Showing posts with label Malavali. Show all posts
Showing posts with label Malavali. Show all posts

लोहगड १४-मार्च-२०२१ ⛰️ LOHGAD

चौथ्यांदा.... !!! हो बरोबर चौथ्यांदा लोहगड पाहिला. पाय दुःखीमुळे मी थोडे दिवस ट्रेकला ब्रेक दिला होता. लोणावळ्याला डॉक्टर कडेच गेले होतो. पण निरव खूप दिवसा पासून आग्रह करत होता, म्हणून लोहगड पाहायला गेलो.
बरेच जण असा विचार करतात कि परत परत एकचं ठिकाण का पाहायचे ? पण निसर्ग,🌱 सह्याद्री व गडकोट ⛰️ एकदा पाहून पूर्ण होईल व समजेल असे कोणालाच शक्य नाही. म्हणूनच तर आम्ही भटके एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा भेट देत असतो.

अता लोहगडचेच पहा ना. ८ वर्षापूर्वी मी एकटा मळवली स्टेशन पासून पायी चालत ट्रेक केला होतो. तेंव्हा तेथील बाकीचे लोक एकटाच कसा आला असेल ? अशा नजरेने पाहत होते 🚶🏻‍♂️. पण एकटा फिरण्याची मज्जाच वेगळी...! पण अवघड ठिकाणी कोणती माहिती न घेता एकट्याने ट्रेक करणे खूप चुकीचे ठरू शकते.
असो, तेंव्हा मनाला खूप खंत वाटली होती. कारण त्यावेळी भाजे लेणी ते लोहगड मधील घाटाचा रस्ता नव्हता. लोहगड गांववाले कसे येत जात होते? आता ज्या गडाला पायथ्या पासून दगडी पायऱ्या आहेत त्या देखील नव्हत्या. तसेच तोफा अस्थ व्यस्थ अवस्थेत होत्या. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे यांचे दिशादर्शक फलक देखील लावलेले नव्हते. एकटाच व खूप दमल्यामुळे त्यावेळी मी विंचूकडा लांबूनच नजरेमध्ये सामावून घेतला व पुढील वेळी पाहायला नक्की येणार असे सांगून परतलो.
परत काही वर्षाने दुसऱ्यांदा (२०१५) लोहगड पाहिला. तेंव्हा घाटाचा रस्ता झाला होता तर पायऱ्यांचे काम चालू होते. या वेळी मात्र विंचूकडा आवर्जून पाहिला.
तिसऱ्यांदा (२०२०) एक वर्षभरा पूर्वी ऑफिस मधील सहकाऱ्यांन सोबत आलो होतो या वेळी मात्र घाटाचा रस्ता पूर्ण खराब झाला होता. गाडी देखील चढत न्हवती. मात्र गडाचा पायथ्याला गावकऱ्यांनी शुल्क पार्किंग चालू केले आहे. तसेच पायऱ्यांचे काम पूर्ण झालेले पाहायला मिळाले. व तोफा देखील व्यवस्थित ठेवलेल्या पहायला मिळाल्या. 
आता चौथ्यांदा मात्र घाट रस्ता देखील व्यवस्थित होता पण मीच अनफिट व रविवारची लोहगडाची गर्दी यामुळे विसापूर कि लोहगड पाहायचा या संभ्रमात होतो. पण विसापूर किल्ला लोहगड किल्या पेक्षा चढायला थोडा अवघड असल्यामुळे निरवला लोहगड दाखवायचा म्हणून निघालो.
लोहगडाचा पुरातत्व खात्याने पायथ्या पासून बनवलेल्या दगडी पायऱ्यांच निरवल्या भावल्या व तो गडाचा दिशेने धावू लागला. कधी एकदाचा पूर्ण गड पाहतोय असे त्याला वाटत होते.

