Showing posts with label Trek near Wai. Show all posts
Showing posts with label Trek near Wai. Show all posts

चंदन वंदन गड ०४-सप्टेंबर-२०२१ ⛰️🚩Chandan Vandan

पुणे पासुन साधारण ९० किलोमीटर  असलेल्या चंदन वंदन कडे सकाळी ०९:०० वाजता निघालो. पुणे सातारा महामार्गावर भुईंज फाट्यावरून डावीकडे गेल्या नंतर वाटेत थोडा मार्ग विचारून घेतला, साधारण १५-२० किलोमीटरच्या निसर्गरम्य असा प्रवासानंतर 🏘️ खोलवडी गावापासून २ किलोमीटर व बनवडी गावाच्या २ किलोमीटर आधी अश्या मध्यभागी असलेल्या गणेश मंदिर 🛕 (गणेशखिंड) येथून दुपारी १२.०० वाजता आमच्या ट्रेकला सुरुवात झाली.

पायथ्या पासून दोन्ही चंदन वंदन गड स्पष्टपणे दिसतात. आकाराने व दिसायला दोन्ही गड सारखेच असल्यामुळे यांना दुर्गविश्वातील जुळी भावंडे का म्हणतात याची प्रचिती आली.

खोलवडी येथुन - चंदन वंदन गड
खोलवडी येथुन - चंदन वंदन गड
गणेश मंदिर - गणेशखिंड (खोलवडी बनवडी)
गणेश मंदिर - गणेशखिंड (खोलवडी बनवडी)
गणेश मुर्ती, गणेश मंदिर - गणेशखिंड (खोलवडी बनवडी)
गणेश मुर्ती, गणेश मंदिर - गणेशखिंड (खोलवडी बनवडी)


वंदनगड 🚩⛰️

गडाचा दिशेने चालायला सुरवात करताच आता तिथे पायऱ्या, शुशोभीकरण व फलक बसवलेले पाहायला मिळाले. गणेश खिंडीतून गड चढतांना डाव्या बाजूला वंदनगड व उजव्या बाजूला चंदनगड आहे. थोडेच अंतर चालून येता एक लहानसे मंदिर लागले. मंदिराचा मागील बाजूने एक सरळ मळलेली वाट वंदन गडाकडे जाते त्या वाटेने आम्ही निघालो.


मंदिर व मागे वंदनगड
मंदिर व मागे वंदनगड

थोड्याच वेळात दोन्ही गडाचा मध्यभागी असलेल्या खिंडीत येऊन पोहचलो. तेथे एक वाट बेलमाची व किकली गावांतून येऊन मिळते. आपल्या डाव्या बाजूने जंगलातील वाट चालत एक तासाभरात आम्ही वंदन गडाचा महादरवाजा पाशी येऊन पोहचलो. या दरवाजा वरती गणेश शिल्प व कमळ कोरलेले पाहायला मिळाले. दरवाजा मागील डाव्या बाजूला सुस्थितीत व उजव्या बाजूला पडक्या अवस्थेतील पहारेकर्‍यांची दिवडी पाहायला मिळाली.

महादरवाजा - वंदनगड
महादरवाजा - वंदनगड
गणेश शिल्प व कमळ, महादरवाजा - वंदनगड
गणेश शिल्प व कमळ, महादरवाजा - वंदनगड

महादरवाजा मागिल दिवडी- वंदनगड
महादरवाजा मागिल दिवडी- वंदनगड

तेथून थोड्या पायऱ्या चढून येताच दुसरा दरवाजा व तिसरा दरवाजा पाहायला मिळाला या तिसऱ्या दरवाजा वरती एक शिलालेख कोरलेला आहे, व  मागे एक भली मोठी दिवडी पाहायला मिळाली व त्या दिवडी मधून एक चोर वाट दरवाजाचा वरचा दिशेला जाते. दरवाजा मधून पुढे गडाच्या दिशेने चालत येताच एक चुन्याचा घाणा पाहायला मिळाला.

