पुणे पासुन साधारण ९० किलोमीटर असलेल्या चंदन वंदन कडे सकाळी ०९:०० वाजता निघालो. पुणे सातारा महामार्गावर भुईंज फाट्यावरून डावीकडे गेल्या नंतर वाटेत थोडा मार्ग विचारून घेतला, साधारण १५-२० किलोमीटरच्या निसर्गरम्य असा प्रवासानंतर 🏘️ खोलवडी गावापासून २ किलोमीटर व बनवडी गावाच्या २ किलोमीटर आधी अश्या मध्यभागी असलेल्या गणेश मंदिर 🛕 (गणेशखिंड) येथून दुपारी १२.०० वाजता आमच्या ट्रेकला सुरुवात झाली.
पायथ्या पासून दोन्ही चंदन वंदन गड स्पष्टपणे दिसतात. आकाराने व दिसायला दोन्ही गड सारखेच असल्यामुळे यांना दुर्गविश्वातील जुळी भावंडे का म्हणतात याची प्रचिती आली.
|
खोलवडी येथुन - चंदन वंदन गड |
|
गणेश मंदिर - गणेशखिंड (खोलवडी बनवडी)
|
|
गणेश मुर्ती, गणेश मंदिर - गणेशखिंड (खोलवडी बनवडी) |
वंदनगड 🚩⛰️
गडाचा दिशेने चालायला सुरवात करताच आता तिथे पायऱ्या, शुशोभीकरण व फलक बसवलेले पाहायला मिळाले. गणेश खिंडीतून गड चढतांना डाव्या बाजूला वंदनगड व उजव्या बाजूला चंदनगड आहे. थोडेच अंतर चालून येता एक लहानसे मंदिर लागले. मंदिराचा मागील बाजूने एक सरळ मळलेली वाट वंदन गडाकडे जाते त्या वाटेने आम्ही निघालो.
|
मंदिर व मागे वंदनगड |
थोड्याच वेळात दोन्ही गडाचा मध्यभागी असलेल्या खिंडीत येऊन पोहचलो. तेथे एक वाट बेलमाची व किकली गावांतून येऊन मिळते. आपल्या डाव्या बाजूने जंगलातील वाट चालत एक तासाभरात आम्ही वंदन गडाचा महादरवाजा पाशी येऊन पोहचलो. या दरवाजा वरती गणेश शिल्प व कमळ कोरलेले पाहायला मिळाले. दरवाजा मागील डाव्या बाजूला सुस्थितीत व उजव्या बाजूला पडक्या अवस्थेतील पहारेकर्यांची दिवडी पाहायला मिळाली.
|
महादरवाजा - वंदनगड |
|
गणेश शिल्प व कमळ, महादरवाजा - वंदनगड |
|
महादरवाजा मागिल दिवडी- वंदनगड |
तेथून थोड्या पायऱ्या चढून येताच दुसरा दरवाजा व तिसरा दरवाजा पाहायला मिळाला या तिसऱ्या दरवाजा वरती एक शिलालेख कोरलेला आहे, व मागे एक भली मोठी दिवडी पाहायला मिळाली व त्या दिवडी मधून एक चोर वाट दरवाजाचा वरचा दिशेला जाते. दरवाजा मधून पुढे गडाच्या दिशेने चालत येताच एक चुन्याचा घाणा पाहायला मिळाला.
|
दुसरा दरवाजा - वंदनगड |
|
तिसरा दरवाजा - वंदनगड |
|
तिसऱ्या दरवाजावरील शिलालेख - वंदनगड |
|
तिसऱ्या दरवाजा मागिल दिवडी - वंदनगड |
|
तिसऱ्या दरवाजा व दिवडी येथिल चोरवाट - वंदनगड |
|
चुन्याचा घाणा - वंदनगड |
तेथून पुढे डाव्या बाजूने दगडा मध्ये असलेल्या पायऱ्या चढून गडमाथ्यावर येऊन पोहोचलो. गडावरती फेरा मारायला चालू करताच उध्वस्त अवस्थेतील अवशेष पाहायला मिळाले. व एक उजव्या बाजूला असलेला तलाव पाहून पुढे आलो. समोर एक सदरे सारखी जागा पाहायला मिळाली.
