दिवस तिसरा सोमवार दिनांक २३-नोव्हेंबर-२०२० रोजी सकाळी ०४:०० वाजता उठून आवरले. व जेथे राहिलो होतो त्यांना सांगितले होते त्या प्रमाणे त्यांनी मस्त पैकी ५ मोठे ग्लास भरून दूध दिले 🥛🥛. मग ते घेऊन व थोडे उजाडल्या नंतर ०६:०० वाजता आम्ही जीवधन कडे जाण्यास निघालो. रोड लगत असलेल्या वराडी डोंगराचा पायथाला आनंद सरांचा मित्र मारुतीचा घरी जाऊन चहा व नाश्ता उरकला. व दुपारचे जेवण बनवायला सांगून मित्र मारुतीला सोबत घेऊन जीवधन कडे निघालो. घाटघर इथे गाडी लावून जीवधन गडाचा जुन्नर दरवाजाने जायचे ठरून आम्ही जंगलाची वाट पायपीट करत चालायला लागलो. काही वेळात आम्ही पायऱ्यांपाशी पोहचलो. येथे देखील कातळामध्ये कोरलेल्या छान पायऱ्या होत्या व आहेत. काही ठिकाणी पायऱ्या तोडलेल्या असल्या कारणाने तेथे लोखंडी शिडी बसवलेल्या आहेत. त्याचा साहाय्याने गडावरती जाताना उजव्या बाजूला मानव निर्मित २० ते २५ फूट लांब गुहा आहे ती पाहिली. पुढे गड चठुन जाताच जुन्नर दरवाजाचे अवशेष दिसतात, दरवाजा अस्तित्वात नाही. तेथून पुढे डाव्या बाजूला एक मोठी गुहा आहे त्या गुहे मध्ये खराब पाणी आहे. तेथून पुढे गडावरती वाड्याचे अवशेष पाहून धान्य कोठार पहिले. धान्य कोठाराची रचना, त्या मधील नक्षी काम, खांबाची रचना, घुमटाची रचना, दरवाजा वरील कोरलेला सूर्य, चंद्र, आतील दरवाजाची रचना त्या वरील कलशाचे कोरीव काम, व इतर रचना वगैरे निरखून पहिले तर लक्षात येईल कि हे धान्य कोठार नसून एक मंदिर होते असावे. त्या कोठाराच्या बाजुला असलेल्या पाण्याचा टाक्या पाहून आम्ही त्याच कोठाराच्या मागील बाजूने बाल्ले किल्ल्यावरील जिवाई देवीची मूर्ती पाहिली. व मंदिरा मागील उद्वस्त वास्तू पाहून वानरलिंगी सुलखा पाहण्यासाठी खाली उतरून गेलो. तेथून पुढे थोडे उजव्या बाजूला वरती चालून जाताच वाड्याचे अवशेष पाहिले व पाण्याचा टाक्यांपाशी येऊन बसलो. तेथील नितळ थंडगार पाणी पिऊन आम्ही खाली असलेले आणखीन एक टाके पाहून गडाचा मुख्य कल्याण दरवाजा पाशी येऊन पोहचलो. तो गायमुखी दरवाजा पाहून आम्ही तिकडूनच गड उतरायला सुरवात केली. तुटलेला पायऱ्यांचा सुरवातीलाच गड प्रेमी लोकांनी दोरखंड बांधून ठेवलेला आहे. त्याचा साहाय्याने आम्ही तेथून खाली उतरलो🧗🏼♀️. इथे देखील कपारी मधील दगडी पायऱ्या पाहायला मिळाल्या काही ठिकाणी तुटलेल्या आहेत तर काही ठिकाणी एकदम सुस्तिथित आहेत त्या पाहायला मिळाल्या. व त्या घळीतून समोर दिसणारा पठार, नानांचा अंगठा, नाणेघाटाचा परिसर दिसत होता तो पाहत व मध्येच असलेली जंगल वाट व पठार पार करून २ वाजता खाली येऊन पोहचलो. जीवधन किल्ला पाहून सर्वांना खूपच बरे वाटले. मी जरा थोडेशे सर्वांचा पुठे गड उतरून आलो व तेथील गावकरांचा गाडीवरून घाटघर गाठले व माझी गाडी घेऊन आलो. व परत तेथून इतर सहकार्यांना घेऊन गेलो. तेथून मी व मारुती दोघे जण त्याचा घरी गेलो व तेथून त्यांनी दिलेले जेवण व प्रेमाचा निरोप घेऊन मी निघालो. पुढे रोड वरती सर्वजण माझी वाट पाहत होते. तेथून आम्ही थेट निघालो ते पूर या गावी असलेल्या "कुकडेश्वर" मंदिराकडे.
घाटघर गावातून जीवधन किल्लयांची पूर्वेकडील बाजू |
जीवधन किल्याचा जुन्नर दरवाजाने जाताना लागणाऱ्या कातळमधील पायऱ्या |
जीवधन किल्याचा जुन्नर दरवाजाने आत जाताच डावीकडे असलेले पाण्याचे टाके |
जीवधन किल्याचे ध्यान कोठार कि जुन्याकाळामधील मंदिर |
जीवधन किल्यावरील पाण्याचा टाक्या |
जीवधन किल्यावरील जीवाई देवीची मूर्ती |
जीवधन किल्यावरून दिसणारा वानरलिंगी सुळखा |
जीवधन किल्याचा मुख्य दरवाजा |
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजाला जाणाररी वाट |
जीवधन किल्याचा वाटेवरून दिसणारा नानांचा अंघठा व नाणेघाटाचा परिसर |
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजा मार्गातील दगडी कातळमधील पायऱ्या |
जीवधन किल्याला मुख्य कल्याण दरवाजा मार्गातील दगडी कातळमधील पायऱ्या |
पश्चिमेकडून पठारावरून दिसणारा जीवधन किल्ला सोबती : पॉल पेंटर, आनंद शिंदे, अरुण गवेकर, अजित गवेकर. ©सुशील राजगोळकर |
No comments:
Post a Comment