दुसरा दरवाजा - वंदनगड
दुसरा दरवाजा - वंदनगड

तिसरा दरवाजा - वंदनगड
तिसरा दरवाजा - वंदनगड

तिसऱ्या दरवाजावरील शिलालेख - वंदनगड
तिसऱ्या दरवाजावरील शिलालेख - वंदनगड

तिसऱ्या दरवाजा मागिल दिवडी - वंदनगड
तिसऱ्या दरवाजा मागिल दिवडी - वंदनगड

तिसऱ्या दरवाजा व दिवडी येथिल चोरवाट - वंदनगड
तिसऱ्या दरवाजा व दिवडी येथिल चोरवाट - वंदनगड

चुन्याचा घाणा - वंदनगड
चुन्याचा घाणा - वंदनगड

तेथून पुढे डाव्या बाजूने दगडा मध्ये असलेल्या पायऱ्या चढून गडमाथ्यावर येऊन पोहोचलो. गडावरती फेरा मारायला चालू करताच उध्वस्त अवस्थेतील अवशेष पाहायला मिळाले. व एक उजव्या बाजूला असलेला तलाव पाहून पुढे आलो. समोर एक सदरे सारखी जागा पाहायला मिळाली.

दगडी पायऱ्यांची वाट - वंदनगड

अवषेश - वंदनगड
अवषेश - वंदनगड

तलाव - वंदनगड
तलाव - वंदनगड

सदरे सारखे अवशेष - वंदनगड
सदरे सारखे अवशेष - वंदनगड

तेथून पुढे चालून येताच तीन कोठारे पाहायला मिळाली. पुढे शिववंदनेश्वर मंदिरामध्ये नमस्कार केला. व खालिल बाजूला दिसत असलेले मशीद 🕌, त्या समोर शिलालेख असलेली कमान, मशीदचा मागे असलेला तलाव🏝️, तलावा वरील कमान, व तेथेच शिलालेख असलेली मोठी कबर व इतर पाहून तलावांचा बाजूने माघारी फिरलो. गडावरती एकुण चार तलाव पाहिले. गडावरून पूर्वेला कल्याणगड, पश्चिमेला वैराटगड, पांडवगड तर दक्षिणेला अजिंक्यतारा दिसत होता ⛰️⛰️. पूर्ण गड व आजूबाजूचा परिसर निहाळून लगबगीने गड उतरायला सुरुवात केली.

कोठार - वंदनगड
कोठार - वंदनगड

कोठार - वंदनगड
कोठार - वंदनगड 

शिववंदनेश्वर मंदिरातील शिवलिंग - वंदनगड
शिववंदनेश्वर मंदिरातील शिवलिंग - वंदनगड

शिलालेख असलेली कमान - वंदनगड
शिलालेख असलेली कमान - वंदनगड


कमानिवरील शिलालेख - वंदनगड


तलाव - वंदनगड
तलाव - वंदनगड


चंदनगड⛰️🚩

साधारण ०४:०० वाजता त्या लहान मंदिराचा समोरील बाजूने चालत येऊन चंदन गडाचा मार्गाला येऊन पोहचलो. तेथून खालील दिशेला अता बनवडी गावांमधून येणारा मार्ग बनवलेला व शुशोभित केलेला पाहायला मिळाला. तेथे एक लहान विहीर व झाडाखाली कृत्रिम बाकडे ठेवली आहेत, तेथे थोडी विश्रांती घेतली.

