⛰️ कमळगड ⛰️ KAMALGAD ⛰️

वेळ २४ डिसेंबर, रात्रीचे ०९:३० वाजले होते. अचानक सुहासचा फोन आला, उद्या कमळगडला ⛰️ जातोय. पण गाडी फुल्ल आहे रे. तू एकटा बाईक 🛵 घेऊन येऊ शकशील का? 
मी रागातच बोलो, नाही तू जाऊन ये..!! 
परत अर्ध्या तासाने फोन आला २ कार आहेत ८ मेंबर आहोत, सकाळी ०७:३० वाजता शंकर महाराज मठ धनकवडी जवळ ये. मग अचानक ठरल्यामुळे रात्री उशिरापर्यंत कमळगडची माहिती इंटरनेटवर वाचु लागलो. काही जणांच्या लिखाणामध्ये कमळगडच्या पायथ्याचे गाव 'नांदगणे' होते तर काही जणांच्या लिखाणामध्ये 'वासोळे तुपेवाडी' होते.
मग मी 'जवळचा, सोपा व चुकामुक न होणारा मार्ग कोणता आहे?' असे माझ्या ओळखीच्या गिर्यारोहकांना विचारले, त्यांनी 'वासोळे तुपेवाडी' असे सांगितले. पण सुहासचा मित्राने नांदगणे सांगितल्यामुळे‌ आम्ही संभ्रमात होतो. 
मग नियोजणाप्रमाणे २५ डिसेंबर २०२० रोजी सर्व जण सकाळी ८ वाजता धनकवडी येथून कमळगडकडे निघालो. त्या नंतर आम्ही सुरूर फाटा येथे हॉटेल अजिंक्यला नाष्टा‌ केला व पुढे निघालो. वाईमध्ये थोडा रस्ता विचारला, २ जणांनी मेणवली रोडने वासोलेला जा असे सांगितले. वाई वरून पुढे जाताना उजव्या बाजूला दिसणारा पांडवगड ⛰️ पाहायला मिळाला. तेथून पुढे डाव्या बाजूला धोम धरणाचा जलाशय️,‌‌ उजव्या बाजूला दिसणारा केंजळगड व रायरेश्वरचे पठार ⛰️पाहत, धोम धरणाला वळसा मारून साधारण दुपारी १२:३०‌️ वाजता आम्ही गडाचे पायथ्याचे गांव 'वासोळे तुपेवाडी' येथे येऊन पोहचलो.

कमळगड कडे जाताना दिसणारा केंजळगड
कमळगड कडे जाताना दिसणारा केंजळगड 

कमळगड कडे जाताना दिसणारा रायरेश्वर
कमळगड कडे जाताना दिसणारा रायरेश्वर

तेथे थांबून पाहता पूर्वेला व पश्चिमेला किल्ल्यासारखेचं डोंगर दिसतात. ते पाहून लक्षात देखील येत नाही कमळगड किल्ला कोणता आहे व आपल्याला जायचे कुठे आहे.
तेवढ्यात तिथे १६ ते १७ वर्षाचा गावातील एक मुलगा आला. तो त्याची गुरे‌ आणायला रानात जात होता. त्याला विचारले यापैकी कमळगड कोणता आहे व कुठून जायचे? तो पूर्वेकडील डोंगराकडे बोट दाखवत म्हणाला या डोंगराचा मागे आहे. इथून नाही दिसणार.... डोंगरावरती धनगराची वस्ती आहे तिथे पोहचल्या शिवाय कमळगड दिसणार नाही. इकडून जा, पण वाट थोडी चुकू शकता. मग आम्ही त्यालाच वाट दाखवायला आमचा सोबत येण्यास सांगितले. तो थोडावेळ आमचा सोबत आला व वाटेत कोरडे पडलेले ४ ओढे पार करून त्याने सांगितले आता या वाटेने सरळ वरती जा. इथून हि वाट वरती गोरक्षनाथ मंदिर, मग जंगल वाट व धनगर वस्तीतून गडावरती जाईल. असे सांगून तो माघारी फिरला. 
त्याने जिथून वाट दाखवली तिथूनच उंच चढाईची मळलेली एकच वाट चालू झाली. वाटेमध्ये मोठी झाडे  व उंचचं उंच कारवीची झाडे आहेत. थोड्याच वेळात डोंगराच्या सपाट भागावरती येऊन पोहचलो. नंतर डावीकडे थोडे अंतर पार करून गेल्यानंतर गोरक्षनाथ मंदिर 🛕लागले. तेथे नमस्कार केला, मंदिरासमोर‌‌ असलेल्या झाडाखाली एका लहानशा दगडावरती ५ शिवलिंग व काही जुन्या काळातील मूर्ती पाहायला मिळाल्या.

