हरिश्चंद्रगड HARISHCHANDRAGAD

भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेला हरिश्चंद्रगड पाहायची इच्छा खूप होती, नियोजन काही होत नसल्यामुळे पाहायचा राहिला होता. पण अचानक संजय शेंडकरने प्लान बनवून कळवले. शनिवारी २३-०१-२०२१ रोजी पहाटे ०६:०० वाजता पुणे येथून निघालो. 🛣️ वाटेमध्ये नारायणगांवला नाश्ता 🍲करून ०९:३० वाजता खिरेश्वर या गावी पोहचलो. मुक्ताई मातेच्या मंदिराला 🛕 लागून असलेले अक्षय मुठे यांचे घर व हॉटेल मुक्ताई येथे गाडी लावून आम्ही आमच्या बॅगवर तंबू, चटई बांधून १०:०० वाजता टोलारखिंड मार्गाने हरिश्चंद्रगडाच्या दिशेने चालायला सुरवात केली. 🚶


मुक्ताई मातेचे मंदिर खिरेश्वर
मुक्ताई मातेचे मंदिर खिरेश्वर 

मुक्ताई मातेची मूर्ती - मुक्ताई मंदिर, खिरेश्वर
मुक्ताई मातेची मूर्ती - मुक्ताई मंदिर, खिरेश्वर
गावामधूनच पूर्ण मोठ्या उंच झाडांच्या जंगलामधुन वाट चालू झाली. भटक्यांचा गर्दी मुळे वाट चांगलीच मळलेळी आहे. वाटे मध्ये ठिक ठिकाणी 🍋 लिंबू सरबत, कोकम सरबत, काकडी विकणारे 🥒 गावकरी यांची दुकाने आहेत. त्या जंगलाचा वाटेमध्ये ऐकू येणारे पक्षाचे आवाज 🕊️ ऐकत आम्ही चालत होतो. पुढे एका झाडाखाली थोडे पाणी पिण्यासाठी विसावलो. तेथील शांततेमध्ये अचानक अफाट मधमाशांचा आवाज 🐝 कानावरती ऐकू येताच आम्ही वरती पाहू लागलो तर ते झाड पूर्ण पणे फुलांनी मोहरले होते🌳🌸.
वाटेमधील फुलांनी मोहरलेले झाड
वाटेमधील फुलांनी मोहरलेले झाड

पुढे पायथ्यापासून तासभराच्या चढाई नंतर आम्ही टोलारखिंड येथे येऊन पोहचलो. येथे समोरच वाघ्रशिल्प नजरेस आले🐯.🛕गावकरी याला वाघोबाचे देवस्थान असे म्हणतात. तसेच तेथे एका दगडावरती शिवलिंग पाहायला मिळाले. गड वनक्षेत्र 🎋🌳असल्याने, येथुन वनविभागाकडून प्लास्टिक व इतर तपासणी करून पुढे गडावरती सोडले जाते. टोलारखिंडीतुन खालील बाजूला कोथळे व लव्हाली 🏘️ या गावी वाट जाते. खिंडीमधून वरती गडाचा दिशेला २ मिनिट चालून येताच समोर उभा ठाकतो तो म्हणजे थोडाशा भीतीचा दगडाच्या चढाईचा मार्ग 🧗🏼‍♀️(rock patch). तेथे काही ठिकाणी दगडा मध्ये पायऱ्या बनवलेल्या आहेत. जंगल वाट संपवून पुढे आल्यामुळे दुपारचे ऊन खुप लागत होते. पुढे डोंगराचा काठावरून जाणारी वाट व दगडाच्या चढाईची (rock patch) वाट पार करून एका गुहे मध्ये येऊन विसावलो. तेथून पुढे चालून जाताच पूर्वे कडून गडाचा पठारावती पोहचलो. पुढे दोन वाटा जातात एक डाव्या बाजूने बालेकिल्ला कडून व एक उजव्या बाजूने, दोन्ही वाटा शेवटी मुख्य मंदिरापाशी जातात. आम्ही उजव्या बाजूने चालत वाटेमधील कोरडे ओढे, व आजू बाजूचा परिसर निहालत २:०० वाजता मुख्य मंदिरा पाशी येऊन पोहचलो. मंदिरा जवळील एका वाटेने बरेच लोक एक जात होते, विचारणा केली व थोडे पुढे वाट पाहून आलो. ती वाट पाचनई गावातून येते, सध्या चढाईसाठी सर्वात जवळची व सोपी वाट म्हणून या वाटेचा जास्त उपयोग करत आहेत. गडावरती वनविभागाणे दिलेल्या नियमा प्रमाणे पाचनई मधील गावकऱ्यांनी लहान हॉटेल बनवलेत त्या पैकी कैलास भारमल यांचे हॉटेल राजयोग येथे जाऊन आम्ही आमचा पाठीवरील बोझा उतरविला. तेथेच घरून घेतलेले दुपारचे जेवण उरकून🍲 एक तास भर विश्रांती घेतली. व पुढील नियोजन ठरविले.

