सातारा भाग १/३ : दातेगड (सुंदरगड) | वसंतगड । Dategad (Sundargad) | Vasantgad ⛰️🚩 14-Sept-2024

१४ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर असे ०४ दिवस सुट्टी होती. त्यामुळे सातारा विभागातील गड किल्ले व इतर भटकंतीला जायचे असे ठरवून अजित व मी वेळ मिळेल त्या नुसार ०८ दिवस आधी केंव्हा, कोणते गड व ईतर काय पाहायचे याचे नियोजन आखात होतो. सातारा मधील सर्व गड तसे जवळ जवळ होते फक्त दातेगड मात्र जरा लांब होता त्यामुळेच थोडे नियोजन आखताना ताळमेळ बसत न्हवता. शेवटी दातेगड आमचा नियोजन मधील मुख्य ठरवून सुरवात दातेगड पासून करायची असे ठरवले व त्या नुसार नियोजन करून अजित १३ सप्टेंबर शुक्रवारी मुंबई हुन माझाकडे आला.
 
दिवस पहिला, शनिवार १४-सप्टेंबर-२०२४
नियोजना प्रमाणे आम्ही १४ सप्टेंबर रोजी पहाटे ०५:०० वाजता पुणे सोडले 🛣️ 🚗 व सातारा-पाटणचा दिशेने निघालो. वाटेमध्ये एकदा पेट्रोल पंप ⛽ जवळ थांबून सरळ पाटण गाठले. पाटण ते टोलेवाडी साठी जाणाऱ्या रस्त्याची चौकशी करून पुढे निघालो. पाटण ते टोलेवाडी हा घाट रस्ता आता नव्याने बनवण्यात आला आहे असे समजले. आणि आम्ही पुढे निघालो पण जेमतेम एक गाडी जाईल इतका असा अरुंद घाट व मध्येच दरड कोसळून रस्ता खराब व अवघड बनला होता. सावधगिरीने कार चालवत आम्ही १०:३० वाजता दातेगड किल्याचा पायथ्याला हॉटेल सुंदरगड येथे येऊन पोहचलो. तेथे नाश्ता केला व चौकशी करून गड चढायला घेतला. 
 
हॉटेल सुंदरगड व मागे सुंदरगड (दातेगड)

हॉटेल सुंदरगड व मागे सुंदरगड (दातेगड)

दातेगड (सुंदरगड) । Dategad (Sundargad) ⛰️
हॉटेल सुंदरगडचा बाजूने मळलेल्या पायवाटेणे १०:०० मिनिटा मध्ये दक्षिण दिशेचा पडझड झालेल्या दरवाजा मधून गडावरती प्रवेश केला. गडावरती प्रवेश करता प्रसन्न आशा सकाळचा वातावरणा मध्ये फुलेली रानफुले 🪻🥀 पाहून मन प्रसन्न झाले. पुढे डाव्या बाजूला असलेली तटबंधी व अवशेष पाहून मुख्य दरवाजातून गडावरती येणाऱ्या कातळ खोदीव पायऱ्यापाशी आलो. त्या पायऱ्या उतरून खाली आलो. तेथे बलदंड अशी साधारण ८ फुटाची हनुमानाची मूर्ती व बाजूला एक मोठी गणपतीची मूर्ती पहायला मिळाली 🛕. त्या गणपती मूर्तीचे कान मात्र वेगळे फुलांचा पाकळ्या सारखे कोरलेले पाहायला मिळाले. तेथे पडझड झालेला गडाचा मुख्य दरवाजा व देवड्या पाहून गडा बाहेर आलो. पूर्वी या दरवाजा व मुर्त्यांचा वरती छपरं असावे से अवशेष दिसतात. 
 
