रविवार
११-मार्च-२०१८,
पहाटे
५:३०
वाजता मी व पदमसिंह चव्हाण
चिंचवड मधून दुचाकी घेऊन
निघालो. त्यानंतर
आम्ही गाडी थांबवली ती थेट
भोर मध्येच. भोरचा
बाझार पेठेमध्ये हॉटेल, दुकाने.... पहाटे चालू करायची लगबग दिसत
होती. तेथील एका हॉटेल मध्ये
आम्ही नाश्ता करून भोरच्या
दक्षिणेस सुमारे ६ ते ८ कि.मी. वर
रोहिडा किल्लाचा पायथ्याशी
वसलेले बाजारवाडीकडे निघालो.
सूर्य
डोंगररांगेतून डोकाहून पाहत
होता. तो
मनमोहोक सूर्योदय पाहत आम्ही
बाजारवाडी येथे पोहचलो.
पहाटे
७:३०
वाजता प्रसन्न अशा वातावरणामध्ये
आम्ही गड चढायला सुरवात केली. साधारण तासाभरात आम्ही पहिल्या
दरवाजा पाशी पोहचलो. पुढे १५
ते २० पायऱ्या चढताच दुसरा
दरवाजा लागला. येथून आत गेल्यावर
उजव्या हाताला भुयारी पाण्याचे
टाके पाहिले. व पुढे थोड्या
पायऱ्या चढुन जाताच तिसरा
दरवाजा लागला. यावर दोन्ही
बाजूला कोरीव शिलालेख व हत्तीचे
शीर कोरलेले आहेत. दरवाजाचा
आजुबाजूच्या तटबंदीची पडझड
झालेली दिसली.
येथून
आत शिरताच समोर सदर आहे डावीकडे, भैरोबाचे मंदिर आहे मंदिरा
समोर पाण्याचे टाके,
चौकोणी
थडगी आहेत.
मंदिरामध्ये
गणपती,
भैरव
व भैरवी या देवांचा मूर्ती आहेत.
मंदिराचा
डाव्या बाजूला वाड्यांचे
अवशेष पाहायला मिळाले. तेथून
पुढे जाताच भक्कम सुस्थितीत
असलेला बुरुज पाहिला व गडाचा
मागील बाजुने चालत आलो. तेथे
चुन्याचा घाणा पाहायला मिळाला. तेथून पुढे जाताच खूप व मोठे
पाण्याचे टाके पाहायला मिळाले. तेथून पुढे जाताच आणखीन एक
बुरुज पाहायला मिळाला. त्या
बुरुजा वरून डोंगररांगेमध्ये
एका डोंगरा वरती असलेले वाघजाई
देवीचे मंदिर दिसले. तसेच
समोर येता तटबंदी,
चोरदरवाजा
व अवशेष पाहायला मिळाले. काही
गडप्रेमी (मावळे)
माती
पडून बुजलेले कोठार खोदाई करून
स्वच्छ करत होते. गडाचे
नाव जरी विचित्रगड असले तरी
गड खूप सुंदर व पाहण्यासारखा
आहे. पूर्ण
गड फिरून झाल्या नंतर भैरवदेवाचा
मंदिरामध्ये बसून जेवण केले
व गड उतारायाला लागलो.
सकाळी
जाताना पायथ्याला रोड लगद
पुराणकाळातील मंदिर दिसले
होते ते पाहायला आम्ही थांबलो. मंदिराच्या आत शिरलो
ते संपूर्ण दगडी बांधकाम
असलेले छान सुंदर असे शिवलिंग
मंदिर आहे ते पाहून आम्ही
भोरकडे निघालो.
भोर
मध्ये दुपारी ०१:००
च्या सुमारास पोहचलो वेळ तर
खूप होता म्हणून आम्ही तेथून
शिरवळ लेणी पाहायला गेलो
(शिंदेवाडी
येथील). तशी
फारशी प्रसिद्ध नाही त्या
मुळे जाताना विचारणा केली तर
कोणीच सांगु शकत नव्हते,
google चा
वापर करत व परत एकट्याला विचारले
असता त्याने उलट विचारले
पांडवधरा का ?