बनवडी गावांमधून चंदन गडावर येणारी वाट
बनवडी गावांमधून चंदन गडावर येणारी वाट

चंदनगडाच्या वाटेवरील झाड व विहीर
चंदनगडाच्या वाटेवरील झाड व विहीर

मग गडाचा दिशेने चालायला सुरुवात केली काही वेळातच आम्ही गडाचा मुख्य दरवाजापाशी येऊन पोहचलो आता असलेल्या अवशेषा वरून दरवाजाची भव्यता लक्षात येथे. दरवाजाला लागूनच एक लहान कबर आहे. तेथून काही पायऱ्या चढून येताच डाव्या बाजूला शंकराचे मंदिर आहे🛕. मंदिरा मध्ये दोन महादेवाचा पिंडी असून त्या वरती प्रत्येकी पाच शिवलिंग आहेत. तर मंदिराचा बाजूला भले मोठे वडाचे झाड आहे🌳. 

मुख्य प्रवेशद्वार - चंदनगड
मुख्य प्रवेशद्वार - चंदनगड

शंकराचे मंदीर - चंदनगड
शंकराचे मंदीर - चंदनगड

शंकराच्या मंदिरा मधील पाच लिंगी महादेवाचे पिंडी - चंदनगड
शंकराच्या मंदिरा मधील पाच लिंगी महादेवाचे पिंडी - चंदनगड

मंदिरापासून पुढे दहा एक पायऱ्या चालून येताच शिळा पहायला मिळाल्या. तेथून समोरच दर्गा🕌, त्या मागे असलेली विहीर, अवशेष पाहून एका मोठा चौथऱ्या पाशी आलो. तो चौथरा पाहून निश्चित काय होते ते सांगता येत नाही. मग तेथे बसून दुपारचे जेवण उरकले 🍛🥞.

दोन्ही बाजूला रचलेल्या शिळा - चंदनगड
दोन्ही बाजूला रचलेल्या शिळा - चंदनगड

दर्गा - चंदनगड
दर्गा - चंदनगड

विहीर - चंदनगड
विहीर - चंदनगड

चौथरा - चंदनगड
चौथरा - चंदनगड

एव्हाना संध्याकाळचे ०५:०० वाजले होते व गडावरती दाट धुके दाटून आले. त्या धुक्यातून मार्ग काढत पुढे चालू लागलो व खालील बाजूला दिसत असलेला तलाव मार्ग न सापडल्यामुळे वरूनच पाहिला. व पुढे कोठार पाहून त्या वातावरणातील आनंद घेऊन गड उतरायला सुरुवात केली. जाता जाता त्या लहान विहरीमधील पाणी काढून ताजे-तवाने झालो.

कोठार - चंदनगड
कोठार - चंदनगड



अशाप्रकारे ०६:३० वाजता चंदन वंदन या जुळ्या भावांची भटकंती उरकून गणेशखिंड येथे पोहचलो व पुणेकडे मार्गस्थ झालो.

सोबती: सुहास शेंडकर, संजय शेंडकर, शशी तांदुळकर, अजय सोनावणे.

© सुशील राजगोळकर


रोहिडा २६-जून-२०२१ ⛰️🧗🏼‍♂️🚩 ROHIDA 26-Jun-2021

दुपारी किल्लाचा पायथ्याला बाजारवाडी गांवामध्ये असलेल्या काळ्या पाषाणातील पुरातन शिव मंदिरा 🛕 मध्ये नमस्कार केला. व गावातील शाळेपाशी गाडी लावून रोहिडा किल्ला चढायला सुरवात केली. निम्मा किल्ला चडून येताच सुंदर असा सोसाट्याचा गार वारा सुटला होता. रोहिडा किल्ल्याचे बुरुज खूप लांबूनच लक्ष वेधून घेतात. किल्ला चढताना देखील दिसणारे बुरुज मन मोहून घेतात. तसेच डाव्या बाजूला केंजळगड स्पष्ट दिसत होता.आम्ही आधी २ गड केल्या मुळे सावकाश किल्ला चढत होतो.

