Showing posts with label Trek near Junner. Show all posts
Showing posts with label Trek near Junner. Show all posts

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गाडी लावली. नाशिकफाटा (भोसरी) ते शिवाजीनगर असा मेट्रोचा प्रवास केला व रिक्षाने स्वारगेट येथे पोहचलो. आमचा प्रत्येक ट्रेकला बस इथूनच निघते मी मात्र नाशिकफाटा येथून जॉईन करतो. पण या वेळी आमचे मित्र प्रदिप मदने काही कारणास्तव या ट्रेकला येणार न्हवते. त्यामुळे मी आज स्वारगेटला आलो होतो. बस घेऊन ड्राइवर काका देखील वेळेत आले. तेथून येणाऱ्या सदस्यांना घेऊन १०:३० वाजता गाडी सोडली. पुढे नाशिक फाटा येथे काही सदस्य व काही मोशी येथून घेतले. पुढे नारायणगांव येथे चहा साठी थांबून पुढे जुन्नर, गणेशखिंड, माळशेज घाट मार्गे जेथून ट्रेकला सुरवात होते अशा "हॉटेल भैरवनाथ / मनूचा ढाबा" येथे रात्री ०३:३० वाजता येऊन पोहचलो. 

प्रथम मी सह्याद्री मित्र भास्कर मेंगाळे याची भेट घेतली, त्यांची नाष्ट्याची तयारी चालू झाली होती. तेथे मुंबई वरून अजित व शैलेश दादा मुंबईचे सदस्य घेऊन आले होते. ते ०२:०० वाजता पोहचले होते त्यांना झोप लागणार इतक्यात मी जाऊन उठवले. त्या नंतर सर्व सदस्यांना आवरून घ्यायला सांगितले.

पहाटे ०४:०० वाजता सर्वांचा परिचय व सूचना सत्र घेऊन प्रत्येक सदस्याला एक हार्नेस दिला व ट्रेकला सुरवात केली. आमचा सोबतीला रवी पारधी (बाळू दादा) वाटाड्या म्हणून आला, सर्वजण अंधारामध्ये विजेरीचा प्रकाशामध्ये चालायला सुरवात केली. पूर्ण घनदाट जंगलाची वाट पण आता सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे वाट पूर्णपणे मळलेली आहे. तरी वाटेत एका विंचुने वाट अडवलीच त्याला बाजूला करून पुढे निघालो. मार्गा वरती सर्वात पुढे वाटाड्या, मी व काही सदस्य तर मध्ये शैलेश दादा व त्यामागे अजित व शेवटी राहुल रासकर दादा अश्या नियोजनाप्रमाणे मध्ये मध्ये एकमेकांना हाक देत पहाटे ०५:३० वाजता माची / पठारावरती वरती येऊन पोहचलो. 

सकाळी परिचय सत्र घेतांना
सकाळी परिचय सत्र घेतांना 

वाटेवरती दिसलेला विंचू
वाटेवरती दिसलेला विंचू

अंधार असल्यामुळे किती वरती चालून आलो हे देखील समजले नाही व समोर असलेला भैरवगड देखील दिसत नव्हता. माचीवरती थोडी विश्रांती घेतली व पुढे निघालो. पुढे पठारावरील (माचीवरील) सरळ वाट व समोर असलेली निसरडी वाट संपून तासभरा मध्ये गडाचा कातळ भिंतीच्या इथे येऊन पोहचलो. आता मात्र थोडे दिसू लागले मग गडाचा कातळ कडा उजव्या बाजूला ठेऊन समोर चालू लागलो व गडाला थोडासा वळसा मारून समोर असलेला एक लहान दगडी पॅच चढून वरती आलो. तसे समोर गडाचा कातळा मध्ये एक आयात कृती गुहा खोदलेली पाहायला मिळाली. गुहे पासून थोडे पुढे खालील दिशेने आलो व खिंडी मध्ये येऊन पोहचलो.

गुहा - भैरवगड (मोरोशी)
गुहा - भैरवगड (मोरोशी)

खिंडीतून दिसणाऱ्या भैरवगडाचा पायऱ्या
खिंडीतून दिसणाऱ्या भैरवगडाचा पायऱ्या 

या खिंडी मधून आता आम्हाला समोर दिसत असलेल्या भैरवगडाचा कातळावरील प्रसिद्ध असलेल्या धडकी भरवणाऱ्या थरारक, अवघड व तुटलेल्या पायऱ्यांचा साहाय्याने गड सर करायचा होता. आमचा पुढे वाटाड्या रवि भाला आला होता त्याने पूर्ण मार्गावरती दोरी लावून ठेवली होती. त्या खिंडी मध्ये सर्व सदस्यांनी हार्नेस चढवले व एक एक करून आरोहण करायला सुरवात केली (गड चढायला घेतला).

