Showing posts with label Tikona. Show all posts
Showing posts with label Tikona. Show all posts

तिकोना किल्ला (वितंडगड) Tikona Fort ( Vitandgad )

निरव रोज फक्त डोंगराला कधी जायचे विचारत असतो म्हणून दिवाळी मध्ये जवळपास कुठेतरी जाऊया असे सांगितले होते म्हणून, रविवार दि. १५/११/२०२० रोजी सकाळी थोडे आवरून ११ वाजता तिकोनाकडे निघालो, जवळच पहिला घोराडेश्वरचा डोंगर पाहून निरव ओरडू लागला डोंगर डोंगर. 
भर दुपारी उन्हामध्ये १२ वाजता तिकोना गडाचा खाली गाडी लावून ट्रेकला सुरवात केली, रविवार व त्यातून दिवाळीची सुट्टी या मुळे गडावरती बऱ्यापैकी गर्दी होती. निरवचा हाथ पकडून आम्ही हळू हळू चालू लागलो, थोडे वरती जाताच निरवला आजू बाजूचे दरी डोंगर दाखवत त्याला समजवत पुढे जात होतो, बुरुज, दरवाजा, चपेटदान मारुती, चुण्याचा घाणा, टाके, पाण्याचा टाक जवळील गुहा पाहिले  व  डावीकडून बाल्ले कील्लाकडे जाणाऱ्या पायऱ्या चढायला सुरवात केली, अता दुर्गसर्वर्धन करण्याऱ्या गडप्रेमींनी तेथे नवीन दगडी पायऱ्या बनवल्या आहेत, पूर्वी तेथे लहान दगडामध्ये कोरलेल्या अवघड पायऱ्या होत्या, त्या पायऱ्या चडून जाताच बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजातून आत मध्ये शिरल्यावर उजवीकडे पाण्याचे टाके व डाव्याबाजूला असलेला तटबंदीचा बुरुज पाहिला व तेथूनच सरळ अशा उंच कातळातील पायऱ्या चडून गेलो व आणखीन एक दरवाजा पार करून तेथून उजव्या बाजूला असलेल्या गुहे व पाण्याचा टाक्या जवळ बसून दुपारचे जेवण उरकले व थोडी विश्रांती घेऊन मागे फिरलो पुढे असलेल्या तुटलेल्या पायऱ्या चडूण गेलो व समोरच असलेल्या महादेव मंदिरा मध्ये जाऊन नमस्कार केला. व पुढे मंदिरा मागे असलेल्या पाण्याचा टाके पाहून गडाचा शेवटचा टोकापाशी असलेल्या ध्वजस्तंभाच्या जागी आलो. तेथून दिसणारा उतुंग असा तुंग किल्ला, लोहगड, विसापूर, पवणा धरणाचा जलाशय व चौहो बाजूचा परिसर निहाळून आम्ही गड उतरायला सुरवात केली, निरव मात्र न दमता पूर्ण गड चडून गेला त्या अवघड बाल्ले किल्ल्याचा पायऱ्या व काही अवघड ठिकाणी निरवला उचलून घेत आम्ही पूर्ण गड पाहिला. अशा प्रकारे काही दिवसा पुरते का होईना मी त्याचे गड, डोंगर प्रेम पूर्ण केले.
~सुशील राजगोळकर

तिकोना गडाचा दरवाजा
तिकोना गडाचा दरवाजा 
तिकोना गडावरील चपेटदान मारुती
तिकोना गडावरील चपेटदान मारुती 
तिकोना गडावरील चुन्याचा घाणा
तिकोना गडावरील चुन्याचा घाणा 
तिकोना गडाचा बाल्ले किल्याला जाणाऱ्या पायऱ्या
तिकोना गडाचा बाल्ले किल्याला जाणाऱ्या पायऱ्या 
तिकोना गडाचा बाल्ले किल्याला जाणाऱ्या पायऱ्या
तिकोना गडाचा बाल्ले किल्याला जाणाऱ्या पायऱ्या 
तिकोना गडाचा बाल्ले किल्याला जाणाऱ्या पायऱ्या
तिकोना गडाचा बाल्ले किल्याला जाणाऱ्या पायऱ्या 
तिकोना गडावरील गुहा
तिकोना गडावरील गुहा 
तिकोना गडावरील महादेव मंदिर
तिकोना गडावरील महादेव मंदिर 
तिकोना गडावरील महादेव मंदिराचा गाभारा व शिवलिंग
तिकोना गडावरील महादेव मंदिराचा गाभारा व शिवलिंग
तिकोना गडावरील महादेव मंदिरा मागील पाण्याचे टाके
तिकोना गडावरील महादेव मंदिरा मागील पाण्याचे टाके 

