पहाटे ६:०५ वाजता मुकाई चौक येथे सर्वांनी जमायचे व जो उशिरा येईल त्याने सर्वांना चहा व नाष्टा द्यायचा असा दंडक होता. नेमके मी ०६:०९ वाजता पोहचलो. आणखीन दोघे ०६ मिनिट
उशिरा पोहचले. ठरल्याप्रमाणे शिक्षा म्हणून मी चहा पाव आणि त्या दोघांनी नाश्ता द्यायचा होता. मुकाई चौकात चहा व मस्का पाव घेऊन आम्ही निघालो. ती ४ मिनिटे मला १२० रुपयांना पडली, त्या नंतर सर्वांच्या गाड्या थांबल्या त्या कार्ले फाटा येथे. सकाळचे मस्त दाट धुके पडले होते .थंडी☃ हि गुलाबी म्हणावी अशीच होती. पण आम्ही दुचाकीवरच चाललो असल्याने हि गुलाबी थंडी नंतर इतकी बोचरी झाली कि बोलता हि येईना.
मळवली स्टेशन
जवळ गरमा गरम कांदा पोहे, वडापाव व चहा असा पोटात भराव टाकून लोहगड ⛰ कडे प्रस्थान केले.
भाजे लेणी ते लोहगड मधील घाटाचा रस्ता खूपच खराब असल्या मुळे सावधगिरीने गाडी चालवावी लागली, सकाळी ८:१५ वा
आम्ही लोहगड पायथ्याला पोहचलो. गाडी पार्क करून एक एक पायरी चढायला
लागलो, बऱ्याच आधी मी इथे आलो होतो तेंव्हा या पायऱ्यांचे काम चालू
होते आता ते पूर्ण झाले त्यामुळे गडावरती जाणे सुलभ झाले आहे, पण दुर्ग
हे दुर्गम असलेले बरे, त्याचे दुर्गपण हरवता कामा नये असे मला वाटते.
आमच्या
पैकी बरेच जण पहिल्यांदा आले होते, त्या पहाटेच्या प्रसन्न वातावरणा मध्ये
फोटो काढायचा मोह ते तरी कसा टाळणार त्यामुळे आम्ही गणेश
दरवाजा, हनुमान दरवाजा, बुरूज, तोफा व पाण्याचे टाके अश्या प्रत्येक ठिकाणी
फोटो काढत गड चढलो. शिव मंदिर आणि त्या समोर असलेल्या हनुमान मंदिर व
शिवलिंग यांना नमस्कार करून मंदिराच्या अंगणात थोडी विश्रांती घेतेली.
पाण्याचा टाक्या व आजुबाजुच्या परिसर न्याहाळत विंचू कड्याच्या दिशेने गेलो. कड्यावर बसून सर्वानी आणलेला फराळ करून माघारी निघालो , परत येताना भली मोठी 16
कोनी
विहीर पाहून गड उतरायला
सुरवात केली. पहाटे लवकर गेल्यामुळे विशेष गर्दी जाणवली नाही पण गड
उतरताना गर्दी वाढू लागली. पायऱ्यांच्या सुरवातीच्या जवळची दुकानांची संख्या पाहून मनात एक विचार आला कि आता "लोहगडचा सिंहगड होऊ नये".
अशा प्रकारे लोहगड ⛰ भेटीने नुतन वर्षांचा प्रारंभ केला या वर्षी असेच आणखी किल्ले पाहण्याचा निच्छय केला.
सोबती- संतोष सांभारे, राहुल पाटील, सागर साळुंके, राजेश लोमटे, राजेंद्र चौधरी, गणेश देशमुख, केतन देसले.
©सुशील राजगोळकर
महाराष्ट्र, सह्यांद्री, दुर्ग, गड, किल्ले, महाराष्ट्रातील किल्ले, प्रवास, निसर्ग, भटकंती, छायाचित्र, लेणी, प्राचिन मंदिरे, पुरातन मंदिरे, समुद्र किनारे, शोध, धाडस, मंदिरे, Maharashtra, Trek, Trekking, Trekker, Nature Lover, Traveler, Photography, Fort, Fort in Maharashtra, Sahyadri Mountain, Old Temples, Caves, Adventure, Explorer, Trails.
लोहगड ⛰ LOHGAD
Subscribe to:
Post Comments (Atom)
सातारा भाग ३/३ : कास पठार । यवतेश्वर । एकीव धबधबा । सज्जनगड । केदारनाथ - परळी । Kas Pathar । Yavateshwar । Ekiv । Sajjangad | Kedarnath - Parali ⛰️ 🛕
दिवस तिसरा, सोमवार १६-सप्टेंबर-२०२४ यवतेश्वर मंदिर । Yavateshwar Temple 🛕 पहाटे आवरून प्रथम कास पठार कडे निघालो घाटामध्ये गाडी थांबवली व धु...
-
AMK म्हणजे अलंगगड - मदनगड - कुलंगगड सह्यांद्री मधील चढाईसाठी खूप अवघड व मोठे म्हणून प्रसिद्ध असलेला किल्ला पैकी एक . हे ०३ ...
-
आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...
-
१४ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर असे ०४ दिवस सुट्टी होती. त्यामुळे सातारा विभागातील गड किल्ले व इतर भटकंतीला जायचे असे ठरवून अजित व मी वेळ मिळेल ...
Note :
भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.
No comments:
Post a Comment