कलावंतीण दुर्ग , ठाकुरवाडी, पनवेल, रायगड Kalavantin Durg

कलावंतीण दुर्ग बदल इंटरनेट वरिल फोटो, माहिती व चित्तथरारक चित्रफित पाहुन आम्हाला थोडी भितीच वाटत होती, "नजर हटी दुर्घटना घटी" अशाच त्या दगडा मध्ये कोरलेल्या पायऱ्या पहायची उत्सुकता खुप होती. खुप दिवसा पासुन नियोजन चालु होते कधि जायचे, मग ऐके दिवशी शैलेश चा संदेश आला आपल्याला पुढील आठवड्याच्या शेवटी कलावंतीण दुर्गला जायचे आहे.

मग कोण कोण येणार ? एकमेकांना विचारणा चालु झाली, सदस्य कमी जास्त होत होते निश्चितपनेे कोणीच सांगत नव्हते, त्याच बरोबर शैलेश व माझे संभाषण चालु झाले होते कसे जायचे रेल्वे, दुचाकी कि गाडी करायाची, शेवटी सदस्यसंख्या ठरली, मग सुहास ने एक गाडी ठरवली. जायचा एक दिवस अगोदर 2 सदस्य वाढले त्यामुळे 1 दुचाकी पण घ्यायचे ठरले.

ठरल्याप्रमाणे दि. 25/12/2017 पहाटे 6:00 वाजता आम्ही पुणे येथुन निघालो 10:00 वाजता ठाकुरवाडी येथे पोहचलो नाष्टा ऊरकुन आम्ही कलावंतीण दुर्गच्या दिशेने चालायला सुरवात केली.

अजित मुंबई हुन येणार होता परंतु तो रस्ता चुकला व दुर्गच्या पलिकडील बाजुला ठाकुरवाडी मध्ये पोहचला, एकटाच असल्याने तेथुन परत तो अलिकडील ठाकुरवाडीला आला, तो पर्यत आम्ही प्रबळमाची पार केली होती. 2:30 तासाच्या चढाई नंतर आम्ही पायऱ्या जवळ पोहचलो, सगळेजण वरती चढायला लागले, मी मात्र अजितची वाट पाहत बसलो, तासाभरात तो आला, त्यानंतर आम्ही दोघे त्या चित्तथरारक पायऱ्या काळजीपूर्वक चढु लागलो व जिथे थोडा फोटो काढायला वाव मिळेल तेथे फोटो काढत 15 मि. मध्ये आम्ही माथ्यावरती पोहचलो, माध्यावरून दिसणारे दृश्य नजरेत सामाऊन घेतले व उतरण्यास सुरवात केली, उतरताना थोडे काळजी पुर्वकच उतरावे लागले.

पुढे आलेले सदस्य खाली प्रबळमाची येथे एका घराच्या अंगणात आमची वाट पाहत बसले होते, अंगण मस्त सारवलेले होते, भुक तर खुपच लागली होती मग आणलेले डबे तेथेच निवांत एकत्र बसुन खाले, अजितने माझासाठी खास थोडा जास्तच डबा अणला होता.

तेथेच मग गप्पा रंगल्या वेळेकडे कोणाचे लक्षच गेले नाही एव्हाना संध्याकाळचे 05:00 वाजले होते, मग मि व अजित लगबगिने खाली आलो अंधार पडायला सुरवात झाली होती 6:30 वाजता अजित निरोप घेऊन मुंबईकडे निघाला, मागून सगळेजण लगोलग आले तसेच आम्ही गाडी काढली व महडच्या अष्टविनायक गणपतीला निघालो, दर्शन घेऊन लगेच परतिचा प्रवास सुरू केला व 10:30 वाजता पुण्यात पोहचलो.

