लोहगड ⛰ LOHGAD

पहाटे ६:०५ वाजता मुकाई चौक येथे सर्वांनी जमायचे व जो उशिरा येईल त्याने सर्वांना चहा ☕ व नाष्टा 🍲 द्यायचा असा दंडक होता. नेमके मी ०६:०९ वाजता पोहचलो. आणखीन दोघे ०६ मिनिट उशिरा पोहचले. ठरल्याप्रमाणे शिक्षा म्हणून मी चहा पाव आणि त्या दोघांनी नाश्ता द्यायचा होता. मुकाई चौकात चहा व मस्का पाव☕🍞 घेऊन आम्ही निघालो. ती ४ मिनिटे मला 💰१२० रुपयांना पडली, त्या नंतर सर्वांच्या गाड्या🏍 थांबल्या त्या कार्ले फाटा येथे. सकाळचे मस्त दाट धुके ☁ पडले होते .थंडी हि गुलाबी म्हणावी अशीच होती. पण आम्ही दुचाकीवरच चाललो असल्याने हि गुलाबी थंडी नंतर इतकी बोचरी झाली कि बोलता हि येईना.
मळवली स्टेशन 🚉 जवळ गरमा गरम कांदा पोहे🍲, वडापाव 🍔 व चहा ☕असा पोटात भराव टाकून  लोहगड ⛰ कडे प्रस्थान केले.
भाजे लेणी ते लोहगड मधील घाटाचा रस्ता 🛣  खूपच खराब असल्या मुळे सावधगिरीने गाडी चालवावी लागली, सकाळी ८:१५ वा आम्ही लोहगड पायथ्याला पोहचलो. गाडी पार्क करून एक एक पायरी चढायला लागलो, बऱ्याच आधी मी इथे आलो होतो तेंव्हा या पायऱ्यांचे काम चालू होते आता ते पूर्ण झाले त्यामुळे गडावरती जाणे सुलभ झाले आहे, पण दुर्ग हे दुर्गम असलेले बरे, त्याचे दुर्गपण हरवता कामा नये असे मला वाटते.
आमच्या पैकी बरेच जण पहिल्यांदा आले होते, त्या पहाटेच्या प्रसन्न वातावरणा मध्ये फोटो काढायचा मोह ते तरी कसा टाळणार त्यामुळे आम्ही गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, बुरूज, तोफा व पाण्याचे टाके अश्या प्रत्येक ठिकाणी फोटो कात गड चलो. शिव मंदिर आणि त्या समोर असलेल्या हनुमान मंदिर व शिवलिंग यांना नमस्कार करून मंदिराच्या अंगणात थोडी विश्रांती घेतेली. पाण्याचा टाक्या व आजुबाजुच्या परिसर न्याहाळत  विंचू कड्याच्या दिशेने  गेलो. कड्यावर बसून सर्वानी आणलेला फराळ करून माघारी निघालो ,  परत येताना भली मोठी 16 कोनी  🏟  विहीर पाहून गड उतरायला सुरवात केली. पहाटे लवकर गेल्यामुळे विशेष गर्दी जाणवली नाही पण गड उतरताना गर्दी वाढू लागली. पायऱ्यांच्या सुरवातीच्या जवळची दुकानांची संख्या पाहून मनात एक विचार आला कि आता "लोहगडचा सिंहगड होऊ नये".
अशा प्रकारे लोहगडभेटीने नुतन वर्षांचा प्रारंभ 🌄 केला या वर्षी असेच आणखी किल्ले पाहण्याचा निच्छय केला.
सोबती- संतोष सांभारे, राहुल पाटील, सागर साळुंके, राजेश लोमटे, राजेंद्र चौधरी, गणेश देशमुख, केतन देसले.
©सुशील राजगोळकर


Lohgad Trek with PCCOE colleagues





लोहगड वरील तोफा



गणेश दरवाजा लोहगड


हनुमान दरवाजा लोहगड

लोहगडावरील तोफ

लोहगडावरील शिवलिंग 

लोहगडावरील हनुमान मंदीर व शिवलिंग 



विंचूकडा

१६ कोणी विहीर


भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.