बागलाण - हरगड., मुल्हेर, मोरागड, साल्हेर व सालोटा | Baglan - Hargad, Mulher, Moragad, Salher & Salota 09 & 10-Dec-2023

'शिलेदार adventure इंडिया' यांचा आयोजनाप्रमाणे आम्ही बागलाण रेंज ट्रेक करायचे ठरवले त्या प्रमाणे दिनांक ०८-१२-२०२३ रोजी रात्री मी पुण्याहून व अजित मुबई वरून येणार होता. आम्ही दोघे व सर्व शिलेदार टीम मेंबर्स नाशिक येथे एकत्र जमलो व तेथून पुढे आम्हा २४ जणांचा दोन दिवसांचा भटकंतीचा प्रवास चालू झाला. ०९-१२-२०२३ रोजी आम्ही सकाळी ०६:०० वाजता किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या मुल्हेर या गावी 🏘️ कुणाल सोनवाने (९०२१२५२२२८) यांचा घरी पोहोचलो, तेथे ताजेतवाने होऊन नाष्टा 🍝 केला व गावातुन थोडे पुढे गडाकडे जाणारा पायवाटेजवळ आलो. 

आणि ०८:१५ वाजता सर्व मेंबर्सने एकमेकांचा परिचय करून घेतला व पहिल्या दिवशी बागलाण मधील डोलबारी डोंगररांगेतील हरगड, मुल्हेर व मोरागड अशा तीन किल्यांच्या रेंज ट्रेकने सुरवात केली. मुल्हेरवाडी येथून हरगड, मुल्हेर व मोरागड स्पष्ट दिसत होते. सुरुवातीला सकाळी हरगड व दुपारी मुल्हेर व मोरागड करून संध्याकाळ पर्यंतखाली यायचे याच नियोजना प्रमाणे आम्ही ट्रेक चालू केला.

"हरगड"

पार्किंग पासून थोडे अंतर चालून येता आम्ही मुल्हेर माची वरील आता संवर्धन केलेल्या दरवाजा व तटबंधी पाशी येऊन पोहचलो. तेथे पहिल्या दरवाजासमोर दगडावरती कोरलेला हनुमान व गणपती पाहायला मिळाला. त्या तटबंधीवरून बागलाण विभागातील सैलबारी डोंगररांगेतील मांगी, तुंगी, तांबोळया व न्हावीगड ⛰️ हे किल्ले दिसत होते तसेच हे किल्ले पुढे दोन्ही दिवस भटकंती मध्ये कायम आमच्या सोबत होते.

पुढे आम्ही मुल्हेरमाची येथील तलावाकाठी असलेल्या गणेश मंदिर 🛕 येथे येऊन पोहचलो. हे मंदिर पूर्ण पाषाणामध्ये बांधलेले दिसते व गाभाऱ्यामध्ये गणेश मूर्ती सोबतच शिवलिंग देखील आहे. हे मंदिर इतिहासाची साक्ष देत अजूनही आपली भव्यता व कलाकुसर जपून आहे. मंदिरासमोरील तलावामध्ये पूर्ण पानझडी उगवलेली दिसली. मंदिर पाहून मंदिराच्या समोरून पुढे आलो तेथे एक देवीचे लहान मंदिर पाहायला मिळाले. तेथून उजवीकडे निघालो समोरच एक मोठा कोरडा तलाव व एक पाण्याचे टाके पाहायला मिळाले.


मुल्हेर माची वरील पहिल्या दरवाजा समोरील कोरीव हनुमान व गणपती
मुल्हेर माची वरील पहिल्या दरवाजा समोरील कोरीव हनुमान व गणपती
मुल्हेर माची वरील तलावा काठीला गणेश मंदिर
मुल्हेर माची वरील तलावा काठीला गणेश मंदिर
मुल्हेर माची वरील देवीचे मंदिर
मुल्हेर माची वरील देवीचे मंदिर