पडझड झालेला दरवाजातून गडावरती प्रवेश करतांना व रान फुले - दातेगड

पडझड झालेला दरवाजातून गडावरती प्रवेश करतांना व रान फुले - दातेगड

पडझड झालेला गडाचा मुख्य दरवाजा व गणपती - दातेगड
 पडझड झालेला गडाचा मुख्य दरवाजा व गणपती - दातेगड
दातेगडावरील हनुमान व गणपती
दातेगडावरील हनुमान व गणपती
हनुमान व कातळ खोदीव पायऱ्या - दातेगड
हनुमान व कातळ खोदीव पायऱ्या - दातेगड

मुख्य दरवाजा समोर बाजूला असलेली गुहा पाहिली व माघारी त्याच कातळ खोदीव पायऱ्या चढून गडावरती आलो. पुढे डाव्या बाजूला गडाचे आकर्षण असलेली तलवारीचा आकाराची विहिरीमध्ये उतरायला सुरवात केली🗡️🏟️. उतरतांना या पायऱ्या ०२ प्रकार मध्ये विभागलेल्या पाहायला मिळाल्या. एक बाजूला लहान लहान पायऱ्या तर एक बाजूला मोठया पायऱ्या. पायऱ्या उतरून खाली आलो तसे तेथे थंडावा जाणवू लागला. विहिरी मध्ये स्वच्छ नितळ पाणी होते. तसेच विहिरीत एक बाजूला नंदी व शिवलिंग पाहायला मिळाले 🛕. त्या शिवलिंग जवळ एका लहान गुहे मधून वारा येत होता.
 
तलवारीचा आकाराची विहीर - दातेगड
तलवारीचा आकाराची विहीर - दातेगड
तलवारीचा आकाराची विहीर - दातेगड
तलवारीचा आकाराची विहीर - दातेगड
विहिरीतील पाणी - दातेगड
विहिरींमधून पाणी घेतांना - दातेगड
तलवारीचा आकाराची विहीरी मधील शिवलिंग व नंदी - दातेगड
तलवारीचा आकाराची विहीरी मधील शिवलिंग व नंदी - दातेगड
तलवारीचा आकाराची विहीरी वरील बाजूने - दातेगड
तलवारीचा आकाराची विहीरी वरील बाजूने - दातेगड
 
विहीर पाहून आम्ही वरती आलो व विहिरीचा मागे असलेले मोठे कोरडे पाण्याचे टाके पाहिले. व समोर असलेले आणखीन एक पाण्याचे टाके व इतर अवशेष पाहून माघारी फिरलो. गडावरती खूप गवत वाढलेले असल्याने लहान अवशेष म्हणावे तितके पाहायला मिळाले नाहीत. पुढे ज्या मार्गी आलो त्या मार्गी गड उतरून खाली आलो. हॉटेल सुंदरगड येथून गरम कांदा भजी घेऊन पुढे वसंतगड पाहण्यासाठी निघालो. हॉटेल सुंदरगड 8999625704 / 9821238154 
 
दातेगडावरील अवशेष
दातेगडावरील अवशेष
पाण्याचे टाके- दातेगड

वसंतगड । Vasantgad ⛰️
वसंतगाडा वरती जाण्यासाठी वसंतगड, बेलदरे व तळबीड अश्या गावांमधून वाटा आहेत. पण आम्हाला तळबीड मधील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी देखील पाहायची होती त्यामुळे आम्ही पाटण वरून बेलदरे मार्गे तळबीडला आलो. 
 
