पहाटे ६:०५ वाजता मुकाई चौक येथे सर्वांनी जमायचे व जो उशिरा येईल त्याने सर्वांना चहा व नाष्टा
द्यायचा असा दंडक होता. नेमके मी ०६:०९ वाजता पोहचलो. आणखीन दोघे ०६ मिनिट
उशिरा पोहचले. ठरल्याप्रमाणे शिक्षा म्हणून मी चहा पाव आणि त्या दोघांनी नाश्ता द्यायचा होता. मुकाई चौकात चहा व मस्का पाव
घेऊन आम्ही निघालो. ती ४ मिनिटे मला
१२० रुपयांना पडली, त्या नंतर सर्वांच्या गाड्या
थांबल्या त्या कार्ले फाटा येथे. सकाळचे मस्त दाट धुके
पडले होते .थंडी☃ हि गुलाबी म्हणावी अशीच होती. पण आम्ही दुचाकीवरच चाललो असल्याने हि गुलाबी थंडी नंतर इतकी बोचरी झाली कि बोलता हि येईना.
मळवली स्टेशन
जवळ गरमा गरम कांदा पोहे
, वडापाव
व चहा
असा पोटात भराव टाकून लोहगड ⛰ कडे प्रस्थान केले.
भाजे लेणी ते लोहगड मधील घाटाचा रस्ता खूपच खराब असल्या मुळे सावधगिरीने गाडी चालवावी लागली, सकाळी ८:१५ वा
आम्ही लोहगड पायथ्याला पोहचलो. गाडी पार्क करून एक एक पायरी चढायला
लागलो, बऱ्याच आधी मी इथे आलो होतो तेंव्हा या पायऱ्यांचे काम चालू
होते आता ते पूर्ण झाले त्यामुळे गडावरती जाणे सुलभ झाले आहे, पण दुर्ग
हे दुर्गम असलेले बरे, त्याचे दुर्गपण हरवता कामा नये असे मला वाटते.
आमच्या
पैकी बरेच जण पहिल्यांदा आले होते, त्या पहाटेच्या प्रसन्न वातावरणा मध्ये
फोटो काढायचा मोह ते तरी कसा टाळणार त्यामुळे आम्ही गणेश
दरवाजा, हनुमान दरवाजा, बुरूज, तोफा व पाण्याचे टाके अश्या प्रत्येक ठिकाणी
फोटो काढत गड चढलो. शिव मंदिर आणि त्या समोर असलेल्या हनुमान मंदिर व
शिवलिंग यांना नमस्कार करून मंदिराच्या अंगणात थोडी विश्रांती घेतेली.
पाण्याचा टाक्या व आजुबाजुच्या परिसर न्याहाळत विंचू कड्याच्या दिशेने गेलो. कड्यावर बसून सर्वानी आणलेला फराळ करून माघारी निघालो , परत येताना भली मोठी 16
कोनी
विहीर पाहून गड उतरायला
सुरवात केली. पहाटे लवकर गेल्यामुळे विशेष गर्दी जाणवली नाही पण गड
उतरताना गर्दी वाढू लागली. पायऱ्यांच्या सुरवातीच्या जवळची दुकानांची संख्या पाहून मनात एक विचार आला कि आता "लोहगडचा सिंहगड होऊ नये".
अशा प्रकारे लोहगड ⛰ भेटीने नुतन वर्षांचा प्रारंभ केला या वर्षी असेच आणखी किल्ले पाहण्याचा निच्छय केला.
सोबती- संतोष सांभारे, राहुल पाटील, सागर साळुंके, राजेश लोमटे, राजेंद्र चौधरी, गणेश देशमुख, केतन देसले.
©सुशील राजगोळकर
महाराष्ट्र, सह्यांद्री, दुर्ग, गड, किल्ले, महाराष्ट्रातील किल्ले, प्रवास, निसर्ग, भटकंती, छायाचित्र, लेणी, प्राचिन मंदिरे, पुरातन मंदिरे, समुद्र किनारे, शोध, धाडस, मंदिरे, Maharashtra, Trek, Trekking, Trekker, Nature Lover, Traveler, Photography, Fort, Fort in Maharashtra, Sahyadri Mountain, Old Temples, Caves, Adventure, Explorer, Trails.
