निमगिरी ⛰️
दिवस दुसरा रविवार दिनांक २२-नोव्हेंबर-२०२० रोजी सकाळी ०५:०० वाजता उठून कॉफी बनवली व आंधार असल्यामुळे थोडे थांबून ०६:४५ वाजता निमगिरी व हनुमंतगडचा दिशेने चालायला सुरवात केली🏻♂️🏼♂️🧑🦯 साधारण तासा भरामध्ये गडावरती पोहचलो. गडाची वाट तशी सोपी आहे, दोन्ही गडावरती जाण्यासाठी एकच वाट आहे कारण खालून सुद्धा हा एकच किल्ला दिसतो पण हे दोन जोड किल्ले आहेत. निमगिरी किल्ल्यावरती जाण्यासाठी प्रशस्त अश्या कातळामधील कोरीव दगडी पायऱ्या आहेत. पण काही ठिकाणी तुटलेल्या व काही ठिकाणि वरून गडाची तटबंधी पडून बुजलेल्या आहेत. आम्ही त्या पायऱ्या पाहून पुढे गेलो. मुख्य दरवाजाच्या खाना खुना आहेत पण दरवाजा अस्तित्वात नाही. दरवाजाला लागूनच एक खराब अवस्थेत पाण्याचे टाके आहे. तेथून सरळ पुढे गडावरती आम्ही चालत गेलो समोर असलेले पाण्याचे टाके, काही वाड्याचे अवशेष, देवीचे मंदिर, मंदिरामधील शिवलिंग, देवीची मूर्ती व मंदिरा समोर असलेल्या पाण्याचा टाक्या पाहून पुढे गडाच्या पूर्वेकडे असलेल्या गुहा पाहिल्या. व गडाला पूर्ण प्रदक्षिणा मारताना समोर दिसत असलेला शिंदोळा, हरिशचंद्रगड व आजू बाजूचा परिसर पाहत जेथून दोन्ही किल्ले जोडले जातात तेथे येऊन हनुमंतगडाकडे चढाई केली.
हनुमंतगड ⛰️
गडावरती जातानाच दगडामध्ये कातळ कोरीव पायऱ्या लागतात त्याचा साहाय्याने गडावरती चडून गेलो. गडावरती जाताच उजव्या हाताला समोरच एक उध्वस्त वाडा पाहायला भेटला. तेथून मागे जाऊन परत माघारी आलो व खालील दिशेला असलेल्या पाण्याचा टाक्या पाहून पुढे चालून गेलो. समोर आणखीन एक पाण्याचे टाके आहे ते पाहिले. गडावरून समोर असलेल्या निमगिरी गडाचा कातळ कोरीव पायऱ्याची वाट स्पष्ट दिसत होती. ती पाहून आम्ही दोन्ही गड उतरून ११:०० वाजता जेथे राहिलो होतो होत्या त्या ठिकाणी येऊन पोहचलो. गडावरती पॉल पेंटर सर आले नाहीत त्यामुळे त्यांनी आमचे तंबू वगैरे आवरुन ठेऊन आमचा साठी कॉफी बनवली होती. आम्ही तेथे थोडे बसून फराळ केला व पुढे हडसर कडे निघालो. दोन्ही गड पाहण्या सारखे होते त्यामुळे मण प्रसन्न झाले. व पहिल्या दिवशीचा शिंदोळा किल्ला पाहून जितका थकवा आला होता तो थोडा दूर झाला.
No comments:
Post a Comment