यावेळी आम्ही कूच करणार आहे विसापूर किल्ल्यावर..... चला तर मग आज प्रस्तावना न देता थेट पायथ्याचे गाव पाटण इथून सुरवात करु🏘️. या आधी २ वेळा लोहगड मार्गे गायमुखी दरवाजाने गडावरती आलो होतो. म्हणून या वेळी पाटण वरून जायचे ठरवून निघालो. भर दुपारी १२ वाजता🌤️ पाटण या गावी पोहचलो. पाटण गावचे ग्रामदैवत वाघजाई मंदिर 🛕 मध्ये नमस्कार केला व मंदिरा मधील गावकऱ्यांना मार्ग विचारून घेतला व त्या दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये विसापूरच्या दिशेने चालायला सुरवात केली.
|
पाटण गावचे ग्रामदैवत वाघजाई मंदिर 🛕 |
|
पाटण गावचे ग्रामदैवत वाघजाई मंदिराचा गाभारा 🛕 |
डोंगरा मध्ये जाणाऱ्या खूप वाटा आहेत पण तशी पूर्ण मळलेळी वाट व वाटेमध्ये दगडा वरती चुन्याने बनवलेले दिशादर्शक बाण ➡️ आहेत. गावातुन थोडे अंतर चालून जाताच दगडा मध्ये कोरलेल्या ४० एक पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या पारकरून पुढे उजव्या बाजूला गेलो व एक डोंगर पार करून पठारावती पोहचलो. तेथून डावीकडे धनगर वस्तीकडे वाट जाते तिकडे न जाता पुढे सरळ वरती जंगलाच्या वाटेने निघालो. ती इतकी घनदाट जंगलाची वाट 🌳🎋आहे की दुपारी उन्हाची झळ देखील लागू दिली नाही.
|
दगडा मध्ये कोरलेल्या पायऱ्या |
|
पठारावरून दिसणारा विसापूर किल्ला |
जंगलाची वाट संपवून पुढे तुटलेल्या दगडांच्या पायऱ्यांची वाट चालू झाली. तेथून पुढे येताच दगडामध्ये कोरलेला हनुमान व त्याला लागूनच मोठी गुहा पाहायला मिळाली. तेथूनच सुस्थितीत असलेल्या दगडातील पायऱ्यांची वाट चालू झाली. वाट संपवून वरती येताच गडावरती प्रवेश झाला. तेथून पुढे आम्ही डाव्या बाजूने गडाला फेरा मारायचा म्हणून निघालो. समोरच गडावरती असलेली तोफ पाहायला मिळाली.
|
विसापूर किल्ला - पायऱ्यांचा वाटेवरील हनुमान
|
|
विसापूर किल्ला - पायऱ्यांचा वाटेवरील गुहा
|
|
विसापूर किल्ला - पायऱ्यांचा वाटेवरील गुहेचा आतील बाजू
|
|
विसापूर किल्ला - पायऱ्यांची वाट |
|
विसापूर किल्लावरिल तोफ
|
पुढे तटबंधी सोडून थोडेसे उजव्या बाजूला पाण्याचा टाक्या व तलाव पाहून, महादेव मंदिर पाहायला गेलो🛕. तिथे मंदिर समोरील अंगणा मध्ये स्तंभ आहे त्या स्तंभा वरती २ बाजूला हनुमान, एका बाजूला गणपती व एका बाजूला सर्प कोरलेला पाहायला मिळाला. तसेच मंदिर समोर २ नंदी व मंदिरामध्ये प्राचीन काळातील शिवलिंग पाहायला मिळाले. मंदिरा मागे लहानसे पुष्कर्णी आहे.
|
विसापूर गडावरील पाण्याचे टाके |
|
विसापूर गडावरील महादेव मंदिराचा बाजूचा तलाव |
|
विसापूर गडावरील महादेव मंदिर |
|
विसापूर किल्ला - महादेव मंदिरातील शिवलिंग |
|
विसापूर किल्ला - महादेव मंदिरा समोरील स्तंभा वरील २ बाजूला असलेले हनुमान |
|
विसापूर किल्ला - महादेव मंदिरा मागील लहानशी पुष्कर्णी
|
तेथून पुढे मंदिरा समोरील दिशेला (पूर्वेकडे) मोठया प्रमाणात असलेल्या पाण्याचा टाक्या पाहिल्या, पुढे असलेले अवशेष पाहून समोरच दिसत असलेला ध्वजस्तंभ 🚩 व गोल बुरुज पाहिला. तेथून माघारी गडाचा दक्षिण दिशेला पाण्याचे टाके, तलाव व डाव्या बाजूला दिसत असलेला तिकोना किल्ला, तुंग किल्ला ⛰️ व पवना धरणाचा जलाशय 🏝️पाहत पुढे चालून गेलो. पुढे गायमुखी मार्ग जवळचा व सोपा असल्याने बरेच लोक गडावरती येताना व तितकेच लोक गड उतरून जाताना दिसत होते.
