सातारा भाग ३/३ : कास पठार । यवतेश्वर । एकीव धबधबा । सज्जनगड । केदारनाथ - परळी । Kas Pathar । Yavateshwar । Ekiv । Sajjangad | Kedarnath - Parali ⛰️ 🛕

दिवस तिसरा, सोमवार १६-सप्टेंबर-२०२४

यवतेश्वर मंदिर । Yavateshwar Temple 🛕
पहाटे आवरून प्रथम कास पठार कडे निघालो घाटामध्ये गाडी थांबवली व धुक्यात हरवलेले सातारा शहर आणि उंच माण करून डोकावणारा अजिंक्यतारा व सूर्यनारायनाची सकाळची किरणे यामुळे सातारा शहर अगदी फोटोत पाहतोय असे भासत होते. 🎑


तेथून पुढे दरे गावातील प्राचीन यवतेश्वर मंदिर पाहायला आलो. 🛕 यवतेश्वर मंदिरा बाहेर गणपती मंदिर आहे तेथे नमस्कार केला. आणि मंदिराचा कमानी मधून काही पायऱ्या उतरून मंदिरा मध्ये आलो. हे शिव मंदिर आहे गाभाऱ्या मध्ये मोठे शिवलिंग पाहायला मिळाले. पहाटे आरती व पूजेचा वेळी आम्ही तेथे पोहचलो. प्रथम आरती व पूजा केली आणि नंतर मंदिर व परिसर पाहिला. मंदिर समोर ०२ नंदी आहेत. बाजूला ग्राम दैवत श्री काळभैरवाचे मंदिर आहे. तेथे दर्शन घेतले, भैरवाची काळ्या पाषाणातील सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळाली. या दोन्ही मंदिरांना सभोवताली भक्कम तटबंदी आहे. तेथे लहान हनुमान मूर्ती देखील आहे तसेच एक वीरगळ देखील पाहायला मिळाली. शेवटी मंदिराचा मागे असलेली बांधीव चौकोनी तलाव पाहून मंदिरा बाहेर आलो व कास पठार चा दिशेने निघालो.
यवतेश्वर मंदिर - दरे
यवतेश्वर मंदिर - दरे

यवतेश्वर मंदिर - दरे

यवतेश्वर मंदिर
यवतेश्वर मंदिर - दरे

यवतेश्वर मंदिर
यवतेश्वर मंदिर - दरे

काळभैरवनाथ - यवतेश्वर, दरे
काळभैरवनाथ - यवतेश्वर, दरे

काळभैरवनाथ मंदिर - यवतेश्वर, दरे
काळभैरवनाथ मंदिर - यवतेश्वर, दरे


कास पठार । Kas Plateau 🪻🥀
‘जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ’ म्हणून कास पठारची नोंद आहे. सकाळचे ०९:०० वाजता आम्ही कासचा पार्किंग नं १ ला पोहचलो. व तेथे पर्यटकांना ये-जा करण्यासाठी असलेल्या ट्रॅव्हल बस मधून पुढे आलो. प्रथम आम्ही गेट नं ४ येथून राजमार्गाने चालत कुमुदिनी तलाव कडे निघालो. वाटेत बहरलेली निरनिराळी फुले पाहत कुमुदिनी तलावा पाशी आलो 🏝️. तलावा वरती असलेली कुमुदिनीची फुले व दुसऱ्या बाजूला असलेल्या कास तलावाचा परिसर पाहून माघारी गेट वरती आलो. आणि बाजूला असलेल्या गेट नं ३ मधून आत मध्ये प्रवेश केला. तेथे असलेली फुले जसे तेरडा, दीपकाडी, पंद, आभाळी, तुतारी, पाणगेंद, खुरपापणी, अबोलीम, जंगली आल, कारवी, टोपली कारवी, निसूर्डी, तारागुच्छ, हळुंदा, कंदीलपुष्प, जरतारी, सितेची आसवे, कावला, मंजिरी, सोनकी 🌸🪻🥀अशी निरनिराळी व नावे माहित नसलेली कित्येक फुले जवळुन पाहत व फोटो घेत गेट नं २ मधून बाहेर आलो. मी कास पठारला चौथ्यांदा आलो होतो त्या मुळे थोडी फुले मला ओळखीची वाटली व काही फुले कदाचित मला ओळखत होती असे वाटले. कासच्या थंड प्रसन्न वातावरणामध्ये फिरून झाल्यानंतर पुढे आम्ही पार्किंग मध्ये जाऊन गाडी घेतली व एकीव धबधबा पाहायला निघालो 🚗.