पुढे दोन दरवाजे पार करून मुल्हेर व हरगड ला जोडणाऱ्या खिंडी मध्ये येऊन पोहचलो. तेथील अवशेष पाहून लक्षात आले की किल्ल्यांच्या सुरक्षिततेसाठी खिंड बांधून घेतलेली होती व खिंडीत एक दरवाजा देखील होता. खिंडीतून हरगडची तुटलेल्या पायऱ्यांची वाट व चोर दरवाजा दिसला. पण तेथून आता गडावरती जाणे सुरक्षित नाही त्यामुळे आम्ही खिंड पारकरून पलीकडील / पुर्व दिशेला आलो व उजव्या हाताला हरगड ठेऊन घनदाट झाडांचा सावलीतील घळी मधून हरगड चढायला सुरवात केली. हि लांब पल्ल्याची वाट चढत होतो एका दरवाजाचा पुढे हनुमान कोरलेला पाहायला मिळाला व तिन्ही भग्नावस्थेतील दरवाजे पार करत हरगड किल्याचा माथ्या वरती येऊन पोहचलो.
हरगड व मुल्हेर गड ला जोडणारी खिंड
हरगड व मुल्हेर गड ला जोडणारी खिंड  

मुल्हेर माची वरून दिसणारा हरगड
मुल्हेर माची वरून दिसणारा हरगड 

भग्नावस्थेतील दरवाजा जवळील हनुमान - हरगड
भग्नावस्थेतील दरवाजा जवळील हनुमान - हरगड 

भग्नावस्थेतील दरवाजा - हरगड
भग्नावस्थेतील दरवाजा - हरगड 

माथ्यावरती समोरच असलेले महादेव मंदिर 🛕व त्या समोरील उभ्या दगडावर असलेला हनुमान पाहून मंदिरामागील दिशेने गडाला फेरा चालू केला. पुढे पाण्याचा तलाव, टाके व अवशेष पाहून माघारी आलो व उत्तर दिशेला निघालो तेथे काही बांधकामाचे अवशेष व एक किल्ल्यावरील आकर्षण असलेली १४ फुटी भव्य मोठी अशी 'हजारबगादी तोफ'  पाहिली, ही इतकी मोठी तोफ किल्ल्यावरती कशी आणली हे एक कोडेच आहे. पुढे ज्या मार्गी आलो त्या मार्गी गड उतरायला माघारी फिरलो व १२:३० वाजता पठारावरती येऊन पोहचलो. तेथे जेवण केले व थोडी विश्रांती घेऊन खिंडीतील दरवाजा पार करून मुल्हेर गडाकडे कूच केले.

महादेव मंदिर - हरगड
महादेव मंदिर - हरगड 

महादेव मंदिर समोरील हनुमान - हरगड
महादेव मंदिर समोरील हनुमान - हरगड 

पाण्याचे टाके व अवशेष - हरगड
पाण्याचे टाके व अवशेष - हरगड

हजारबगादि तोफ - हरगड
हजारबगादि तोफ - हरगड



"मुल्हेर" ⛰️

"मुल्हेर माची" हि हरगड, मुल्हेर व मोरागड या तीन किल्ल्यांना जोडणारी मुख्य माची आहे. हरगड कडून पुढे मुल्हेर कडे जाताना माची वरती खाली न येता वरून एक वाट मुल्हेर गडाकडे जाते त्या वाटेने आम्ही पुढे निघालो, वाटेत जुन्या दगडी पायऱ्या लागल्या. हि वाट घनदाट झाडांनी वेढलेली व घळीतून जाते त्यामुळे हि वाट लांबून दिसत नाही. हि वाट चालून पुढे येताच गडाच्या पहिल्या दरवाजाआधी एका कातळामध्ये हनुमान कोरलेला पाहायला मिळाला. हा हनुमान शेंदूर लावलेला असल्याने माचीवरती प्रवेश करतांना व हरगडकडे जाताना दिसत होता.
घळीतून मुल्हेर गडावरती जाणारी वाट - मुल्हेर
घळीतून मुल्हेर गडावरती जाणारी वाट - मुल्हेर

मुल्हेर गडाचा वाटेवरती असलेला हनुमान - मुल्हेर
मुल्हेर गडाचा वाटेवरती असलेला हनुमान - मुल्हेर

पुढे आणखीन एक दरवाजा पार करून समोर आल्यानंतर पाण्याचे टाके व उजव्या हाताला असलेल्या गुहा पाहिला व पुढे भग्नावास्थेत असलेले आणखीन दोन दरवाजे पारकरून मुल्हेर गडाचा माथा वरती येऊन पोहचलो. उजव्या हाताला असलेल्या सात पाण्याचा टाक्या पाहून पूर्वेकडे / मोरागडाचा दिशेनं चालू लागलो. येथून मोरागडचा पायऱ्या स्पष्ट दिसत होत्या.