तोलारखिंड येथिल वाघ्रशिल्प
तोलारखिंड येथिल वाघ्रशिल्प
तोलारखिंड येथिल शिवलिंग
तोलारखिंड येथिल शिवलिंग
तोलारखिंड नंतर असलेला दगडाचा चढाईचा मार्ग
तोलारखिंड नंतर असलेला दगडाचा चढाईचा मार्ग
वाटेतील गुहा
वाटेतील गुहा

दुपारच्या विश्रांती नंतर आम्ही मुख्य मंदिराचा परिसर पाहायला निघालो. प्रथम केदारेश्वर लेणी व केदारेश्वराचा पाण्यातील लेणी मधील शिवलिंग पाहिले व त्या थंडगार बर्फाळलेल्या पाण्यामधून शिवलींगाला प्रदक्षिणा मारली. या शिवलिंगा भोवती ४ खांब होते त्या पैकी आता एकच खांब पूर्ण शाबूत आहे व बाकीचे ३ खांब भग्न अवस्थेत आहेत.
पुढे गडावरील मुख्य 🛕🛕 हरिश्चंद्रेश्वर मंदिर, गाभाऱ्यातील शिवलिंग, तसेच या मंदिराला दोन बाजूने दरवाजे व त्या समोर नंदी पाहायला मिळतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिरातील गणपती, मंदिरावरील सुबक सुंदर नक्षीकाम, मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या काही गुहा, त्यातील एका गुहेत पुरातन काळातील काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिरा मधील पिण्याच्या पाण्याचे टाके, मंदिराचा बाजूने असलेली लहान मंदिरे पाहून बाहेर आलो.
मुख्य मंदिरा समोरील लहानशा मंदिरा मध्ये देखील गणपती व पाण्याखाली शिवलिंग पाहायला मिळाले. तसेच मंदिरा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी व इतर लहान सहान शिवलिंग व गणपती मंदिरे पाहायला मिळाली.

केदारेश्वर लेणी
केदारेश्वर लेणी

केदारेश्वराचा लेणी मधील पाण्यातील शिवलिंग
केदारेश्वराचा लेणी मधील पाण्यातील शिवलिंग

हरिश्चंद्रेश्वर मंदिर
हरिश्चंद्रेश्वर मंदिर
गाभाऱ्यातील शिवलिंग
गाभाऱ्यातील शिवलिंग
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला गणपती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला गणपती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला नंदी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला नंदी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील एका लहान मंदिर व शिवलिंग
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम

हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील पाण्याचे टाके
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील पाण्याचे टाके
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील गुहे मध्ये असलेल्या पुरातन काळातील काही मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील गुहे मध्ये असलेल्या पुरातन काळातील काही मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा समोरील लहानशे गणपती व शिवलिंग मंदिर
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा समोरील लहानशे गणपती व शिवलिंग मंदिर
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी
पुष्करणीचा मागील बाजूला असलेले गणपती मंदिर
पुष्करणीचा मागील बाजूला असलेले गणपती मंदिर

पुढे तेथूनच जवळ तारामती शिखराच्या पायथ्याला सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुंफेत गणेशाची सुमारे आठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती पाहायला मिळाली. याच गुहेच्या आजुबाजूला अनेक गुहा पाहायला मिळाल्या.

हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली लेणी / गुहा
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली लेणी / गुहा
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
पुढे संध्याकाळचा चहा घेऊन मंदिरा पासून १२०० मीटर लांब व पश्चिम दिशेला असलेला कोकण कडा पाहायला निघालो.⛰️ तो अप्रतिम मनमोहक कोकण कडा पाहून मन प्रसन्न झाले. त्यातच कोकण कडा वरून सूर्यास्त 🌤️पाहणे म्हणजे नयन सुखचं !! कोकण कडा येथे देखील लहान हॉटेल व बऱ्याच प्रमाणात तंबू ⛺ लावलेले दिसले. कोकण कडाच्या सूर्यास्ता नंतर विजेरीचा 🔦 प्रकाशामध्ये आम्ही माघारी फिरलो व मंदिर जवळ मुक्कामाच्या ठिकाणी आलो. मग आम्ही तेथेच अंगणा मध्ये आमचा तंबू ⛺ लावला तो पर्यंत जेवण तयार झाले. मग रात्री त्या गरमा गरम जेवणा वरती ताव मारला आणि मग त्या अंधाऱ्या रात्री शेकोटी पेटवून 🔥गप्पा गोष्टी केल्या.

