अजित खूप दिवसापासून बोलत होता खूप दिवस झाले दादा आता ट्रेक करून, मी येतो तू दोन दिवसाचे नियोजन कर. मग मी नियोजन करून अजितला कळवले तसे तो मुंबईवरून गुरुवार २४ जून रात्री माझ्याकडे आला. मग नियोजनाप्रमाणे आम्ही शुक्रवार २६ जून २०२१ रोजी पहाटे ५:३० वाजता गाडी 🏍️ घेऊन पुणे सोडले व वाईच्या दिशेने निघालो.
|
ट्रेकला जाण्यापूर्वी बनवलेले नियोजन |
८:३० वाजता वाई येथे नाश्ता 🍛 उरकून आम्ही पुन्हा त्याच मार्गे थोडे माघारी आलो. व कडेगाव येथून उजवीकडे वळसा घेऊन व्याजवाडी गाठली. तेथे गाडी लावून एका गावकर्याला गडाचा मार्ग विचारून घेतला.
०९:०० वाजता आम्ही गडाच्या दिशेने चढाई चालू केली 🧗🏼♂️. वाट तशी मळलेली होती. थोडे अंतर पार करताच थोडा रिमझिम पाऊस आला त्या पावसाच्या सरी झेलत गड चढू लागलो. मध्येच एक लहान धबधबा लागला व त्यांचा समोरच एक भगवा ध्वज दिसत होता, तेथे येऊन पोहोचलो.
|
व्याजवाडी जवळून दिसणारा वैराटगड
|
गडाची काही वाट ही घनदाट जंगलाची आहे ती पार करून आम्ही १०:३० वाजता मुख्य दरवाज्यापाशी पोचलो. तेथून एक मुख्य वाट डाव्या बाजूला कापसेवाडी कडे खाली जाताना दिसत होती. आम्ही गडावरती न जाता त्या वाटेने खाली गेलो. व तेथे असलेल्या ३ टाक्या पाहून मुख्य दरवाजाच्या ज्या दिशेला मागे आलो. दरवाज्याच्या चढाईच्या आधी खालील बाजूला असलेले लक्ष्मी माता मंदिर व प्राचीन गुहा पाहीली. मग आम्ही महाद्वारातून प्रवेश केला. गडाचा महाद्वाराची पडझड झालेली आहे पण असलेल्या अवशेषांवरून महाद्वाराची भव्यता लक्षात येते. या महाद्वारातून प्रवेश करता समोर दोन हनुमान मंदिर पाहायला मिळाली🛕.
|
वैराटगड गडाचा मार्गा वरील पाण्याचा टाक्या |
|
वैराटगडाचा मुख्य दरवाजा जवळील प्राचीन गुहा |
|
वैराटगडाचा मुख्य दरवाजा जवळील लक्ष्मीमाता मंदिर |
|
वैराटगडाचा मुख्य प्रवेश द्वार |
|
वैराटगडावरील दोन हनुमान मंदिर |
|
वैराटगडावरील हनुमानाची मूर्ती |
|
वैराटगडावरील हनुमान मंदिरातील मूर्ती |
तेथून डाव्या बाजूला दिसत असलेले वैराटेश्वर मंदिराच्या दिशेला चालू लागलो. मध्येच दोन-तीन पाण्याचे तलाव पाहून वैराटेश्वर मंदिराचे 🛕 दर्शन घेतले. मंदिराबाहेर एक मोठी वीरगळ, नंदी व तुळशीवृंदावन पाहायला मिळाले. बाजूलाच असलेले एक लहान मंदिर व आत मध्ये असलेली लहान विरगळ पाहिली व मंदिरा समोर थोडी डागडुजी करून असलेला मठ पाहिला. तेथे एका तळ घरामध्ये ठेवलेली ज्योतिबा देवाची मूर्ती व एका खोलीमध्ये गुरु दत्ताची मूर्ती पाहायला मिळाली.
