विसापूर VISAPUR

अचानक ठरल्याने थोडे उशिरा सकाळी १० वाजता मी व आनंद विसापूर ला निघालो. थंडीची चाहूल संपून थोडे ऊन लागत होते म्हणून कामशेत जवळ थोडे थांबून ऊसाचा रस घेतला व पुढे निघालो. त्या नंतर गाडी थांबवली ती भाजे गाव येथे. गाडी लावून आम्ही विसापूरच्या दिशेने चालायला सुरवात केलीशिवजयंती असल्या कारणाने लोहगडाकडे जाणारे व येणारे यांची गर्दी देखील खूप होती. आम्ही हळू हळू रस्ताच्या घाट वाटेने न जाता डोंगर पाय वाटेने घाट रस्ता पारकरून १२ वाजता विसापूर गडा वरती जाणारा गायमुख रस्ता येथे येऊन पोहचलो. आणि आम्ही वेळ न दवडता गड चढायला सुरवात केली. वाटे मध्येच असलेले पाण्याचे टाके व तेथे कोरलेला लहानसा शिलालेख पाहून अर्ध्या तासात आम्ही गडमाथा गाठला. व दुपारचे ऊन खूप होते म्हणून आम्ही तेथे असलेल्या बोराच्या झाडाखाली बसून जेवण उरकले व एक तासभर झोप काढली. व २ वाजल्या नंतर गड फिरायला सुरवात केली. विसापूर गडावरून समोरच असलेला लोहगड स्पष्ट दिसतो, तसेच पवणा धरणाचा पाण्याच्या जलाशय व त्या मागे उभा असलेला तुंग किल्ला, तिकोना किल्ला देखील पाहायला मिळाला.
पुढे पाण्याचे टाके, चुण्याचा घाणा, दलनाचे जाते पाहुण गडाच्या तटबंदी वरून निघालो व पाण्याच्या टाक्यामध्ये कोरलेला हनुमान पाहिला व तेथील टाकी पाहून पुढे दिसत असलेल्या २ वाड्यांकडे गेलो. वाडे पाहिल्या नंतर मोठया प्रमाणात असलेल्या पाण्याच्या टाक्या पाहिल्या. व पाटण गावाकडून येणाऱ्या पायऱ्यांचा वाटेने थोडे खाली उतरून तेथे असलेले हनुमान व त्यालाच लागून असलेल्या २ मोठ्या गुहा पाहूण माघारी आलो. पुढे जाऊन तोफ, पाण्याचे टाके, तलाव पाहिला. तलाव आठला होता पण तलावाच्या हिरव्या गार कुरणावरती जनावरे चरत होती. तेथून पुढे दिसत असलेल्या महादेव मंदिर पाहायला गेलो व मंदिराच्या मागे असलेले लहानसे पुष्करर्णी पाहून गडाला वळसा घालून जायचे ठरवले व पुढे निघालो. बुरुजपाण्याचे टाके, तलाव, तटबंदी पाहत आलो, गड खूप मोठा असल्याने गडाच्या चौहो बाजूने मोठया प्रमाणात पाण्याचे टाके पाहायला मिळाले. गडाच्या मध्ये झाडी देखील खूप आहेआम्हाला तेथे सापाची कात पाहायला मिळाली ती कात जवळपास ६ फूट लांब सापाची असावी असा अंदाज आला. अश्या प्रकारे गड पाहात आम्ही गडाला पूर्ण प्रदक्षिणा मारून गायमुखी वाटे जवळ येऊन पोहचलो व गड उतरायला सुरवात केली, आणि ५:३० वाजता भाजे येथे येऊन पोहचलो. अश्या प्रकारे आम्ही शिवजयंती साजरी केली. 

विसापूर

विसापूर



विसापूर गडावरील चुण्याचा घाणा
विसापूर
विसापूर गडावरील जात

विसापूर गडावरील पाण्याचा टाक्यातील हनुमान
विसापूर
विसापूर गडावरील  कोठाराचे अवशेष
विसापूर
विसापूर गडावरील पाण्याचे टाके
विसापूर
पायऱ्यांचा वाटेवरील हनुमान व गुहा
विसापूर
विसापूर गडावरील महादेव मंदिरामधील शिवलिंग
विसापूर
विसापूर गडावरील महादेव मंदिरा समोरील अंगण
विसापूर
गडावरती मिळालेली सापाची कात
©सुशील राजगोळकर

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.