दि.
१६/१२/२०१७ला
रात्री ८.००
वाजता पुणे येथून निघालो.
रात्री १०.००
वाजता खेड घाटाजवळ हाँटेल
मध्ये जेवण ऊरकुन निघालो.
त्यानंतर थेट
गाडी थांबली ति म्हणजे "बारी"
या गाविच,
तेव्हा पहाटेचे
३.००
वाजले होते. कडाक्याची
थंडी वाजत होती.
अंधारात काही
दिसत नसल्यामुळे सर्वांनी
हातात विजेरी घेतली.
मस्तपैकी
गरमागरम पोहे व चहा घेतला.
तिथल्याच
मंदिराच्या अंगणात एकमेकांचा
परिचय सत्र झाले व ३.४५
ला महाराष्ट्र मधील सर्वोच्च
शिखर"कळसुबाई"
चढायला सुरवात
केली.
अंधाऱ्या
रात्री आकाशातल्या चांदण्या
खूपच मनमोहक दिसत होत्या.
मध्येेच अंगावर
येणाऱ्या थंड वाऱ्यामूळे
अंगावर सरसरून काटा येत होता.
सुर्योदयापूर्वीच
माथ्यावर पोहचायचे असल्यामुळे
लगबगीने चालायला सुरू केले.
प्रचंड प्रमाणात
येणाऱ्या गिर्यारोहकांमुळे
पायवाट चांगलीच मळलेली आहे.
मध्ये मध्ये
दगडी पायरी आहेत व लोखंडी शिडी
बसवलेल्या आहेत तब्बल २.३०
तासाच्या चढाई नंतर आम्ही
सुमारे ६.३०
वाजता माथा गाठला. सर्वप्रथम
कळसुबाई मातेचे दर्शन घेतले.
त्यानंतर
सुर्यदेवतेच्या आगमनाची
आतुरतेने वाट पाहू लागलो.
कळसूबाई वरून
दिसणारा तो सूर्योदय अप्रतिम
होता. माथ्यावर
वाहणाऱ्या सोसाट्याच्या
वाऱ्यामुळे थंडी तर खूपच वाजत
होती पण फोटो पण काढायची हौस
होती. मग
काय....... थोडा
वेळ फोटो काढायचे आणि मध्येच
थंडी पासुन वाचण्या साठी
मंदिराचा मागे लपत होते. शिखरा
वरून दिसनारे नयनरम्य दृश्य
नजरेत भरून घेतले आणि ८.३०
ला शिखर ऊतरायला सुरवात
केली.आजूबाजूला
दिसणारा परिसर पाहत खाली
ऊतरलो. मागे
वळुन पाहताच लक्षात आले अंधारा
मध्ये आपन किती चढाई केली
होती. ११.३०
ला खाली पोहचलो, जेवण
केले आणि परतीच्या मार्गाला
लागलो. अशाप्रकारे
महाराष्ट्रातील सर्वात ऊंच
कळसुबाई शिखराचा ट्रेक
अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.
©सुशील राजगोळकर
No comments:
Post a Comment