कलावंतीण दुर्ग , ठाकुरवाडी, पनवेल, रायगड Kalavantin Durg

कलावंतीण दुर्ग बदल इंटरनेट वरिल फोटो, माहिती व चित्तथरारक चित्रफित पाहुन आम्हाला थोडी भितीच वाटत होती, "नजर हटी दुर्घटना घटी" अशाच त्या दगडा मध्ये कोरलेल्या पायऱ्या पहायची उत्सुकता खुप होती. खुप दिवसा पासुन नियोजन चालु होते कधि जायचे, मग ऐके दिवशी शैलेश चा संदेश आला आपल्याला पुढील आठवड्याच्या शेवटी कलावंतीण दुर्गला जायचे आहे.

मग कोण कोण येणार ? एकमेकांना विचारणा चालु झाली, सदस्य कमी जास्त होत होते निश्चितपनेे कोणीच सांगत नव्हते, त्याच बरोबर शैलेश व माझे संभाषण चालु झाले होते कसे जायचे रेल्वे, दुचाकी कि गाडी करायाची, शेवटी सदस्यसंख्या ठरली, मग सुहास ने एक गाडी ठरवली. जायचा एक दिवस अगोदर 2 सदस्य वाढले त्यामुळे 1 दुचाकी पण घ्यायचे ठरले.

ठरल्याप्रमाणे दि. 25/12/2017 पहाटे 6:00 वाजता आम्ही पुणे येथुन निघालो 10:00 वाजता ठाकुरवाडी येथे पोहचलो नाष्टा ऊरकुन आम्ही कलावंतीण दुर्गच्या दिशेने चालायला सुरवात केली.

अजित मुंबई हुन येणार होता परंतु तो रस्ता चुकला व दुर्गच्या पलिकडील बाजुला ठाकुरवाडी मध्ये पोहचला, एकटाच असल्याने तेथुन परत तो अलिकडील ठाकुरवाडीला आला, तो पर्यत आम्ही प्रबळमाची पार केली होती. 2:30 तासाच्या चढाई नंतर आम्ही पायऱ्या जवळ पोहचलो, सगळेजण वरती चढायला लागले, मी मात्र अजितची वाट पाहत बसलो, तासाभरात तो आला, त्यानंतर आम्ही दोघे त्या चित्तथरारक पायऱ्या काळजीपूर्वक चढु लागलो व जिथे थोडा फोटो काढायला वाव मिळेल तेथे फोटो काढत 15 मि. मध्ये आम्ही माथ्यावरती पोहचलो, माध्यावरून दिसणारे दृश्य नजरेत सामाऊन घेतले व उतरण्यास सुरवात केली, उतरताना थोडे काळजी पुर्वकच उतरावे लागले.

पुढे आलेले सदस्य खाली प्रबळमाची येथे एका घराच्या अंगणात आमची वाट पाहत बसले होते, अंगण मस्त सारवलेले होते, भुक तर खुपच लागली होती मग आणलेले डबे तेथेच निवांत एकत्र बसुन खाले, अजितने माझासाठी खास थोडा जास्तच डबा अणला होता.

तेथेच मग गप्पा रंगल्या वेळेकडे कोणाचे लक्षच गेले नाही एव्हाना संध्याकाळचे 05:00 वाजले होते, मग मि व अजित लगबगिने खाली आलो अंधार पडायला सुरवात झाली होती 6:30 वाजता अजित निरोप घेऊन मुंबईकडे निघाला, मागून सगळेजण लगोलग आले तसेच आम्ही गाडी काढली व महडच्या अष्टविनायक गणपतीला निघालो, दर्शन घेऊन लगेच परतिचा प्रवास सुरू केला व 10:30 वाजता पुण्यात पोहचलो.

"अशाप्रकारे सरत्या वर्षात कलावंतीण दुर्गचा ट्रेक एक चांगला अनुभव, पुढील चितथरारक ट्रेक करण्याचा विश्वास व जिद्द निर्माण करणारा झाला"

©सुशील राजगोळकर
















































कळसुबाई शिखर KALSUBAI PEAK

दि. १६/१२/२०१७ला रात्री ८.०० वाजता पुणे येथून निघालो. रात्री १०.०० वाजता खेड घाटाजवळ हाँटेल मध्ये जेवण ऊरकुन निघालो. त्यानंतर थेट गाडी थांबली ति म्हणजे "बारी" या गाविच, तेव्हा पहाटेचे ३.०० वाजले होते. कडाक्याची थंडी वाजत होती.
अंधारात काही दिसत नसल्यामुळे सर्वांनी हातात विजेरी घेतली. मस्तपैकी गरमागरम पोहे व चहा घेतला. तिथल्याच मंदिराच्या अंगणात एकमेकांचा परिचय सत्र झाले व ३.४५ ला महाराष्ट्र मधील सर्वोच्च शिखर"कळसुबाई" चढायला सुरवात केली.
अंधाऱ्या रात्री आकाशातल्या चांदण्या खूपच मनमोहक दिसत होत्या. मध्येेच अंगावर येणाऱ्या थंड वाऱ्यामूळे अंगावर सरसरून काटा येत होता. सुर्योदयापूर्वीच माथ्यावर पोहचायचे असल्यामुळे लगबगीने चालायला सुरू केले. प्रचंड प्रमाणात येणाऱ्या गिर्यारोहकांमुळे पायवाट चांगलीच मळलेली आहे. मध्ये मध्ये दगडी पायरी आहेत व लोखंडी शिडी बसवलेल्या आहेत तब्बल २.३० तासाच्या चढाई नंतर आम्ही सुमारे ६.३० वाजता माथा गाठला. सर्वप्रथम कळसुबाई मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर सुर्यदेवतेच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहू लागलो. कळसूबाई वरून दिसणारा तो सूर्योदय अप्रतिम होता. माथ्यावर वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे थंडी तर खूपच वाजत होती पण फोटो पण काढायची हौस होती. मग काय....... थोडा वेळ फोटो काढायचे आणि मध्येच थंडी पासुन वाचण्या साठी मंदिराचा मागे लपत होतेशिखरा वरून दिसनारे नयनरम्य दृश्य नजरेत भरून घेतले आणि ८.३० ला शिखर ऊतरायला सुरवात केली.आजूबाजूला दिसणारा परिसर पाहत खाली ऊतरलो. मागे वळुन पाहताच लक्षात आले अंधारा मध्ये आपन किती चढाई केली होती. ११.३० ला खाली पोहचलो, जेवण केले आणि परतीच्या मार्गाला लागलो. अशाप्रकारे महाराष्ट्रातील सर्वात ऊंच कळसुबाई शिखराचा ट्रेक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.
©सुशील राजगोळकर 

 

 



भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.