रायगड ⛰️🚩 RAIGAD २० नोव्हेंबर २०२१

खूप दिवसांपासून मुलगा म्हणत होता ट्रेकला जाऊया ना पप्पा, नेमकं बायकोला पण रायगड पहायचा होता. मग काय केला प्लॅन रायगडाचा..! अन अखेर तो दिवस उजाडला.... सहपरिवार शुक्रवार १९-नोव्हेंबर-२०२१ सकाळी ०८:३० वाजता आम्ही निघालो 🏍️ व पिरंगुटला येऊन थांबलो. थोड्याच वेळात हेमंत परिवारा सोबत आला आणि आम्ही पुढे निघालो. मुळशी तलावाच्या 🌅 काठावरती बसून सकाळचा नाष्टा केला🍜. 

मुळशी तलावा काठी
मुळशी तलावा काठी
ताम्हाणी घाटाचा निसर्गरम्य परिसर न्याहाळत दुपारी १२:३० वाजता सणसवाडी येथे येऊन पोहचलो. तेथून पुढे अष्टविनायक गणपती "पाली गावाचा बल्लाळेश्वर" च्या दर्शनासाठी गेलो. नंतर तेथील विश्रामगृहा मध्ये दुपारचे जेवण उरकले 🫓🥘 व पुढे पाचाड कडे निघालो. मस्त रिमझिम असा पाऊस 🌧️ झाला होता. रस्त्याचा दुतर्फा हिरव्यागार गर्द झाडीने शालू पांघरलेला...🌳🍀 त्या थंड प्रसन्न वातावरण मध्ये बाईक 🏍️ चालवणे म्हणजे सुख...!

पाली गावाचे बल्लाळेश्वर गणपती मंदिर
पाली गावाचे बल्लाळेश्वर गणपती मंदिर

पाली येथून किल्ले सरसगड
पाली येथून किल्ले सरसगड

पुढे सणसवाडी निजामपूर मार्गे रायगडाकडे निघालो. प्रथम वाटेमध्ये पाचाडला असलेले राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा समाधीला नमस्कार केला व जवळच असलेला माँसाहेबांचा वाडा पाहिला. 🏘️ वाडयामधील असलेल्या अवशेषा वरून त्याची भव्यता लक्षात येते. वाडयाच्या आतमध्ये असलेली चौकी, सदर, तकयाची विहीर, तटबंधीला असलेल्या पायऱ्या, शौचालय, पाण्याचा टाक्या व इतर अवशेष आजही आपले थोडेफार अस्तित्व जपून आहेत. वाडा बघेपर्यंत संध्याकाळ झाली व तेथून दिसणारा सुर्यास्त पाहत होतो तितक्यात सुरक्षा रक्षकाची शीळ कानावर आली....चला वाडा बंद करायचा आहे. तसे आम्ही बाहेर आलो व किल्ले रायगडचा पायथ्याला असलेल्या हॉटेल रायगड फार्म हाऊस येथे मुक्कामासाठी आलो.

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा समाधी - पाचाड
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधी - पाचाड

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा - पाचाड
राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा - पाचाड 

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा - पाचाड
राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा - पाचाड 
तकयाची विहीर राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा - पाचाड
तकयाची विहीर राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा - पाचाड
सुर्यास्त
शनिवार २०-नोव्हेंबर-२०२१ पहाटे लवकर उठून आवरले. हॉटेल मध्येच कांदापोहे-चहा असा नाश्ता घेतला. हॉटेल पासून जवळच रायगडाचा चढाईचा मार्ग होता. पहाटे ०६:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषात रायगड चढायला ⛰️ सुरुवात केली. पहिले नागमोडी वळण व एक एक पायरी चढत, काही पायऱ्या चढुन जाताच समोर खुबलढा बुरुज पाहायला मिळाला. सकाळची ती रम्य 🌄 पहाट, सह्याद्रीच्या डोंगररांगे मध्ये खाली उतरलेले ढग पाहत, मजल दर मजल करत २ तासांच्या चढाई नंतर आम्ही महादरवाजा पाशी येऊन पोहचलो.
पायर्‍यांची वाट - किल्ले रायगड
पायर्‍यांची वाट - किल्ले रायगड