"अशाप्रकारे सरत्या वर्षात कलावंतीण दुर्गचा ट्रेक एक चांगला अनुभव, पुढील चितथरारक ट्रेक करण्याचा विश्वास व जिद्द निर्माण करणारा झाला"

©सुशील राजगोळकर
















































कळसुबाई शिखर KALSUBAI PEAK

दि. १६/१२/२०१७ला रात्री ८.०० वाजता पुणे येथून निघालो. रात्री १०.०० वाजता खेड घाटाजवळ हाँटेल मध्ये जेवण ऊरकुन निघालो. त्यानंतर थेट गाडी थांबली ति म्हणजे "बारी" या गाविच, तेव्हा पहाटेचे ३.०० वाजले होते. कडाक्याची थंडी वाजत होती.
अंधारात काही दिसत नसल्यामुळे सर्वांनी हातात विजेरी घेतली. मस्तपैकी गरमागरम पोहे व चहा घेतला. तिथल्याच मंदिराच्या अंगणात एकमेकांचा परिचय सत्र झाले व ३.४५ ला महाराष्ट्र मधील सर्वोच्च शिखर"कळसुबाई" चढायला सुरवात केली.
अंधाऱ्या रात्री आकाशातल्या चांदण्या खूपच मनमोहक दिसत होत्या. मध्येेच अंगावर येणाऱ्या थंड वाऱ्यामूळे अंगावर सरसरून काटा येत होता. सुर्योदयापूर्वीच माथ्यावर पोहचायचे असल्यामुळे लगबगीने चालायला सुरू केले. प्रचंड प्रमाणात येणाऱ्या गिर्यारोहकांमुळे पायवाट चांगलीच मळलेली आहे. मध्ये मध्ये दगडी पायरी आहेत व लोखंडी शिडी बसवलेल्या आहेत तब्बल २.३० तासाच्या चढाई नंतर आम्ही सुमारे ६.३० वाजता माथा गाठला. सर्वप्रथम कळसुबाई मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर सुर्यदेवतेच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहू लागलो. कळसूबाई वरून दिसणारा तो सूर्योदय अप्रतिम होता. माथ्यावर वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे थंडी तर खूपच वाजत होती पण फोटो पण काढायची हौस होती. मग काय....... थोडा वेळ फोटो काढायचे आणि मध्येच थंडी पासुन वाचण्या साठी मंदिराचा मागे लपत होतेशिखरा वरून दिसनारे नयनरम्य दृश्य नजरेत भरून घेतले आणि ८.३० ला शिखर ऊतरायला सुरवात केली.आजूबाजूला दिसणारा परिसर पाहत खाली ऊतरलो. मागे वळुन पाहताच लक्षात आले अंधारा मध्ये आपन किती चढाई केली होती. ११.३० ला खाली पोहचलो, जेवण केले आणि परतीच्या मार्गाला लागलो. अशाप्रकारे महाराष्ट्रातील सर्वात ऊंच कळसुबाई शिखराचा ट्रेक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.
©सुशील राजगोळकर 

 

 



देवकुंड धबधबा - भिरा पाटणुस रायगड महाराष्ट्र Devkund Waterfall - Bhira Patnus Raigad Maharashtra

08 नोव्हेंबर 2017 ला सकाळी 8:00 वाजता देवकुंडला जायला निघालो, आनंद बिराजदार ला घेऊन 8:30 ला निघालो. "थंडी आणि दुचाकी हे समीकरण लक्षात घेऊन थोड्या उशिराच निघायचे" हा निर्णय  तसा ठीकच वाटला. ताम्हिणी घाटामध्ये पुणे रायगड हद्दीवर पोटभर नाष्टा केला. दुपारी 12:30 ला भिरा येथे पोहोचलो. दुपारी 1:00 ला  ट्रेक सुरू केला,  भिरा धरणाच्या बाजुने जंगलातुन आम्ही चालु लागलो, चालतांना मध्ये मध्ये पक्ष्यांचे प्राण्यांचे निरनिराळे आवाज तर मध्ये मध्ये खळखळत जाणारा पाण्याचा आवाज ऐकु येत होता.  साधारणपणे दीड तासाच्या वाटचालीनंतर देवकुंड ला पोहचलो, उंची  वरुन पडणारा धबधबा व तेथिल थंड व नितळ स्वच्छ पाणी पाहुन मनभरून गेले, न राहुन पाण्यात डुबकी मारली पोहुन झाल्या नंतर आनंदने आणलेला डबा पाण्यात पाय ठेऊन निवांतपणे खाल्ला, बुधवार असल्याने तशि गर्दि कमिच होती तेथुन सर्व पर्यटक परतिच्या वाटेला निघायला लागले, आम्ही मात्र तेथुन सर्व पर्यटक गेल्या नंतर निरव शांतते मध्ये थोडावेळ थांबून छायाचित्रे घेतली आणि परतिच्या वाटेला लागलो. 