मुल्हेर गडाचा दरवाजा - मुल्हेर
मुल्हेर गडाचा दरवाजा - मुल्हेर

मुल्हेर गडावरील गुहा - मुल्हेर
मुल्हेर गडावरील गुहा - मुल्हेर


मुल्हेर गडाचा दरवाजा - मुल्हेर
मुल्हेर गडाचा दरवाजा - मुल्हेर

पाण्याचा टाक्या - मुल्हेर
पाण्याचा टाक्या - मुल्हेर

मुल्हेर गडावरील अवशेष
मुल्हेर गडावरील अवशेष

मुल्हेर गडावरून दिसणारा मोरागड
मुल्हेर गडावरून दिसणारा मोरागड
पुढे एका झाडाखाली असलेल्या भडंगनाथ मंदिरा 🛕पाशी आलो. हे लहानशे मंदिर झाडाचा पारावरती बांधलेले आहे त्या मंदिरा जवळ एका दगडामध्ये पादुका, शिवलिंग व एक शिलालेख देखील पाहायला मिळाला. मंदिरासमोर उभे राहिल्यास डाव्या बाजूला असलेल्या दोन मोठया पाण्याच्या टाक्या पाहिल्या व माघारी मंदिराजवळ आलो. व पुढे मंदिराच्या समोरील बाजूने चालायला सुरवात केली व पुढील निमुळती वाट पार करून बुरुजावरती आलो व तेथे असलेल्या दरवाजापाशी दगड कोसळून वाट थोडी अवघड आहे ती पार करून मुल्हेर व मोरागडला जोडणाऱ्या खिंडीपाशी येऊन पोहचलो. इथे उजव्या हाताला एक पाण्याचे टाके पाहायला मिळाले तेथून पुढे बुरुजावरती जाणारी वाट दगड कोसळून बंद झालेली होती. हि खिंड बांधून घेतलेली आहे पण सध्या त्याची पूर्ण पडझड झालेली पाहायला मिळाली.

भडंगनाथ मंदिर - मुल्हेर
भडंगनाथ मंदिर - मुल्हेर

भडंगनाथ मंदिर येथील शिलालेख - मुल्हेर
भडंगनाथ मंदिर येथील शिलालेख - मुल्हेर


भडंगनाथ मंदिर शेजारील पाण्याचा टाक्या - मुल्हेर
भडंगनाथ मंदिर शेजारील पाण्याचा टाक्या - मुल्हेर

भडंगनाथ मंदिर शेजारील पाण्याचा टाक्या - मुल्हेर
भडंगनाथ मंदिर शेजारील पाण्याचा टाक्या - मुल्हेर

मुल्हेर गडाचा शेवटचा दरवाजा इथून दिसणाऱ्या मोरागडाचा पायऱ्या
मुल्हेर गडाचा शेवटचा दरवाजा इथून दिसणाऱ्या मोरागडाचा पायऱ्या 


"मोरागड" ⛰️
मोरागडला मुल्हेर माचीवरून एक वाट येते ती वाट देखील मुल्हेर व मोरागडला जोडणाऱ्या खिंडी मध्ये येऊन मिळते. तेथे असलेल्या मोरागडचा दरवाजाचे अवशेष स्पष्ट पाहायला मिळतात पण हे दरवाजे पूर्णपणे दगड पडुन झाकले गेलेले पाहीले. पुढे आम्ही कातळामध्ये खोदून बनवलेल्या पायऱ्यांच्या साहाय्याने मोरागड चढायला घेतला. पायऱ्यांच्या शेवटी दगडामध्ये बांधून घेतलेला दरवाजा आहे या दरवाजावरती एका बाजूला हनुमान व एका बाजूला गणपती कोरलेला पाहायला मिळाला.
मोरागडचा कातळ खोदीव पायऱ्या
मोरागडचा कातळ खोदीव पायऱ्या 