सुरवातीला काही सोप्या पायऱ्या लागल्या त्या चढून वरती आलो त्याच्या पुढे पायऱ्या तुटलेल्या आहेत तेथून पुढे जाण्यासाठी तेथे असलेल्या गुहेला एका लहान छिद्र (hole) आहे तेथून थोडे रांगून गुहे मध्ये आलो. या गुहे मध्ये वरती चढण्यासाठी लाकडे लावलेली आहेत तेथून वरती चढून गुहेमधून पुन्हा पायऱ्यांन वरती यावे लागते. मी तेथे थोडे थांबलो, पुढे सर्व सदस्य गेले व मागून अजित माझासाठी हार्नेस घेऊन आला व आम्ही पुढे निघालो. मोजक्याच पायऱ्या चढल्या नंतर पुढे पायऱ्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत तेथे वाटाड्या दादाचा मदतीने आम्ही वरती आलो. पुढे गडा वरती जातांना एका बाजूला खोल दरी व समोर‌ असलेल्या कातळावरील पायऱ्या एक एक सावधगिरीने चढू लागलो. पुढे वाटेमध्ये कातळामध्ये बनवलेले एक कोरडे पाण्याची टाके लागले. त्यापुढे काही पायऱ्या व त्यानंतर पुन्हा एक पाण्याची टाके लागले पण त्यामध्ये पाणी खराब होते.  त्यापुढे आणखीन काही पायऱ्या व एक अवघड पॅच पार करून माथ्यावरती येऊन पोहचलो. तेथे एक लहान खोलीचे अवशेष पाहायला मिळाले. पुढे उजव्या बाजूला दोन जोड बुजलेले पाण्याचे टाके पाहिले व माघारी येऊन डाव्या बाजूने चालत गडाचा सर्वोच्च ठिकाणी येऊन पोहचलो.

पायऱ्यांच्या वाटेवरील गुहेतील फोटो
पायऱ्यांच्या वाटेवरील गुहेतील फोटो

भैरव गडाच्या कातळातील पायऱ्या
भैरव गडाच्या कातळातील पायऱ्या
भैरव गडाच्या पायऱ्यांच्या वाटेवरील कोरडे टाके
भैरव गडाच्या पायऱ्यांच्या वाटेवरील कोरडे टाके

भैरवडाच्या कातळातील पायऱ्या
भैरवगडाचा एक भीतीदायक / अवघड पॅच
भैरवगडाचा पायऱ्यांच्या वाटेवरील पाण्याचे टाके

भैरवगडाचा एक भीतीदायक / अवघड पॅच
भैरवगडाचा एक भीतीदायक / अवघड पॅच

दोन एकत्र असलेली व बुजलेली पाण्याची टाकी
दोन एकत्र असलेली व बुजलेली पाण्याची टाकी - भैरवगड (मोरोशी)

मोरोशी भैरव गडाच्या माथ्यावर पोहचल्यावर तेथुन सह्यमंडळ पाहायचा आनंदच वेगळा. तेथून डाव्या बाजूला नवरा नवरी सुळका, नाणेघाटाचा परिसर व उजव्या बाजूला अलंग - मदन - कुलंग (AMK), कळसुबाई शिखर,आजोबा शिखर, कात्राबाई शिखर, गवळदेव शिखर, घनचक्कर शिखर, शिरपुंजे भैरवगड व भटक्यांची पंढरी असलेला हरिश्चंद्र गड - कोकणकडा, तारामती शिखर, हरिश्चंद्र गडाचा बालेकिल्ला असे सर्व संपूर्ण सह्य मंडळ पाहून घेतले. सह्याद्री फिरताना एका किल्ल्या वरून दिसणारे आपण पाहिलेले इतर किल्ले पाहणे म्हणजे सह्याद्री भटकंती मधील एक मन सुखद अनुभव, गडावरती येताच नानांचा अंगठा दिसला मला माझा जुन्या आठवणी जाग्या झाल्या २०२० मध्ये मी इथून सूर्यास्त पाहिला होता. तर मागील काही महिन्या मध्ये मी AMK व भैरवगड (शिरपुंजे) ते रतनगड असा रेंज ट्रेक केला होता ते सर्व किल्ले/शिखर इथून पाहतांना मन सुखावून गेले.

