पांडवगड २६-जून-२०२१ ⛰️🧗🏼‍♂️ PANDAVGAD 26-Jun-2021

दिवस दुसरा २६-जून-२०२१ सकाळी पहाटे ४:३० वाजता उठून आम्ही तंबू ⛺ वगैरे काढून आमची अवरा अवर केली. पण सकाळी बऱ्यापैकी पाऊस 🌧️ चालू होता. थोड्याच वेळात पाऊस थांबला आणि आम्ही ६:३० वाजता गुंडेवाडी येथे पोहोचलो. तेथेच आम्ही सकाळचा दूध बिस्किटाचा नाश्ता🧃🍪 केला. व अंकित नवघणे (+918237206953) यांच्याकडे आमच्या बॅग मधील काही साहित्य व तंबू ठेवून, दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिली व सकाळी ०७:०० वाजता पांडव गड चढायला सुरुवात केली.

पांडव गडाची वाट
पांडव गडाची वाट

पांडव गडाची वाट
पांडव गडाची वाट

चांगली मळलेली सकाळच्या पावसाने ओलसर झालेली घनदाट जंगलाची चढाईची वाट. सुरुवातीलाच काही अंतर चालून आलो इतक्यात लहानशा गवत्या सापाने आमची वाट आडवली. त्याला बाजूला करून प्रसन्न असे वातावरण 🏞️ व खूप साऱ्या मोरांचा 🦚 आवाज ऐकत आम्ही ८:३० वाजता गडावरती पोहोचलो. समोरच एक पाण्याचा तलाव पहायला मिळाला. तिथून उजव्या हाताला एक घर होते🏠 तेथे जाऊन चौकशी केली, तर तेथे मॅप्रो कंपनीचे ३ पहारेकरी कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. हा पांडवगड खाजगी मालकी हक्काचा आहे असे फलक गडावर ती बऱ्याच ठिकाणी लिहिलेले आहेत (मॅप्रो कंपनी).

पांडव गडावरील पाण्याचा तलाव
पांडव गडावरील पाण्याचा तलाव

तेथून पुढे पूर्वेकडील बाजूला चालायला सुरुवात केली एक लहान टाके व पुढे जाऊन सहा टाक्क्यांची एक मोठी जोड टाकी पाहायला मिळाली. तेथे एक मोठा खेकडा पाहीला. त्याचे फोटो घेऊन आम्ही त्याला पुन्हा पाण्याच्या टाक्यात सोडून दिले. तेथून पुढे जाता बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा व सुस्थितीत असलेला एक बुरुज पहायला भेटला. पुढे अजून एक दुसरा दरवाजा लागला तो पार करून पुढे चालून जाता एक हनुमानाचे मंदिर व त्याच्यासमोरच एक चुन्याचा घाणा पाहीला. पुढे थोडेसे पडक्या अवस्थेत असलेले पांडवजाई माता मंदिर पाहिले. मंदिरासमोर दोन पुरातन शिवलिंग व नंदी आहेत. पुढे जाऊन आम्ही गडावरून दिसणारा वैराटगड, केंजळगड, कमळगड, ⛰️ धोम धरण 🏝️ व वाई चा परिसर निहाळून माघारी फिरलो.

पांडवगडावरील पाण्याचे टाके
पांडव गडावरील पाण्याचे टाके

पांडव गडावरील ६ पाण्याच्या जोड टाक्या
पांडव गडावरील ६ पाण्याच्या जोड टाक्या

पांडव गडावरील पाण्याच्या टाक्यापाशी मिळालेला खेकडा
पांडव गडावरील पाण्याच्या टाक्यापाशी मिळालेला खेकडा

पांडव गडावरील ६ पाण्याच्या जोड टाक्यातील खांब असलेले एक टाके
पांडव गडावरील ६ पाण्याच्या जोड टाक्यातील खांब असलेले एक टाके

