शिंदोळा ⛰️ Shindola

पारगाव फाटावरून जवळच असलेला शिंदोळा किल्ला पहिला पाहूनच पुढे जायचे, असे ठरवून आम्ही निघालो.
बगडवाडी पारगाव तर्फ मढ येथे आमचा गाड्या लावून ११:०० वाजता २ ते ३ तास मध्ये खाली येऊ असे ठरवून आम्ही असलेले जेवण व सुरक्षेचे साहित्य वगैरे न घेता गडाचा दिशेने निघालो. तसेहि हा गड जरा दुर्लक्षित व अपरिचितच. या गडाची सहज अशी माहिती उपलब्ध नाही. गडावरती सहसा कोणी जात नासावेत म्हणून गडाला जाणारी वाट पटकन सापडत नाही. गावातील लोकांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही घळीचा वाटेणे गड चढून गेलो. पण तो गडावरती जाण्याचा मुख्य मार्ग नाही. काही ठिकाणी थोडी अवघड व धोकादायक वाट आहे. त्या वाटेने आम्ही गडावरती पोहचलो.
गडाचा मुख्य दरवाजाची पडझड झालेली आहे. तेथेच दगडामध्ये कोरलेला गणपती आहे तेथे दर्शन घेऊन तेथून आम्ही गडा वरती फेरी मारली. गडावरती पाण्याच्या टाक्या वैतिरिक्त पाहायला काही भेटले नाही. पण गडावरून माळशेज, MTDC माळशेज घाट, पारगाव चा परिसर, हरिश्चंद्रगड, निमगिरी/हनुमंतगड, पिंपळगाव जोग धरण, असा पूर्ण परिसर मात्र शिंदोळा गडावरून पाहिला. दुपारचे कडक ऊन होते त्यातून सर्व जण थकले होते. पाणी सुद्धा संपले होते, पण सर्वाना तहान तर खूप लागली होती. आम्ही ज्या अवघड वाटेने गडावरती आलो त्या वैतिरिक्त गड उतरताना मात्र एक थोडी मळलेली वाट सापडली. त्या वाटेने खाली जायचे ठरउन आम्ही गड उतरायला सुरवात केली. रखरखते ऊन लागत होते. वाटे मध्ये एक दोन ठिकाणी दगडामध्ये कोरलेल्या लहानश्या पायऱ्या लागल्या. गडाचा एका आड वाटेला एक कपारी दिसली, तेथे मानव निर्मित लहानशी गुहा व लहानसा पाण्याचा झरा सापडला. मग मात्र आम्ही आमची तहान भागवली व पुढे चालून गेलो. हि वाट तशी सोपी होती पण खूप वळसा मारून खूप लांब पल्याची होती. त्यामुळे खूप वेळ झाला होता. गडाचा उंचीचा वाटेवरून येतांना आम्हाला एक तलाव दिसत होता. ती जंगलाची वाट संपवून आम्ही त्या तलावा पाशी पोहचलो. तेथुंन पुढे शेतातील वाटेने आम्ही ०४:०० वाजता बगडवाडी येथे पोहचलो व निमगिरी कडे निघालो. जरी या दुर्लक्षित किल्ला वरती जास्त कोणी येत नसले तरी आम्हा भटक्यानं साठी हा एक चांगलाच पर्वणी, अनुभव, आठवण देणारा ट्रेक ठरला.
निमगिरी मध्ये ०५:०० वाजता पोहचलो व एका बोरवेल वरती पाणी भरून घेतले. व गावा पासून थोड्या लांब अंतरावरती रस्त्याचा बाजूला असलेल्या शेतामध्ये आमचा बसतांड मांडला. लगेचच कार मधील साहित्य काडून पहिला चहा टाकला . व खूप भूक लागली असल्याने जे थोडेफार जेवण घेऊन आलो होतो ते खाल्ले. त्या नंतर आम्ही चहा घेत तंबू/टेन्ट ठोकले व जेवण बनऊन गप्पा गोष्टी करत रात्र जागवली.


शिंदोळा गडावरील पाण्याचा टाक्या
शिंदोळा गडावरील पाण्याचा टाक्या 
शिंदोळा गडावरील पाण्याचा टाक्या
शिंदोळा गडावरील पाण्याचा टाक्या 
शिंदोळा गडावरून दिसणारा परिसर
शिंदोळा गडावरून दिसणारा परिसर

बगडवाडी गावाचा वाटेवरून जाताना दिसणारा शिंदोळा किल्ला
बगडवाडी गावाचा वाटेवरून जाताना दिसणारा शिंदोळा किल्ला

शिंदोळा गडाच्या मुख्य दरवाजा इथे दगडामध्ये कोरलेला गणपती
शिंदोळा गडाच्या मुख्य दरवाजा इथे दगडामध्ये कोरलेला गणपती
शिंदोळा गडावरील कोरडे पाण्याचे टाके
शिंदोळा गडावरील कोरडे पाण्याचे टाके


शिंदोळा गडाच्या आडवाटेवर असलेला पाण्याचा झरा
शिंदोळा गडाच्या आडवाटेवर असलेला पाण्याचा झरा

बगडवाडी गावाचा तलाव व मागे शिंदोळा किल्ला
बगडवाडी गावाचा तलाव व मागे शिंदोळा किल्ला 

शिंदोळा किल्लाची लहानशी चित्रफीत YouTube वरती आहे त्याची link  :
https://www.youtube.com/watch?v=--0Ch_awgZw


सोबती : पॉल पेंटर, आनंद शिंदे, अरुण गवेकर, अजित गवेकर. 

©सुशील राजगोळकर

No comments:

Post a Comment

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.