©सुशील राजगोळकर

तुंग (कठीणगड) TUNG

०४ ऑगस्ट २०१८ रोजी ठरल्याप्रमाणे मी दुचाकी घेऊन सकाळचे ०८:०० वाजता किवळे, रावेतहून लोणावळाकडे निघालो. व ०९:१० वाजता छञपती शिवाजी महाराज चौक लोणावळा येथे पोहचलो. माझे काही मित्र मुंबईहून येणार होते ते ही १०:२० पोहचले. मग एकत्र नाष्टा करून किल्ले तुंग कडे रवाना झालो. 
लोणावळा आणि त्यातून पावसाळा म्हटले कि पाऊस व दाट धुके हे आलेच...! त्याच धुक्यातून सावकाश गाडी चालवत आम्ही ११:४५ ला तुंग किल्ल्यापाशी पोहचलो. पायथ्याला मारुती मंदिर आहे तेथे गाडी लावून गड चढायला सुरवात केली. पावसाची रिपरिप चालूच होती. थोडेसे वरती चढुन जाताच डाव्या बाजूला एक मारुती मंदिर लागले, त्याला नमस्कार करून आणखीन थोडे पुढे जाता उजव्या हाताला एक पाण्याचे टाके व गुहा लागली. ती पाहून पुढे जाताच पहिला मुख्य दरवाजा लागला. तेथून आत शिरताच एक सरळ वाट पुढे माचीकडे जाते व एक वाट गड माथ्यावरती जाते. वरती चढून येताच उजव्या बाजूला सदरेचे अवशेष पाहायला मिळाले तेथेच एक गणपती मंदिर व पाण्याचे मोठे कुंड आहे. त्या कुंडाचा डाव्या बाजूने पुढे जाता बाले किल्ल्याचा चढणीचा आधी उजव्या हाताला एक स्वच्छ नितळ पाण्याचे टाके आहे, ते पाहून तिथून परत माघारी आलो. व बालेकिल्ला चढायला सुरवात केली. या गडचा माथा लहान आहे त्यामुळे तुंग किल्ला हा टेहळणी साठी वापरला जायचा. बालेकिल्यावर तुंग देवीचे मंदिर आहे तिथे देवीचे दर्शन घेतले व थोडे थांबुन किल्ला उतरायला सुरवात केली. या किल्ल्यावरून तिकोना, लोहगड, विसापूर हे किल्ले व पवन मावळ हा सर्व परिसर दिसतो पण यावेळी दाट धुक्यामुळे आम्हाला ते दिसू शकले नाही. साधारण ०२:१५ वाजता आम्ही किल्ला उतरून खाली पोहचलो व तेथेच जेवण करून लगोलग कोरीगड (कोराईगड) पाहायला निघालो.

©सुशील राजगोळकर














बेडसे लेणी व तिकोना (वितंडगड) किल्ला, Bedase Caves & Tikona Fort

   काल दिनांक 27 जून 2017 रोजी मी व माझा मित्र अजित गवेकर, दुचाकीवर सकाळी 8:30 मि. चिंचवड येथुन निघालो, वाटेत बारीक रिमझिम पाऊस चालु होता, कामशेत येथे नाश्ता करून, 10:00 वाजता बेडसे लेणीच्या पायथ्याशी पोहचलो, डोंगराच्या मध्यावर लेणी पर्यंत जाण्यासाठी दगडि पायऱ्या आहेत, पायऱ्यावरती प्रचंड प्रमाणात दिसणारे लहान मोठे खेकडे पहात लेणी जवळ पोहचलो, तेथे पोहचताच लेणी लक्ष वेधुन घेतात, सुंदर सुबकअशी लेणी पाहुन, तेथे अत्यंत शांत प्रसन्न अशा वातावरणात थोडी विश्रांती घेतली, व तेथून पुढे आम्ही तिकोना किल्ला कडे निघालो , किल्लाचा पायथा पाशी दुचाकी पार्क करून किल्ला चढायला चालू केला मध्ये एक मारूती मंदिर आहे,  मारूती ला नमस्कार करून थोडे पुढे जाताच आम्ही तळ्यापाशी व गुहे जवळ जाऊन पोहचलो. तिथून डाविकडे थोडे वरती चालताच बाल्ले किल्ल्याला जाणाऱ्या पायऱ्या सुरू होतात. बाल्ले किल्लाला प्रवेश करताच उजव्या बाजुला पाण्याचे टाके व डाविकडे बुरूज आहे. अजुन थोडे सरळ वरती गेले की उजवीकडे पाण्याचे टाके आहे ते पाहुन परत फिरलो व तुटलेल्या पायऱ्या वरून वरती जाताच महादेवाचे मंदिर सामोरे येते, ते पाहुन मागील बाजुला असलेले पाण्याचे तळे पाहीले, ढगांचि उघड झाप व रीमझिम पाऊस चालू होता त्यातुन दिसनारे तुंग किल्लाचे दृश्य पाहुन आम्ही बाल्ले किल्ला उतरायला सुरवात केली, मग आम्ही महाद्वार व चोर दरवाजा पहायला गेलो, तेथील झालेली पडझड पाहुन असे जाणवते की , अता तिकडुन कोणीच येत जात नसावे, पुर्ण किल्ला पाहुन झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला व 6:00वा चिंचवडला पोहचलो, अशाप्रकारे या वर्षातील दुसरा पाऊसाळी ट्रेक पुर्ण केला.

©सुशील राजगोळकर











तिकोना (वितंडगड) , किल्यावरुन दिसनारे मनमोहक दृश्य माझ्या मोबाईल मध्ये चित्रित केले आहे
 
https://www.youtube.com/watch?v=IbPZ1lJ02o8&feature=youtu.be

वरिल YouTube link वरती उपलब्ध आहे, आपणास चित्रिकरण आवडल्यास आपल्या प्रतीक्रिया आपण तेथे द्याव्यात.

"घनगड" ⛰️ निरवचा ५० व्या किल्याची भटकंती. 🚗⛰️ | Ghangad & Tailbailla - Lonavala 11-January-2026

मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.