पांडवगड बाल्ले किल्याचा पहिला दरवाजा व बुरुज
पांडवगड बाल्ले किल्याचा पहिला दरवाजा व बुरुज

पांडवगड बाल्ले किल्याचा पहिला दरवाजा व बुरुजाची आतील बाजू
पांडवगड बाल्ले किल्याचा पहिला दरवाजा व बुरुजाची आतील बाजू

पांडव गडावरील हनुमान मंदिर
पांडव गडावरील हनुमान मंदिर

पांडव गडावरील हनुमानाची मूर्ती
पांडव गडावरील हनुमानाची मूर्ती

पांडव गडावरील चुन्याचा घाणा
पांडव गडावरील चुन्याचा घाणा

पांडव गडावरील पांडवजाई माता मंदिर
पांडव गडावरील पांडवजाई माता मंदिर

पांडव गडावरील पांडवजाई माता मंदिरा समोरील शिवलिंग व नंदी
पांडव गडावरील पांडवजाई माता मंदिरा समोरील शिवलिंग व नंदी

पांडवजाई मातेचि मूर्ती
पांडवजाई मातेचि मूर्ती

पांडवजाई मंदिराचा समोरील पादुका
पांडवजाई मंदिराचा समोरील पादुका

किल्ला चढून आल्यानंतर जेथे मोठे पाण्याचे टाके होते तेथूनच डाव्या बाजूला मेणावली कडून येणाऱ्या मार्गाने पुढे गेलो. समोर दोन पाण्याचे टाके तर आणखीन समोर गेल्यानंतर एक गुहा व दोन पाण्याची टाकी पाहायला मिळाली. तेथून पुढे थोडे खाली उतरून गेल्यानंतर गडाचा मेणवली दरवाजा व पायऱ्या पाहिल्या व माघारी फिरलो. व ज्या वाटेने आलो त्या वाटेने गड उतरायला सुरुवात केली. व ११:०० वाजता पायथ्याला येउन पोहोचलो. तेथे ताजे तवाने होऊन जेवण बांधून घेतले व मांढरदेवी-भोर घाट रस्त्याने हिरवीगार डोंगर रांग 🛣️ पाहत रोहिडा गडाच्या दिशेने निघालो.

पांडव गडावरील पाण्याचे टाके
पांडव गडावरील पाण्याचे टाके

पांडव गडावरील गुहेतून बाहेरील फोटो
पांडव गडावरील गुहेतून बाहेरील फोटो

पांडव गडावरील गुहा
पांडव गडावरील गुहा

पांडव गडावरील पाण्याचे टाके
पांडव गडावरील पाण्याचे टाके

पांडव गडाचा मेणवली कडील उध्वस्त दरवाजा
पांडव गडाचा मेणवली कडील उध्वस्त दरवाजा
पांडव गडाचा मेणवली कडील उध्वस्त दरवाजा येथून दिसणारा पांडवगड
पांडव गडाचा मेणवली कडील उध्वस्त दरवाजा येथून दिसणारा पांडवगड

©सुशील राजगोळकर

12 comments:

  1. छान वर्णन ...

    ReplyDelete
  2. खूप छान आणि वैशिष्टपूर्ण आणि विस्तारपूर्वक स्पष्टीकरण

    ReplyDelete
  3. Hero!
    Mera time kab ayenga?
    Fantastic clicked snaps and simple, effective blogspot.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद हिरो 🙏🏻🙏🏻

      Delete
  4. एकदा तरी सोबत घ्या आम्हाला.
    तुमच्या पुढील प्र वा सा साठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन...

    ReplyDelete
  5. खुप छान प्रवास वर्णन. असेच पुढील नवनवीन गड किल्ले यांच्या प्रवासवर्णनाची प्रतीक्षा

    ReplyDelete
  6. खुप छान.... वाचताना गडावरच आहे असे वाटले....पुढच्या ट्रेक साठी शुभेच्छा 👍👍

    ReplyDelete

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.