भैरव गडाच्या माथ्यावरील फोटो
भैरव गडाच्या माथ्यावरून दिसणारे नवरा नवरी सुळका, नानाचा अंगठा व नाणेघाटाचा परिसर
भैरव गडाच्या माथ्यावरून दिसणारे नवरा नवरी सुळका, नानाचा अंगठा व नाणेघाटाचा परिसर

भैरवगडचा‌ माथ्यावरती पोहचल्यानंतर थोडे बसून विश्रांती घेतली व सोबत आणलेला खाऊ खाऊन गड उतरायला सुरवात केली. जितक्या सावध गतीने गड चढून आलो होतो तितक्याच सावधानतेने गड उतरायला घेतला. गडावररती येणाऱ्यांची संख्या वाढली होती त्यामुळे आम्ही काही पायऱ्या उतरून आल्या नंतर तेथूनच प्रस्थारोहण केले व खिंडी मध्ये आलो. तेथे भास्कर दादा देखील काही दुसरे सदस्य घेऊन आला होता, त्याचाशी थोडे बोलणे झाले व आम्ही खाली पुढे निघालो. गडाचा वळसा मारून पुढे आल्या नंतर डाव्या बाजूला वरील दिशेला असलेल्या खांब टाक्या मधील पाणीभरून घेतले. आता सकाळचे अकरा वाजले होते मात्र रखरखते ऊन लागत होते. पुढे आलेले सदस्य माचीवरील भैरवनाथाचे दर्शन घेऊन सावली मध्ये विसावले होते तितक्यात सर्वजण तेथे जमा झाले व समुह छायाचित्र घेऊन खाली निघालो. व दुपारी ०१:३० वाजे पर्यंत सर्वजण हॉटेल भैरवनाथ / मनूचा ढाबा येथे येऊन पोहचलो.

भैरवडाच्या खाली उतरतांना वरील  दिशेने दिसणाऱ्या पायऱ्या
भैरवडाच्या खाली उतरतांना वरील  दिशेने दिसणाऱ्या पायऱ्या

भैरव गडावरील कातळावरती असलेले पाण्याचे टाके

भैरवडाच्या माचीवरील भैरवनाथाचे मंदिर

भैरव गडाच्या माचीवरून घेतलेला फोटो व मागे भैरवगड
भैरव गडाच्या माचीवरून घेतलेला फोटो व मागे भैरवगड

भैरव गडाच्या माची वरती जाणारी वाट व मागे भैरवगड

भैरवगडचा हा ट्रेक करून झाल्यानंतर सर्वांना कडाक्याची भूक लागली होती त्यामुळे प्रथम भरपेट जेवण केले. त्यानंतर अजित व शैलेश दादा मुंबईकडे व आम्ही पुणे कडे माळशेज घाट, ओझर, नारायणगांव मार्गे आलो व सायंकाळी ०६:०० वाजता पुणे येथे येऊन पोहचलो.

एक दिवसीय भटकंतीमध्ये मोरोशीचा भैरवगड आरोहण, प्रस्तारोहण, गडावरून सह्यमंडळ पाहणे, सर्व मित्रांचा सहवास, सहभोजन, सह्याद्री जगण्याचा एक सुखद अनुभव आणि गोड आठवणी सोबत घेऊन घरी पोहोचलो.

सोबती : अजित गवेकर, शैलेश जाधव, राहुल रासकर व इतर सदस्य.

©सुशील राजगोळकर

#भैरवगड #मोरोशी #सह्याद्री ⛰️ #महाराष्ट्र 🚩#निसर्ग 🌳🌈 #भटकंती🏕️ #प्रवास🏍️ #ठाणे #मुंबई #ईगतपुरी #पुणे #सुशील_राजगोळकर #२४मार्च२०२४