पुरातन मंदिरातील शिवलिंग - बाजारवाडी
पुरातन मंदिरातील शिवलिंग - बाजारवाडी

काळ्या पाषाणातील पुरातन मंदिराची आतील बाजू - बाजारवाडी
काळ्या पाषाणातील पुरातन मंदिराची आतील बाजू - बाजारवाडी

काळ्या पाषाणातील पुरातन मंदिर व मागे दिसत असलेला रोहिडा किल्ला - बाजारवाडी
काळ्या पाषाणातील पुरातन मंदिर व मागे दिसत असलेला रोहिडा किल्ला - बाजारवाडी

रोहिडा किल्ला
रोहिडा किल्ला

पहिल्या दरवाजाला अता छानसा लाकडी दरवाजा बसवलेला आहे. पहिल्या दरवाजा ते दुसऱ्या दरवाजा पर्यंत दगडी पायऱ्या पहायला मिळतात. दुसऱ्या दरवाजातून आत मध्ये येताच उजव्या बाजूला एक पिण्याचा पाण्याचे टाके आहे. ते पाहून आम्ही तेथील वरचा बाजूनी असलेला बुरुजा सारखा भाग पाहून पुढे काही पायऱ्या चालून गेलो. तेथे किल्याचा तिसरा दरवाजा लागला दरवाजा वरती शिलालेख व हत्तीचे शीर पाहायला मिळाले.

रोहिडा किल्लाचा पहिला दरवाजा
रोहिडा किल्लाचा पहिला दरवाजा

रोहिडा किल्लाचा पहिला दरवाजाचा आतील बाजू
रोहिडा किल्लाचा पहिला दरवाजाचा आतील बाजू

रोहिडा किल्लाचा पहिल्या व दुसऱ्या दरवाजा मधील पायऱ्या
रोहिडा किल्लाचा पहिल्या व दुसऱ्या दरवाजा मधील पायऱ्या

रोहिडा किल्लाचा दुसऱ्या दरवाजाचा आतील बाजू
रोहिडा किल्लाचा दुसऱ्या दरवाजाचा आतील बाजू

रोहिडा किल्लाचा दुसऱ्या दरवाजा येथील पाण्याचे टाके
रोहिडा किल्लाचा दुसऱ्या दरवाजा येथील पाण्याचे टाके

रोहिडा किल्लाचा तिसरा दरवाजा
रोहिडा किल्लाचा तिसरा दरवाजा

तेथून आत मध्ये शिरताच समोरच असलेले सदरेचे अवशेष पाहायला मिळाले, तेथून डावीकडे दिसत असलेल्या भैरवाचा मंदिरा मध्ये जाऊन दर्शन घेतले. 🛕 मंदिर मध्ये भैरव, भैरवी व गणपती या देवांची मूर्ती तर बाजूलाच असलेले शिवलिंगाला नमस्कार केला. मंदिरा मध्ये उत्खनना मध्ये सापडलेला लहानसा पण वजनदार शिशाचा गोळा ठेवलेला आहे तो उचलून पाहिला. मंदिरा समोर व बाजूला एक तलाव आहे. दुपारचा थंड वारा सुटला होता मग भुक खूप लागल्याने मंदिराचा समोरच बसून दुपारचे जेवण उरकले. मंदिरा जवळून कमळगड व केंजळगड ⛰️ दिसत होते.

रोहिडा किल्ला वरील मंदिरातील भैरव, भैरवी व गणपतीची मूर्ती.
रोहिडा किल्ला वरील मंदिरातील भैरव, भैरवी व गणपतीची मूर्ती.

रोहिडा किल्ला वरील मंदिरातील शिवलिंग.
रोहिडा किल्ला वरील मंदिरातील शिवलिंग.