एकीव धबधबा । Ekiv Waterfall
कास पठार पासून जवळ असलेला एकीव धबधबा हा पाहण्या सारखा आहे. हा धबधबा थेट एक सात खाली न कोसळता दगडांना लागून पायऱ्या प्रमाणे हळू हळू व पसरत पडतो. त्यामुळे हा धबधबा दिसायला खूप सुंदर आहे. रोड वरून अगदी जवळ चालत गेले कि हा धबधबा आहे. धबधब्या वरती गर्दी न्हवती. धबधब्या मध्ये भिजत ओरडण्या पेक्षा धबधब्या समोर शांत बसून राहणे व उडणारे बारीक तुषार व समोर दिसणारा धबधबा हेच आम्हाला खूप भारी वाटले. तेथील आनंद घेतल्या नंतर आम्ही गाडी वळवली व सज्जनगड पाहायला निघालो.
एकीव धबधबा
एकीव धबधबा

एकीव धबधबा
एकीव धबधबा

सज्जनगड । Sajjangad ⛰️
एकीव धबधबा पाहून झाल्या नंतर सज्जनगडाला ०२:०० वाजता पोहचलो. पार्किंग मध्ये गाडी लावली व पायऱ्यांचा वाटेने गडाचा दिशेने निघालो. पुढे वाटेत असलेले हनुमान पाहत गडाचा प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वारातून आत आलो.🏰 पुढे डाव्या बाजूला कातळ व असलेल्या पायरी मार्गे श्री समर्थ महाद्वार (दुसरा दरवाजा) जवळ आलो. या दरवाजाचा वरती शिलालेख कोरलेला पाहायला मिळाला. दरवाजाचा मागे अगदी सुस्तिथित व थोडी डागडुजी केलेल्या देवड्या पाहायला मिळाल्या. तेथे उजव्या बाजूला एक शिलालेख कोरलेला आहे व त्याचा मराठी मधील अर्थ असलेली फरशी लावली आहे ते पाहिले.
गडाचे प्रथम महाद्वार - सज्जनगड
गडाचे प्रथम महाद्वार - सज्जनगड 

दुसऱ्या दरवाजावर जवळील शिलालेख - सज्जनगड
दुसऱ्या दरवाजावर जवळील शिलालेख - सज्जनगड 

दुसरा दुसऱ्या दरवाज्यापासून थोडे पुढे आलो उजव्या बाजूला बांधीव पाण्याचे टाके व डाव्या बाजूला घोडाळे तलाव, चुन्याचा घाणा व अवशेष पाहून माघारी आलो व सरळ समोर निघालो. समोर बांधीव तलाव व वीरगळ पाहिली व त्या समोरील पेठेतील मारुती मंदिर मध्ये नमस्कार करून पुढे आलो.
बांधिव पाण्याचे टाके - सज्जनगड
बांधिव पाण्याचे टाके - सज्जनगड 

चुन्याचा घाणा - सज्जनगड
चुन्याचा घाणा - सज्जनगड 

विरगळ व बांधिव पाण्याचं टाकं - सज्जनगड
विरगळ व बांधिव पाण्याचं टाकं - सज्जनगड 



पुढे गडावरील श्री राम मंदिर व श्री समर्थ समाधी मंदिर व श्री समर्थ यांचा वापरातील वस्तू पाहिल्या. पुढे मंदिराचा मागे गडाचा पश्चिम दिशेला आलो. तेथून उरमोडी धरण व कासचा परिसर अगदी सुरेख दिसत होता. तेथून पुढे येऊन श्री समर्थ स्थापित धाब्याचा मारुती मंदिर मध्ये दर्शन घेतले व दक्षिण दिशेने गडाचा फेरा चालू केला. पुढे अंग्लाई मंदिराचा आधी असलेल्या बुरजातील हनुमान पाहिला व अंग्लाई देवी मंदिरा मध्ये आलो. तेथे असलेले बुरुज व इतर अवशेष पाहिले. पुढे गड फेरा पूर्ण करून घोडाळे तलाव इथे येऊन पोहचलो व गड उतार झालो आणि पुढे परळी कडे निघालो.
राम मंदिर, श्री समर्थ समाधी व परिसर - सज्जनगड
राम मंदिर, श्री समर्थ समाधी व परिसर - सज्जनगड 

धाब्याच्या मारुती मंदिर - सज्जनगड 

अंग्लाई मंदिरा समोरील अवशेष - सज्जनगड

अंग्लाई देवी - सज्जनगड
अंग्लाई देवी - सज्जनगड 


केदारनाथ मंदिर - परळी । Kedarnath Temple - Parali 🛕
सज्जनगड पासून जवळच परळी गांव मध्ये प्राचीन केदारनाथ मंदिर व वैजनाथ मंदिर आहे तेथे आलो.
प्रथम विद्युत महावितरण चा बाजूला एक लहान वैजनाथ मंदिर आहे तेथे जाऊन दर्शन घेतले, मंदिराचा बाहेर शीर नसलेला नंदी व गाभाऱ्या मध्ये शिवलिंग पाहायला मिळाले. या मंदिराचे स्लॅब व समोरील काही भाग आता सिमेंट मध्ये बांधलेले आहे. तेथून पुढे केदारनाथ मंदिराचा परिसर मध्ये आलो.
 वैजनाथ मंदिर - परळी

