तिकोना किल्ला (वितंडगड) Tikona Fort ( Vitandgad )

निरव रोज फक्त डोंगराला कधी जायचे विचारत असतो म्हणून दिवाळी मध्ये जवळपास कुठेतरी जाऊया असे सांगितले होते म्हणून, रविवार दि. १५/११/२०२० रोजी सकाळी थोडे आवरून ११ वाजता तिकोनाकडे निघालो, जवळच पहिला घोराडेश्वरचा डोंगर पाहून निरव ओरडू लागला डोंगर डोंगर. 
भर दुपारी उन्हामध्ये १२ वाजता तिकोना गडाचा खाली गाडी लावून ट्रेकला सुरवात केली, रविवार व त्यातून दिवाळीची सुट्टी या मुळे गडावरती बऱ्यापैकी गर्दी होती. निरवचा हाथ पकडून आम्ही हळू हळू चालू लागलो, थोडे वरती जाताच निरवला आजू बाजूचे दरी डोंगर दाखवत त्याला समजवत पुढे जात होतो, बुरुज, दरवाजा, चपेटदान मारुती, चुण्याचा घाणा, टाके, पाण्याचा टाक जवळील गुहा पाहिले  व  डावीकडून बाल्ले कील्लाकडे जाणाऱ्या पायऱ्या चढायला सुरवात केली, अता दुर्गसर्वर्धन करण्याऱ्या गडप्रेमींनी तेथे नवीन दगडी पायऱ्या बनवल्या आहेत, पूर्वी तेथे लहान दगडामध्ये कोरलेल्या अवघड पायऱ्या होत्या, त्या पायऱ्या चडून जाताच बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजातून आत मध्ये शिरल्यावर उजवीकडे पाण्याचे टाके व डाव्याबाजूला असलेला तटबंदीचा बुरुज पाहिला व तेथूनच सरळ अशा उंच कातळातील पायऱ्या चडून गेलो व आणखीन एक दरवाजा पार करून तेथून उजव्या बाजूला असलेल्या गुहे व पाण्याचा टाक्या जवळ बसून दुपारचे जेवण उरकले व थोडी विश्रांती घेऊन मागे फिरलो पुढे असलेल्या तुटलेल्या पायऱ्या चडूण गेलो व समोरच असलेल्या महादेव मंदिरा मध्ये जाऊन नमस्कार केला. व पुढे मंदिरा मागे असलेल्या पाण्याचा टाके पाहून गडाचा शेवटचा टोकापाशी असलेल्या ध्वजस्तंभाच्या जागी आलो. तेथून दिसणारा उतुंग असा तुंग किल्ला, लोहगड, विसापूर, पवणा धरणाचा जलाशय व चौहो बाजूचा परिसर निहाळून आम्ही गड उतरायला सुरवात केली, निरव मात्र न दमता पूर्ण गड चडून गेला त्या अवघड बाल्ले किल्ल्याचा पायऱ्या व काही अवघड ठिकाणी निरवला उचलून घेत आम्ही पूर्ण गड पाहिला. अशा प्रकारे काही दिवसा पुरते का होईना मी त्याचे गड, डोंगर प्रेम पूर्ण केले.
~सुशील राजगोळकर

तिकोना गडाचा दरवाजा
तिकोना गडाचा दरवाजा 
तिकोना गडावरील चपेटदान मारुती
तिकोना गडावरील चपेटदान मारुती 
तिकोना गडावरील चुन्याचा घाणा
तिकोना गडावरील चुन्याचा घाणा 
तिकोना गडाचा बाल्ले किल्याला जाणाऱ्या पायऱ्या
तिकोना गडाचा बाल्ले किल्याला जाणाऱ्या पायऱ्या 
तिकोना गडाचा बाल्ले किल्याला जाणाऱ्या पायऱ्या
तिकोना गडाचा बाल्ले किल्याला जाणाऱ्या पायऱ्या 
तिकोना गडाचा बाल्ले किल्याला जाणाऱ्या पायऱ्या
तिकोना गडाचा बाल्ले किल्याला जाणाऱ्या पायऱ्या 
तिकोना गडावरील गुहा
तिकोना गडावरील गुहा 
तिकोना गडावरील महादेव मंदिर
तिकोना गडावरील महादेव मंदिर 
तिकोना गडावरील महादेव मंदिराचा गाभारा व शिवलिंग
तिकोना गडावरील महादेव मंदिराचा गाभारा व शिवलिंग
तिकोना गडावरील महादेव मंदिरा मागील पाण्याचे टाके
तिकोना गडावरील महादेव मंदिरा मागील पाण्याचे टाके 

©सुशील राजगोळकर

No comments:

Post a Comment

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.