आम्ही
हो म्हणालो,
मग
त्यांने सांगितलेल्या कच्चा
रसत्याने गाडी जेथे पर्यंत
जाते तेथे पर्यंत नेली व समोर
डोंगरामध्ये लेणी दीसली त्या
दिशेने चालायला लागलो १०मि
.मध्ये
आम्ही लेण्यांपाशी पोहचलो,
तिकडे
सहसा कोणी फिरकत जरी नसले तरी
काहींनि थोडी अस्वच्छता पसरवली
आहे,
तिथे
१५ बौद्ध काळीन लेणी आहेत.
तसे
फारसे काही कोरीव लेणी नाही
आहेत पण एका लेणी मध्ये शिवलिंग,
बौद्ध
स्तूप व एक मोठी लेणी स्वच्छ
नितळ पाण्याने भरलेली आहे
तेथील शांततेमध्ये थोडा वेळ
विश्रंती घेतली व परतीचा
मार्गाला लागलो.
©सुशील राजगोळकर
महाराष्ट्र, सह्यांद्री, दुर्ग, गड, किल्ले, महाराष्ट्रातील किल्ले, प्रवास, निसर्ग, भटकंती, छायाचित्र, लेणी, प्राचिन मंदिरे, पुरातन मंदिरे, समुद्र किनारे, शोध, धाडस, मंदिरे, Maharashtra, Trek, Trekking, Trekker, Nature Lover, Traveler, Photography, Fort, Fort in Maharashtra, Sahyadri Mountain, Old Temples, Caves, Adventure, Explorer, Trails.
रोहिडा (विचित्रगड) । शिरवळ लेणी ROHIDA & SHIRWAL CAVES
हरिहरगड उर्फ हर्षगड HARIHAR HARSHGAD
"हरिहरगड
गिर्यारोहकांसाठी प्रसिद्ध
आहे तो म्हणजे 'सरळ
उभ्या'
व
'बोगदयामधुन
जाणाऱ्या'
कातळ
कोरीव चित्तथरारक पायऱ्यासासांठी."
कितेक
दिवसापासुन हरिहरगड पहायची
खुप ईच्छा होती पण नियोजण होत
नव्हते,
एक
दिवस अरूण गवेकर यांचा संदेश
आला "जाणता
राजा ट्रेकर्स"
आयोजित
हरिहरगड रविवार दि.
07/01/2018 ला
आहे,
लगेचच
मि अजितला फोन केला,
तो
म्हणाला पप्पा व मि जाणारा
आहे आणि तु पण येत आहेस,
अजितने
माझे येणे त्याच्यासाठी
निश्चित केले,
मला
मात्र प्रश्न पडला ट्रेकचे
नियोजन ठाणेहून आहे ?
मला
ठाणे पुण्याहून गाठायचे आहे
?
ट्रेकला
जायचे तर आहेच,
मग
कसे ?
मग
मी ठरवले व शुक्रवारी रात्रीच
अजितकडे मुंबईला गेलो व तेथून
आम्ही शनिवारी रात्री १२:००
वाजता ठाणे येथुन नियोजणा
प्रमाणे निघालो.
रविवार
दि.
०७/०१/२०१८
पहाटे ०४:३०
वाजता आम्ही "आद्य
ज्योतिर्लिंग श्री त्रंबकेश्वर" येथे
पोहचलो,
तेथेच
थोडे आवरून त्रंबकेश्वरचे
दर्शन घेतले व नाश्ता उरकुन "हर्षेवाडी" गाठली,
सकाळचे
०८:३०
वाजले होते,
तेथेच
एकमेकांचा परिचय सत्र झाले,
तज्ञ
सदस्यांनी गडाचा परिचय व ट्रेक
मधील खाच खळग्यांची माहिती
दिली.