बेलदरे ते तळबीडकडे जातांना दिसणार वसंतगड
बेलदरे ते तळबीडकडे जातांना दिसणार वसंतगड
बेलदरे मार्गे थोडा खराब रस्ता व लहान अवघड घाट पार करून तळबीड येथील प्राथमिक शाळे जवळ ०२:३० वाजता येऊन पोहचलो 🏫. तेथे घरून आणलेले जेवण केले व विश्रांती घेऊन ०३:०० वाजता गड चढायला घेतला. सुरवातीला काही नव्याने बनवलेल्या पायऱ्या चडून आलो. पुढे गावकरी गुरे चारत होते 🐃 त्यांच्याशी बोलून थोडी माहिती घेतली व गडाचा दिशेने निघालो. वाटेमध्ये भले मोठे एक वटवृक्ष लागला 🌳. साधारण ४५ मिनिटांचा चढाई नंतर आम्ही मुख्य प्रवेशद्वारा जवळ येऊन पोहचलो. तेथे एक गणपतीचे लहान मंदिर पाहिले 🛕 नमस्कार करून पुढे कातळ खोदून बनवलेल्या २० एक पायऱ्या चालून गडमाथ्या वरती आलो. तेथे मुख्य दरवाजाची पूर्ण पणे पडझड झालेली व काही अवशेष पाहायला मिळाले.
तेथे समोर गडाचा नकाशा व गडावरील पाहण्याच्या ठिकाणांची माहिती दिली आहे.
 
गडाचा मुख्य प्रवेशद्वारा जवळ असलेला गणपती - वसंतगड
गडाचा मुख्य प्रवेशद्वारा जवळ असलेला गणपती - वसंतगड
कातळ खोदीव पायऱ्या - वसंतगड
कातळ खोदीव पायऱ्या -वसंतगड

 नकाशा पाहून आम्ही पूर्व दिशेने गड फेरीला सुरवात केली. समोर असलेली विहीर 🏟️ पाहून हनुमानाचे दर्शन 🛕 घेतले व पूर्व दिशेच्या बुरुजा जवळ आलो. तेथे असलेली तटबंधी, बुरजावरती जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या व तटबंधी मध्ये असलेले शौचकुप पाहिले. गडावरती बरेच गवत व झाडे झुडपे वाढलेली दिसत होती. पुढे गडाचा पठारावरती पूर्ण दलदल झालेली त्यामधुन कसे बसे मार्ग काढत आम्ही दक्षिण बुरुजा पाशी आलो. तेथे एक पडझड होऊन झाकलेला चोर मार्ग व पडझड झालेला बुरुज पाहिला.
 
वसंतगडावरील हनुमान
वसंतगडावरील हनुमान
पूर्वेकडील बुरुज व तटबंधी - वसंतगड
पूर्वेकडील बुरुज व तटबंधी - वसंतगड

तटबंधी मधील शौचकुप - वसंतगड
तटबंधी मधील शौचकुप - वसंतगड
पडझड झालेला दक्षिण बुरुज - वसंतगड
पडझड झालेला दक्षिण बुरुज - वसंतगड

दक्षिण बुरुजा नंतर एका मोठा तलाव उजव्या हाताला व पुढे दूरवर दिसत असलेल्या पश्चिम बुरुजा कडे निघालो. मध्ये एक लहान तलाव पाहून पश्चिम बुरुजापाशी आलो. बुरुजाला असलेल्या मोठ्याला पायऱ्या चढून आम्ही बुरुजा वरती आलो. हा बुरुज पाहून पूर्व व दक्षिण बुरुज कसा होता हे जाणवले. असे ०४ बुरुज चार दिशेला या गडावरती पाहिले. हे बुरुज मूळ तटबंधीला लागून बांधलेले आहेत पण तटबंधी वरती नाही. हे बुरुज उंच बांधून घेतलेले आहेत. तेथून पुढे बाजूला असलेला गडाचा पश्चिम दरवाजा पाशी आलो (बेलदरे बाजूचा) 🏰 हा गोमुखी रचनेचा उत्तम सुस्तिथित असलेला दरवाजा पाहिला. या दरवाजा वरती हनुमान कोरलेला पाहायला मिळाला.

