काल दिनांक 27 जून 2017 रोजी मी व माझा मित्र अजित गवेकर, दुचाकीवर सकाळी 8:30 मि. चिंचवड येथुन निघालो, वाटेत बारीक रिमझिम पाऊस चालु होता, कामशेत येथे नाश्ता करून, 10:00 वाजता बेडसे लेणीच्या पायथ्याशी पोहचलो, डोंगराच्या मध्यावर लेणी पर्यंत जाण्यासाठी दगडि पायऱ्या आहेत, पायऱ्यावरती प्रचंड प्रमाणात दिसणारे लहान मोठे खेकडे पहात लेणी जवळ पोहचलो, तेथे पोहचताच लेणी लक्ष वेधुन घेतात, सुंदर सुबकअशी लेणी पाहुन, तेथे अत्यंत शांत प्रसन्न अशा वातावरणात थोडी विश्रांती घेतली, व तेथून पुढे आम्ही तिकोना किल्ला कडे निघालो , किल्लाचा पायथा पाशी दुचाकी पार्क करून किल्ला चढायला चालू केला मध्ये एक मारूती मंदिर आहे, मारूती ला नमस्कार करून थोडे पुढे जाताच आम्ही तळ्यापाशी व गुहे जवळ जाऊन पोहचलो. तिथून डाविकडे थोडे वरती चालताच बाल्ले किल्ल्याला जाणाऱ्या पायऱ्या सुरू होतात. बाल्ले किल्लाला प्रवेश करताच उजव्या बाजुला पाण्याचे टाके व डाविकडे बुरूज आहे. अजुन थोडे सरळ वरती गेले की उजवीकडे पाण्याचे टाके आहे ते पाहुन परत फिरलो व तुटलेल्या पायऱ्या वरून वरती जाताच महादेवाचे मंदिर सामोरे येते, ते पाहुन मागील बाजुला असलेले पाण्याचे तळे पाहीले, ढगांचि उघड झाप व रीमझिम पाऊस चालू होता त्यातुन दिसनारे तुंग किल्लाचे दृश्य पाहुन आम्ही बाल्ले किल्ला उतरायला सुरवात केली, मग आम्ही महाद्वार व चोर दरवाजा पहायला गेलो, तेथील झालेली पडझड पाहुन असे जाणवते की , अता तिकडुन कोणीच येत जात नसावे, पुर्ण किल्ला पाहुन झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला व 6:00वा चिंचवडला पोहचलो, अशाप्रकारे या वर्षातील दुसरा पाऊसाळी ट्रेक पुर्ण केला.
©सुशील राजगोळकर
तिकोना (वितंडगड) , किल्यावरुन दिसनारे मनमोहक दृश्य माझ्या मोबाईल मध्ये चित्रित केले आहे
https://www.youtube.com/watch? v=IbPZ1lJ02o8&feature=youtu.be
https://www.youtube.com/watch?
वरिल YouTube link वरती उपलब्ध आहे, आपणास चित्रिकरण आवडल्यास आपल्या प्रतीक्रिया आपण तेथे द्याव्यात.
No comments:
Post a Comment