रोहिडा २६-जून-२०२१ ⛰️🧗🏼‍♂️🚩 ROHIDA 26-Jun-2021

दुपारी किल्लाचा पायथ्याला बाजारवाडी गांवामध्ये असलेल्या काळ्या पाषाणातील पुरातन शिव मंदिरा 🛕 मध्ये नमस्कार केला. व गावातील शाळेपाशी गाडी लावून रोहिडा किल्ला चढायला सुरवात केली. निम्मा किल्ला चडून येताच सुंदर असा सोसाट्याचा गार वारा सुटला होता. रोहिडा किल्ल्याचे बुरुज खूप लांबूनच लक्ष वेधून घेतात. किल्ला चढताना देखील दिसणारे बुरुज मन मोहून घेतात. तसेच डाव्या बाजूला केंजळगड स्पष्ट दिसत होता.आम्ही आधी २ गड केल्या मुळे सावकाश किल्ला चढत होतो.

पुरातन मंदिरातील शिवलिंग - बाजारवाडी
पुरातन मंदिरातील शिवलिंग - बाजारवाडी

काळ्या पाषाणातील पुरातन मंदिराची आतील बाजू - बाजारवाडी
काळ्या पाषाणातील पुरातन मंदिराची आतील बाजू - बाजारवाडी

काळ्या पाषाणातील पुरातन मंदिर व मागे दिसत असलेला रोहिडा किल्ला - बाजारवाडी
काळ्या पाषाणातील पुरातन मंदिर व मागे दिसत असलेला रोहिडा किल्ला - बाजारवाडी

रोहिडा किल्ला
रोहिडा किल्ला

पहिल्या दरवाजाला अता छानसा लाकडी दरवाजा बसवलेला आहे. पहिल्या दरवाजा ते दुसऱ्या दरवाजा पर्यंत दगडी पायऱ्या पहायला मिळतात. दुसऱ्या दरवाजातून आत मध्ये येताच उजव्या बाजूला एक पिण्याचा पाण्याचे टाके आहे. ते पाहून आम्ही तेथील वरचा बाजूनी असलेला बुरुजा सारखा भाग पाहून पुढे काही पायऱ्या चालून गेलो. तेथे किल्याचा तिसरा दरवाजा लागला दरवाजा वरती शिलालेख व हत्तीचे शीर पाहायला मिळाले.

रोहिडा किल्लाचा पहिला दरवाजा
रोहिडा किल्लाचा पहिला दरवाजा

रोहिडा किल्लाचा पहिला दरवाजाचा आतील बाजू
रोहिडा किल्लाचा पहिला दरवाजाचा आतील बाजू

रोहिडा किल्लाचा पहिल्या व दुसऱ्या दरवाजा मधील पायऱ्या
रोहिडा किल्लाचा पहिल्या व दुसऱ्या दरवाजा मधील पायऱ्या

रोहिडा किल्लाचा दुसऱ्या दरवाजाचा आतील बाजू
रोहिडा किल्लाचा दुसऱ्या दरवाजाचा आतील बाजू

रोहिडा किल्लाचा दुसऱ्या दरवाजा येथील पाण्याचे टाके
रोहिडा किल्लाचा दुसऱ्या दरवाजा येथील पाण्याचे टाके

रोहिडा किल्लाचा तिसरा दरवाजा
रोहिडा किल्लाचा तिसरा दरवाजा

तेथून आत मध्ये शिरताच समोरच असलेले सदरेचे अवशेष पाहायला मिळाले, तेथून डावीकडे दिसत असलेल्या भैरवाचा मंदिरा मध्ये जाऊन दर्शन घेतले. 🛕 मंदिर मध्ये भैरव, भैरवी व गणपती या देवांची मूर्ती तर बाजूलाच असलेले शिवलिंगाला नमस्कार केला. मंदिरा मध्ये उत्खनना मध्ये सापडलेला लहानसा पण वजनदार शिशाचा गोळा ठेवलेला आहे तो उचलून पाहिला. मंदिरा समोर व बाजूला एक तलाव आहे. दुपारचा थंड वारा सुटला होता मग भुक खूप लागल्याने मंदिराचा समोरच बसून दुपारचे जेवण उरकले. मंदिरा जवळून कमळगड व केंजळगड ⛰️ दिसत होते.

