दिवस दुसरा, रविवार १५-सप्टेंबर-२०२४
भूषणगड । Bhushangad
पहाटे लवकर उठून आवरले व मसूर येथून रायगाव, वडगांव, रहाटणी, शेणवडी मार्गे भूषणगड कडे निघालो. गडाचा जवळ येता गडा जवळ दरड कोसळली आहे कि भूसंकलन झाले आहे असे दिसत होते. पण जवळ आल्या नंतर पाहिले तर गडावरती गाडी जाण्यासाठी पूर्ण गडाचा घेरा फोडून रस्ता बनविण्याचे काम चालू असल्याचे दिसले. ०७:३० वाजता गडाचा पार्किंग मध्ये पोहचलो तसे समोरच असलेल्या कमानी मधून व नव्याने बनवलेल्या पायऱ्यांचा वाटेने आम्ही गड चढायला घेतला. वाटेवरती गडाचा नकाशा लावलेला आहे त्यावरून गडावरील अवशेष कोणत्या दिशेला आहेत हे समजायला मदत झाली.
|
भूषणगडचा पायथ्याला असलेली कमान व पायरी मार्ग |
गडाचा वाटे
मध्ये असलेल्या म्हसोबाचे दर्शन घेतले व समोर असलेल्या काही पायऱ्या चढून
गोमुखी दरवाजा पाहून पुढे आलो. गडाचा दरवाजा पडायला आला आहे त्यामुळे इथे
धोका असे लिहण्यात आले आहे. दरवाजामधून प्रवेश केल्या नंतर पूर्व दिशेला समोर असलेल्या बुरुजा वरती आलो. बुरुजा वरून पश्चिम दिशेला मुख्य दरवाजा ते शेवट पर्यंत असलेली गडाची तटबंधी पाहता आली. पुढे काही पायऱ्या चढून समोर असलेली चौकोनी आकारातील बांधीव विहीर व त्या शेजारील शिव मंदिर मध्ये नमस्कार करून ३० मिनिटा मध्ये हरणाई देवीचा मंदिरा पाशी पोहचलो. मंदिरा समोर एक भले मोठे चिंचेचे झाड आहे ते दुरवरुन येतांना दिसत होते. मंदिरा समोर दीपमाळ व इतर अवशेष पाहून पश्चिम दिशेला आलो.
|
म्हसोबा मंदिर - भूषणगड |
|
भूषणगडाचे मुख्य प्रवेशद्वार |
|
बांधीव चौकोनी विहीर - भूषणगड |
|
शिव मंदिर - भूषणगड |
|
हरणाई देवी मंदिर व मागे लहान गणपती मंदिर - भूषणगड |
|
हरणाई देवी मंदिरा समोरील दीपमाळ, अवशेष व चिंचेचे झाड - भूषणगड |
पश्चिम दिशेला गडाची काहीशी पडझड झालेली पण भक्कम तटबंधी व बुरुज पाहिला. पावसाळ्या मुळे तशी बरीच झाडी वाढली होती त्या मुळे थोडे सावध तटबंधीचा बाजूने मार्ग काढत पूर्व दिशेचा बुरुजा वरती आलो. तेथून दिसणारा प्रदेश नेहाळून घेतला. पुढे बांधीव टाक्याचा बाजूने गड फेरा पूर्ण करून हरणाई देवीचा मंदिरा मध्ये दर्शन घेतले. मंदिरा मधील पुजारी सोबत बोलून थोडी चौकशी केली. गडावरती मंदिरा समोर विश्रामगृह बांधलेले आहे तेथे ट्रस्टला विचारून गडावरती राहायची सोय होऊ शकते असे समजले.
