जीवधन व नाणेघाट JIVDHAN & NANEGHAT

कोरोना मुळे बाहेर फिरणे बंद होते, जवळपास साधारण ८ महिन्या नंतर सह्याद्री मध्ये जायला भेटले. ४ दिवसा पूर्वी बातमी आली "गडकोटांचे दरवाजे खुले" बातमी वाचूनच मनाला बरे वाटले मग नियोजन चालू झाले कुठे तरी एक दिवस जाऊया व अचानक ठरले "जीवधन व नाणेघाट" पाहायला जायचे. 

ठरल्या प्रमाणे शनिवारी ०७/११/२०२० सकाळी ६ वाजता पिंपरी चिंचवड वरून निघालो. २ कारमध्ये ८ जण होतो. नारायणगाव येथे प्रसिद्ध असलेल्या राजकमल मिसळ हॉटेल मध्ये नाष्टा उरकला. जाताना रस्त्या लगत असलेला शिवनेरी,चावंड,हडसर किल्ला व आजूबाजूचा मनमोहून टाकणाऱ्या डोंगर रांगा पाहत साधारण १०:३० वाजता जीवधन किल्याच्या पश्चिमेला | नाणेघाटाचा बाजूला असलेल्या हॉटेल करण येथे पायथ्याला लावून ट्रेकला सुरवात केली, पठारावरती सळसळणारे गवत, वाहणारे झरे पार करत व घनदाट वाढलेल्या झाडी मधून पायपीट करत तासाभरामध्ये पायऱ्यांजवळ पोहचलो. काही सोप्या, काही अवघड, कडे कपारीमधील त्या पायऱ्या पार करत आम्ही मुख्य कल्याण दरवाजाजवळ पोहचलो, खालून गडाकडे पाहताना नेमके गडाला जाण्याचा मार्ग कुठे आहे तो कळत सुद्धा नाही, गड उतरून गेल्यानंतर थोडे फार लक्षात येते.

जीवधन कडे जाताना दिसणारा चावंड किल्ला
जीवधन कडे जाताना दिसणारा चावंड किल्ला

जीवधन गडावरती जाताना लागणाऱ्या पायऱ्या
जीवधन गडावरती जाताना लागणाऱ्या पायऱ्या

जीवधन गडावरती जाताना लागणाऱ्या कडे कपारी मधील पायऱ्याची वाट
  जीवधन गडावरती जाताना लागणाऱ्या कडे कपारी मधील पायऱ्याची वाट 

मुख्य दरवाजा पार करून आम्ही वानरलिंगी सुळक्याच्या दिशेने चालायला लागलो, तेथे सर्वानी आणलेल्या शिदोरीवर मनसोक्त ताव मारला आणि पुढे चालायला सुरवात केली जवळच असलेल्या झाडाच्या सावलीत सर्व जण विसावले, मात्र मी व भरत भसे पुढे गेलो व समोरील बाले किल्या वरील पावसाळी तलाव, जीवाई देवीची मूर्ती पाहून पूर्वे कडील खाली असलेल्या कोठार, पाण्याचा टाक्या व तेथून पुढे असलेला जुन्नर मार्ग दरवाजा पाहिला व मागे फिरलो.
जुन्नर मार्ग कल्याण मार्गापेक्षा चढाईला अवघड आहे. तासाभराने आमचे सर्व सहकारी तेथे आले आणि मग आम्ही वरून दिसत असलेल्या पश्चिम दिशेला असलेल्या पाण्याचा टाक्या पाहायला उतरलो, टाक्यातील थंडगार पाणी पिऊन मुख्य दरवाजा जवळील आणखीन एक असलेली पाण्याची टाकी पाहून गड उतरायला सुरवात केली 

जीवधन गडाचा मुख्य दरवाजा
जीवधन गडाचा मुख्य दरवाजा 

जीवधन गडावरील मुख्य दरवाजा इथे टिपलेले छायाचित्र
जीवधन गडावरील मुख्य दरवाजा इथे टिपलेले छायाचित्र

जीवधन गडावरूण दिसणारा वानरलिंगी सुळका
जीवधन गडावरूण दिसणारा वानरलिंगी सुळका 

जीवधन गडावरील जिवाई देवीची मूर्ती
जीवधन गडावरील जिवाई देवीची मूर्ती

जीवधन गडावरील पूर्वेकडील पाण्याचा टाक्या
जीवधन गडावरील पूर्वेकडील पाण्याचा टाक्या

जीवधन गडाला घाटघरकडून येणारी पायर्यांची वाट, जुन्नर मार्ग
जीवधन गडाला घाटघरकडून येणारी पायर्यांची वाट, जुन्नर मार्ग 

जीवधन गडावरील पश्चिमेकडील पाण्याचा टाक्या
जीवधन गडावरील पश्चिमेकडील पाण्याचा टाक्या
पठारावरून दिसणारा जीवधन किल्ला
पठारावरून दिसणारा जीवधन किल्ला 

५ वाजता कार चालू करून पुढे जवळच असलेल्या नाणेघाटकडे वळवली, नाणेघाटाचा सुरवातीलाच असलेल्या गणपतीला नमस्कार केला व जुन्या काळी नाणेघाटाच्या जकात गोळा करण्यासाठी वापरलेला दगडी रांजण पाहिला व घाट उतरायला सुरवात केली. घाटामध्ये असलेल्या गुहा, कोरलेला हनुमान व गुहेमधील शिलालेख पाहून परत फिरलो. तेथेच "नानांचा अंगठा" म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंच अशा टेकडीचा वरच्या टोकावरती जाऊन सूर्यास्त पाहण्या साठी बसलो. त्या उंच दरीचा टोकावरून मागे दिसणारा जीवधन किल्ला, भैरवगड पाहिला व टेकडी उतरून घरी निघालो, इतक्या दिवसा नंतर सह्याद्री मध्ये फिरून सर्वांनाच खूप बरे वाटले. 


नाणेघाटाचा सुरवातीला असलेले गणपती मंदिर
नाणेघाटाचा सुरवातीला असलेले गणपती मंदिर 
जुन्या काळी नाणेघाटाच्या जकात गोळा करण्यासाठी वापरलेला दगडी रांजण
जुन्या काळी नाणेघाटाच्या जकात गोळा करण्यासाठी वापरलेला दगडी रांजण

नाणेघाटा मधील हनुमान
नाणेघाटा मधील हनुमान
नाणेघाटा मधील गुहा मधील शिलालेख
नाणेघाटा मधील गुहा मधील शिलालेख 
नाणेघाटा मधील गुहा
नाणेघाटा मधील गुहा 

©सुशील राजगोळकर

No comments:

Post a Comment

भैरवगड (मोरोशी) । Bhairavgad (Moroshi) । २४-मार्च-२०२४

आमचा "ट्रेकगुरु" संस्थेचा आयोजना प्रमाणे मी शनिवार २३-मार्च-२०२४ रोजी रात्री ०८:०० वाजता घरून निघालो व नाशिकफाटा येथे मित्राकडे गा...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.