मोरागडचा दरवाजा वरील गणपती
मोरागडचा दरवाजा वरील गणपती

मोरागचा दरवाजा वरील हनुमान
मोरागचा दरवाजा वरील हनुमान

कातळ खोदिव पायऱ्या चढून थोडे वरती आल्यानंतर दोन गुहा पाहायला मिळाल्या त्यानंतर एका लहान दरवाजा मधून आम्ही गडाचा माथा वरती प्रवेश केला. पुढे असलेले पाण्याचे टाके, तलाव, एकत्र असलेले दोन लहान पाण्याचे टाके पाहून गड उतरायला घेतला. कातळामधील पायऱ्या उतरून आम्ही खिंडीमध्ये आलो व मुल्हेर माचीकडे निघालो, थोडेच अंतर खाली येऊन मागे वळून पाहता मुल्हेर व मोरागड ला जोडणाऱ्या या खिंडीचे बुरुज व तटबंधीचा बांधकामाने किती भरभक्कम सुरक्षितता दिली आहे ते कळले.
दरवाजा व पायऱ्या - मोरागड
दरवाजा व पायऱ्या - मोरागड

बांधीव तलाव  - मोरागड
बांधीव तलाव  - मोरागड

पाण्याचे टाके - मोरागड
पाण्याचे टाके - मोरागड

पाण्याचे टाके - मोरागड
पाण्याचे टाके - मोरागड

ही घळीची वाट उतरून आम्ही माचीवरती आलो येथे श्री सोमेश्वर मंदिर पाहिले या मंदिराचे पूर्ण बांधकाम हे दगडामध्ये केलेले आहे, मंदिरा 🛕 मध्ये नंदी आहे नंदीचा समोरून गाभाराचा दरवाजातून आतमध्ये येता तेथील एका लहान खिडकी मधून शिवलिंग 🕉️ दिसते पण शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी बाजूने जाणाऱ्या पायऱ्या उतरून गाभाऱ्या मध्ये जावे लागते. गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतले व मंदिराचा बाहेरून फेरा मारला. मंदिराचा बाहेर मुख्य गाभाऱ्याच्या बाजूला असेलेले आणखीन एक शिवलिंग, गणेश मूर्ती व हनुमानचे दर्शन घेतले. या मंदीराच्या बाजूला दोन तोफा सवंर्धन करून ठेवलेल्या पाहायला मिळाला. पुढे सकाळी जेथून ट्रेक ला सुरवात केली त्या ठिकाणी संध्याकाळी ०६:०० वाजता येऊन पोहचलो व फ्रेश होऊन कुणाल सोनवने यांचा घरी रात्रीचे जेवण केले 🍱 व मुक्कामा साठी वाघांबे या गावी आलो.

श्री सोमेश्वर मंदिर - मुल्हेर माची
श्री सोमेश्वर मंदिर - मुल्हेर माची

श्री सोमेश्वर मंदिरातील शिवलिंग - मुल्हेर माची
श्री सोमेश्वर मंदिरातील शिवलिंग - मुल्हेर माची

श्री सोमेश्वर मंदिरा बाहेरील गणपती - मुल्हेर माची
श्री सोमेश्वर मंदिरा बाहेरील गणपती - मुल्हेर माची

श्री सोमेश्वर मंदिरा बाहेरील शिवलिंग - मुल्हेर माची
श्री सोमेश्वर मंदिरा बाहेरील शिवलिंग - मुल्हेर माची

श्री सोमेश्वर मंदिरा जवळील तोफा - मुल्हेर माची
श्री सोमेश्वर मंदिरा जवळील तोफा - मुल्हेर माची