|
वैराटगडावरील पाण्याचा तलाव व मागे दिसत असलेले वैराटेश्वर मंदिर |
|
|
वैराटगडावरील वैराटेश्वर मंदिर |
|
वैराटगडावरील वैराटेश्वर मंदिरातील शिवलिंग
|
|
वैराटगडावरील मठ |
|
वैराटगडावरील मठातील श्री गुरुदत्ताची मूर्ती |
|
वैराटगडावरील मठातील तळ घरातील श्री जोतिबा देवाची मूर्ती |
मठ पाहून झाल्यानंतर गडाच्या पूर्व दिशेचा रुंद अशा तटबंदीवरुन फेरा मारायला सुरुवात केली. पुढे एका ठिकाणी तटबंदी मधून जाणारा चोरदरवाजा पाहायला मिळाला. पुढे गडाला फेरा मारतांना गडाच्या खाली उध्वस्त अवस्थेतील पुरातन घरांचे अवशेष पहायला मिळाले. असा पूर्ण गडाचा फेरा मारून मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो व गड उतरायला सुरुवात केली. साधारण दुपारी १:३० वाजता व्याजवाडी येथे येऊन पोहोचलो व लगोलग पांडवगडाच्या पायथ्याचे गाव गुंडेवाडी कडे निघालो.
|
वैराटगडाची तटबंदी |
|
वैराटगडा वरील चोर दरवाजा |
|
वैराट गडाच्या खाली उध्वस्त अवस्थेतील पुरातन घरांचे अवशेष |
व्याजवाडी वरून निघाल्यानंतर वाई येथे पेट्रोल भरून गुंडेवाडी येथे पोहचायला दुपारचे २:३० वाजले होते. भूक तर खूप लागली होती, मग तेथेच बसून आम्ही दुपारचे जेवण उरकले एव्हाना दुपारचे ३:३० वाजले. मग मात्र आम्ही द्विधा मनस्थिती मध्ये अडकलो होतो पांडवगड आज करायचा की नाही ?
कारण पांडवगडाचा पूर्ण मार्ग हा घनदाट जंगलाचा दिसत होता आणि गडावर ती जाऊन खाली उतरेपर्यंत अंधार होणार होता.
|
वाई - भोर मार्गावरून दिसणारा पांडव गड |
म्हणून मग आम्ही गडावरती न जाता आमची गाडी 🏍️ पुन्हा वाई कडे माघारी वळवली. मग वाईमध्ये महागणपतीचे 🛕 दर्शन घेतले व तेथील नदी घाटावरती असलेली इतर पुरातन मंदिरे पाहिली. नंतर वाईपासून ३ किलोमीटर वरती असलेल मेणवली कडे निघालो. मेणवली येथे नाना फडणवीस यांचा वाडा बंद असल्या कारणाने बाहेरूनच पाहायला भेटला. वाड्याच्या मागील बाजूला असलेले पुरातन शिवलिंग मंदिर 🛕 व नदी घाटाचा निवांत शांतते मध्ये तेथे थोडी विश्रांती घेतली.
|
महागणपती - वाई |
|
महागणपती मंदिर वाई |
|
नाना फडणवीस वाड्याची मागील बाजू व नदी घाट - मेणवली
|
|
नदी घाट व पुरातन मंदिरे - मेणवली
|
|
मंदिरासमोर असलेली जुनी घंटा - मेणवली |
|
मंदिरासमोर असलेला पुरातन नंदी - मेणवली |
|
मंदिरा मधील पुरातन शिवलिंग - मेणवली |
मेणवली येथील गावकऱ्यांना विचारून पांडवगड मेणवली मार्गे चौकशी केली. पण असे समजले मेणवली मार्गे पांडवगड सोपा मार्ग जरी असला तरी खूप लांब पल्ल्याचा आहे. म्हणून आम्ही पुन्हा आमची गाडी गुंडेवाडी कडे वळवळी. गुंडेवाडी कडे जात असताना वाई येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एक शाळा दिसली. तेथे दोन शिक्षक देखील होते, त्यातील म्हसळ सरांनी आमचा अवतार बघून तुम्ही ट्रेकर आहात का असे विचारले ? आम्ही हो म्हणताच त्यांनी त्यांच्या ट्रेकर मुलाला फोन लावून बोलने करून दिले. मग सरांना विचारून आम्ही आमचा पहिल्या दिवसाचा मुक्काम शाळेमध्ये करायचे ठरवले. शाळेच्या व्हरांड्या मध्ये आम्ही आमचा तंबू लावला व जेवण करून झोपी गेलो.
©सुशील राजगोळकर
Very nice
ReplyDeleteAll photos are fantastic.
Overall it feels good.
धन्यवाद 🙏🏻
DeleteVery nice susheel....keep it up 👍👍
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Delete