जीवधन Jivdhan ⛰️

दिवस तिसरा सोमवार दिनांक २३-नोव्हेंबर-२०२० रोजी सकाळी ०४:०० वाजता उठून आवरले. व जेथे राहिलो होतो त्यांना सांगितले होते त्या प्रमाणे त्यांनी मस्त पैकी ५ मोठे ग्लास भरून दूध दिले 🥛🥛. मग ते घेऊन व थोडे उजाडल्या नंतर ०६:०० वाजता आम्ही जीवधन कडे जाण्यास निघालो. रोड लगत असलेल्या वराडी डोंगराचा पायथाला आनंद सरांचा मित्र मारुतीचा घरी जाऊन चहा व नाश्ता उरकला. व दुपारचे जेवण बनवायला सांगून मित्र मारुतीला सोबत घेऊन जीवधन कडे निघालो. घाटघर इथे गाडी लावून जीवधन गडाचा जुन्नर दरवाजाने जायचे ठरून आम्ही जंगलाची वाट पायपीट करत चालायला लागलो. काही वेळात आम्ही पायऱ्यांपाशी पोहचलो. येथे देखील कातळामध्ये कोरलेल्या छान पायऱ्या होत्या व आहेत. काही ठिकाणी पायऱ्या तोडलेल्या असल्या कारणाने तेथे लोखंडी शिडी बसवलेल्या आहेत. त्याचा साहाय्याने गडावरती जाताना उजव्या बाजूला मानव निर्मित २० ते २५ फूट लांब गुहा आहे ती पाहिली. पुढे गड चठुन जाताच जुन्नर दरवाजाचे अवशेष दिसतात, दरवाजा अस्तित्वात नाही. तेथून पुढे डाव्या बाजूला एक मोठी गुहा आहे त्या गुहे मध्ये खराब पाणी आहे. तेथून पुढे गडावरती वाड्याचे अवशेष पाहून धान्य कोठार पहिले. धान्य कोठाराची रचना, त्या मधील नक्षी काम, खांबाची रचना, घुमटाची रचना, दरवाजा वरील कोरलेला सूर्य, चंद्र, आतील दरवाजाची रचना त्या वरील कलशाचे कोरीव काम, व इतर रचना वगैरे निरखून पहिले तर लक्षात येईल कि हे धान्य कोठार नसून एक मंदिर होते असावे. त्या कोठाराच्या बाजुला असलेल्या पाण्याचा टाक्या पाहून आम्ही त्याच कोठाराच्या मागील बाजूने बाल्ले किल्ल्यावरील जिवाई देवीची मूर्ती पाहिली. व मंदिरा मागील उद्वस्त वास्तू पाहून वानरलिंगी सुलखा पाहण्यासाठी खाली उतरून गेलो. तेथून पुढे थोडे उजव्या बाजूला वरती चालून जाताच वाड्याचे अवशेष पाहिले व पाण्याचा टाक्यांपाशी येऊन बसलो. तेथील नितळ थंडगार पाणी पिऊन आम्ही खाली असलेले आणखीन एक टाके पाहून गडाचा मुख्य कल्याण दरवाजा पाशी येऊन पोहचलो. तो गायमुखी दरवाजा पाहून आम्ही तिकडूनच गड उतरायला सुरवात केली. तुटलेला पायऱ्यांचा सुरवातीलाच गड प्रेमी लोकांनी दोरखंड बांधून ठेवलेला आहे. त्याचा साहाय्याने आम्ही तेथून खाली उतरलो🧗🏼‍♀️. इथे देखील कपारी मधील दगडी पायऱ्या पाहायला मिळाल्या काही ठिकाणी तुटलेल्या आहेत तर काही ठिकाणी एकदम सुस्तिथित आहेत त्या पाहायला मिळाल्या. व त्या घळीतून समोर दिसणारा पठार, नानांचा अंगठा, नाणेघाटाचा परिसर दिसत होता तो पाहत व मध्येच असलेली जंगल वाट व पठार पार करून २ वाजता खाली येऊन पोहचलो. जीवधन किल्ला पाहून सर्वांना खूपच बरे वाटले. मी जरा थोडेशे सर्वांचा पुठे गड उतरून आलो व तेथील गावकरांचा गाडीवरून घाटघर गाठले व माझी गाडी घेऊन आलो. व परत तेथून इतर सहकार्यांना घेऊन गेलो. तेथून मी व मारुती दोघे जण त्याचा घरी गेलो व तेथून त्यांनी दिलेले जेवण व प्रेमाचा निरोप घेऊन मी निघालो. पुढे रोड वरती सर्वजण माझी वाट पाहत होते. तेथून आम्ही थेट निघालो ते पूर या गावी असलेल्या "कुकडेश्वर" मंदिराकडे.