लोहगडाचा पुरातत्व खात्याने पायथ्या पासून बनवलेल्या दगडी पायऱ्यां
लोहगडाचा पुरातत्व खात्याने पायथ्या पासून बनवलेल्या दगडी पायऱ्यां

गडावरती जातांना असलेले गणेश दरवाजा, पाण्याचा टाक्या, हनुमान दरवाजा, तोफा, बुरुज, गडावरून दिसणारे विसापूर किल्ला, तिकोना किल्ला, तुंग किल्ला ⛰️ व पवना धरणाचा जलाशय दाखवत. तर पुढे भगवा ध्वज🚩, हनुमान मंदिर, शिवलिंग, महादेव मंदिर🛕, पाण्याचे टाके व १६ कोणी तलाव असे सर्व काही निरवला दाखवत व समजावून सांगत आम्ही विंचूकडयाच्या दिशेला आलो. यावेळी मात्र निरवने आग्रह करून देखील विंचूकडा लांबूनच पाहिला व पुढील वेळी आपण नक्की जाऊया असे सांगितले व माघारी फिरलो. मात्र यावेळी विशेष म्हणजे या पूर्वी ३ वेळा येऊन देखील पाहायची राहिलेली गडावरील "लक्ष्मी कोठी" पाहिली व मन आणखीनच प्रसन्न झाले.

लोहगड वरील तोफ
लोहगड वरील तोफ
लोहगड वरील महादेव मंदिरातील शिवलिंग
लोहगड वरील महादेव मंदिरातील शिवलिंग 
लोहगड वरील महादेव मंदिरा
लोहगड वरील महादेव मंदिर
लोहगड वरील विंचूकडा (पप्पा तिकडे जाऊया)
लोहगड वरील विंचूकडा (पप्पा तिकडे जाऊया)
लोहगड वरील "लक्ष्मी कोठी"
लोहगड वरील "लक्ष्मी कोठी"

"हीच ती गडकोटांची खासियत पूर्ण गड पाहिला असे वाटते तरी काहींना काही राहून जाते. प्रत्येक वेळी प्रत्येक ऋतूत काहीतरी नवीन पाहायला मिळते किंवा पहिल्या वेळी पाहिलेल्या गोष्टी सुद्धा, दुसऱ्या वेळी वेगळ्याच रूपात पाहायला मिळतात."
आता निरव विंचूकडा व गडावरून पाहायला मिळालेले इतर किल्ले कधी पाहायला मिळणार याची वाट पाहतोय..........!!

©सुशील राजगोळकर


( लोहगड भटकंती ब्लॉग २०२०)

⛰️लोहगड १४-मार्च-२०२१⛰️ 





विसापूर ⛰️ VISAPUR ⛰️ १६-जानेवारी-२०२१

यावेळी आम्ही कूच करणार आहे विसापूर किल्ल्यावर..... चला तर मग आज प्रस्तावना न देता थेट पायथ्याचे गाव पाटण इथून सुरवात करु🏘️. या आधी २ वेळा लोहगड मार्गे गायमुखी दरवाजाने गडावरती आलो होतो. म्हणून या वेळी पाटण वरून जायचे ठरवून निघालो. भर दुपारी १२ वाजता🌤️ पाटण या गावी पोहचलो. पाटण गावचे ग्रामदैवत वाघजाई मंदिर 🛕 मध्ये नमस्कार केला व मंदिरा मधील गावकऱ्यांना मार्ग विचारून घेतला व त्या दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये विसापूरच्या दिशेने चालायला सुरवात केली.