खुबलढा बुरूज - किल्ले रायगड
खुबलढा बुरूज - किल्ले रायगड

महादरवाजा बुरुज - किल्ले रायगड
महादरवाजाचे बुरुज - किल्ले रायगड

महादरवाजा - किल्ले रायगड
महादरवाजा - किल्ले रायगड
पुढे डाव्याबाजूने बाल्लेकिल्लाचा दिशेने चालायला सुरुवात केली. समोर २ तोफा पाहायला मिळाल्या. तेथून पुढे हत्ती तलाव व बाजूला असलेले हनुमान टाके पाहिले. मग पुढे जाण्याआधी आम्ही एक मार्गदर्शक सोबतीला घेतला (रमेश ढेबे ९२८४३५३९२६). पुढे गंगासागर तलाव पाहिला व तलावातील थंडगार पाणी घेतले व पालखी दरवाजाने प्रवेश केला.
तोफा -  किल्ले रायगड
तोफा -  किल्ले रायगड
वरील दिशेने महादरवाजा व तटबंदी - किल्ले रायगड
वरील दिशेने महादरवाजा व तटबंदी - किल्ले रायगड

हनुमान टाकी येथील कोरीव हनुमान -किल्ले रायगड
हनुमान टाकी येथील कोरीव हनुमान -किल्ले रायगड

हनुमान टाके - किल्ले रायगड
हनुमान टाके - किल्ले रायगड

गंगासागर तलाव - किल्ले रायगड
गंगासागर तलाव - किल्ले रायगड

पालखी दरवाजा - किल्ले रायगड
पालखी दरवाजा - किल्ले रायगड
गंगासागर तलाव व मागे मनोरे - किल्ले रायगड
पुढे असलेल्या राणीवसा, धान्यांचे कोठार, मंत्र्यांचे वाडे, कार्यालय, मेणा दरवाजा, राजवाडा, सचिवालय, टाकसाळ, खलबत खाना, उंच मनोरे (स्तंभ) असे सर्व पाहून राजसभा येथे आलो. 
राणीवसा - किल्ले रायगड
राणीवसा - किल्ले रायगड

राणीवसा - किल्ले रायगड
राणीवसा - किल्ले रायगड
धान्यांचे कोठार - किल्ले रायगड
धान्यांचे कोठार - किल्ले रायगड

राणीवसा येथील सौचालय- किल्ले रायगड

अष्टप्रधांनाचे वाडे - किल्ले रायगड
अष्टप्रधांनाचे वाडे - किल्ले रायगड

मेणा दरवाजा - किल्ले रायगड


टाकसाळ - किल्ले रायगड
टाकसाळ - किल्ले रायगड

खलबतखाना - किल्ले रायगड
खलबतखाना - किल्ले रायगड

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राजवाडा - किल्ले रायगड
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राजवाडा - किल्ले रायगड
राजसभा येथे सिंहासनावर पंच धातूने बनलेल्या मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून पुढील किल्ला पाहायला घेतला. त्या काळी माईक स्पीकरची जरी सुविधा नसली तरी राजसभेची रचनाच अशी आहे कि आजतागायत देखील नगारखाना येथे कागद जरी फाडला तरी त्याचा आवाज सिंहासना जवळ ऐकू येतो. पुढे नगारखाना पाहून होळीचा माळा वरती आलो.


राजसभा येथील मेघडंबरी मधील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची मूर्ती - किल्ले रायगड

नगारखाना - किल्ले रायगड
नगारखाना - किल्ले रायगड
होळीच्या माळा येथिल छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
होळीचा माळ येथिल छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुढे तेथे असलेल्या शिर्काई देवीचे दर्शन घेतले, पुढे बाजारपेठ, इतर अवशेष व कोळींब तलाव पाहून जगदीश्वर मंदिराच्या मागील (पश्चिम) दरवाजाने प्रवेश केला.
शिर्काई देवीचे मंदिर - किल्ले रायगड
शिर्काई देवीचे मंदिर - किल्ले रायगड