|
विसापूर गडावरील पाण्याचे टाक्या |
|
विसापूर गडावरील अवशेष |
|
विसापूर गडावरील ध्वजस्तंभ व गोल बुरुज |
तेथून पुढे मंदिरा समोरील दिशेला (पूर्वेकडे) मोठया प्रमाणात असलेल्या पाण्याचा टाक्या पाहिल्या, पुढे असलेले अवशेष पाहून समोरच दिसत असलेला ध्वजस्तंभ 🚩 व गोल बुरुज पाहिला. तेथून माघारी गडाचा दक्षिण दिशेला पाण्याचे टाके, तलाव व डाव्या बाजूला दिसत असलेला तिकोना किल्ला, तुंग किल्ला ⛰️ व पवना धरणाचा जलाशय 🏝️ पाहत पुढे चालून गेलो. पुढे गायमुखी मार्ग जवळचा व सोपा असल्याने बरेच लोक गडावरती येताना व तितकेच लोक गड उतरून जाताना दिसत होते.
|
विसापूर गडावरील पाण्याचे टाक्या |
|
विसापूर गडावरील चुण्याचा घाणा |
|
विसापूर गडावरील जात |
|
विसापूर गडाचा दक्षिण दिशेचा ध्वज व मागे लोहगड किल्ला |
पुढे तटबंधी सोडून उजव्या हाताला दिसत असलेला टाक्यातील हनुमान पाहिला व तेथे असलेली टाकी पाहून समोर दिसत असलेल्या कोठाराकडे / वाडाकडे निघालो. ते वाडे दुमजली, मुख्य वाड्याला दुप्पट भिंत बांधलेली व समोर मोठे अंगण होते असावे असे जाणवते. ते पाहून आम्ही गडाच्या उत्तर दिशेला असलेल्या पाण्याचा टाक्या, टाक्यांचा बाजूला असलेला हनुमान पाहिला. पुढे बुरुज 🚩 व तेथे असलेली तोफ पाहून माघारी फिरलो. ज्यामार्गे गडावरती आलो होतो तिकडे निघालो वाटेत असलेली उंचचउंच तटबंधी व पाण्याच्या टाक्या पाहून गड उतरायला सुरवात केली.
|
विसापूर गडाची तटबंधी |
|
विसापूर गडाची तटबंधी व मागे लोहगड किल्ला |
|
विसापूर गडावरील पाण्याचा टाक्यातील हनुमान |
|
विसापूर गडावरील कोठाराचे अवशेष |
|
विसापूर गडावरील कोठाराचे अवशेष |
|
|
विसापूर गडावरील कोठाराचेअवशेष
|
|
|
विसापूर गडावरील कोठाराचे अवशेष |
|
|
विसापूर गडावरील पाण्याचा टाक्यांचा बाजूला असलेला हनुमान |
|
विसापूर गडावरील उत्तर दिशेला असलेल्या बुरुजा वरील तोफ |
|
विसापूर गडावरील उंच तटबंधी |
|
विसापूर गडावरील पाण्याचा टाक्या |
पाटण गावमधून विसापूर गडावरती जाण्यासाठी १ ते १.५ तास लागतो. विसापूर गडाचा परिसर खूप मोठा असल्या कारणाने पूर्ण गड फिरण्यासाठी किमान ३-४ तास लागतात. संपूर्ण गडाला फेरा मारताना प्रकर्षाने जाणवते कि गडावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या टाक्या आहेत. गडाला पूर्वी संपूर्ण तटबंधी बांधण्यासाठी लागणारे दगड हे याच पाण्याच्या टाक्या व तलावातील खोद काम करून काडलेले दगड वापरले असावेत. गडाचा मधोमध लहान घनदाट झाडीची टेकडी आहे. गावकऱ्यांचा माहिती नुसार गडावरती व गडाच्या आजूबाजूने असे एकूण २१ हनुमान कोरलेले होते. त्यापैकी आता आम्हाला गडावरती फक्त ५ हनुमान मूर्ती पाहायला मिळाल्या