ढाक बहिरी | Dhak Bahiri | २१ जानेवारी २०२३

ढाक बहिरीचा लेणी / गुहा हा ट्रेक तसा पुणे वरून एका दिवसात पाहून येता येऊ शकतो. पण शनिवार व रविवारी हल्ली किल्ल्या वरती होणाऱ्या गर्दीमुळे आम्ही एक दिवस आदी तिकडे रहायला जायचे नियोजन केले. मग नियोजना प्रमाणे 20 जानेवारी 2023 रोजी रात्री 10:00 वाजता रावेत पुणे इथून 'जांभिवली' गावाचा दिशेने निघालो व रात्री 12:00 वाजता जांभिवली गावापासून पुढे 1 किलोमीटर वरती असलेल्या "कोंडेश्वर मंदिर" येथे पोहोचलो. तेथे पोहचताच एका बाजूला दगडी चुल व लाकडे नजरेस आली. लगोलग आम्ही त्या कडाक्याचा थंडी मध्ये चूल पेटवली व मसाला दूध बनवायला घेतले. तो पर्यंत तेथे असलेल्या "भैरोबा मंदिर" मध्ये आम्ही आमचे तंबू लावले. नंतर त्या अंधाऱ्या रात्री तासभर गप्पा टप्पा करून झोपी गेलो.


भैरोबा मंदिर - कोंडेश्वर मंदिर, जांभिवली
 भैरोबा मंदिर - कोंडेश्वर मंदिर, जांभिवली

दुसरे दिवशी शनिवारी 21 जानेवारी 2023 रोजी पहाटे लवकर उठून काही मेंबर रात्री येतांना गावाचा शेवटचे घर व शुभम रेस्ट्रॉरंट असा लहानसा बोर्ड असलेल्या घरी जाऊन सकाळचा नाश्ता बनवायला सांगून परत आम्हाला बोलवायला आले. तो पर्यंत आम्ही आमचे तंबू वगैरे आवरून घेतले. त्यानंतर तेथे भरपेट नाश्ता करून घेतला व गावातील कदम आजोबांना आमचा सोबत वाटाड्या म्हणून घेतले.
पुढे सकाळचा प्रसन्न अशा वातावरणा मध्ये डोंगराचा कुशीत असलेल्या "कोंडेश्वर मंदिरा" मध्ये दर्शन घेतले, हे एक प्राचीन मंदिर असून गाभाऱ्या मध्ये शिवलिंग पाहायला मिळाले, मंदिरा समोर व बाजूला आता सभामंडप बांधण्यात आला आहे. तसेच मंदिराचा बाजूला शिव शंकराची मूर्ती नव्याने बसवलेली पाहायला मिळाली. मंदिराचा आवारात काही वीरगळ व जुन्या मंदिराचे अवशेष पाहायला मिळाले. मंदिराचा मागील बाजूला लहान कुंडा मध्ये पाणी आहे तर पाऊसाळ्या मध्ये येथे धबधबा वाहत असतो त्यामुळे येथे पर्यटकांची चांगलीच गर्दी असते.
कोंडेश्वर मंदिर - जांभिवली
कोंडेश्वर मंदिर - जांभिवली
कोंडेश्वर मंदिर - जांभिवली
कोंडेश्वर मंदिर - जांभिवली

कोंडेश्वर मंदिर - जांभिवली

अवशेष - कोंडेश्वर मंदिर, जांभिवली

विरगळ - कोंडेश्वर मंदिर, जांभिवली


कोंडेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर नंतर आम्ही मंदिराचा मागून जाणाऱ्या वाटेने ढाक बहिरीचा ट्रेकला सुरवात केली. ट्रेकचा सुरवाती पासून समोर व काही वेळा डाव्या बाजूला दूरवर ढाक बहिरी किल्ला दिसत होता. ट्रेकचा मार्ग तसा पूर्ण मळलेल्या वाटेचा होता पण काही वाटा वाट चुकणाऱ्या देखील होत्या. किल्ल्या पर्यंतची वाट हि चढ उताराची व घनदाट जंगलामधून जाणारी होती. त्यामुळे संपूर्ण ट्रेक मध्ये काही ठिकाणीच ऊन जाणवले मात्र पूर्ण वाट हि जंगलातील उंच झाडांच्या सावलीमधून जाणारी होती त्यामुळे ऊन जाणवले नाही.