पाटण गावचे ग्रामदैवत वाघजाई मंदिर 🛕

पाटण गावचे ग्रामदैवत वाघजाई मंदिर 🛕

पाटण गावचे ग्रामदैवत वाघजाई मंदिराचा गाभारा  🛕
पाटण गावचे ग्रामदैवत वाघजाई मंदिराचा गाभारा 🛕
डोंगरा मध्ये जाणाऱ्या खूप वाटा आहेत पण तशी पूर्ण मळलेळी वाट व वाटेमध्ये दगडा वरती चुन्याने बनवलेले दिशादर्शक बाण ➡️ आहेत. गावातुन थोडे अंतर चालून जाताच दगडा मध्ये कोरलेल्या ४० एक पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या पारकरून पुढे उजव्या बाजूला गेलो व एक डोंगर पार करून पठारावती पोहचलो. तेथून डावीकडे धनगर वस्तीकडे वाट जाते तिकडे न जाता पुढे सरळ वरती जंगलाच्या वाटेने निघालो. ती इतकी घनदाट जंगलाची वाट 🌳🎋आहे की दुपारी उन्हाची झळ देखील लागू दिली नाही.
दगडा मध्ये कोरलेल्या पायऱ्या
दगडा मध्ये कोरलेल्या पायऱ्या

पठारावरून दिसणारा विसापूर किल्ला
पठारावरून दिसणारा विसापूर किल्ला

जंगलाची वाट संपवून पुढे तुटलेल्या दगडांच्या पायऱ्यांची वाट चालू झाली. तेथून पुढे येताच दगडामध्ये कोरलेला हनुमान व त्याला लागूनच मोठी गुहा पाहायला मिळाली. तेथूनच सुस्थितीत असलेल्या दगडातील पायऱ्यांची वाट चालू झाली. वाट संपवून वरती येताच गडावरती प्रवेश झाला. तेथून पुढे आम्ही डाव्या बाजूने गडाला फेरा मारायचा म्हणून निघालो. समोरच गडावरती असलेली तोफ पाहायला मिळाली.

विसापूर किल्लाच्या पायऱ्यांचा वाटेवरील हनुमान
विसापूर किल्ला - पायऱ्यांचा वाटेवरील हनुमान
विसापूर किल्ला - पायऱ्यांचा वाटेवरील गुहा
विसापूर किल्ला - पायऱ्यांचा वाटेवरील गुहा
विसापूर किल्ला - पायऱ्यांचा वाटेवरील गुहेचा आतील बाजू
विसापूर किल्ला - पायऱ्यांचा वाटेवरील गुहेचा आतील बाजू
विसापूर किल्ला - पायऱ्यांची वाट
विसापूर किल्ला - पायऱ्यांची वाट
विसापूर किल्लावरिल तोफ
विसापूर किल्लावरिल तोफ

पुढे तटबंधी सोडून थोडेसे उजव्या बाजूला पाण्याचा टाक्या व तलाव पाहून, महादेव मंदिर पाहायला गेलो🛕.  तिथे मंदिर समोरील अंगणा मध्ये स्तंभ आहे त्या स्तंभा वरती २ बाजूला हनुमान, एका बाजूला गणपती व एका बाजूला सर्प कोरलेला पाहायला मिळाला. तसेच मंदिर समोर २ नंदी व मंदिरामध्ये प्राचीन काळातील शिवलिंग पाहायला मिळाले. मंदिरा मागे लहानसे पुष्कर्णी आहे.

विसापूर गडावरील पाण्याचे टाके
विसापूर गडावरील पाण्याचे टाके
विसापूर गडावरील महादेव मंदिराचा बाजूचा तलाव
विसापूर गडावरील महादेव मंदिराचा बाजूचा तलाव
विसापूर गडावरील महादेव मंदिर
विसापूर गडावरील महादेव मंदिर
विसापूर किल्ला - महादेव मंदिरातील शिवलिंग
विसापूर किल्ला - महादेव मंदिरातील शिवलिंग
विसापूर किल्ला - महादेव मंदिरा समोरील स्तंभा वरील २ बाजूला असलेले हनुमान
विसापूर किल्ला - महादेव मंदिरा समोरील स्तंभा वरील २ बाजूला असलेले हनुमान
विसापूर किल्ला - महादेव मंदिरा मागील लहानशी पुष्कर्णी
विसापूर किल्ला - महादेव मंदिरा मागील लहानशी पुष्कर्णी

