Showing posts with label Bedase Caves. Show all posts
Showing posts with label Bedase Caves. Show all posts

बेडसे लेणी व तिकोना (वितंडगड) किल्ला, Bedase Caves & Tikona Fort

   काल दिनांक 27 जून 2017 रोजी मी व माझा मित्र अजित गवेकरदुचाकीवर सकाळी 8:30 मिचिंचवड येथुन निघालोवाटेत बारीक रिमझिम पाऊस चालु होताकामशेत येथे नाश्ता करून, 10:00 वाजता बेडसे लेणीच्या पायथ्याशी पोहचलोडोंगराच्या मध्यावर लेणी पर्यंत जाण्यासाठी दगडि पायऱ्या आहेतपायऱ्यावरती प्रचंड प्रमाणात दिसणारे लहान मोठे खेकडे पहात लेणी जवळ पोहचलोतेथे पोहचताच लेणी लक्ष वेधुन घेतातसुंदर सुबकअशी लेणी पाहुनतेथे अत्यंत शांत प्रसन्न अशा वातावरणात थोडी विश्रांती घेतलीव तेथून पुढे आम्ही तिकोना किल्ला कडे निघालो किल्लाचा पायथा पाशी दुचाकी पार्क करून किल्ला चढायला चालू केला मध्ये एक मारूती मंदिर आहे,  मारूती ला नमस्कार करून थोडे पुढे जाताच आम्ही तळ्यापाशी व गुहे जवळ जाऊन पोहचलोतिथून डाविकडे थोडे वरती चालताच बाल्ले किल्ल्याला जाणाऱ्या पायऱ्या सुरू होतातबाल्ले किल्लाला प्रवेश करताच उजव्या बाजुला पाण्याचे टाके व डाविकडे बुरूज आहेअजुन थोडे सरळ वरती गेले की उजवीकडे पाण्याचे टाके आहे ते पाहुन परत फिरलो व तुटलेल्या पायऱ्या वरून वरती जाताच महादेवाचे मंदिर सामोरे येतेते पाहुन मागील बाजुला असलेले पाण्याचे तळे पाहीलेढगांचि उघड झाप व रीमझिम पाऊस चालू होता त्यातुन दिसनारे तुंग किल्लाचे दृश्य पाहुन आम्ही बाल्ले किल्ला उतरायला सुरवात केलीमग आम्ही महाद्वार व चोर दरवाजा पहायला गेलोतेथील झालेली पडझड पाहुन असे जाणवते की अता तिकडुन कोणीच येत जात नसावेपुर्ण किल्ला पाहुन झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला व 6:00वा चिंचवडला पोहचलोअशाप्रकारे या वर्षातील दुसरा पाऊसाळी ट्रेक पुर्ण केला.

©सुशील राजगोळकर











तिकोना (वितंडगड) , किल्यावरुन दिसनारे मनमोहक दृश्य माझ्या मोबाईल मध्ये चित्रित केले आहे
 
https://www.youtube.com/watch?v=IbPZ1lJ02o8&feature=youtu.be

वरिल YouTube link वरती उपलब्ध आहे, आपणास चित्रिकरण आवडल्यास आपल्या प्रतीक्रिया आपण तेथे द्याव्यात.

"घनगड" ⛰️ निरवचा ५० व्या किल्याची भटकंती. 🚗⛰️ | Ghangad & Tailbailla - Lonavala 11-January-2026

मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.