|
पश्चिम दिशेची तटबंधी व बुरुज - भूषणगड |
|
पश्चिम दिशेची तटबंधी व बुरुज - भूषणगड |
|
पश्चिम दिशेची तटबंधी व बुरुज - भूषणगड |
|
बांधीव पाण्याचे टाके - भूषणगड |
|
हरणाई देवी मंदिर - भूषणगड |
हरणाई देवीचा दर्शना नंतर गड उतरायला घेतला व म्हसोबा मंदिरा पाशी आलो. तेथून एक वाट पश्चिम दिशेला गडाचा तटबंधीचा खालून (बिलगून) पुढे पश्चिम बुरुजाला वळसा मारून तेथे आलो व "भुयारीदेवीचे" दर्शन घेऊन माघारी फिरलो व गड उतरून ०९:३० वाजता पार्किंग मध्ये येऊन पोहचलो व महिमानगडचा दिशेने निघालो. गडावरती जाण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात, गडाला चोहो बाजूने खुप भक्कम तटबंधी आहे. भविष्यात कदाचित रस्ता झालाच तर हीच तटबंधी फोडून गडावर गाडी पोहोचेल. त्यापेक्षा चांगल्या भक्कम दगडी पायऱ्या बनवलेल्या बरे होईल असे वाटते असो. राम पुजारी : 9623487340 / 9921427161
महादेव मंदिर - शिरसवाडी (प्राचीन मंदिर) । Ancient Mahadev Temple - Shiraswadi
भूषणगड वरून महिमानगडाचा दिशेने निघालो पण जातांना शिरसवाडी गावाचा सुरवातीलाच एक प्राचीन मंदिर दिसले आणि आम्ही गाडी थांबवली 🚗. मुख्य गाभाऱ्यामध्ये प्राचीन शिवलिंग पाहायला मिळाले. पहाटेच मंदिर मध्ये पूजा झालेली व शिवलिंग वरती छान अशी फुले वाहिलेली होती व त्या वरती सकाळची सूर्यकिरणे पडली होती ते पाहून मनाला खूपच शांत व प्रसन्न वाटले. गाभाऱ्यामध्ये थोडे बसून जप केला व दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराचा सभामंडप हा मुख्य सहा खांबांचा व त्या मध्ये नंदी आहे. सभामंडपा मध्ये एक ठिकाणी पाच फणी सर्प शिल्प व एक ठिकाणी तुटलेल्या अवस्तेथील गणेशाची मूर्ती पाहायला मिळाली. मंदिराची एक बाजूने भिंत पूर्ण कोसळायला आली आहे तर दुसऱ्या बाजूला सुस्तिथित आहे. मंदिरा समोरील झाडा खाली एक लहान दगडावरती शिवलिंग पाहायला मिळाले. पुढे एका गावकऱ्यांना या मंदिरा बद्दल विचारले, मंदिराला महादेव मंदिर बोलतात असे म्हणाला व या वैतिरिक्त फारसे काही तो बोलला नाही. नंतर Google वरती पाहिले तर या मंदिराचा एक फोटो किंवा लोकेशन्स देखील दिलेले नाही. पुढे शिरसवाडी वरून वडूज पेडगाव मार्गे महिमानगड कडे निघालो.
|
प्राचीन महादेव मंदिर - शिरसवाडी |
|
प्राचीन महादेव मंदिर - शिरसवाडी |
|
प्राचीन महादेव मंदिर - शिरसवाडी |
|
प्राचीन महादेव मंदिर - शिरसवाडी |
|
प्राचीन महादेव मंदिर - शिरसवाडी |
महिमानगड । Mahimangad भूषणगड व महादेव मंदिर शिरसवाडी पाहून माहिमनगडाचा पायथ्याला ११:०० वाजता पोहचलो. ग्रामपंचायत व बनेश्वर मंदिर जवळ गाडी लावली. आणि भवानी मंदिराचा बाजूने गडाचा दिशेने चालायला सुरवात केली. साधारण २० मिनिटामध्ये आम्ही गडाचा मुख्य प्रवेशद्वारा जवळ येऊन पोहचलो 🏰 . गडाचा मुख्य दरवाजाची पूर्ण पडझड झालेली आहे. तेथून आत मध्ये आलो आणि हनुमानाचे दर्शन घेतले व मंदिराचा समोरील (पूर्व) दिशेला पुढे निघालो.