तेथून पुढे मंदिरा समोरील दिशेला (पूर्वेकडे) मोठया प्रमाणात असलेल्या पाण्याचा टाक्या पाहिल्या, पुढे असलेले अवशेष पाहून समोरच दिसत असलेला ध्वजस्तंभ 🚩 व गोल बुरुज पाहिला. तेथून माघारी गडाचा दक्षिण दिशेला पाण्याचे टाके, तलाव व डाव्या बाजूला दिसत असलेला तिकोना किल्ला, तुंग किल्ला ⛰️ व पवना धरणाचा जलाशय 🏝️पाहत पुढे चालून गेलो. पुढे गायमुखी मार्ग जवळचा व सोपा असल्याने बरेच लोक गडावरती येताना व तितकेच लोक गड उतरून जाताना दिसत होते.

विसापूर गडावरील पाण्याचे टाक्या
विसापूर गडावरील पाण्याचे टाक्या
विसापूर गडावरील अवशेष
विसापूर गडावरील अवशेष
विसापूर गडावरील ध्वजस्तंभ व गोल बुरुज
विसापूर गडावरील ध्वजस्तंभ व गोल बुरुज

तेथून पुढे मंदिरा समोरील दिशेला (पूर्वेकडे) मोठया प्रमाणात असलेल्या पाण्याचा टाक्या पाहिल्या, पुढे असलेले अवशेष पाहून समोरच दिसत असलेला ध्वजस्तंभ 🚩 व गोल बुरुज पाहिला. तेथून माघारी गडाचा दक्षिण दिशेला पाण्याचे टाके, तलाव व डाव्या बाजूला दिसत असलेला तिकोना किल्ला, तुंग किल्ला ⛰️ व पवना धरणाचा जलाशय 🏝️ पाहत पुढे चालून गेलो. पुढे गायमुखी मार्ग जवळचा व सोपा असल्याने बरेच लोक गडावरती येताना व तितकेच लोक गड उतरून जाताना दिसत होते.

विसापूर गडावरील पाण्याचे टाक्या
विसापूर गडावरील पाण्याचे टाक्या
विसापूर गडावरील चुण्याचा घाणा
विसापूर गडावरील चुण्याचा घाणा
विसापूर गडावरील जात
विसापूर गडावरील जात
विसापूर गडाचा दक्षिण दिशेचा ध्वज व मागे लोहगड किल्ला
विसापूर गडाचा दक्षिण दिशेचा ध्वज व मागे लोहगड किल्ला

पुढे तटबंधी सोडून उजव्या हाताला दिसत असलेला टाक्यातील हनुमान पाहिला व तेथे असलेली टाकी पाहून समोर दिसत असलेल्या कोठाराकडे / वाडाकडे निघालो. ते वाडे दुमजली, मुख्य वाड्याला दुप्पट भिंत बांधलेली व समोर मोठे अंगण होते असावे असे जाणवते. ते पाहून आम्ही गडाच्या उत्तर दिशेला असलेल्या पाण्याचा टाक्या, टाक्यांचा बाजूला असलेला हनुमान पाहिला. पुढे बुरुज 🚩 व तेथे असलेली तोफ पाहून माघारी फिरलो. ज्यामार्गे गडावरती आलो होतो तिकडे निघालो वाटेत असलेली उंचचउंच तटबंधी व पाण्याच्या टाक्या पाहून गड उतरायला सुरवात केली.