रोहिडा किल्ला वरील मंदिरा शेजारील तलाव
रोहिडा किल्ला वरील मंदिरा शेजारील तलाव

पुढे मंदिराचा बाजूला खूप प्रमाणात असलेले वाड्याचे अवशेष पाहून मंदिराचा मागील बुरुजा कडे गेलो. व तेथून गडाचा पश्चिम दिशेने फेरा मारायला सुरवात केली. पुढे चुन्याचा घाणा पाहिला. थोडे पुढे येताच मोठया प्रमाणात असलेल्या जोड पाण्याचा टाक्या पाहिला. व पुढे असलेला एक बुरुज पाहून फत्ते बुरुज (वाघजाई बुरुज) पाशी येऊन पोहचलो. बुरुजा वरून लांब डोंगर रांगेचा सोंडे वरती असलेले वाघजाई मंदिर दिसते. तेथून माघारी फिरलो. अवशेष, तटबंधी, गुप्त दरवाजा व समोर असलेले २ बुरुज पाहून तिसऱ्या दरवाजा पाशी येऊन पोहचलो. व लगोलग गड उतरायला घेतला. गडाकडे मागे वळून पाहतांना गड हळूहळू धुक्याची चादर घेत आहे असे वाटले. 

रोहिडा किल्ला वरील वाड्याचे अवशेष
रोहिडा किल्ला वरील वाड्याचे अवशेष

रोहिडा किल्ला वरील बुरुज
रोहिडा किल्ला वरील बुरुज

रोहिडा किल्ला वरील चुन्याचा घाणा.
रोहिडा किल्ला वरील चुन्याचा घाणा.

रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.
रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.

रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.
रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.

रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.
रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.

रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.
रोहिडा किल्ला वरील पाण्याचे टाके.

रोहिडा किल्ला वरील फत्ते बुरुज (वाघजाई बुरुज)
रोहिडा किल्ला वरील फत्ते बुरुज (वाघजाई बुरुज)

रोहिडा किल्ला वरील गुप्त दरवाजा
रोहिडा किल्ला वरील गुप्त दरवाजा

रोहिडा किल्ला वरील बुरुज
रोहिडा किल्ला वरील बुरुज

रोहिडा किल्ला वरील भैरवाचे मंदिर व त्या समोरील तलाव
रोहिडा किल्ला वरील भैरवाचे मंदिर व त्या समोरील तलाव

रोहिडा किल्ला वरील बुरुज
रोहिडा किल्ला वरील बुरुज

धुक्यात हरवलेला रोहिडा किल्ला
धुक्यात हरवलेला रोहिडा किल्ला

मग आम्ही ५:०० वाजता बाजारवाडीतून भोर कडे निघालो, भोर मध्ये प्रत्येक वेळी पाहायचा राहिलेला श्रीमंत रघुनाथ शंकरराव पंडित पंतसचिव यांचा भव्य मोठा राजवाडा पाहिला 🏤. पुढे थर्मास मध्ये चहा भरून घेतला व संध्याकाळचा थंड वातावरण मध्ये भोर येथील नेकलेस पॉईंटचा निसर्गा मध्ये बसून चहा☕ पिण्याचा एक सुखद अनुभव घेतला. शूटिंग साठी प्रसिद्ध असलेला हा नेकलेस पॉईंट कित्येक मराठी व काही हिंदी सिनेमा मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशाप्रकारे दोन दिवसाचा आनंददायक भटकंती प्रवास  उरकून आम्ही रात्री ०९:०० वाजता घरी येऊन पोहचलो.

राजा रघुनाथराव राजवाडा समोरील तोफ
राजा रघुनाथराव राजवाडा समोरील तोफ 

राजा रघुनाथराव कमान - भोर
राजा रघुनाथराव कमान - भोर

भोर येथील श्रीमंत रघुनाथ शंकरराव पंडित पंतसचिव यांचा राजवाडा
भोर येथील श्रीमंत रघुनाथ शंकरराव पंडित पंतसचिव यांचा राजवाडा

नेकलेस पॉईंट भोर
नेकलेस पॉईंट भोर 

नेकलेस पॉईंट - भोर आणि संध्याकाळचा चहा
नेकलेस पॉईंट - भोर आणि संध्याकाळचा चहा

©सुशील राजगोळकर

"घनगड" ⛰️ निरवचा ५० व्या किल्याची भटकंती. 🚗⛰️ | Ghangad & Tailbailla - Lonavala 11-January-2026

मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.