रोहिडा किल्ला वरील मंदिरातील भैरव, भैरवी व गणपतीची मूर्ती.
रोहिडा किल्ला वरील मंदिरातील भैरव, भैरवी व गणपतीची मूर्ती.

रोहिडा किल्ला वरील मंदिरातील शिवलिंग.
रोहिडा किल्ला वरील मंदिरातील शिवलिंग.

रोहिडा किल्ला वरील मंदिरा शेजारील तलाव
रोहिडा किल्ला वरील मंदिरा शेजारील तलाव

पुढे मंदिराचा बाजूला खूप प्रमाणात असलेले वाड्याचे अवशेष पाहून मंदिराचा मागील बुरुजा कडे गेलो. व तेथून गडाचा पश्चिम दिशेने फेरा मारायला सुरवात केली. पुढे चुन्याचा घाणा पाहिला. थोडे पुढे येताच मोठया प्रमाणात असलेल्या जोड पाण्याचा टाक्या पाहिला. व पुढे असलेला एक बुरुज पाहून फत्ते बुरुज (वाघजाई बुरुज) पाशी येऊन पोहचलो. बुरुजा वरून लांब डोंगर रांगेचा सोंडे वरती असलेले वाघजाई मंदिर दिसते. तेथून माघारी फिरलो. अवशेष, तटबंधी, गुप्त दरवाजा व समोर असलेले २ बुरुज पाहून तिसऱ्या दरवाजा पाशी येऊन पोहचलो. व लगोलग गड उतरायला घेतला. गडाकडे मागे वळून पाहतांना गड हळूहळू धुक्याची चादर घेत आहे असे वाटले. 

रोहिडा किल्ला वरील वाड्याचे अवशेष
रोहिडा किल्ला वरील वाड्याचे अवशेष

रोहिडा किल्ला वरील बुरुज
रोहिडा किल्ला वरील बुरुज

रोहिडा किल्ला वरील चुन्याचा घाणा.
रोहिडा किल्ला वरील चुन्याचा घाणा.

रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.
रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.

रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.
रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.

रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.
रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.

रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.
रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.

रोहिडा किल्ला वरील फत्ते बुरुज (वाघजाई बुरुज)
रोहिडा किल्ला वरील फत्ते बुरुज (वाघजाई बुरुज)

रोहिडा किल्ला वरील गुप्त दरवाजा
रोहिडा किल्ला वरील गुप्त दरवाजा

रोहिडा किल्ला वरील बुरुज
रोहिडा किल्ला वरील बुरुज

रोहिडा किल्ला वरील भैरवाचे मंदिर व त्या समोरील तलाव
रोहिडा किल्ला वरील भैरवाचे मंदिर व त्या समोरील तलाव

रोहिडा किल्ला वरील बुरुज
रोहिडा किल्ला वरील बुरुज

धुक्यात हरवलेला रोहिडा किल्ला
धुक्यात हरवलेला रोहिडा किल्ला

मग आम्ही ५:०० वाजता बाजारवाडीतून भोर कडे निघालो, भोर मध्ये प्रत्येक वेळी पाहायचा राहिलेला श्रीमंत रघुनाथ शंकरराव पंडित पंतसचिव यांचा भव्य मोठा राजवाडा पाहिला 🏤. पुढे थर्मास मध्ये चहा भरून घेतला व संध्याकाळचा थंड वातावरण मध्ये भोर येथील नेकलेस पॉईंटचा निसर्गा मध्ये बसून चहा☕ पिण्याचा एक सुखद अनुभव घेतला. शूटिंग साठी प्रसिद्ध असलेला हा नेकलेस पॉईंट कित्येक मराठी व काही हिंदी सिनेमा मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशाप्रकारे दोन दिवसाचा आनंददायक भटकंती प्रवास  उरकून आम्ही रात्री ०९:०० वाजता घरी येऊन पोहचलो.