घाटघर गावातून जीवधन किल्लयांची पूर्वेकडील बाजू
घाटघर गावातून जीवधन किल्लयांची पूर्वेकडील बाजू 
जीवधन किल्याचा जुन्नर दरवाजाने जाताना लागणाऱ्या कातळमधील पायऱ्या
जीवधन किल्याचा जुन्नर दरवाजाने जाताना लागणाऱ्या कातळमधील पायऱ्या 
जीवधन किल्याचा जुन्नर दरवाजाने आत जाताच डावीकडे असलेले पाण्याचे टाके
जीवधन किल्याचा जुन्नर दरवाजाने आत जाताच डावीकडे असलेले पाण्याचे टाके
जीवधन किल्याचे ध्यान कोठार कि जुन्याकाळामधील मंदिर
जीवधन किल्याचे ध्यान कोठार कि जुन्याकाळामधील मंदिर 

जीवधन किल्यावरील पाण्याचा टाक्या
जीवधन किल्यावरील पाण्याचा टाक्या
जीवधन किल्यावरील जीवाई देवीची मूर्ती
जीवधन किल्यावरील जीवाई देवीची मूर्ती 
जीवधन किल्यावरून दिसणारा वानरलिंगी सुळखा
जीवधन किल्यावरून दिसणारा वानरलिंगी सुळखा 
जीवधन किल्यावरील पाण्याचा टाक्या
जीवधन किल्यावरील पाण्याचा टाक्या 

जीवधन किल्याचा मुख्य दरवाजा
जीवधन किल्याचा मुख्य दरवाजा 
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजाला जाणाररी वाट
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजाला जाणाररी वाट 
जीवधन किल्याचा वाटेवरून दिसणारा नानांचा अंघठा व नाणेघाटाचा परिसर
जीवधन किल्याचा वाटेवरून दिसणारा नानांचा अंघठा व नाणेघाटाचा परिसर 
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजा मार्गातील दगडी कातळमधील पायऱ्या
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजा मार्गातील दगडी कातळमधील पायऱ्या
जीवधन किल्याचा वाटेवरून दिसणारा वानरलिंगी सुळखा
जीवधन किल्याचा वाटेवरून दिसणारा वानरलिंगी सुळखा
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजा मार्गातील दगडी कातळमधील पायऱ्या
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजा मार्गातील दगडी कातळमधील पायऱ्या
पश्चिमेकडून पठारावरून दिसणारा जीवधन किल्ला
पश्चिमेकडून पठारावरून दिसणारा जीवधन किल्ला 

सोबती : पॉल पेंटर, आनंद शिंदे, अरुण गवेकर, अजित गवेकर. 

©सुशील राजगोळकर

हडसर Hadsar ⛰️

खुंटीचा वाटेने 🧗🏼‍♂️ जायचे आहे म्हणून आम्ही आमची गाड्या हडसर या गावी लावून भर दुपारी १२:३० वाजता ट्रेकला सुरवात केली. सर्वांनी प्रस्तारोहणाचे साहित्य, पाणी वगैरे घेऊन पठारावरून चालत निघालो. थोड्या वेळात खुंटीचा वाटे जवळ येऊन पोहचलो. त्या खुंटीचा वाटेकडे पहिले तरी मनामध्ये धडकी भरते, अशा वाटेची चढाई पहिल्यांदाच करणार होतो. भीती तर मनामध्ये खूप वाटत होती पण आता आलोय तर माघार नाही. म्हणून मन घट केले व सहकाऱ्यांचा विश्वासावरती आम्ही ती खुंटीची वाट सर केली🧗🏼‍♂️🧗🏼‍♂️. तेथे अजून काही जुन्नर विभागातील लोक त्या वाटेने चढाई करत होते त्यांना विचारणा केली असता, हि खुंटीची वाट बऱ्याच वर्षा पूर्वी गावकऱ्यांनी आपल्या सोयी साठी बनवली आहे असे समजले. आमचा पैकी आनंद सर यांनी पहिला चढाई करून आम्हा सर्वांचा सुरक्षेसाठी व चढाई सोपी व्हावी यासाठी रोप लावला. पहिली खुंटीची वाट चडून गेल्यानंतर समोरच मोठी गुहा आहे तेथून थोडेसेच पुढे जाता अजून एक गुहा पाहायला मिळाली. पण अजून गडावरती पोहचलो नाही कारण तेथून दुसरी आणखीन एक लहानशी खुंटीची वाट चालू होते. ती वाट तशी सोपी असल्या कारणाने आम्ही लवकर चढुन गेलो. तेथून गडाचा तटबंदीला लागून सरळ वाट जाते त्या वाटेने आम्ही गडावरती पोहचलो. समोर गडाचा परिसर, तलाव, पाण्याचा टाक्या, अवशेष, पाहत आम्ही महादेव मंदिरा पाशी येऊन पोहचलो. मंदिरा समोर एक मोठा नंदी आहे. मंदिराचा आत मध्ये गणपतीची मूर्ती, मारुतीचा २ मूर्ती व मुख्य गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे त्यांना नमस्कार केला. व खूप भूक लागल्याने आम्ही मंदिराचा पायऱ्या वरती बसूनच भेळ बनवली🛕. मग सर्वानी मनसोक्त पणे ती फस्त केली. त्यानंतर आम्ही मंदिराचा मागे असलेला तलाव, पाण्याचे टाके पाहून राजमार्गाने गड खाली उतरायला सुरवात केली. कातळामध्ये कोरून निर्माण केलेल्या राजमार्गाचा पायऱ्या, दरवाजाचा कमानी, दरवाजा मागील दिवडी, थोडी तटबंधी असे सर्व काही अजूनही खूपच सुस्थित आहेत ते पाहुचनच मन भारावले. आम्ही त्याच पायऱ्यांचा वाटेने पेठेचावाडीला येऊन पोहचलो तो पर्यंत थोडा अंधार झाला होता. पेठेच्या वाडी वरून मग आम्ही पुन्हा हडसर पर्यंत रोडचा बाजूने चालत गेलो. सर्व जण थकल्याने आम्ही तेथेच राहायचे ठरवले. मग एका गावकऱ्याचा इथे जेवण बनवायला सांगितले व पहिला कोरा चहा देण्यास सांगितले. चहा घेऊन झाल्या नंतर तेथेच थोडे फ्रेश झालो व जेवण ️ उरकून त्यांचाच घराचा पडवी मध्ये आमचा बिछाना अंथरून झोपी गेलो.