विसापूर गडाची तटबंधी
विसापूर गडाची तटबंधी
विसापूर गडाची तटबंधी व मागे लोहगड किल्ला
विसापूर गडाची तटबंधी व मागे लोहगड किल्ला
विसापूर गडावरील पाण्याचा टाक्यातील हनुमान
विसापूर गडावरील पाण्याचा टाक्यातील हनुमान
विसापूर गडावरील वाड्याचे अवशेष
विसापूर गडावरील कोठाराचे अवशेष
विसापूर गडावरील वाड्याचे अवशेष
विसापूर गडावरील कोठाराचे अवशेष

विसापूर गडावरील वाड्याचे अवशेष
विसापूर गडावरील कोठाराचेअवशेष
विसापूर गडावरील वाड्याचे अवशेष
विसापूर गडावरील कोठाराचे अवशेष

विसापूर गडावरील पाण्याचा टाक्यांचा बाजूला असलेला हनुमान
विसापूर गडावरील पाण्याचा टाक्यांचा बाजूला असलेला हनुमान
विसापूर गडावरील उत्तर दिशेला असलेल्या बुरुजा वरील तोफ
विसापूर गडावरील उत्तर दिशेला असलेल्या बुरुजा वरील तोफ 

विसापूर गडावरील उंच तटबंधी
विसापूर गडावरील उंच तटबंधी
विसापूर गडावरील पाण्याचा टाक्या
विसापूर गडावरील पाण्याचा टाक्या

पाटण गावमधून विसापूर गडावरती जाण्यासाठी १ ते १.५ तास लागतो. विसापूर गडाचा परिसर खूप मोठा असल्या कारणाने पूर्ण गड फिरण्यासाठी किमान ३-४ तास लागतात. संपूर्ण गडाला फेरा मारताना प्रकर्षाने जाणवते कि गडावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या टाक्या आहेत. गडाला पूर्वी संपूर्ण तटबंधी बांधण्यासाठी लागणारे दगड हे याच पाण्याच्या टाक्या व तलावातील खोद काम करून काडलेले दगड वापरले असावेत. गडाचा मधोमध लहान घनदाट झाडीची टेकडी आहे. गावकऱ्यांचा माहिती नुसार गडावरती व गडाच्या आजूबाजूने असे एकूण २१ हनुमान कोरलेले होते. त्यापैकी आता आम्हाला गडावरती फक्त ५ हनुमान मूर्ती पाहायला मिळाल्या

१ - पायऱ्यांचा वाटेवरील हनुमान
१ - विसापूर गडाचा पायऱ्यांचा वाटेवरील हनुमान
विसापूर किल्ला - महादेव मंदिरा समोरील स्तंभा वरील २ बाजूला असलेले हनुमान
२ व ३ - विसापूर गडावरील महादेव मंदिरा समोरील स्तंभा वरील २ बाजूला असलेले हनुमान
४ - विसापूर गडावरील पाण्याचा टाक्यातील हनुमान
४ - विसापूर गडावरील पाण्याचा टाक्यातील हनुमान
५ - विसापूर गडाचा उत्तरेला पाण्याचा टाक्यांचा बाजूला असलेला हनुमान
५ - विसापूर गडाचा उत्तरेला पाण्याचा टाक्यांचा बाजूला असलेला हनुमान

अशाप्रकारे शहराच्या अगदी जवळ असलेला आणि इतिहासाची आठवण करून देणाऱ्या या विसापूर किल्लाची ही सफर ..!!

सोबती: सुहास शेंडकर, संजय शेंडकर,  शशी तांदुळकर, वैभव सोनावणे, अजय सोनावणे, अकाश भोसले.