गोरक्षनाथ मंदिर कमळगड
गोरक्षनाथ मंदिर कमळगड

कमळगड - गोरक्षनाथ मंदिराचा गाभारा
कमळगड - गोरक्षनाथ मंदिराचा गाभारा

मंदिरासमोर‌‌ असलेल्या झाडाखाली एका लहानशा दगडावरती असलेले ५ शिवलिंग.
मंदिरासमोर‌‌ असलेल्या झाडाखाली एका लहानशा दगडावरती असलेले ५ शिवलिंग. 

मंदिरासमोर‌‌ झाडाखालील असलेल्या मूर्ती
मंदिरासमोर‌‌ झाडाखालील असलेल्या मूर्ती 

मंदिरासमोर‌‌ झाडाखालील असलेल्या मूर्ती
मंदिरासमोर‌‌ झाडाखालील असलेल्या मूर्ती 

मंदिरापासून थोडे पुढे चालून जाताच एक लहानसा पाण्याचा झरा सापडला. तेथे आम्ही तहान भागवली व पाण्याचा बॉटल भरून घेऊन पुढे चालून गेलो. 

पाण्याचा झरा
पाण्याचा झरा

त्या पूर्ण घनदाट जंगलात भर दुपारी देखील सूर्याची किरणे आम्हा पर्यंत पोहचली नाही. काही वेळात आम्ही धनगरवस्ती🛖येथे येऊन पोहचलो. तेथून उजव्या बाजूला पाहताच गडावरील झेंडा पाहायला मिळाला, तेथून १०मि. मध्ये आम्ही किल्याचा चढाईसाठी लोखंडी शिडी 🧗🏼‍♀️बसवली आहे तेथे येऊन पोहचलो. शिडी व ५ ते ८ पायऱ्या चडून गडावरती येताच समोरच पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसले, यालाच "गेरूची किंवा कावेची विहीर" म्हणतात.....!! त्याला आत उतरायला मजबूत ५०-५५ पायऱ्या आहेत त्या उतरून आम्ही खाली गेलो. या पायर्‍या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासले.... तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते. इतका मोठा ट्रेक करून आल्यानंतर ची पूर्ण शरीरातील उष्णता कमी होऊन हवेतील थंडावा वाढत जातो व विहिरीमध्ये खूप थंड व शांत वाटते. विहिरीतून वर चढून येताच विहिरीचा मागे असलेला चौथरा व त्याच्यामध्ये असलेला भगवा ध्वज पाहिला. त्या चौथऱ्याचा मागे काळ्या दगडाच्या पाषाणामध्ये एक लहानसे शिवलिंग पाहायला मिळाले. गड लहान असल्यामुळे गडाला १० मिनिटामध्ये पूर्ण प्रदक्षिणा मारून झाली.