१.३०
तासाचा चढाई नंतर आम्ही १०:३०
वाजता पायऱ्यांपाशी पोहचलो,
सरळ
व तीव्र चढाईच्या या पायऱ्या
बांधलेल्या जिन्यासारख्या
वाटतात,
तशा
या चढाईसाठी अवघड आहेत पण
जागोजागी आधारासाठी खोबण्या
केलेल्या आहेत त्याचा सहाय्याने
आम्ही पार केल्या,
पायऱ्यांचा
शेवटी बांधलेला मुख्यदरवाजा
अजूनही सुस्थितीत आहे,
तेथेच
एका दगडामध्ये कोरलेला लहानसा
पण सुंदर सुबक असा गणपती आहे,
त्याला
नमस्कार करून आम्ही पुढे कातळ
कोरून तयार केलेला रस्ता,
याच्या
एकबाजूला कातळ तर दुसऱ्या
बाजूला आहे खोल दरी.
तसेच
पुढे गेल्यावर पायऱ्यानिशी
असलेला बोगदा व पुढील दोन
दरवाजे असा हा पुर्ण अदभुत
मार्ग सावधगिरीनेच पार करून
गडावरती पोहचलो.
"इतिहास
असे सांगतो,
कॅप्टन
ब्रिग्ज हा इग्रंज अधिकारी
या पायऱ्या नष्ट करायला आला
होता पण तो या पायऱ्या पाहताच
त्यांचा मोहात पडला व तसाच
माघारी परतला,
ज्यांनी
हे निर्माण केले आहे त्याचे
कौतुक करावे तितके कमीच,
या
मार्गाचे वर्णन शब्दात
करणं कठिणच."
गडावरती
पाहायला पडझड झालेल्या वास्तू,
गुप्त
दरवाजा,
पाण्याची
टाके,
पावसाळी
तलाव,
नंदी
,
शिवलिंग,
हनुमान
मंदिर,
कोठार
व गडाची सर्वोच माथ्याची टेकडी
आहे,
हे
सर्व गडावरती पाहून झाल्यानंतर
आम्ही तलावाकाठी झाडाच्या
सावलीमध्ये सर्वानी आणलेले
डबे एकत्र बसून खाले व परत
तितक्याच काळजीपूर्वक गड
उतरण्यास सुरुवात केली.
निम्म्यात
आल्यावर पठारावरती हर्षेवाडीच्या
बाजूस एक आश्रम,
दगडी
बांधलेला कुंड (तलाव),
कुंडाचा
भिंतीवरती कोरलेला शिलालेख
व गणपती आहे ते पाहुन तेथून
थोडेसे जंगलामध्ये पुढे जाताच
तेथे हनुमानाचे मंदिर आहे व
मंदिराचा समोर दगडामध्ये शिव
शंकराची प्रतिमा कोरलेली आहे
हे सर्व पाहून दुपारचे २:३०
वाजता आम्ही हर्षेवाडी येथे
पोहचलो व लगेचच मुंबईचा दिशेने
निघालो व रात्री ०८:००
वाजता ठाणे येथे पोहचलो.
अशाप्रकारे
या वर्षीच्या ट्रेक चा श्रीगणेशा
झाला.
"इतिहासाची
साक्ष देत असलेला हा गड पहायला
व अनुभवायला मिळाला,
हे
आमचे भाग्यच!!!"
©सुशील राजगोळकर
Subscribe to:
Posts (Atom)
"घनगड" ⛰️ निरवचा ५० व्या किल्याची भटकंती. 🚗⛰️ | Ghangad & Tailbailla - Lonavala 11-January-2026
मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...
-
खूप दिवसांपासून मुलगा म्हणत होता ट्रेकला जाऊया ना पप्पा, नेमकं बायकोला पण रायगड पहायचा होता. मग काय केला प्लॅन रायगडाचा..! अन अखेर तो दिवस उ...
-
मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...
-
हम्पी हे एक भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे . हम्पीचे अवशेष हे युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे . ख...
Note :
भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.



