महाराष्ट्र, सह्यांद्री, दुर्ग, गड, किल्ले, महाराष्ट्रातील किल्ले, प्रवास, निसर्ग, भटकंती, छायाचित्र, लेणी, प्राचिन मंदिरे, पुरातन मंदिरे, समुद्र किनारे, शोध, धाडस, मंदिरे, Maharashtra, Trek, Trekking, Trekker, Nature Lover, Traveler, Photography, Fort, Fort in Maharashtra, Sahyadri Mountain, Old Temples, Caves, Adventure, Explorer, Trails.
देवकुंड धबधबा - भिरा पाटणुस रायगड महाराष्ट्र Devkund Waterfall - Bhira Patnus Raigad Maharashtra
08 नोव्हेंबर 2017 ला सकाळी 8:00 वाजता देवकुंडला
जायला निघालो, आनंद बिराजदार ला घेऊन 8:30 ला निघालो. "थंडी आणि दुचाकी हे समीकरण
लक्षात घेऊन थोड्या उशिराच निघायचे" हा निर्णय तसा ठीकच वाटला. ताम्हिणी घाटामध्ये पुणे रायगड हद्दीवर
पोटभर नाष्टा केला. दुपारी 12:30 ला भिरा येथे पोहोचलो. दुपारी 1:00 ला ट्रेक सुरू केला, भिरा धरणाच्या बाजुने जंगलातुन आम्ही चालु लागलो,
चालतांना मध्ये मध्ये पक्ष्यांचे प्राण्यांचे निरनिराळे आवाज तर मध्ये मध्ये खळखळत
जाणारा पाण्याचा आवाज ऐकु येत होता. साधारणपणे
दीड तासाच्या वाटचालीनंतर देवकुंड ला पोहचलो, उंची वरुन पडणारा धबधबा व तेथिल थंड व नितळ स्वच्छ पाणी
पाहुन मनभरून गेले, न राहुन पाण्यात डुबकी मारली पोहुन झाल्या नंतर आनंदने आणलेला डबा
पाण्यात पाय ठेऊन निवांतपणे खाल्ला, बुधवार असल्याने तशि गर्दि कमिच होती तेथुन सर्व
पर्यटक परतिच्या वाटेला निघायला लागले, आम्ही मात्र तेथुन सर्व पर्यटक गेल्या नंतर
निरव शांतते मध्ये थोडावेळ थांबून छायाचित्रे घेतली आणि परतिच्या वाटेला लागलो.
Subscribe to:
Posts (Atom)
"घनगड" ⛰️ निरवचा ५० व्या किल्याची भटकंती. 🚗⛰️ | Ghangad & Tailbailla - Lonavala 11-January-2026
मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...
-
खूप दिवसांपासून मुलगा म्हणत होता ट्रेकला जाऊया ना पप्पा, नेमकं बायकोला पण रायगड पहायचा होता. मग काय केला प्लॅन रायगडाचा..! अन अखेर तो दिवस उ...
-
१४ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर असे ०४ दिवस सुट्टी होती. त्यामुळे सातारा विभागातील गड किल्ले व इतर भटकंतीला जायचे असे ठरवून अजित व मी वेळ मिळेल ...
-
हम्पी हे एक भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे . हम्पीचे अवशेष हे युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे . ख...
Note :
भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.