©सुशील राजगोळकर










पन्हाळगड ते पावनखिंड 15 व 16 जुलै 2017, Panhalgad To Pawankhind

      ठरल्याप्रमाणे माझा भाचा अजित गवेकर मुंबईहुन शुक्रवारी 14 जुलै रोजी चिंचवडला 7:00 वाजता माझ्याकडे आला, येथुन आम्ही दोघे बालाजीनगरला शैलेश चिंदके कडे जेवायला गेलो. त्याने खास कोल्हापुरी आख्खा मसुर जेवणाचा बेत केला होता, जेवन ऊरकुन आम्ही तिघे कात्रजला गेलो. एव्हाना रात्रीचे 12:30 वाजले होते, तेथे सागर थोरात आमची वाट पाहत होता. येथुन आम्ही चौघे कोल्हापुरला जाणारी बस पकडुन निघालो, पहाटे 5:30 वाजता कोल्हापुरला पोहचलो. तेथेच फ्रेश होऊन 7:15 ची पन्हाळा गाडी पकडुन गडावरती पोहचलो.
     पन्हाळगडावरती पोहताच वीर शिवा काशीद व वीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्याला वंदन करून तीन दरवाजा येथे आलो, तेथे आमचा मित्र धर्मदास मोटे आला होता. त्याच्यासोबत नाश्ता ऊरकुन आम्ही पाच जण राजदिंडी दरवाजाकडे निघालो, भग्न अवस्थेतील दरवाजा पाहुन मन खिन्न झाले. याच दरवाजा मधुन महाराज विशाळगडाकडे गेले होते.
तेथुनच आम्ही आमच्या ट्रेकची सुरवात केली. येथुनच जंगलातुन वाट जाते, त्याच वाटेने आम्ही निघालो, थोडे चालत जाताच मसाई पठारावरती पोहचलो, तेथे फोटो काढुन पुढे चालत राहीलो, थोडे अंतर पुढे गेल्यानंतर पठारावरती मसाई देवीचे मंदिर लागले, तेथे नमस्कार करुन थोडे आडवाटेला गेलो व तेथे पांडवदरा व बुधा लेणी पाहिल्या व तेथेच दुपारचे जेवन ऊरकले व पुढे पठारावरती चालू लागलो. त्यातच जोराचा वारा व पाऊस चालू झाला, पाऊसाचा मार झेलत भिजत चालत राहीलो व 5 ते 6 कि.मि. चा पठार संपवून पुढे डोंगर रांगेतुन चालायला लागलो, डोंगराच्या कुशीत वसलेल्या लहान लहान वाड्या-वस्तीमधुन  चालत होतो, त्या वाड्या पाहून वाटते अजुनही त्या वाड्यांना शहराची झळ लागलेली नाही, असेच डोंगर रांगेने पुढे जात 20 ते 25 कि. मि. ट्रेक करून करपेवाडी या गावी आम्ही एका घरामध्ये रात्रीचा मुक्काम केला.
       दुसऱ्या दिवशी (16 जुलै 2017 ) सकाळी नाश्ता ऊरकुन आम्ही 08:00 वाजता निघालो, घनदाट जंगलातुन जाताना झाडांच्या अधुन मधुन डोकावणारी सकाळची कोवळी सूर्य किरणे पाहत, पक्षांचे येणारे वेगवेगळे आवाज ऐकत, जंगलातुन जाताना दिसनारे फेसाळत पडणारे धबधबे व त्याचा आवाज तसेच बरेचसे लहान मोठे ओढे पार करत, वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाहत आम्ही चालत राहीलो. त्यातच पाऊस येत-जात होताजंगलातील चिखलमय रस्ता तुडवत मध्येच निसरडा रस्ता कापत आम्ही 45 ते 50 कि. मि. चा ट्रेक करून पावनखिंडपाशी नवीन बांधलेल्या ध्वजस्तंभापाशी पोहचलो, त्या ऊंच स्तंभावरून पावनखिंड व निसर्गरम्य असे वातावरण पाहून आम्ही 05:00 वाजता तयार केलेल्या लोखंडी शिडीवरून पावनखिंड मध्ये उतरलो, खिंड पाहून झाल्यानंतर दोन दिवसाचा ट्रेकचा थकवा दुर झाला व बरे वाटले. त्यानंतर आम्ही भाततळी या गावी गेलो व तेथुन कोल्हापुर गाडी पकडुन कोल्हापुर गाठले व लागोलग पुणे गाडी पकडुन पुण्याला परत आलो.