केदारनाथ मुख्य मोठा मंदिराचा बाहेर प्रथम दर्शनी ५४ वीरगळी व सतीशिळा पाहिल्या. या गावातील वेग वेगळ्या ठिकांणा वरून जमा करून एकत्र संवर्धन करून ठेवलेल्या आहेत. मंदिरा समोर एक लहान नंदी आहे त्याला शीर नाही व शीर बसवण्या सारखे चौकोनी खोबणी आहे कदाचित याचे शीर निघाले असावे. त्या नंदी समोर देखील एक शिवलिंग ठेवलेले आहे. तसेच त्या नंदीचा मागे एका बाजूला पंचमुखी शिवलिंग पाहायला मिळाले. पुढे मंदिराचा आत मध्ये आलो. मंदिराचा सभामंडप मध्ये एक मोठा नंदी आहे. त्याचा मानेला देखील भेग आहे कदाचित बाहेरील नंदी प्रमाणे या नंदीचे देखील शीर बसवलेलं असावे. मंडपाला नक्षीदार खांब आहेत. नंदीचा बाजूला चार एक सारखे नक्षीकाम असलेले खांब आहेत त्या वैतिरिक्त काही प्राचीनच खांब मध्ये मध्ये हे इतर ठिकाणचे सुरक्षिततेसाठी आता जोडले असावेत असे वाटते. मंदिराचा मुख्य गाभाऱ्या मध्ये शिवलिंग पाहायला मिळाले तेथे नमस्कार केला व बाहेर आलो. मंदिराचा समोरील मुख्य भिंतीवरती कामसूत्रातील काही शिल्पे कोरललेली आहेत. या मुख्य मंदिराचा बाजूला आणखीन एक मंदिर आहे त्या मंदिराचा फक्त गाभारा शिलक्क आहे, आत मध्ये शिवलिंग आहे बाकी मंदिर पूर्णपणे पडझड झालेले आहे. तसेच मंदिराचा दुसऱ्या बाजूला एक शिवलिंग व गणपती पाहिला. पुढे आणखीन एक मंदिर आहे व त्या मंदिराचा बाजूने शेती केली आहे त्या मंदिरातील शिवलिंग हे पाण्याखाली होते. मंदिरा समोर व बाजूने बरेच अवशेष पाहायला मिळाले. मंदिराचा मागे उरमोडी धरणाची भिंत आहे. मंदिराचा परिसर सुंदर व शांत आहे. 
केदारनाथ मंदिर - परळी
केदारनाथ मंदिर - परळी

केदारनाथ मंदिर - परळी
केदारनाथ मंदिर - परळी


केदारनाथ मंदिर - परळी
पडझड झालेले मंदिर व केदारनाथ मंदिर - परळी

केदारनाथ मंदिर - परळी
केदारनाथ मंदिर - परळी

केदारनाथ मंदिर - परळी
केदारनाथ मंदिरा जवळील गणपती व शिवलिंग - परळी

केदारनाथ मंदिर - परळी
केदारनाथ मंदिर - परळी

केदारनाथ मंदिर - परळी
केदारनाथ मंदिर - परळी

केदारनाथ मंदिर - परळी
केदारनाथ मंदिरा समोरील शिवलिंग- परळी

केदारनाथ मंदिर - परळी
केदारनाथ मंदिरा मधील शिवलिंग - परळी

केदारनाथ मंदिर - परळी
केदारनाथ मंदिरातील नंदी - परळी

विरघळ व सतीशिळा, केदारनाथ मंदिर - परळी
विरघळ व सतीशिळा, केदारनाथ मंदिर - परळी

पडझड झालेल्या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग

हे सर्व पाहून आम्ही पुढे सातारा कडे निघालो. सातारा मध्ये ०५:०० वाजता पोहचलो. पुढे अजिंक्यतारा किल्ला पाहायचा होता पण अजित म्हणाला पुढील सातारा भटकंती साठी शिलक्क राहूदे. मग आम्ही ०३ दिवसीय सातारा विभागाची भटकंती थांबवली व पुणे कडे निघालो व रात्री ०८:३० वाजता घरी येऊन पोहचलो.
©सुशील राजगोळकर

No comments:

Post a Comment

सातारा भाग ३/३ : कास पठार । यवतेश्वर । एकीव धबधबा । सज्जनगड । केदारनाथ - परळी । Kas Pathar । Yavateshwar । Ekiv । Sajjangad | Kedarnath - Parali ⛰️ 🛕

दिवस तिसरा, सोमवार १६-सप्टेंबर-२०२४ यवतेश्वर मंदिर । Yavateshwar Temple 🛕 पहाटे आवरून प्रथम कास पठार कडे निघालो घाटामध्ये गाडी थांबवली व धु...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.