|
महिमानगड
|
|
मुख्य प्रवेशद्वार महिमानगड |
|
हनुमान मंदिर - महिमानगड |
|
पाण्याचे टाके - महिमानगड
|
हनुमान मंदिराचा समोर डाव्या बाजूला दिसत असलेली तटबंधी व समोर असलेले बांधीव पाण्याचे टाके पाहून पुढे असलेल्या उंच तटबंधीचा गुप्त दरवाजा मधून पूर्व दिशेला असलेल्या बुरुजा वरती आलो. तेथून मागे वळून पाहता महिमानगडाचा पूर्ण माथा दिसत होता. तेथून माघारी आलो व समोर असलेले कोरडे टाके पाहून पीर व बाजूला असलेले वाड्याचे अवशेष पाहिले. पुढे पश्चिम दिशेचा तटबंधी जवळून गडाचा फेरा पूर्ण करून मुख्य प्रवेशद्वारा पाशी आलो. व गड उतरून १२:३० वाजता गाडी पाशी पोहचलो तसे पुसेगाव मार्गे वर्धनगड कडे निघालो.
|
बुरुज व पूर्वेकडील बुरुज वरती येण्यासाठी असलेला दरवाजा - महिमानगड
|
|
पूर्वेकडील बुरुजावरून दिसणारा माहिमनगडाचा संपूर्ण माथा - महिमानगड
|
|
वाड्याचे अवशेष - भूषणगड |
सेवागिरी महाराज समाधी आणि सिद्धेश्वर मंदिर - पुसेगांव । Pusegaon 🛕
महिमानगड वरून वर्धनगड कडे जातांना वाटे मध्ये एक मोठे मंदिर व श्री सेवागिरी मंदिर अशी कमान दिसली म्हणून गाडी थांबवली. मंदिर मध्ये प्रवेश केला. भव्य असा मोठा सभामंडप बांधलेला आहे. तेथे प्रथम असलेल्या सेवागिरी महाराजांचा संजीवन समाधीचे दर्शन घेतले. बाजूला असलेल्या प्राचीन सिद्धेश्वर मंदिर मध्ये देखील दर्शन घेतले. सिद्धेश्वर मंदिर खूप प्राचीन असल्याचे जाणवले पण मंदिराचा कळसाचा नव्याने जीर्णोद्धार केलेला आहे. मंदिरातील प्राचीन खांबांना खालील बाजूने मार्बल व वरती पूर्ण ऑइल कलर केलेला आहे. मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले. मंदिराचा बाजूला एक वीरगळ पाहायला मिळाली. मंदिरा समोर उंचवट्यावर दगडी चार खांबी लहान मंडपा मध्ये नंदी आहे व त्या मंडपाचा समोर शिलालेख कोरलेला पाहिला. दोन्ही मंदिरा मध्ये दर्शन घेऊन झाल्या नंतर महाप्रसाद घेतला व वर्धनगड कडे निघालो.
|
सेवागिरी महाराज समाधी - पुसेगांव
|
|
श्री सिद्धेश्वर मंदिर - पुसेगांव |
|
श्री सिद्धेश्वर मंदिर - पुसेगांव |
|
श्री सिद्धेश्वर मंदिर - पुसेगांव |
वर्धनगड । Vardhangad वर्धनगडाचा पायथ्याला कारखानीस वाड्यापाशी गाडी लावून ०२:४५ ला गड चढायला सुरवात केली. सुरवाती पासूनच गडा वरती जायला पायऱ्या बनवलेल्या आहेत. थोडे वरती आल्या नंतर एक हनुमाची मूर्ती लागली. तेथून थोडे पुढे दगडा मध्ये कोरलेल्या पादुका पायरी मार्गाचा बाजूला लावलेल्या पाहिल्या. साधारण १५ मिनिटामध्ये गडाचा मुख्य प्रवेशद्वारा पाशी येऊन पोहचलो. गडाला दरवाजाचे सवंर्धन केलेले आहे व नव्याने लाकडी दरवाजा बसवलेला पाहिला.