|
दगडी पायऱ्यांची वाट - वंदनगड |
|
अवषेश - वंदनगड |
|
तलाव - वंदनगड |
|
सदरे सारखे अवशेष - वंदनगड |
तेथून पुढे चालून येताच तीन कोठारे पाहायला मिळाली. पुढे शिववंदनेश्वर मंदिरामध्ये नमस्कार केला. व खालिल बाजूला दिसत असलेले मशीद 🕌, त्या समोर शिलालेख असलेली कमान, मशीदचा मागे असलेला तलाव🏝️, तलावा वरील कमान, व तेथेच शिलालेख असलेली मोठी कबर व इतर पाहून तलावांचा बाजूने माघारी फिरलो. गडावरती एकुण चार तलाव पाहिले. गडावरून पूर्वेला कल्याणगड, पश्चिमेला वैराटगड, पांडवगड तर दक्षिणेला अजिंक्यतारा दिसत होता ⛰️⛰️. पूर्ण गड व आजूबाजूचा परिसर निहाळून लगबगीने गड उतरायला सुरुवात केली.
|
कोठार - वंदनगड |
|
कोठार - वंदनगड |
|
शिववंदनेश्वर मंदिरातील शिवलिंग - वंदनगड |
|
शिलालेख असलेली कमान - वंदनगड |
|
कमानिवरील शिलालेख - वंदनगड |
|
तलाव - वंदनगड |
चंदनगड⛰️🚩
साधारण ०४:०० वाजता त्या लहान मंदिराचा समोरील बाजूने चालत येऊन चंदन गडाचा मार्गाला येऊन पोहचलो. तेथून खालील दिशेला अता बनवडी गावांमधून येणारा मार्ग बनवलेला व शुशोभित केलेला पाहायला मिळाला. तेथे एक लहान विहीर व झाडाखाली कृत्रिम बाकडे ठेवली आहेत, तेथे थोडी विश्रांती घेतली.
|
बनवडी गावांमधून चंदन गडावर येणारी वाट |
|
चंदनगडाच्या वाटेवरील झाड व विहीर |
मग गडाचा दिशेने चालायला सुरुवात केली काही वेळातच आम्ही गडाचा मुख्य दरवाजापाशी येऊन पोहचलो आता असलेल्या अवशेषा वरून दरवाजाची भव्यता लक्षात येथे. दरवाजाला लागूनच एक लहान कबर आहे. तेथून काही पायऱ्या चढून येताच डाव्या बाजूला शंकराचे मंदिर आहे🛕. मंदिरा मध्ये दोन महादेवाचा पिंडी असून त्या वरती प्रत्येकी पाच शिवलिंग आहेत. तर मंदिराचा बाजूला भले मोठे वडाचे झाड आहे🌳.
|
मुख्य प्रवेशद्वार - चंदनगड |
|
शंकराचे मंदीर - चंदनगड |
|
शंकराच्या मंदिरा मधील पाच लिंगी महादेवाचे पिंडी - चंदनगड
|
मंदिरापासून पुढे दहा एक पायऱ्या चालून येताच शिळा पहायला मिळाल्या. तेथून समोरच दर्गा🕌, त्या मागे असलेली विहीर, अवशेष पाहून एका मोठा चौथऱ्या पाशी आलो. तो चौथरा पाहून निश्चित काय होते ते सांगता येत नाही. मग तेथे बसून दुपारचे जेवण उरकले 🍛🥞.
|
दोन्ही बाजूला रचलेल्या शिळा - चंदनगड
|
|
दर्गा - चंदनगड |
|
विहीर - चंदनगड |
|
चौथरा - चंदनगड |
एव्हाना संध्याकाळचे ०५:०० वाजले होते व गडावरती दाट धुके दाटून आले. त्या धुक्यातून मार्ग काढत पुढे चालू लागलो व खालील बाजूला दिसत असलेला तलाव मार्ग न सापडल्यामुळे वरूनच पाहिला. व पुढे कोठार पाहून त्या वातावरणातील आनंद घेऊन गड उतरायला सुरुवात केली. जाता जाता त्या लहान विहरीमधील पाणी काढून ताजे-तवाने झालो.
|
कोठार - चंदनगड |
अशाप्रकारे ०६:३० वाजता चंदन वंदन या जुळ्या भावांची भटकंती उरकून गणेशखिंड येथे पोहचलो व पुणेकडे मार्गस्थ झालो.
सोबती: सुहास शेंडकर, संजय शेंडकर, शशी तांदुळकर, अजय सोनावणे.
© सुशील राजगोळकर
आम्हाला पण कधी संधी द्या तुमच्या बरोबर फिरण्याची
ReplyDeleteहो जाऊया....
Deleteलई भारी..
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुंदर फोटो आले आहेत
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुपच छान
ReplyDeleteधन्यवाद
Delete