कोकण कडा
कोकण कडा
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
हरिश्चंद्रेगडा वरील रात्रीचे जेवण
हरिश्चंद्रेगडा वरील रात्रीचे जेवण
तंबूमधील रात्र
तंबूमधील रात्र
हरिश्चंद्रेगडा वरील रात्रीची शेकोटी
हरिश्चंद्रेगडा वरील रात्रीची शेकोटी

दुसरे दिवशी रविवार २४-०१-२०२१ सकाळी पुन्हा ताजे तवाने होऊन चहा घेतला व ०६:०० वाजता अंधारा मध्ये महाराष्ट्रामधील चौथे उंच "तारामती शिखर" चढायला सुरवात केली. अर्धा तास भरात चढाई करून आम्ही शिखरावर सूर्यनारायणाची वाट पाहत बसलो. व ०७:१४ मिनिटाने सुर्य ️ डोंगर रांगेतून बाहेर डोकावून पाहू लागला. तो नयनरम्य सूर्योदयाचा नजारा डोळ्यात सामावून घेतला. व तारामती शिखरावरील शिवलिंग, ध्वजस्तंभ, शिखरावरून दिसणारा कालभैरी डोंगर, कोकणकडा, आजू बाजूची डोंगर रांग️,खाली दिसत असलेले गडावरील मंदिर पाहून शिखराला फेरा मारला व शिखर उतरून आलो. तो पर्यंत सकाळचे ०९:०० वाजले होते. मग आम्ही नाश्ता उरकून आमचा तंबू काढला व बॅग वरती बांधून गड उतरायला सज्ज झालो. सकाळी ०९:३० वाजता राजमार्ग जुन्नर दरवाजाने गड उतरायचा असे ठरवून निघालो. वाटेमध्ये दिसत असलेला बाल्लेकिल्ला पाहत आम्ही चालू लागलो. वेळे अभावी बाल्ले किल्ला वरती चढाई केली नाही. पण खालून बाल्ले किल्याला थोडीशी तटबंधी दिसत होती. राजमार्गाचा रस्ता काही सापडला नाही मग तेथील गावकऱ्यांचा माहिती नुसार आम्ही मार्ग शोधायचा प्रयत्न केला. पण खूप घनदाट झाडीतुन मार्ग शोधत थोडे अंतर आत चालून गेलो. पण कदाचित ती प्राण्याची वाट असावी व पुढे जाऊन ती वाट पण बंद झाली व दुसरी कोणतीच वाट नसल्यामुळे माघारी फिरलो. व ज्या मार्गाने गडावरती आलो होतो त्या मार्गे गड उतरला. गडाखाली पोहचल्या नंतर चौकशी केली असता जुन्नर दरवाजाने आधी जाऊन आलेले किंवा वाटाड्या शिवाय शक्यतो कोणी येत जात नाही असे समजले. पुढे आम्ही पिंपळगाव जोग धरणावरती पोहूण पुन्हा माघारी हॉटेल मुक्ताई येथे आलो. व दुपारचे जेवण उरकुन ०३:०० वाजता पुणे कडे निघालो.

तारामती शिखर वरून सूर्योदय
तारामती शिखर वरून सूर्योदय
तारामती शिखर वरून सूर्योदय पाहताना
तारामती शिखर वरून सूर्योदय पाहताना
तारामती शिखर वरील शिवलिंग
तारामती शिखर वरील शिवलिंग

तारामती शिखर वरील ध्वज स्तंभ
तारामती शिखर वरील ध्वज स्तंभ
तारामती शिखर
तारामती शिखर

तारामती शिखर
तारामती शिखर
सकाळचा नाष्टा
सकाळचा नाष्टा
मुक्कामाचे हॉटेल राजयोग
मुक्कामाचे हॉटेल राजयोग
पठारावरून दिसणारा बाल्ले किल्ला
पठारावरून दिसणारा बाल्ले किल्ला
पिंपळगाव जोग धरण येथील पुरातन शिवलिंग
पिंपळगाव जोग धरण येथील पुरातन शिवलिंग
पिंपळगाव जोग धरणाचा जलाशय व मागे दिसणारा शिंदोळा किल्ला
पिंपळगाव जोग धरणाचा जलाशय व मागे दिसणारा शिंदोळा किल्ला

पूर्ण गड पाहून झाल्या नंतर येथे पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा निर्माण झाली, म्हणूनच कदाचित हरिश्चंद्रगडाला भटक्यांची पंढरी असे म्हणतात........

सोबती: संजय शेंडकर, वैभव सोनावणे, अकाश भोसले.

©सुशील राजगोळकर





भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.