|
वर्धनगड |
|
वर्धनगड |
|
मुख्य प्रवेशद्वार - वर्धनगड |
गडावरती प्रवेश करता दोन्ही बाजूला घनदाट झाडीचे जंगल वाढवलेले पाहिले. व एक वाट सरळ गडमाथ्यावरती मंदिराकडे जाते त्या वाटेने पुढे आलो. समोर एक शिव मंदिर लागले तेथे दर्शन घेतले व बाजूला असलेली भग्न शिवलिंग, पाण्याचे टाके पाहून पुढे आलो. तसे समोर एक लहान हनुमान मंदिर लागले तेथे नमस्कार केला व वर्धनी माता मंदिरा मध्ये आलो. मंदिराचा मुख्य गाभारा प्राचीन आहे पण मंदिर नव्याने बांधून घेतले आहे. वर्धनी मातेची मूर्ती अगदी आकर्षक आहे. मातेचा मूर्ती पाशी एका बाजूला लहान गणपतीची मूर्ती देखील कोरलेली आहे. मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाहेर आलो.
|
शिव मंदिर - वर्धनगड |
|
पाण्याचे टाके - वर्धनगड |
|
हनुमान मंदिर - वर्धनगड |
|
वर्धनी देवी - वर्धनगड |
मंदिराचा मागे येऊन गडावरून दिसणारा कल्याणगड व प्रदेश नेहाळून उत्तर दिशेने गडाचा फेरा चालू केला. पुढे असलेली तलाव, तटबंधी पाहून व घनदाट वाढलेल्या झाडांमधून पुढे असलेला आणखीन एक लहान तलाव पाहून मुख्य प्रवेशद्वारा जवळ येऊन पोहचलो. आणि गड उतरायला सुरवात केली. गड उतरतांना आपल्याकडे अजून बराच वेळ आहे असे लक्षात आले आणि आम्ही औंध पाहायला जायचे ठरवले. पुढे गडाचा पायथ्याला असलेला कारखानीस वाड्याचे असलेलं काही अवशेष पाहिले व पुढे औंधचा दिशेने निघालो.
|
तलाव - वर्धनगड |
|
तटबंधी - वर्धनगड |
|
कारखानीस वाड्याचे अवशेष - वर्धनगड |
औंध । यमाई देवी । Aundh । Yamai Devi 🛕
संध्याकाळी
०५:०० वाजता औंध येथील नगराळे तलाव येथे पोहचलो. हा एक मोठा प्राचीन
चौकोनी
बांधून घेतलेला तलाव प्रथम पाहिला व त्या शेजारी असलेली प्राचीन
मंदिरे पाहिली. 🛕 मोकळाई देवी मंदिरा मध्ये देवीची मूर्ती व समोर लहान मंडप मध्ये दोन नंदी व दोन बाजूला २ दीप माळ आहेत. एका दीप माळे वरती गणपती तर दुसऱ्या दीप माळे वरती हनुमान कोरलेला आहे. जवळच श्री रुपपुरी महाराज समाधी मंदिर होते मंदिर बंद होते पण त्या वरील बाहेरील नक्षीकाम हे खूपच सुंदर होते. समोर हनुमान मंदिर, प्राचीन शिव मंदिर, विष्णू मंदिर पाहून औंध गावातील यमाई देवीचा मंदिर जवळ आलो 🛕.
|
नगराळे तलाव - औंध |
|
मोळकाई देवी मंदिर - औंध |
|
मोळकाई देवी मंदिर - औंध |
|
रूपपुरी महाराज समाधी मंदिर - औंध |
यमाई देवीचा मंदिरा बाहेर महाराष्ट्रातील मोठी दीप माळ इथे पाहायला मिळाली. त्या सोबत इतर ०३ दीप माळ तेथे आहेत. तसेच एक मोठा नंदी मंदिरा समोर आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वारा बाहेर बऱ्याच वीरगळी पाहायला मिळाल्या. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम हे संपूर्ण दगडी. समोर ०२ हत्ती शिल्पे आहेत. प्रवेशद्वारा वरती एक नगारखाना बांधलेला आहे. यमाई देवी मंदिराचा बाजूला एक लहान शिव मंदिर आहे, गाभाऱ्या मध्ये शिवलिंग व गणपती आहे. समोर वीरगळी आहेत. तेथेच पंत प्रतिनिधींचा वाडा आहे. वाड्याचे काम चालू असल्याने आतून पाहता आला नाही. हे सर्व पाहून झाल्या नंतर यमाई देवीचा मंदिरा मध्ये प्रवेश केला. भला मोठा दुमजली सभामंडप व आत मध्ये यमाई देवीचा शिवकालीन मुख्य गाभारा. आत मध्ये येऊन देवीचे दर्शन घेतले. मंदिरा बाहेर मोठा नंदी व आत मध्ये देवीचे मंदिर असा आमचा मना मध्ये प्रश्न निर्माण झाला होता. यमाई देवीचा गाभाराचा खाली बरोबर मध्यभागी एक लहान तळघरा सारखे आहे व त्या मध्ये शिवलिंग आहे. तेथे दर्शन घेतले व पुढे डोंगरावरील मूळपीठ मंदिराकडे निघालो.
