
तेथुनच आम्ही आमच्या ट्रेकची सुरवात केली. येथुनच जंगलातुन वाट जाते, त्याच वाटेने आम्ही निघालो, थोडे चालत जाताच मसाई पठारावरती पोहचलो, तेथे फोटो काढुन पुढे चालत राहीलो, थोडे अंतर पुढे गेल्यानंतर पठारावरती मसाई देवीचे मंदिर लागले, तेथे नमस्कार करुन थोडे आडवाटेला गेलो व तेथे पांडवदरा व बुधा लेणी पाहिल्या व तेथेच दुपारचे जेवन ऊरकले व पुढे पठारावरती चालू लागलो. त्यातच जोराचा वारा व पाऊस चालू झाला, पाऊसाचा मार झेलत भिजत चालत राहीलो व 5 ते 6 कि.मि. चा पठार संपवून पुढे डोंगर रांगेतुन चालायला लागलो, डोंगराच्या कुशीत वसलेल्या लहान लहान वाड्या-वस्तीमधुन  चालत होतो, त्या वाड्या पाहून वाटते अजुनही त्या वाड्यांना शहराची झळ लागलेली नाही, असेच डोंगर रांगेने पुढे जात 20 ते 25 कि. मि. ट्रेक करून करपेवाडी या गावी आम्ही एका घरामध्ये रात्रीचा मुक्काम केला.
       दुसऱ्या दिवशी (16 जुलै 2017 ) सकाळी नाश्ता ऊरकुन आम्ही 08:00 वाजता निघालो, घनदाट जंगलातुन जाताना झाडांच्या अधुन मधुन डोकावणारी सकाळची कोवळी सूर्य किरणे पाहत, पक्षांचे येणारे वेगवेगळे आवाज ऐकत, जंगलातुन जाताना दिसनारे फेसाळत पडणारे धबधबे व त्याचा आवाज तसेच बरेचसे लहान मोठे ओढे पार करत, वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाहत आम्ही चालत राहीलो. त्यातच पाऊस येत-जात होताजंगलातील चिखलमय रस्ता तुडवत मध्येच निसरडा रस्ता कापत आम्ही 45 ते 50 कि. मि. चा ट्रेक करून पावनखिंडपाशी नवीन बांधलेल्या ध्वजस्तंभापाशी पोहचलो, त्या ऊंच स्तंभावरून पावनखिंड व निसर्गरम्य असे वातावरण पाहून आम्ही 05:00 वाजता तयार केलेल्या लोखंडी शिडीवरून पावनखिंड मध्ये उतरलो, खिंड पाहून झाल्यानंतर दोन दिवसाचा ट्रेकचा थकवा दुर झाला व बरे वाटले. त्यानंतर आम्ही भाततळी या गावी गेलो व तेथुन कोल्हापुर गाडी पकडुन कोल्हापुर गाठले व लागोलग पुणे गाडी पकडुन पुण्याला परत आलो.

©सुशील राजगोळकर

 



















भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.