मागे दुरवर दिसत असलेला ढाक बहिरी किल्ला
मागे दुरवर दिसत असलेला ढाक बहिरी किल्ला 

ढाक बहिरी किल्ल्याकडे जाणारी जंगलातील वाट
ढाक बहिरी किल्ल्याकडे जाणारी जंगलातील वाट



पुढे दोन वाटा चालू होतात अशा जंगलाचा मध्य ठिकाणी येऊन पोहचलो. तेथे गडकिल्ले संवर्धन संस्थेने किल्ल्याचा सुंदर असा नकाशा लावला आहे. त्या नकाशा वरून आपल्याला तेथील वाटांचा व परिसराचा अंदाज येतो. उजवीकडे एक वाट ढाक गावाकडे / ढाक किल्या वरती व दुसरी वाट सरळ समोर ढाक गुहेकडे व कळकराय सुळक्याकडे जाते त्या वाटेने साधारण २:३० तासाचा ट्रेक नंतर आम्ही कळकराय खिंडीत येऊन पोहचलो. खिंडीचा डाव्या बाजूला उंच "कळकराय सुळका" व उजव्या बाजूला "ढाक किल्ला" व खिंड उतरून पुढे "ढाक गुहा / लेणी" कडे वाट जाते. खिंडीतून उजव्या बाजूला किल्ल्या वरती जाणारी वाट हि खूप अवघड अशी कातळातील पाहायला मिळाली, या वाटेने क्वचितच कोणी किल्यावर जातात. आम्ही प्रथम खिंड उतरून लेणी कडे जायचे ठरवले.


खींडीतुन खाली उतरतांना - कळकराय, ढाक बहिरी
खींडीतुन खाली उतरतांना - कळकराय, ढाक बहिरी 

खींडीतुन खाली उतरतांना
खींडीतुन खाली उतरतांना - कळकराय, ढाक बहिरी 

खींडीतुन खाली उतरतांना - कळकराय, ढाक बहिरी
खींडीतुन खाली उतरतांना - कळकराय, ढाक बहिरी 

हि खिंड तेथे असलेल्या दोर व साखळिचा मदतीने उतरुन आलो. खिंड तशि चढा उतरायला थोडी अवघडच आहे. पुढे आता मात्र गुहेकडे जाणारी थरारक अशी वाट चालू झाली. उजव्या बाजूला उंच कातळ कडा व डाव्या बाजूला खोल दरी होती. काही ठिकाणी कातळामध्ये खोदलेल्या लहान पायऱ्या होत्या तर काही ठिकाणी खूप अवघड जोखमीची वाट होती. पुढे तर सरळ उभ्या कातळा मधील वाट चढून लेणी / गुहे पाशी पोहचायचे होते त्या वाटे वरती आता दोर, लोखंडी साखळी व एका ठिकाणी झाडाची फांदी लावलेली आहे. त्याचा साहाय्याने एक मेकाला धीर व साथ देत आम्ही लेणी मध्ये येऊन पोहचलो.

मुख्य लेणी मार्गा वरील एक लहान लेणी - ढाक बहिरी
मुख्य लेणी मार्गा वरील एक लहान लेणी - ढाक बहिरी 






मुख्या लेणी कडे जाणारा मार्ग - ढाक बहिरी
मुख्य लेणी कडे जाणारा मार्ग - ढाक बहिरी 

पहिल्या लेणी मध्ये शेंदूर लावलेल्या भैरीचा मूर्ती पाहायला मिळाल्या व तसेच एक पाण्याचे टाके पाहायला मिळाले. समोर आणखीन एक मोठी लेणी होती व त्या समोर 3 री अपूर्ण लेणी होती. लेणीमधून समोर असलेला राजमाची किल्ला स्पष्ट दिसत होता. तेथे थोडी विश्रांती घेतली व टाक्या मधिल पाणी भरून घेऊन त्याच थरारक वाटेने माघारी फिरलो. पुढे येऊन जंगला मध्ये एके ठिकाणी दुपारचे जेवण केले व 04:00 वाजता कोंडेश्वर मंदिरा पाशी येऊन पोहचलो व पुण्याचा दिशेने निघुन 06:00 पोहचलो. अशाप्रकारे वर्षाचा सुरवातीला एक अवघड ट्रेकने प्रवासाला सुरुवात केली.

भैरवचा मुर्ती - ढाक बहिरी लेणी/गुहा
भैरवचा मुर्ती - ढाक बहिरी लेणी/गुहा

ढाक बहिरी लेणी/गुहा
ढाक बहिरी लेणी/गुहा
ढाक बहिरी लेणी/गुहा

ढाक बहिरी लेणी/गुहा येथुन दिसणारा राजमाची किल्ला
ढाक बहिरी लेणी/गुहा येथुन दिसणारा राजमाची किल्ला 



कोंडेश्वर मंदिर व येथिल कुंड

सोबती : सुहास शेंडकर, संजय शेंडकर, वैभव सोनवने, शशीकांत तांदुळकर, आकाश भोसले, अजय सोनवने, राहुल होनराव.
©सुशील राजगोळकर

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.