कुकडेश्वर 🛕 Kukadeshwar

ते प्राचीन काळातील मंदिर कुकडी नदीचा उजव्या तीरावर असून पूर गावचा हद्दीत स्तिथ आहे. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ मंडप अशी असून मंदिर पश्चिमाभिमुख आहे. प्रत्येक भिंतीवर आतून, बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेले आढळते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही. पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे. दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागातही लक्षवेधी नक्षीकाम केलेले आढळते. मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. हे शिव मंदिर पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे सुस्थितीत आहेत. मंदिरासमोरच दगडात खोदून तयार केलेला नंदी आहे. याच्या डाव्या बाजूस अजून एक छोटेसे मंदिर आहे. त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे आहेत. मंदिराला आधार देणारे खांब पूर्णतः नक्षीकाम केलेले आहेत. खांबाच्या इतर दोन्ही बाजूस सारखेच शिल्प आहे. त्याखाली ढोल वाजवतानाच्या व्यक्तीप्रतिमांचे शिल्प आहे.

कुकडेश्वर मंदिर
कुकडेश्वर मंदिर 

कुकडेश्वर मंदिराची समोरील बाजू
कुकडेश्वर मंदिराची समोरील बाजू 


कुकडेश्वर मंदिरा मधील गणपती
कुकडेश्वर मंदिरा मधील गणपती
कुकडेश्वर मंदिराचा गाभारा
कुकडेश्वर मंदिराचा गाभारा
कुकडेश्वर मंदिराचा डाव्या बाजूसचे छोटेसे मंदिर व त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे
कुकडेश्वर मंदिराचा डाव्या बाजूसचे छोटेसे मंदिर व त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे




तेथून पुढे आम्हाला चावंड किल्ला पाहायला जायचे होते पण घरी लवकर जाण्यासाठी व पुढील जुन्नर मोहीम साठी चावंड किल्ला शिल्लक ठेऊन आम्ही तेथून थेट घरी जायचे ठरवले. अशा प्रकारे ३ दिवसाची जुन्नर मोहीम कायम स्वरूपी आठवणी मध्ये राहील अशा आठवणींचा खजिना घेऊन आम्ही घरी निघालो.  मी रात्री ०७:३० वाजता पुण्याला पोहचलो तसेच बाकी सर्व जण रात्री ०९:०० वाजता मुंबईला पोहचले.

सोबती : पॉल पेंटर, आनंद शिंदे, अरुण गवेकर, अजित गवेकर. 

©सुशील राजगोळकर

No comments:

Post a Comment

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.