सरसगड व सुधागड , ०६ व ०७ ऑगस्ट २०२२ | Sarasgad & Sudhagad 06 & 07 Aug 2022 ⛰️🚩

०६ ऑगस्ट २०२२ ला पहाटे ७ वाजता पुणे वरून एकटा बाईक 🏍️ घेऊन निघालो. पुढे नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या पहाटेचा सुंदर वातावरणीतलं लोणावळा-खंडाळा घाट प्रवासाचा आनंद घेत ०९:३० वाजता शिळफाटा खोपोली येथे पोहचलो, व अजित आणि अभिजित मुंबई वरून येणार होते त्याची वाट पाहत थोडा वेळ थांबलो. थोड्या वेळाने ते दोघे आले व पुढे एका हॉटेल मध्ये सकाळचा भरपेट नाष्टा 🍽️ करून पालीचा दिशेने निघालो. वाटे मध्ये जांभूळपाडा मृगगड असा फलक दिसला आणि क्षणभर विचार आला मृगगड पाहून पुढे जाऊया ? आणि आमच्या गाड्या तेथे थांबल्या. तेथे थांबून थोडी चर्चा केली, दोन दिवसा मध्ये सरसगड व सुधागड वैतिरिक्त अजून काही ठिकाणे जसे मृगगड, ठाणाळे लेणी, उंबरखिंड, उन्हेरे कुंड (रामकुंड) पाहता येथील का ? पण दुसऱ्या दिवशी वेळ पाहून ठरवू असे ठरवून पुढे पाली सरसगड कडे निघालो. वाटे मध्ये  सकाळ पासून अदृश्य असलेला पाऊस रिमझिम बरसू लागला. पहिल्या दिवसाचा बाईक प्रवास संपवून आम्ही १२:३० वाजता पाली गावातील सरसगड कडे जाणाऱ्या वाटेवरती येऊन पोहचलो.


सरसगड ⛰️🚩

पायथ्याला असलेल्या एका घरामध्ये आमचा बॅग मधील काही ओझे रिकामी करून आम्ही सरसगडचा दिशेने चालायला सुरवात केली. गडावर जातांना वाटे मध्ये एक पाण्याचे टाके लागले. गडाकडे जाणारी वाट काहीशी झाडा झुडपातून तर काहीशी सरळ सोपी अशी होती. पण वाट चढतांना वातावरणा मध्ये खूप आद्रता जाणवत होती. थोड्याच वेळात ढग दाटून आले. व त्या ढगामागे सरसगड उघडझाप होताना पाहाने खूप नयनरम्य होते. इतक्यात अचानक धो-धो पाऊस कोसळू लागला 🌧️. खूप दिवसा नंतर अशा डोंगर पठारावरती या अश्या बरसणाऱ्या पावसाचा आनंद घेत आम्ही एका लहान झाडाच्या 🌳 आडोशाला उभे राहिलो. पुढे पावसाचा जोर ओसरल्यावर गडाचा दिशेने निघालो. 



धुक्यात हरवलेला सरसगड
धुक्यात हरवलेला सरसगड 

पुढे सुरवातीला काही दगडातील लहान पायऱ्या चढुन गुहे पाशी येऊन पोहचलो. पुढे दोन डोंगराचा मध्ये घळीतून खोदून बनवलेल्या साधारण १.५ ते २ फूट उंचीची एक पायरी अश्या ९४ दगडी पायऱ्या चढून दक्षिण दिशेचा मुख्य दरवाजा पाशी येऊन पोहचलो. या पायऱ्या चढून आलो पण नंतर जातांना उतरण्याची थोडी भीतीच वाटत होती. बघु नंतर आता आलोय तर पूर्ण गड आधी पाहून घेऊ असे म्हणून मुख्य प्रवेश द्वाराचा उंभऱ्याला नमस्कार करून आत मध्ये प्रवेश केला. गडाचा मुख्य दरवाजा, देवड्या व पायऱ्या या पूर्ण एका आखंड दगडामध्ये खोदून बनवलेल्या पाहायला मिळाल्या. 