राजा रघुनाथराव राजवाडा समोरील तोफ
राजा रघुनाथराव राजवाडा समोरील तोफ 

राजा रघुनाथराव कमान - भोर
राजा रघुनाथराव कमान - भोर

भोर येथील श्रीमंत रघुनाथ शंकरराव पंडित पंतसचिव यांचा राजवाडा
भोर येथील श्रीमंत रघुनाथ शंकरराव पंडित पंतसचिव यांचा राजवाडा

नेकलेस पॉईंट भोर
नेकलेस पॉईंट भोर 

नेकलेस पॉईंट - भोर आणि संध्याकाळचा चहा
नेकलेस पॉईंट - भोर आणि संध्याकाळचा चहा

©सुशील राजगोळकर

पांडवगड २६-जून-२०२१ ⛰️🧗🏼‍♂️ PANDAVGAD 26-Jun-2021

दिवस दुसरा २६-जून-२०२१ सकाळी पहाटे ४:३० वाजता उठून आम्ही तंबू ⛺ वगैरे काढून आमची अवरा अवर केली. पण सकाळी बऱ्यापैकी पाऊस 🌧️ चालू होता. थोड्याच वेळात पाऊस थांबला आणि आम्ही ६:३० वाजता गुंडेवाडी येथे पोहोचलो. तेथेच आम्ही सकाळचा दूध बिस्किटाचा नाश्ता🧃🍪 केला. व अंकित नवघणे (+918237206953) यांच्याकडे आमच्या बॅग मधील काही साहित्य व तंबू ठेवून, दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिली व सकाळी ०७:०० वाजता पांडव गड चढायला सुरुवात केली.

पांडव गडाची वाट
पांडव गडाची वाट

पांडव गडाची वाट
पांडव गडाची वाट

चांगली मळलेली सकाळच्या पावसाने ओलसर झालेली घनदाट जंगलाची चढाईची वाट. सुरुवातीलाच काही अंतर चालून आलो इतक्यात लहानशा गवत्या सापाने आमची वाट आडवली. त्याला बाजूला करून प्रसन्न असे वातावरण 🏞️ व खूप साऱ्या मोरांचा 🦚 आवाज ऐकत आम्ही ८:३० वाजता गडावरती पोहोचलो. समोरच एक पाण्याचा तलाव पहायला मिळाला. तिथून उजव्या हाताला एक घर होते🏠 तेथे जाऊन चौकशी केली, तर तेथे मॅप्रो कंपनीचे ३ पहारेकरी कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. हा पांडवगड खाजगी मालकी हक्काचा आहे असे फलक गडावर ती बऱ्याच ठिकाणी लिहिलेले आहेत (मॅप्रो कंपनी).

पांडव गडावरील पाण्याचा तलाव
पांडव गडावरील पाण्याचा तलाव

तेथून पुढे पूर्वेकडील बाजूला चालायला सुरुवात केली एक लहान टाके व पुढे जाऊन सहा टाक्क्यांची एक मोठी जोड टाकी पाहायला मिळाली. तेथे एक मोठा खेकडा पाहीला. त्याचे फोटो घेऊन आम्ही त्याला पुन्हा पाण्याच्या टाक्यात सोडून दिले. तेथून पुढे जाता बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा व सुस्थितीत असलेला एक बुरुज पहायला भेटला. पुढे अजून एक दुसरा दरवाजा लागला तो पार करून पुढे चालून जाता एक हनुमानाचे मंदिर व त्याच्यासमोरच एक चुन्याचा घाणा पाहीला. पुढे थोडेसे पडक्या अवस्थेत असलेले पांडवजाई माता मंदिर पाहिले. मंदिरासमोर दोन पुरातन शिवलिंग व नंदी आहेत. पुढे जाऊन आम्ही गडावरून दिसणारा वैराटगड, केंजळगड, कमळगड, ⛰️ धोम धरण 🏝️ व वाई चा परिसर निहाळून माघारी फिरलो.