लोहगड ⛰ LOHGAD
कोरीगड (कोराईगड) "निरव"चा पहिला ट्रेक KORIGAD (KORAIGAD)
निरव म्हणजे माझा मुलगा. निरवच्या मम्मी ने त्याला कायम सांगितले होते पप्पा तुला सोडून ट्रेकला जातात. मग तो रोज मला म्हणत होता पप्पा ट्रेकला जाऊया ? जंगलात जाऊया ?. फक्त २ वर्षाचा चिमुरडा त्याला ट्रेक म्हणजे काय माहित नाही पण डिस्कव्हरी चॅनेल पाहून त्याला डोंगर, जंगल, प्राणी असे बरीच आवड निर्माण झाली होते, पण प्रत्येक्षात कधी पाहिले नाही.
म्हणुन मग आम्ही एक दिवस ठरवला व सकाळी ८:०० वाजता घरातून डबा सोबत घेऊन, निरवला ट्रेकला व जंगलात जाऊया असे सांगून निघालो. त्या नंतर आम्ही गाडी थांबवली ती थेट लोणावळा येथे नाष्टासाठी. गाडी थांबवताच निरव विचारू लागला "ट्रेक कुठे आहे"?.
मी म्हणालो थोडे थांब आपण नाष्टा करून जाऊया. त्या नंतर आम्ही लोणावळा येथून पुढे निघालो व तेथील लायन्स पॉईंट येथे थोडे थांबून निरवला घेऊन घोडेस्वारी केली. सुरवातीला तो घोड्यावरती बसायला घाबरत होता नंतर मात्र त्याला खूप आनंद झाला.
त्यानंतर कोरीगड कडे जातांना हिरवागार चापडा साप आडवा आला. त्याला पाहताच निरव साप साप असे बोलू लागला. पेठ शहापूर या पायथाच्या गावी गाडी लावून कोरीगडच्या दिशेने चालायला सुरवात केली. गडाच्या दिशेन बोट करून निरवला सांगितले आपल्याला तिथे पर्यंत जायचे आहे. निरवने डोके वर करून गडाकडे पाहताच, किल्ल्या वरील भगव्या झेंड्याने त्याचे लक्ष वेधले.
गडावरती जातांना घनदाट जंगल दाखवत व मध्ये मध्ये निरवला उचलून घेत आम्ही पायऱ्यांच्या वाटेपाशी येऊन पोहचलो. मग निरव १ २ ३ असे एक एक पायऱ्या मोजत वर चढू लागला. मध्येच माकडे दर्शन देत होती. थोड्याच वेळात दगडामध्ये असलेले गणेश मंदिर व गुहा जवळ पोहचलो. तेथे थोडी विश्रांती घेऊन पुन्हा पुढे चालू लागलो. तेथे एक लहान गुहा व त्यातील पाण्याचे टाके निरवला दाखवले. परत थोडे पुढे पायऱ्या चढून जाताच आणखीन एक गुहा लागली तिथे काही पाहण्यासारखे नाही म्हणून मी दुर्लक्ष करत होतो पण निरव ऐकेल तरी कसा. म्हणाला मला पाहायचेच आहे, मग ती गुहा दाखवली. अश्या प्रकारे पायऱ्यां संपवून आम्ही पहिल्या मुख्य दरवाजा पाशी पोहचलो.
कोरीगडची जंगलातील वाट |
कोरीगड वरील पायऱ्यांची वाट |
कोरीगड वरील पायऱ्यांचा वाटेवरती असलेले गणेश मंदिर |
कोरीगडचा मुख्य गणेश दरवाजा |
मुख्य दरवाजातून थोडे पुढे चालून जाताच समोर असलेल्या शंकर मंदिरातील शिवलिंग व नंदीला नमस्कार करून मंदिराच्या अंगणात असलेल्या तोफा पाहिल्या. गडाच्या एका बाजूने गड व आजूबाजूचा परिसर पाहत गडाचा फेरा चालू केला व जो झेंडा खालून दिसत होता तेथे येऊन पोहचलो. निरवला सांगितले हाच तो खालून दिसलेला झेंडा. तसेच मंदिराच्या मागे असलेले तलाव पाहिले. तिथेच असलेली गडावरील मोठी लक्ष्मी तोफ पाहिली. कोराईमातेच्या मंदिरामध्ये जेवण उरकले आणि निरवला ट्रेक कशाला म्हणतात ते समजावले.