दक्षिण दरवाजा - सरसगड
दक्षिण दरवाजा - सरसगड

दक्षिण दरवाजा मागील देवड्या - सरसगड
दक्षिण दरवाजा मागील देवड्या - सरसगड 

डोंगर घळीतील पायऱ्या - सरसगड
डोंगर घळीतील पायऱ्या - सरसगड

पुढे माचीवरती पूर्व दिशेचा बुरुजावरून थोडे वरील देशाला पुढे आलो व बालेकिल्ल्याच्या पायथ्याने गडाला फेरा मारायला सुरवात केली. या बाल्ले किल्याचा सभोवताली असलेल्या गुहा, कित्येक पाण्याची टाकी, हौद, शत्राग्रह पाहत फेरा चालू होता. पुढे २ मोठे पाण्याचे टाके पाहायला मिळाले. तसेच उत्तर दरवाजाचा आधी एक लहान दरवाजा मधून एक वाट बुरुजा वरती जाते. तेथे जाऊन माघारी आलो व उत्तर दरवाजा पाहिला. पुढे काही पडके अवशेष पाहायला मिळाले. तेथून थोडे पुढे येऊन बाल्ले किल्याचा चढाईला सुरवात केली. 

शत्राग्रह - सरसगड
शत्राग्रह - सरसगड

कोठार - सरसगड
कोठार - सरसगड

कोठार - सरसगड
कोठार - सरसगड

पाण्याचे टाके - सरसगड
पाण्याचे टाके - सरसगड 

उत्तर दरवाजा - सरसगड
उत्तर दरवाजा - सरसगड 

उत्तर दरवाजा - सरसगड
उत्तर दरवाजा - सरसगड 

पाण्याचे टाके - सरसगड
पाण्याचे टाके - सरसगड 

रिमझिम पाऊस बरसतच होता त्यात वाट थोडी अवघड व जोखमीची होती. सावधानता बाळगत आम्ही बाल्ले किल्ल्यावरती येऊन पोहोचलो. वरती तलावाचा काठाला शिवकालीन महादेव मंदिर पाहायला मिळाले. 🛕 मंदिराला पत्र्याचे आच्छादन बनवलेले आहे तेथे थोडी उसंत घेऊन दुपारचे भोजन केले. मंदिरा जवळ आता छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती बसवलेली नजरेस पडली.

बाल्ले किल्ल्याचा वाटेवरील पायऱ्या - सरसगड
बाल्ले किल्ल्याचा वाटेवरील पायऱ्या - सरसगड 

बाल्ले किल्ल्यावरील तलावाकाठील महादेव मंदिर - सरसगड 

बाल्ले किल्ल्यावरील तलावाकाठील महादेव मंदिराचे अवशेष  - सरसगड
बाल्ले किल्ल्यावरील तलावाकाठील महादेव मंदिराचे अवशेष  - सरसगड 

बाल्ले किल्ल्यावरील तलावाकाठील महादेव मंदिराचे अवशेष  - सरसगड 

बाल्ले किल्ल्यावरील तलावाकाठील महादेव मंदिर - सरसगड 

पुढे बाल्ले किल्ला उतरून माचीवरती आलो. बाल्ले किल्याची प्रदक्षिणा पूर्ण करतांना एक वाट तटबंदीला लागून दक्षिण दरवाजा पर्यंत जातांना दिसत होती. पण खूप घनदाट झाडी वाढल्यामुळे आम्ही त्या वाटेने जाणे टाळुन वरीच्या दिशेने असलेल्या दुसऱ्या वाटेने पुढे आलो व जेथून फेरा चालू केला होता तेथे येऊन पोहचलो व मुख्य दरवाजा पाशी आलो. पावसाळा मध्ये काही ठिकाणी भटकंती करतांना खूप जोखमीची असते तशीच जोखीम सरसगडच्या पायऱ्यांचा इथे जाणवली. ज्या पायऱ्या चढून आलो होतो त्या खूप उंच, शेवाळलेल्या व निसरड्या झाल्या होत्या. त्यामुळे आता मात्र आम्ही एक मेकाला आधार देत खूप सावधगिरीने एक एक पायरी उतरू लागलो होतो व तसेच गुहे पाशी येऊन पोहचलो. सरासगडचा ट्रेक संपवून साधारण ०५:०० वाजता पायथ्याला पाली येथे येऊन पोहचलो. पुढे सुधागड पाहायला दुसऱ्या दिवशी सकाळी जायचे असे ठरवले.