बाजारपेठ - किल्ले रायगड
बाजारपेठ - किल्ले रायगड

बाजारपेठेतील नाग - किल्ले रायगड
बाजारपेठेतील नाग - किल्ले रायगड



कोळिंब तलाव - किल्ले रायगड

कोळिंब तलाव - किल्ले रायगड

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये शिवलिंग व गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूला हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराचा बाहेरील नंदी पाहता इतर राजवटीमध्ये नंदीची मोडतोड झालेली जाणवते. मंदिरा समोरील (पूर्व) दरवाजाने बाहेर येताच उजव्या बाजूला नजरे समोर अष्टकोनी चौथरा दिसतो ती महाराजांची समाधी, तेथे नतमस्तक झालो. या पूर्वेकडील दरवाजाचा दुसऱ्या पायरीवर एक लहानसा शिलालेख दिसतो ’सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर’, ज्यांनी हा रायगड बांधला त्यांच्या नावाचा हा शिलालेख. तसेच दरवाजाचा उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख कोरलेला दिसतो. ते सर्व पाहून झाल्यानंतर मंदिरामधून बाहेर आलो. 

जगदीश्वर मंदिर - किल्ले रायगड
जगदीश्वर मंदिर - किल्ले रायगड

मंदिरामधील हनुमानाची मूर्ती-  किल्ले रायगड
मंदिरामधील हनुमानाची मूर्ती-  किल्ले रायगड

जगदीश्वर मंदिरासमोरील नंदी - किल्ले रायगड
जगदीश्वर मंदिरासमोरील नंदी - किल्ले रायगड

मंदिराच्या पायरीवरील शिलालेख 'सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर' - किल्ले रायगड
मंदिराच्या पायरीवरील शिलालेख 'सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर' - किल्ले रायगड

भिंतीवरील शीलालेख - किल्ले रायगड
भिंतीवरील शीलालेख - किल्ले रायगड

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची समाधी - किल्ले रायगड
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची समाधी - किल्ले रायगड

मंदिराच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे ते लांब असल्यामुळे नाही पाहता आले, मग उजवीकडे थोडे खालील दिशेला असलेली बारा टाकी व दारूची कोठारे पाहिली. तेथून खोल दरीमध्ये वाघ दरवाजा दिसत होता मन तर खूप सांगत होते पुन्हा कधी पाहणार? पण परिवार सोबत असल्यामुळे तेथूनच माघारी फिरलो.


बारा टाकी येथील कोठारे - किल्ले रायगड
बारा टाकी येथील कोठारे - किल्ले रायगड

बारा टाकी - किल्ले रायगड
बारा टाकी - किल्ले रायगड


बाजारपेठेच्या बाजूला गावकऱ्यांची काही घरे 🛖⛺ आहेत तेथे दुपारचे जेवण🥘 उरकले. नंतर बाजारपेठतुन होळीचा माळावरती आलो व तेथुन डाव्याबाजूला थोडे खालील दिशेला असलेल्या वाडेश्वर महादेव मंदिर, कुशावर्त तलाव व इतर इमारतींचे अवशेष पाहून माघारी फिरलो व गड उतार झालो.

कुशावर्त तलाव - किल्ले रायगड
कुशावर्त तलाव - किल्ले रायगड

वाडेश्वर महादेव मंदिर - किल्ले रायगड
वाडेश्वर महादेव मंदिर - किल्ले रायगड

कुशावर्त तलाव - किल्ले रायगड
कुशावर्त तलाव - किल्ले रायगड

 ज्या कारणासाठी इतके दिवस जाणे टाळत होतो तसेच झाले. रायगड हा धावत पळत वा एका दिवसात जगण्याचा / पाहण्याचा विषय नाही. शेवटी हिरकणी बुरुज, महादरवाजा समोरील पाण्याचा टाक्या, टकमक टोक, वाघ दरवाजा, भवानी कडा, काळा हौद, वाघबीळ, गुहा व इतर कित्येक अवशेष पाहायचे राहिले आहेत याचीच आता खंत.....!!

सध्या रोपवेमुळे किल्ल्यावरती येणाऱ्या लोकांची गर्दी वाढलेली आहे ते अभिमानाचेच आहे पण किल्ल्यावरती कचऱ्याचे प्रमाण देखील खूप दिसत आहे. ते कुठेतरी थांबले पाहिजे...!
साडेचार वर्षाचा माझा मुलगा निरव मात्र इतका मोठा रायगड किल्ला अगदी न थकता चढून आला व पूर्ण फिरला देखील, यासाठी त्याचे विशेष कौतुक वाटले. भेटू लवकरच पुन्हा रायगडा वरती.....!!

© सुशील राजगोळकर



रायगड किल्ल्यावरून दिसणारा जिजाऊ माँसाहेब यांचा राजवाडा




भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.