पठारावरून दिसणारा हडसर किल्ला
पठारावरून दिसणारा हडसर किल्ला 
हडसर किल्लाची खुंटीची वाट
हडसर किल्लाची खुंटीची वाट 
हडसर किल्लाच्या महादेव मंदिरा मधील मारुती व गणपती
हडसर किल्लाच्या महादेव मंदिरा मधील मारुती व गणपती 
हडसर किल्लावरील महादेव मंदिर
हडसर किल्लावरील महादेव मंदिर 

हडसर किल्याचा कातळमधील पायऱ्या
हडसर किल्याचा कातळमधील पायऱ्या
हडसर किल्याचा कातळमधील पायऱ्या
हडसर किल्याचा कातळमधील पायऱ्या
हडसर किल्याचा दरवाजा व मागे कातळमधील पायऱ्या
हडसर किल्याचा दरवाजा व मागे कातळमधील पायऱ्या 
हडसर किल्याचा पायऱ्याचा वाटेवरून वरून समोर दिसणारा परिसर
हडसर किल्याचा पायऱ्याचा वाटेवरून वरून समोर दिसणारा परिसर
हडसर किल्याची पायऱ्याची वाट
हडसर किल्याची पायऱ्याची वाट
हडसर किल्लाचा खुंटीचा वाटेवरील गुहेमधून मागे दिसणारा हटकेश्वर डोंगर
हडसर किल्लाचा खुंटीचा वाटेवरील गुहेमधून मागे दिसणारा हटकेश्वर डोंगर 
हडसर किल्लाची खुंटीची वाट
हडसर किल्लाची खुंटीची वाट
हडसर किल्लाची खुंटीची वाट
हडसर किल्लाची खुंटीची वाट
हडसर किल्लावरील अवशेष
हडसर किल्लावरील अवशेष
हडसर किल्लावरील पाण्याचे टाके
हडसर किल्लावरील पाण्याचे टाके 
हडसर किल्ल्यावरून दिसणारा समोरील परिसर
हडसर किल्ल्यावरून दिसणारा समोरील परिसर 

1) हडसर किल्याची खुंटीची वाट या वरील लहानशी चित्रफीत YouTube वरती आहे त्याची link  : https://www.youtube.com/watch?v=LPopWPDz8lg

2) हडसर किल्याची खुंटीची वाट या वरील लहानशी चित्रफीत YouTube वरती आहे त्याची link  : https://www.youtube.com/watch?v=Cy7-EY9Uvvs&feature=youtu.be

सोबती : पॉल पेंटर, आनंद शिंदे, अरुण गवेकर, अजित गवेकर. 

©सुशील राजगोळकर

"घनगड" ⛰️ निरवचा ५० व्या किल्याची भटकंती. 🚗⛰️ | Ghangad & Tailbailla - Lonavala 11-January-2026

मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.