पांडवगडावरील पाण्याचे टाके
पांडव गडावरील पाण्याचे टाके

पांडव गडावरील ६ पाण्याच्या जोड टाक्या
पांडव गडावरील ६ पाण्याच्या जोड टाक्या

पांडव गडावरील पाण्याच्या टाक्यापाशी मिळालेला खेकडा
पांडव गडावरील पाण्याच्या टाक्यापाशी मिळालेला खेकडा

पांडव गडावरील ६ पाण्याच्या जोड टाक्यातील खांब असलेले एक टाके
पांडव गडावरील ६ पाण्याच्या जोड टाक्यातील खांब असलेले एक टाके

पांडवगड बाल्ले किल्याचा पहिला दरवाजा व बुरुज
पांडवगड बाल्ले किल्याचा पहिला दरवाजा व बुरुज

पांडवगड बाल्ले किल्याचा पहिला दरवाजा व बुरुजाची आतील बाजू
पांडवगड बाल्ले किल्याचा पहिला दरवाजा व बुरुजाची आतील बाजू

पांडव गडावरील हनुमान मंदिर
पांडव गडावरील हनुमान मंदिर

पांडव गडावरील हनुमानाची मूर्ती
पांडव गडावरील हनुमानाची मूर्ती

पांडव गडावरील चुन्याचा घाणा
पांडव गडावरील चुन्याचा घाणा

पांडव गडावरील पांडवजाई माता मंदिर
पांडव गडावरील पांडवजाई माता मंदिर

पांडव गडावरील पांडवजाई माता मंदिरा समोरील शिवलिंग व नंदी
पांडव गडावरील पांडवजाई माता मंदिरा समोरील शिवलिंग व नंदी

पांडवजाई मातेचि मूर्ती
पांडवजाई मातेचि मूर्ती

पांडवजाई मंदिराचा समोरील पादुका
पांडवजाई मंदिराचा समोरील पादुका

किल्ला चढून आल्यानंतर जेथे मोठे पाण्याचे टाके होते तेथूनच डाव्या बाजूला मेणावली कडून येणाऱ्या मार्गाने पुढे गेलो. समोर दोन पाण्याचे टाके तर आणखीन समोर गेल्यानंतर एक गुहा व दोन पाण्याची टाकी पाहायला मिळाली. तेथून पुढे थोडे खाली उतरून गेल्यानंतर गडाचा मेणवली दरवाजा व पायऱ्या पाहिल्या व माघारी फिरलो. व ज्या वाटेने आलो त्या वाटेने गड उतरायला सुरुवात केली. व ११:०० वाजता पायथ्याला येउन पोहोचलो. तेथे ताजे तवाने होऊन जेवण बांधून घेतले व मांढरदेवी-भोर घाट रस्त्याने हिरवीगार डोंगर रांग 🛣️ पाहत रोहिडा गडाच्या दिशेने निघालो.

पांडव गडावरील पाण्याचे टाके
पांडव गडावरील पाण्याचे टाके

पांडव गडावरील गुहेतून बाहेरील फोटो
पांडव गडावरील गुहेतून बाहेरील फोटो

पांडव गडावरील गुहा
पांडव गडावरील गुहा

पांडव गडावरील पाण्याचे टाके
पांडव गडावरील पाण्याचे टाके

पांडव गडाचा मेणवली कडील उध्वस्त दरवाजा
पांडव गडाचा मेणवली कडील उध्वस्त दरवाजा
पांडव गडाचा मेणवली कडील उध्वस्त दरवाजा येथून दिसणारा पांडवगड
पांडव गडाचा मेणवली कडील उध्वस्त दरवाजा येथून दिसणारा पांडवगड

©सुशील राजगोळकर

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.