भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेला हरिश्चंद्रगड पाहायची इच्छा खूप होती, नियोजन काही होत नसल्यामुळे पाहायचा राहिला होता. पण अचानक संजय शेंडकरने प्लान बनवून कळवले. शनिवारी २३-०१-२०२१ रोजी पहाटे ०६:०० वाजता पुणे येथून निघालो. ️ वाटेमध्ये नारायणगांवला नाश्ता करून ०९:३० वाजता खिरेश्वर या गावी पोहचलो. मुक्ताई मातेच्या मंदिराला 🛕 लागून असलेले अक्षय मुठे यांचे घर व हॉटेल मुक्ताई येथे गाडी लावून आम्ही आमच्या बॅगवर तंबू, चटई बांधून १०:०० वाजता टोलारखिंड मार्गाने हरिश्चंद्रगडाच्या दिशेने चालायला सुरवात केली.
|
मुक्ताई मातेचे मंदिर खिरेश्वर |
|
मुक्ताई मातेची मूर्ती - मुक्ताई मंदिर, खिरेश्वर |
|
वाटेमधील फुलांनी मोहरलेले झाड |
पुढे पायथ्यापासून तासभराच्या चढाई नंतर आम्ही टोलारखिंड येथे येऊन पोहचलो. येथे समोरच वाघ्रशिल्प नजरेस आले.🛕गावकरी याला वाघोबाचे देवस्थान असे म्हणतात. तसेच तेथे एका दगडावरती शिवलिंग पाहायला मिळाले. गड वनक्षेत्र असल्याने, येथुन वनविभागाकडून प्लास्टिक व इतर तपासणी करून पुढे गडावरती सोडले जाते. टोलारखिंडीतुन खालील बाजूला कोथळे व लव्हाली ️ या गावी वाट जाते. खिंडीमधून वरती गडाचा दिशेला २ मिनिट चालून येताच समोर उभा ठाकतो तो म्हणजे थोडाशा भीतीचा दगडाच्या चढाईचा मार्ग 🧗🏼♀️(rock patch). तेथे काही ठिकाणी दगडा मध्ये पायऱ्या बनवलेल्या आहेत. जंगल वाट संपवून पुढे आल्यामुळे दुपारचे ऊन खुप लागत होते. पुढे डोंगराचा काठावरून जाणारी वाट व दगडाच्या चढाईची (rock patch) वाट पार करून एका गुहे मध्ये येऊन विसावलो. तेथून पुढे चालून जाताच पूर्वे कडून गडाचा पठारावती पोहचलो. पुढे दोन वाटा जातात एक डाव्या बाजूने बालेकिल्ला कडून व एक उजव्या बाजूने, दोन्ही वाटा शेवटी मुख्य मंदिरापाशी जातात. आम्ही उजव्या बाजूने चालत वाटेमधील कोरडे ओढे, व आजू बाजूचा परिसर निहालत २:०० वाजता मुख्य मंदिरा पाशी येऊन पोहचलो. मंदिरा जवळील एका वाटेने बरेच लोक एक जात होते, विचारणा केली व थोडे पुढे वाट पाहून आलो. ती वाट पाचनई गावातून येते, सध्या चढाईसाठी सर्वात जवळची व सोपी वाट म्हणून या वाटेचा जास्त उपयोग करत आहेत. गडावरती वनविभागाणे दिलेल्या नियमा प्रमाणे पाचनई मधील गावकऱ्यांनी लहान हॉटेल बनवलेत त्या पैकी कैलास भारमल यांचे हॉटेल राजयोग येथे जाऊन आम्ही आमचा पाठीवरील बोझा उतरविला. तेथेच घरून घेतलेले दुपारचे जेवण उरकून एक तास भर विश्रांती घेतली. व पुढील नियोजन ठरविले. |
तोलारखिंड येथिल वाघ्रशिल्प |
|
तोलारखिंड येथिल शिवलिंग |
|
तोलारखिंड नंतर असलेला दगडाचा चढाईचा मार्ग |
|
वाटेतील गुहा |
दुपारच्या विश्रांती नंतर आम्ही मुख्य मंदिराचा परिसर पाहायला निघालो. प्रथम केदारेश्वर लेणी व केदारेश्वराचा पाण्यातील लेणी मधील शिवलिंग पाहिले व त्या थंडगार बर्फाळलेल्या पाण्यामधून शिवलींगाला प्रदक्षिणा मारली. या शिवलिंगा भोवती ४ खांब होते त्या पैकी आता एकच खांब पूर्ण शाबूत आहे व बाकीचे ३ खांब भग्न अवस्थेत आहेत.
पुढे गडावरील मुख्य 🛕🛕 हरिश्चंद्रेश्वर मंदिर, गाभाऱ्यातील शिवलिंग, तसेच या मंदिराला दोन बाजूने दरवाजे व त्या समोर नंदी पाहायला मिळतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिरातील गणपती, मंदिरावरील सुबक सुंदर नक्षीकाम, मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या काही गुहा, त्यातील एका गुहेत पुरातन काळातील काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिरा मधील पिण्याच्या पाण्याचे टाके, मंदिराचा बाजूने असलेली लहान मंदिरे पाहून बाहेर आलो.
मुख्य मंदिरा समोरील लहानशा मंदिरा मध्ये देखील गणपती व पाण्याखाली शिवलिंग पाहायला मिळाले. तसेच मंदिरा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी व इतर लहान सहान शिवलिंग व गणपती मंदिरे पाहायला मिळाली.
|
केदारेश्वर लेणी |
|
केदारेश्वराचा लेणी मधील पाण्यातील शिवलिंग |
|
हरिश्चंद्रेश्वर मंदिर |
|
गाभाऱ्यातील शिवलिंग |
|
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम |
|
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला गणपती |
|
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम |
|
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला नंदी |
|
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील एका लहान मंदिर व शिवलिंग |
|
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम |
|
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील पाण्याचे टाके |
|
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील गुहे मध्ये असलेल्या पुरातन काळातील काही मूर्ती |
|
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा समोरील लहानशे गणपती व शिवलिंग मंदिर |
|
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी |
|
पुष्करणीचा मागील बाजूला असलेले गणपती मंदिर |
पूर्ण गड पाहून झाल्या नंतर येथे पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा निर्माण झाली, म्हणूनच कदाचित हरिश्चंद्रगडाला भटक्यांची पंढरी असे म्हणतात........
सोबती: संजय शेंडकर, वैभव सोनावणे, अकाश भोसले.
©सुशील राजगोळकर
No comments:
Post a Comment