दक्षिण दरवाजा येथील डोंगर घळीतील पायऱ्याची वाट - सरसगड
दक्षिण दरवाजा येथील डोंगर घळीतील पायऱ्याची वाट - सरसगड

बल्लाळेश्वर गणपती (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक ठिकाण. 🛕 येथील गणपती ‘बल्लाळेश्वर’ म्हणून ओळखला जातो. रात्री गणपतीचे दर्शन घेतले, या मंदिराचा समोर पाण्याचे दोन कुंड आहेत. दर्शनानंतर पाली येथे रात्रीचे जेवण करून मंदिराचा विश्रामगृहा मध्ये मुक्काम केला. 


बल्लाळेश्वर मंदिर - पाली 

बल्लाळेश्वर मंदिर - पाली 

सुधागड ⛰️🚩

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरले व सुधागड ट्रेक साठी पाच्छापूर कडे निघालो. सकाळी ७ वाजता पाच्छापूर येथे पोहचलो. पाच्छापूर गावातील निशांत तांबट 9225136215 यांचा घरी सकाळचा नाष्टा केला व दुपारचा जेवणासाठी येऊ असे सांगून आमचा बॅग मधील ओझे, हेल्मेट इ. तेथेच ठेऊन पुढे दर्यागाव (ठाकूरवाडी) येथे पोहोचलो. तेथील अंगणवाडीचा समोर बाईक लावून, तेथूनच जाणाऱ्या वाटेने सुधागडचा दिशेने चालायला सुरवात केली. वाटे मध्ये २ अवघड ठिकाणी आता लोखंडी शिडी बसवल्या आहेत. मुख्य दरवाजाचा आधी काही तुटलेल्या पायऱ्यांची वाट आहे. तेथून पुढे  मुख्य दरवाजा पाशी येऊन पोहचलो. या दरवाजाचा बाजूचे बुरुज हे अखंड दगडातील कोरीव व वरील काही भाग दगडामध्ये बांधून काढलेले आहेत. येथील दरवाजांची पडझड झालेली पहायला मिळाली. मात्र एक चोर वाट बुरुजावरती जाते. पुढे बाजूला असलेला एक चिलखती बुरुज पाहून तेथून आम्ही किल्याचा मुख्य पठाराचा दिशेने चढाई करू लागलो. साधारण २.५ तासाचा खड्या चढाई नंतर आम्ही किल्याचा पठारा वरती येऊन पोहचलो.


सुधागडचा वाटेवरील शिडीचा वाट

पायऱ्यांची वाट - सुधागड

पायऱ्यांची वाट - सुधागड

चिलखती बुरजावरती जाणारी वाट - सुधागड 

पुढे एक शिवमंदिर, 🛕 मंदिरा मागे बांधीव तलाव व मंदिरा समोर असलेला गणपती पाहून पुढे चालून गेलो. पुढे वाटेत असलेला उध्वस्त वाडा व इतर उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहत वाड्या पाशी येऊन पोहचलो. वाडा अजूनहि आपली तग धरून उभा आहे. वाड्या मध्ये काही इतर अवशेष पाहायला मिळाले. वाड्याचा बाजूला असलेले शिव मंदिर पाहिले. या मंदिरामध्ये इतर देवी देवतांचा मुर्ती आहेत, तेथून पुढे एकवाट गुप्त दरवाजा व एक वाट पुढे भोराई मंदिरा कडे जाते.