"साल्हेर" ⛰️
दुसऱ्या दिवशी १०-१२-२०२३ पहाटे लवकर उठून आवरले व वाघांबे वरून साल्हेर या गावी आलो. सकाळी ०७:०० वाजता गडकिल्यांमधील सर्वात उंच किल्ला असलेला "साल्हेर" किल्ल्याचा ट्रेक चालू केला. तेंव्हाच सूर्योदय झाला होता त्या रम्य सकाळी आम्ही साल्हेर किल्ला चढायला घेतला. थोडे अंतर चालून येता कातळातील पायऱ्या चालू झाल्या. त्या पायऱ्या पार करून पुढे येता किल्याचा पहिला दरवाजा लागला, तेथून आतमध्ये येता तटबंधी वरून जाणारी वाट व दुसरा दरवाजा नजरेसमोर आला. दुसरा दरवाजा मधून आत येता, तिसऱ्या दरवाजा समोरच आहे पण तेथे वळसा मारून जावे लागते. तिसऱ्या दरवाजाच्या इथे उजव्या बाजूला एक शिलालेख कोरलेला आहे. आता या तिन्ही दरवाजाचा येथे संवर्धन करून बुरुज व तटबंधी बांधून घेतलेली पाहायला मिळाली.

साल्हेर गावातून चालताना दिसणारा साल्हेर किल्ला
साल्हेर गावातून चालताना दिसणारा साल्हेर किल्ला 


साल्हेर किल्याचा पहिला दरवाजा
साल्हेर किल्याचा पहिला दरवाजा

साल्हेर किल्याचा दुसरा दरवाजा
साल्हेर किल्याचा दुसरा दरवाजा
साल्हेर किल्याचा तिसरा दरवाजा वरील शिलालेख
साल्हेर किल्याचा तिसरा दरवाजा वरील शिलालेख



पुढे किल्ला पूर्व दिशेला ठेऊन उजव्या बाजूने थोडे वरील दिशेला चालत आलो. येथे कातळात खोदून बनवलेल्या पायऱ्या व तीन दरवाजे पार करून साल्हेर किल्याच्या गडमाथावरती येऊन पोहचलो. पुढे बरेच अंतर चालून आल्यानंतर एक पाण्याचे टाके व यज्ञकुंड लागले तेथे थोडी विश्रांती घेतली व पुढे चालून आलो. तेथे गंगासागर तलाव दिसत होता पण आम्ही त्या आधीच परशुराम मंदिराकडे जायचे व येतांना येथील सर्व पाहायचे असे ठरून उजव्या हाताला वरील दिशेने चालून गेलो व काही वेळात किल्ल्याचा वरील माथा वरती येऊन पोहचलो, तेथून परशुराम मंदिर स्पष्ट दिसू लागले व ०९:३० वाजता आम्ही "सह्याद्रीतील सर्वोच किल्याचा माथा - साल्हेरचा माथा" गाठला.
येथे मंदिरा मध्ये परशुरामाची मूर्ती 🛕 व पादुका आहेत, तेथून पूर्वेकडे मांगी, तुंगी, तांबोळया, न्हावीगड, मुल्हेरगड, हरगड व  मोरागड दिसत होते तर सालोटा अगदी नजरे समोर होता व सालोटाचा⛰️ मार्ग इथून दिसत होता.


कातळ खोदीव पायऱ्या - साल्हेर
कातळ खोदीव पायऱ्या - साल्हेर

पाण्याचे टाके - साल्हेर
पाण्याचे टाके - साल्हेर

यज्ञकुंड -  साल्हेर
यज्ञकुंड -  साल्हेर

परशुराम मंदिर कडे जातांना व मागे दूरवर गंगासागर तलाव - साल्हेर
परशुराम मंदिर कडे जातांना व मागे दूरवर गंगासागर तलाव - साल्हेर

परशुराम मंदिर कडे जातांना - साल्हेर
परशुराम मंदिर कडे जातांना - साल्हेर

साल्हेरचा सर्वोच माथा वरील परशुराम मंदिर - साल्हेर
साल्हेरचा सर्वोच माथा वरील परशुराम मंदिर - साल्हेर

परशुराम मंदिराचा गाभारा - साल्हेर
परशुराम मंदिराचा गाभारा - साल्हेर

परशुराम मंदिर इथून दिसणारा सालोटा गड - साल्हेर
परशुराम मंदिर इथून दिसणारा सालोटा गड - साल्हेर