©सुशील राजगोळकर

 



















कात्रज (जुना बोगदा) ते सिंहगड म्हणजेच K2S, Katraj To Sinhagad

        पुण्यातील प्रसिद्ध आणि ट्रेकर्स चा आवडता ट्रेक म्हणूनच ह्या सीजन चा पहिला आणि वॉर्मउप ट्रेक म्हणुन हा ट्रेक निश्चित केला. आणि ठरल्या प्रमाणे 17/06/2017 सकाळी 8:30 वाजता टनेल जवळील वाघजाई देवीच्या दर्शनाने ट्रेकला सुरवात केली.तसा हा मध्यम अवघड (moderate difficulty) आणि जास्त दम सहनशक्ती (high endurance) चा आवश्यकता असणारा ट्रेक.
एकूण 17 डोंगर आणि 20 किमी आणि आम्ही 8 जण, दोन तीन नवीन मित्र नवखे ट्रेकर्स, काही मध्यम आणि दोन तीन अनुभवी ट्रेकर्स सजले पूर्ण तयारीनिशी होतो. पहिले 2 डोंगर झाले आणि ऊन वाढलं आणि ट्रेक ची अवघड पण जाणवू लागला.सगळ्यांचीच कसोटी लागु लागली दर 40 ते 45 मिनिटाने थांबा घेत होतो. मध्यंतरी अजून एक ग्रुप मधी भेटत होता, दुपारी जेवण झालं आणि मग सगळे निघाले काही थोडे पुढे काही थांबत बसत मागून हळू हळू येत होते. एक एक डोंगर सरत होता आणि सिंहगड अजून अजून जवळ दिसत होता आणि मधील डोंगर आणि दऱ्या कमी होत होत्या आणि पुढच्या ग्रुपने 2:30 ला सिंहगड पायथा गाठला दुसऱ्या ग्रुपने लगोलग 3:15 ला ट्रेक पूर्ण केला. सिंहगडावर पोहचल्यावर सगळ्यांनीच दिवसभर म्हणून दाखवलेली इच्छा अखेरीस पूर्ण झाली आणि मुसळधार पाऊस झाला सर्व ग्रुपने पावसाचा भजी  आणि चहा बरोबर भिजून मनमुराद आनंद लुटला.
संध्याकाळी 6:00 च्या सुमारास पीएमटी च्या बस ने बरोबरच सर्वजण पुण्याकडे रवाना झालो.

अश्या प्रकारे सर्व मित्रांनी सीजन च्या पहिला ट्रेक *कात्रज ते सिंहगड* चा मनसोक्त आनंद घेतला

# Awesome Trek with Expert Anand Birajdar.

# Trek start on early morning from old tunnel at 8:30am and Successfully end on Sinhgad at 3:15pm.

# No थकवा only feeling Refresh.

# हा Trek नाही Treks आहेत.

# सुरवातीली असे वाटले आपन Out होतो की काय, नंतर set zalya नंतर असे वाटु लागले, आज आपन Century करायचिच, मध्येच ऐकटा बोलला Nurous 90 नाही झालि पाहिजे, पण सर्व membersनि, Not Out Century केलि.

# काही Members चि Life मधील पहीलीच Test Match होती.

# कात्रज ते सिंहगड फक्त ऐकुनच होतो, काल ट्रेक Successfully करुण झाला, शेवटी ट्रेक संपल्या नंतर प्रतेकाच्या चेहरा वरिल आनंद व विश्वास पाहुन मला खुप बरे वाटले.

  ©सुशील राजगोळकर

 








 

 

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.