©सुशील राजगोळकर


विसापूर VISAPUR

अचानक ठरल्याने थोडे उशिरा सकाळी १० वाजता मी व आनंद विसापूर ला निघालो. थंडीची चाहूल संपून थोडे ऊन लागत होते म्हणून कामशेत जवळ थोडे थांबून ऊसाचा रस घेतला व पुढे निघालो. त्या नंतर गाडी थांबवली ती भाजे गाव येथे. गाडी लावून आम्ही विसापूरच्या दिशेने चालायला सुरवात केली. शिवजयंती असल्या कारणाने लोहगडाकडे जाणारे व येणारे यांची गर्दी देखील खूप होती. आम्ही हळू हळू रस्ताच्या घाट वाटेने न जाता डोंगर पाय वाटेने घाट रस्ता पारकरून १२ वाजता विसापूर गडा वरती जाणारा गायमुख रस्ता येथे येऊन पोहचलो. आणि आम्ही वेळ न दवडता गड चढायला सुरवात केली. वाटे मध्येच असलेले पाण्याचे टाके व तेथे कोरलेला लहानसा शिलालेख पाहून अर्ध्या तासात आम्ही गडमाथा गाठला. व दुपारचे ऊन खूप होते म्हणून आम्ही तेथे असलेल्या बोराच्या झाडाखाली बसून जेवण उरकले व एक तासभर झोप काढली. व २ वाजल्या नंतर गड फिरायला सुरवात केली. विसापूर गडावरून समोरच असलेला लोहगड स्पष्ट दिसतो, तसेच पवणा धरणाचा पाण्याच्या जलाशय व त्या मागे उभा असलेला तुंग किल्ला, तिकोना किल्ला देखील पाहायला मिळाला.
पुढे पाण्याचे टाके, चुण्याचा घाणा, दलनाचे जाते पाहुण गडाच्या तटबंदी वरून निघालो व पाण्याच्या टाक्यामध्ये कोरलेला हनुमान पाहिला व तेथील टाकी पाहून पुढे दिसत असलेल्या २ वाड्यांकडे गेलो. वाडे पाहिल्या नंतर मोठया प्रमाणात असलेल्या पाण्याच्या टाक्या पाहिल्या. व पाटण गावाकडून येणाऱ्या पायऱ्यांचा वाटेने थोडे खाली उतरून तेथे असलेले हनुमान व त्यालाच लागून असलेल्या २ मोठ्या गुहा पाहूण माघारी आलो. पुढे जाऊन तोफ, पाण्याचे टाके, तलाव पाहिला. तलाव आठला होता पण तलावाच्या हिरव्या गार कुरणावरती जनावरे चरत होती. तेथून पुढे दिसत असलेल्या महादेव मंदिर पाहायला गेलो व मंदिराच्या मागे असलेले लहानसे पुष्करर्णी पाहून गडाला वळसा घालून जायचे ठरवले व पुढे निघालो. बुरुज, पाण्याचे टाके, तलाव, तटबंदी पाहत आलो, गड खूप मोठा असल्याने गडाच्या चौहो बाजूने मोठया प्रमाणात पाण्याचे टाके पाहायला मिळाले. गडाच्या मध्ये झाडी देखील खूप आहे, आम्हाला तेथे सापाची कात पाहायला मिळाली ती कात जवळपास ६ फूट लांब सापाची असावी असा अंदाज आला. अश्या प्रकारे गड पाहात आम्ही गडाला पूर्ण प्रदक्षिणा मारून गायमुखी वाटे जवळ येऊन पोहचलो व गड उतरायला सुरवात केली, आणि ५:३० वाजता भाजे येथे येऊन पोहचलो. अश्या प्रकारे आम्ही शिवजयंती साजरी केली. 

विसापूर

विसापूर



विसापूर गडावरील चुण्याचा घाणा
विसापूर
विसापूर गडावरील जात

विसापूर गडावरील पाण्याचा टाक्यातील हनुमान
विसापूर
विसापूर गडावरील  कोठाराचे अवशेष
विसापूर
विसापूर गडावरील पाण्याचे टाके
विसापूर
पायऱ्यांचा वाटेवरील हनुमान व गुहा
विसापूर
विसापूर गडावरील महादेव मंदिरामधील शिवलिंग
विसापूर
विसापूर गडावरील महादेव मंदिरा समोरील अंगण
विसापूर
गडावरती मिळालेली सापाची कात
©सुशील राजगोळकर

"घनगड" ⛰️ निरवचा ५० व्या किल्याची भटकंती. 🚗⛰️ | Ghangad & Tailbailla - Lonavala 11-January-2026

मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.