धनगरवस्ती वरून मागे दिसत असलेला कमळगड
धनगरवस्ती वरून मागे दिसत असलेला कमळगड 
कमळगड वरती बसवलेली लोखंडी शिडीची वाट
कमळगड वरती बसवलेली लोखंडी शिडीची वाट 
गेरूचा विहरीचा पायऱ्या
गेरूचा विहरीचा पायऱ्या
गेरूचा विहरीचा फोटो
गेरूचा विहरीचा फोटो 
विहरीमध्ये गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती
विहरीमध्ये गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती 
गेरूचा विहरी मधील फोटो
गेरूचा विहरी मधील फोटो
गेरूचा विहरीचा फोटो
गेरूचा विहरीचा फोटो 
गेरूचा विहरीचा मागील बाजूने घेतलेला फोटो
गेरूचा विहरीचा मागील बाजूने घेतलेला फोटो

विहरीचा व चौथऱ्याचा मागे काळ्या दगडाच्या पाषाणामध्ये असलेले शिवलिंग
विहरीचा व चौथऱ्याचा मागे काळ्या दगडाच्या पाषाणामध्ये असलेले शिवलिंग
कमळगडवर असलेला भगवा ध्व्ज
कमळगडवर असलेला भगवा ध्व्ज 

इतर किल्ल्या सारखे इथे बुरुज, तटबंदी, पाण्याचे टाके, मंदिरे, कोठार वैगेरे पाहण्यासारखे काही नाही. पण हा कमळगड प्रसिद्ध आहे तो गेरूचा / कावेचा विहिरीसाठीच. विहीर पाहून ३ तासD ट्रेकचा थकवा पूर्ण पणे नाहीसा झाला. गडाचा चोहो बाजूला हिरवीगार घनदाट झाडीचे जंगल☘️ पाहायला मिळाले. गडावरून पाचगणी, महाबळेश्वर, केंजळगड, रायरेश्वर व धनगरवस्ती वरील हिरवीगार शेती पाहून आम्ही गड उतरायला सुरवात केली. 
कमळगड वरून दिसणाररी धनगरवस्तीवरील शेती व आजू बाजूचा परिसर
कमळगड वरून दिसणाररी धनगरवस्तीवरील शेती व आजू बाजूचा परिसर

पुढे आम्ही लवकरच धनगरवस्ती येथे येऊन झाडाखाली विसावलो. तेथे वस्तीवरील मुलाने येऊन ताक देऊ का विचारताच, ये १०-१२🥛ग्लास घेऊन असे सांगितले. त्याने दिलेले ताक व आणलेली शिदोरी सोडून मस्त पैकी दुपारचा जेवणावरती  ताव मारला..... पुढे जंगलाची वाट चालायला सुरवात केली. आम्हा ८ जणांपैकी २ जण थोडे पुढे गेले व ज्याची भीती होती तेच घडले. खालून गोरक्षनाथ मंदिरा मध्ये जागरणासाठी मुंबई वरून लोक येत होते त्यांना विचारले आमचा पैकी २ जण खाली जातांना पाहिले का? ते म्हणाले नाही. लगेचच मी व सुहासने आमच्या बाकी सदस्यांना तिथेच थांबवून, दोघांचा शोध घ्यायला सुरवात केली. ️त्यांना हाका मारलेल्या कदाचित ऐकू जात नसाव्या म्हणून आम्ही बरेच आडवाटेला जंगला मध्ये जाऊन हाका दिल्या मग तिकडून आवाज ️आला. मग आम्हाला हायसे वाटले. या मध्ये १५ ते २० मिनिटे निघून गेली. मग अंधाराच्या आधी  गावात जायचे म्हणून पटापट चालायला सुरवात केली. संध्याकाळी ६ वाजता तुपेवाडी येथे येऊन पोहचलो. वेळ न दवडता लगोलग धोम धरणाकडे निघालो व तेथे फ्रेश होऊन पुण्याचा दिशेने कूच केली आणि रात्री १० वाजता पुण्याला येऊन पोहचलो..!

सोबती: सुहास शेंडकर, संजय शेंडकर, शेखर खरवलीकर, रोहित भेलके, शशी तांदुळकर, वैभव सोनावणे, अजय. 

©सुशील राजगोळकर

15 comments:

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.