©सुशील राजगोळकर
| कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील नंदी व तोफा |
कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील तोफा |
| कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील तोफा |
| कोरीगड वरील महादेव मंदिर समोरील तोफा |
| कोरीगड वरील पाण्याचा तलाव |
| कोरीगड वरील कोराईमाता मंदिर |
©सुशील राजगोळकर
तुंग (कठीणगड) TUNG
०४ ऑगस्ट २०१८ रोजी ठरल्याप्रमाणे मी दुचाकी घेऊन सकाळचे ०८:०० वाजता किवळे, रावेतहून लोणावळाकडे निघालो. व ०९:१० वाजता छञपती शिवाजी महाराज चौक लोणावळा येथे पोहचलो. माझे काही मित्र मुंबईहून येणार होते ते ही १०:२० पोहचले. मग एकत्र नाष्टा करून किल्ले तुंग कडे रवाना झालो.
लोणावळा आणि त्यातून पावसाळा म्हटले कि पाऊस व दाट धुके हे आलेच...! त्याच धुक्यातून सावकाश गाडी चालवत आम्ही ११:४५ ला तुंग किल्ल्यापाशी पोहचलो. पायथ्याला मारुती मंदिर आहे तेथे गाडी लावून गड चढायला सुरवात केली. पावसाची रिपरिप चालूच होती. थोडेसे वरती चढुन जाताच डाव्या बाजूला एक मारुती मंदिर लागले, त्याला नमस्कार करून आणखीन थोडे पुढे जाता उजव्या हाताला एक पाण्याचे टाके व गुहा लागली. ती पाहून पुढे जाताच पहिला मुख्य दरवाजा लागला. तेथून आत शिरताच एक सरळ वाट पुढे माचीकडे जाते व एक वाट गड माथ्यावरती जाते. वरती चढून येताच उजव्या बाजूला सदरेचे अवशेष पाहायला मिळाले तेथेच एक गणपती मंदिर व पाण्याचे मोठे कुंड आहे. त्या कुंडाचा डाव्या बाजूने पुढे जाता बाले किल्ल्याचा चढणीचा आधी उजव्या हाताला एक स्वच्छ नितळ पाण्याचे टाके आहे, ते पाहून तिथून परत माघारी आलो. व बालेकिल्ला चढायला सुरवात केली. या गडचा माथा लहान आहे त्यामुळे तुंग किल्ला हा टेहळणी साठी वापरला जायचा. बालेकिल्यावर तुंग देवीचे मंदिर आहे तिथे देवीचे दर्शन घेतले व थोडे थांबुन किल्ला उतरायला सुरवात केली. या किल्ल्यावरून तिकोना, लोहगड, विसापूर हे किल्ले व पवन मावळ हा सर्व परिसर दिसतो पण यावेळी दाट धुक्यामुळे आम्हाला ते दिसू शकले नाही. साधारण ०२:१५ वाजता आम्ही किल्ला उतरून खाली पोहचलो व तेथेच जेवण करून लगोलग कोरीगड (कोराईगड) पाहायला निघालो.
©सुशील राजगोळकर
Subscribe to:
Posts (Atom)
"घनगड" ⛰️ निरवचा ५० व्या किल्याची भटकंती. 🚗⛰️ | Ghangad & Tailbailla - Lonavala 11-January-2026
मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...
-
खूप दिवसांपासून मुलगा म्हणत होता ट्रेकला जाऊया ना पप्पा, नेमकं बायकोला पण रायगड पहायचा होता. मग काय केला प्लॅन रायगडाचा..! अन अखेर तो दिवस उ...
-
मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...
-
हम्पी हे एक भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे . हम्पीचे अवशेष हे युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे . ख...
Note :
भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.