शिव मंदिर व मागे बांधिव तलाव - सुधागड

शिव मंदिरा जवळ असलेली गणपती मुर्ती - सुधागड

शिव मंदिरा मागिल बांधिव तलाव - सुधागड

अवशेष - सुधागड 

वाडा - सुधागड 


वाड्यामध्ये असलेले अवशेष - सुधागड 

शिव मंदिरातील शिवलिंग व इतर देवी-देवतांच्या मुर्ती - सुधागड 


पुढे दगडे रचून बनवलेल्या वाटेने भोराई मंदिराचा दिशेने चालू लागलो, त्याआधी उजव्या बाजूला असलेल्या पावसाळी तलावाचा काठाणे पुढे जाऊन ३ उध्वस्त कोठारे पाहिली. पुढे आंबाचा पारापाशी आलो. पुढे टकमक टोक कडे जात असतांना दाट धुके दाटून आले त्यामुळे माघारी फिरलो व भोराई मंदिरा जवळ आलो.
तलाव - सुधागड 

तलाव - सुधागड 

दारुगोळा कोठारे - सुधागड 

दारुगोळा कोठारे - सुधागड 

🛕 भोराई मंदिरा समोर एक दीपमाळ आहे, या दीपमाळेवर एक हत्ती कोरलेला आहे, जणू त्या हत्तीने आपल्या पाठीवर ती दीपमाळ घेतली आहे असे वाटले. तसेच मंदिरा जवळ आता गडावर इतरत्र सापडलेल्या विरगळी एकत्र ठेवलेल्या पाहायला मिळाल्या. तसेच मंदिरा समोर अज्ञात वीरांचा समाधी आहेत त्या पाहून, भोराई मातेचा मंदिरा समोर व थोडे पुढे हनुमान मंदिरा मध्ये नमस्कार केला.

भोराई देवी मंदिर - सुधागड 

भोराई देवी मंदिर - सुधागड 

भोराई देवी मंदिराचा गाभारा - सुधागड 

भोराई देवी मंदिरा समोरील दिपमाळ - सुधागड 

भोराई देवी मंदिरा समोर असलेल्या विरगळी- सुधागड 

भोराई देवी मंदिरा समोर असलेल्या अज्ञात विरांच्या समाधी - सुधागड 

हनुमान मंदिर व मागे भोराई देवी मंदिर - सुधागड 

पुढे हनुमान मंदीराचा थोडे खालील दिशेला धोंडशे गांवाकडून येणाऱ्या मार्गाने खाली उतरलो. तेथे शरभ व कमळ असलेला गोमुखी महा दरवाजा पाहायला मिळाला, या दरवाज्याला पावसाचे पाणी वाहत जाण्यासाठी जागा ठेवली आहे, दरवाजाचा मागिल पायऱ्या व गोमुखी रचना ही कातळात कोरून बनवलेली पाहायला मिळाली, महा दरवाजा पाहून माघारी फिरलो.

गोमुखी महा दरवाजा मागिल वाट - सुधागड 

गोमुखी महा दरवाजा मागिल बाजू- सुधागड 

गोमुखी महा दरवाजा - सुधागड 

गोमुखी महा दरवाजाची वरील दिशेने मागिल बाजू- सुधागड 

पुढे येऊन गुप्त दरवाजा पाहायला खाली उतरलो. गुप्त दरवाजा पाहिला व तेथे वाटेत एक पिण्याच्या पाण्याचे टाके होते तेथून बाटली मध्ये पाणी भरून घेतले. व ज्या मार्गाने गड चढून आलो होतो त्याच मार्गे गड उतरायला सुरुवात केली. 

पाण्याचे टाके - सुधागड

गुप्त दरवाजा येथील बुरुज - सुधागड 

गड उतरतांना अचानक जोराचा वारा व पाऊस चालू झाला. वाटेत थोडे थांबून आम्ही ०३ वाजता पाच्छापूर येथे निशांत तांबट यांच्याकडे आलो. धो-धो पाऊस बरसतच होता त्यांचा घराचा अंगणा मध्ये त्यांनी आम्हाला दिलेल्या  🍱 गरमा गरम जेवणा वरती ताव दिला. जेवण एकदम सुरेख सात्विक असे होते. पुढे आम्ही आमचा बॅग पूर्ण पणे पॅक करून घेतल्या व सावकाश गाडी चालवत शिळफाटा खोपोली येथे पर्यंत एकत्र आलो. दिवसभर पाऊसात भिजत असल्यामुळे थोडी थंडी वाजत होती. शिळफाटा येथे ☕ चहा घेतला आणि अजित व अभि मुंबईकडे व मी पुणे कडे मार्गस्थ झालो.

© सुशील राजगोळकर



भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.