तलाव - वसंतगड
तलाव - वसंतगड
तलाव व मागे पश्चिम बुरुज - वसंतगड
तलाव व मागे पश्चिम बुरुज - वसंतगड
पश्चिम दरवाजा (बेलदरे बाजूचा) - वसंतगड
पश्चिम दरवाजा (बेलदरे बाजूचा) - वसंतगड
पश्चिम दरवाजा वरील हनुमान - वसंतगड
  पश्चिम दरवाजा वरील हनुमान - वसंतगड
पश्चिम दरवाजा व बुरुज पाहून झाल्यानंतर गडाचा मध्य भागी असलेल्या मंदिराचा दिशेने निघालो. पुढे असलेल्या वीरांचा समाधी व तलाव पाहून चंद्रसेन मंदिरापाशी आलो. 🛕 मंदिर समोर ०२ दीपमाळ, वीरगळी, अवशेष, ०२ नंदी पाहून मंदिरा मध्ये प्रवेश केला. मंदिराचा गाभाऱ्या मध्ये चंद्रसेन, जानाई व जोगेश्वरी मातेची मूर्ती पाहायला मिळाली. मंदिर पुरातन व आता जीर्णोद्धार केलेले पाहीले. पुढे चंद्रसेन मंदिराचा मागे जाऊन चुन्याचा घाणा पाहिला व परत मंदिरापाशी आलो. तेथे असलेले शिव मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, गजलक्ष्मी मंदिर व राम मंदिर पाहिले. पुढे वाड्याचे अवशेष पाहून गड उतरायला घेतला.
 
वीरांचा समाधी - वसंतगड
वीरांचा समाधी - वसंतगड

वीरांचा समाधी - वसंतगड
वीरांचा समाधी - वसंतगड
चंद्रसेन मंदिर - वसंतगड
चंद्रसेन मंदिर - वसंतगड
चंद्रसेन मंदिरा समोरील नंदी - वसंतगड
चंद्रसेन मंदिरा समोरील नंदी - वसंतगड
जानाई देवी, चंद्रसेन व जोगेश्वरी माता - वसंतगड
जानाई देवी, चंद्रसेन व जोगेश्वरी माता - वसंतगड
चुन्याचा घाणा व मागे दूरवर उत्तर बुरुज - वसंतगड
चुन्याचा घाणा व मागे दूरवर उत्तर बुरुज - वसंतगड
शिव मंदिर - वसंतगड
शिव मंदिर - वसंतगड

पूर्वीचा विठ्ठल व रखुमाई मूर्ती - वसंतगड
पूर्वीचा विठ्ठल व रखुमाई मूर्ती - वसंतगड

शिवलिंग व गजलक्ष्मी मंदिर - वसंतगड
शिवलिंग व गजलक्ष्मी मंदिर - वसंतगड

राम मंदिर - वसंतगड
राम मंदिर - वसंतगड
वसंतगड उतरून साधारण ०६:३० वाजता तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा समाधीस्थळ येथे येऊन पोहचलो. तेथे असलेले अवशेष, राम मंदिर, वीरगळ पाहून समाधीचे दर्शन घेतले व पुढे उंब्रजचा दिशेने निघालो. उंब्रज मध्ये थोडी चौकशी करून आम्ही दुसरे दिवशीचा प्रवास थोडा कमी असावा म्हणून मसूर या गावी आलो व तेथे राहिलो. 
 
सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते समाधी स्थळ - तळबीड
सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते समाधी स्थळ - तळबीड
सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते समाधी - तळबीड
सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते समाधी - तळबीड
सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते समाधी स्थळ - तळबीड
सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते समाधी स्थळ - तळबीड


©सुशील राजगोळकर
 
 

No comments:

Post a Comment

सातारा भाग ३/३ : कास पठार । यवतेश्वर । एकीव धबधबा । सज्जनगड । केदारनाथ - परळी । Kas Pathar । Yavateshwar । Ekiv । Sajjangad | Kedarnath - Parali ⛰️ 🛕

दिवस तिसरा, सोमवार १६-सप्टेंबर-२०२४ यवतेश्वर मंदिर । Yavateshwar Temple 🛕 पहाटे आवरून प्रथम कास पठार कडे निघालो घाटामध्ये गाडी थांबवली व धु...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.