|
महाराष्ट्र मधील मोठी दीप माळ - यमाई मंदिर, औंध
|
|
यमाई देवी मंदिर - औंध |
|
यमाई देवी मंदिर - औंध |
|
यमाई देवी मंदिर - औंध |
|
यमाई देवी मंदिर - औंध |
|
पंत प्रतिनिधींचा वाडा व यमाई देवी मंदिर - औंध |
औंध गावातील सर्व पाहून आम्ही डोंगरावरील यमाई देवीचे मूळपीठ पाहायला आलो. डोंगराचा पायथ्यापासून मंदिरा पर्यंत पायऱ्या बनवलेल्या आहेत त्या सोबत डोंगरावरती गाडी देखील येते. संध्याकाळचा सूर्यास्ता सोबत आम्ही मंदिर जवळ येऊन पोहचलो. 🛕 मंदिराचा बाजूने पूर्ण दगडी बांधकामामध्ये किल्ल्या प्रमाने बांधून घेतलेले आहे. 🏰 तसेच ०२ प्रवेशद्वार आहेत. आत मध्ये मंदिराचा दोन्ही बाजूला दीप माळ आहेत. समोर नक्षीदार मंडपा मध्ये नंदी आहे तसेच मंदिराच्या शिखरावर विविध देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती आहेत. मंदिरा मध्ये प्रवेश केला आणि देवीचे दर्शन घेतले. तेथे पुजाऱ्यांन सोबत थोडे बोला नंतर असे समजले "शिव-पार्वती यांचे एकत्रित पुजले जाणारे रूप म्हणजे यमाई. शिवशक्तीस्वरुपिनी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुकादेवीचा अवतार मानले जाते . महाराष्ट्रात व अन्य राज्यांत यमाई देवीची अनेक उपपीठे (मंदिरे) आहेत, परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील हे औंध गावच्या डोंगरावरती असलेले आदिमायेचे मुख्यपीठ आहे. त्यामुळेच या ठिकाणास मुळपीठ त्याचबरोबर देवीलाही यमाईदेवी व्यतिरिक्त मुळपीठदेवी म्हणून देखील ओळखले जाते" असे पुजाऱ्यांनी सांगितले. त्याच सोबत देवीची मूर्ती हि शिवकालीन असून देवीचा समोर शिवलिंग देखील पाहायला मिळाले. पूर्ण मंदिर पाहून झाल्या नंतर मंदिरा बाहेर संध्याकाळचा थंड वातावरण मध्ये थोडे बसलो व पुढे सातारा कडे निघालो. रात्री पुण्याहून अजित चा मित्र सातारा मध्ये येऊन आम्हाला मिळाला. नंतर आम्ही सातारा मधील प्रसिद्ध मानस हॉटेल मध्ये जेवणाचा आस्वाद घेतला व रात्री सातारा मध्ये राहिलो.
©सुशील राजगोळकर
|
यमाई देवी मंदिर - औंध (मूळपीठ)
|
|
यमाई देवी मंदिर - औंध (मूळपीठ) |
|
यमाई देवी मंदिर - औंध (मूळपीठ) |
|
यमाई देवी मंदिर - औंध (मूळपीठ) |
|
यमाई देवी मंदिर - औंध (मूळपीठ) |
|
यमाई देवी मंदिर - औंध (मूळपीठ) |
|
यमाई देवी मंदिर - औंध (मूळपीठ) |
No comments:
Post a Comment