परशुराम मंदिरा जवळ थोडी विश्रांती घेतली व मग माथा उतरून गंगासागर तलावापाशी आलो. तेथे एक मोठी गुहा पाहायला मिळाली, गुहे मध्ये एक हनुमानाची मूर्ती पाहिली. गुहे समोरील दिशेला गंगासागर तलावाला लागून रेणुका मातेचे मंदिर पाहिले, मंदिराचा गाभाऱ्या मध्ये रेणुका मातेची व गणपतीची मूर्ती आहे 🛕 तेथे नतमस्तक झालो. या मंदिराचा खांबा वरती छान नक्षीकाम केलेले पाहीले तर मंदिराला खिडकी आहे त्यामधुन पूर्ण गंगासागर तलावा दिसत होता. तलावाचा बाजूला दोन पाण्याचा टाक्या देखील आहेत ते सर्व पाहून आम्ही पुढे चालून आलो. तेथे वाडाचे अवशेष पाहायला मिळाले या वाड्याचा बुरुजांच्या अवशेषा वरून वाड्याची भव्यंता खुप होती असे लक्षात आले. वाड्याचा पुढे भाग्नावास्तेथील हनुमान, गोमुख व इतर अवशेष पाहायला मिळाले.

गंगासागर तलावा जवळील गुहा - साल्हेर

गुहेतील हनुमान - साल्हेर
गुहेतील हनुमान - साल्हेर

रेणुका मातेचा मंदिरातील गाभारा - साल्हेर
रेणुका मातेचा मंदिरातील गाभारा - साल्हेर


रेणुका मातेचे मंदिर - साल्हेर
रेणुका मातेचे मंदिर - साल्हेर

गंगासागर तलाव - साल्हेर
गंगासागर तलाव - साल्हेर

गंगासागर तलावा शेजारील टाके - साल्हेर
गंगासागर तलावा शेजारील टाके - साल्हेर

वाड्याचे अवशेष - साल्हेर
वाड्याचे अवशेष - साल्हेर

भग्नावस्थेतील हनुमान व इतर अवशेष - साल्हेर
भग्नावस्थेतील हनुमान व इतर अवशेष - साल्हेर

पुढे आम्ही पहिला दरवाजा उतरून खाली आलो व डाव्या बाजूला नजरे समोर सालोटा ठेऊन साल्हेर चा पोटातील खूप साऱ्या गुहा, पाण्याचा टाक्या, कोठारे पाहत पुढे आलो तेथे दुसरा दरवाजा लागला व आणखीन काही पायऱ्या उतरून आल्या नंतर तिसरा दरवाजा लागला त्याचा अगदी समोर एक शिलालेख कोरलेला पाहायला मिळाला. इथून पुढे कातळातील खोदीव पायऱ्यांची वाट संपवून आम्ही उजव्या हाताला वळलो व चौथा दरवाजा पार करून थोडे पुढे येऊन डावीकडे वळून चालुन आलो आणि साल्हेर व सालोट्याला जोडणाऱ्या खिंडी मध्ये येऊन पोहचलो.

सालोटा गडाचा दिशेचा पहिला दरवाजा - साल्हेर
सालोटा गडाचा दिशेचा पहिला दरवाजा - साल्हेर

साल्हेर गडाचा पोटातील टाक्या व गुहा
साल्हेर गडाचा पोटातील टाक्या व गुहा

सालोटा गडाचा दिशेला उतरताना असलेला दुसरा दरवाजा - साल्हेर
सालोटा गडाचा दिशेला उतरताना असलेला दुसरा दरवाजा - साल्हेर


तिसरा दरवाजा येथील शिलालेख - साल्हेर
तिसरा दरवाजा येथील शिलालेख - साल्हेर

तिसरा दरवाजा इथून दिसणारा सालोटा - साल्हेर
तिसरा दरवाजा इथून दिसणारा सालोटा - साल्हेर

कातळ खोदीव पायऱ्या व तेथून दिसणारा सालोटा - साल्हेर
कातळ खोदीव पायऱ्या व तेथून दिसणारा सालोटा - साल्हेर


"सालोटा" ⛰️

साल्हेर वरून सालोटा गडाचा मार्ग पाहिला होता त्या प्रमाणे साल्हेर व सालोट्याला जोडणारा खिंडी मधून सालोटागड आमचा डावीकडे ठेऊन उजव्या दिशेने (माळदर गावाचा दिशेने) पुढे चालत आलो, व काही अंतर चालून आल्या नंतर डाव्या बाजूला वरील दिशेने चढायला चालू केले तेथील पायऱ्या पर्यंतची वाट ढासळून गेली आहे तेथील दोन अवघड पॅच चढून कातळातील खोदीव पायऱ्यांचा वाटेल येऊन पोहचलो. पुढील पायऱ्या पाहून थोडी भीतीच वाटली पायऱ्या चांगल्या गुढगाभर उंच आहेत त्या पायऱ्या चढत पुढे आलो. तेथे एक गुहा लागली व आणखीन काही पायऱ्या चढून आल्यावर पहिला दरवाजा लागला हा दरवाजा दगड पढुन झाकला गेला आहे त्यातून मार्ग काढत आम्ही वरती आलो त्या दरवाजा पाशी एक गुहा पाहीली तेथून पुढे कड्याचा पोटातून चालत दुसऱ्या दरवाजा पाशी आलो. 
सालोटा गडाची अवघड वाट
सालोटा गडाची अवघड वाट

सालोटा गडाचा कातळ खोदीव पायऱ्या
सालोटा गडाचा कातळ खोदीव पायऱ्या

सालोटा गडाचा दुसरा दरवाजा
सालोटा गडाचा दुसरा दरवाजा


दुसरा दरवाजाचा पुढे बऱ्याच गुहा व दोन पाण्याचा टाक्या पाहून सालोट्याचा कड्याला वळसा मारून समोर असलेला दरवाजा पार केला व गड माथा वरती आलो. माथा वरती एक पाण्याचे टाके लागेल तेथुन पुढे सरळ गेल्या नंतर एक हनुमानाचे मंदिर लागले ते पाहून वरील दिशेने सालोट्याचा शेवटचा माथा वरती आलो व तेथून साल्हेर व अत्युच्च शिखर पाहून माघारी फिरलो व माथ्याचा पायथ्याला असलेल्या टाक्यातील पाणी घेऊन आल्या वाटे गड उतरायला सुरवात केली व ०२:०० वाजता खिंडी मध्ये येऊन पोहचलो.

पाण्याचे टाके - सालोटा
पाण्याचे टाके - सालोटा

गुहा - सालोटा
गुहा - सालोटा
हनुमान मंदिर - सालोटा
हनुमान मंदिर - सालोटा

सालोटा गडाचा माथ्या वरून दिसणारा साल्हेर
सालोटा गडाचा माथ्या वरून दिसणारा साल्हेर

आमची गाडी व जेवणाची वेवस्था वाघांबे गावात असल्याने आम्ही त्या दिशेने चालत आलो व ०३:३० वाजता येऊन वाघांबे येथे पोहचलो. या दोन दिवसाचा भटकंती मध्ये प्रकषाने जाणवलेली कि इतक्या कातळ खोदीव पायऱ्या या किल्ल्यांना खूप मोठा प्रमाणामध्ये आहेत व तसेच मोठा तलाव व टाक्याचा मधोमध उभे खांब पाहायला मिळाले कदाचित पूर्वीच्या काळी पाण्याचा साठा मोजण्यासाठी किंवा अंदाज घेण्यासाठी असे खांब उभारले असावेत असे वाटते.
आम्हा सर्व २४ जणांनी या दोन दिवसांचा बागलाण विभागातील डोलबारी डोंगररांगेतील हरगड, मुल्हेर, मोरागड, साल्हेर व सालोटा असे पाच गडांची भटकंती पूर्ण केली.
त्या पैकी विशेष कौतुक म्हणजे डॉक्टर प्रतिभा व वंदना तेंडुलकर यांचे त्यांनी वयाचा एकष्टाव्या वर्षी न थकता इतका मोठा रेंज ट्रेक खूप आनंदाने पूर्ण केला.
या बागलाण ट्रेकचा आनंद व आठवणी घेऊन ट्रेकची सांगता केली आणि आम्ही परतीचा प्रवासा चालू केला व रात्री ०२:०० वाजता पुणे व मुंबईला पोहोचलो.

हजार बगादी तोफ हरगड येथे सर्व शिलेदार टीम मेंबर्स

"सह्यांद्रीतील सर्वोच किल्याचा माथा - साल्हेरचा माथा" येथे सर्व शिलेदार टीम मेंबर्स 

©सुशील राजगोळकर

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.