२८ डिसेंबरला संध्याकाळी विवेकचा फोन आला, दादा ४ दिवस कोकण फिरायला जाऊया
? मी कामा मध्ये असल्याने काही जास्त न-बोलता बघुया असे म्हणून फोन ठेवून
दिला. २९ ला रात्री फोन वरती बोलने झाले व जायचे निश्चित केले. ४, ५ की ६
दिवसांचा प्रवास ? कधी कुठे मुक्काम ?
१ जानेवारी ते ६ जानेवारी २०२२, ६
दिवसाचा प्रवास 🛣️, १ गाडी 🚘, ५ जण 👩❤️👨👨👩👦, १६ मंदिरे🛕, ७
किल्ले 🏰, कित्येक समुद्र किनारे 🌊 🏝️ व इतर खुप काही पाहीले.
२ दिवसा मध्ये थोडीफार जुजबी माहिती जमवली व निघालो प्रवासाला..........
शनिवार ०१ जानेवारी २०२२, दिवस पहीला : वाई, मेणवली
सकाळी
काही कारणास्तव निघायला उशिर झाला. दुपारी "वाई महागणपतीच्या" 🛕 दर्शनाने
६ दिवसांचा प्रवासाची सुरवात केली. वाई कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक
धार्मिक क्षेत्र. काही जण वाईला दक्षिण काशी मानतात. सरदार रास्ते यांनी
१७६२ मध्ये बांधलेले, एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे
गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे. मंदिरा शेजारीच
अजून एक दगडामध्ये बांधलेले "श्री काशी विश्वेश्वर मंदिर" 🛕 पाहिले.
मंदिरा बाहेर मोठा नंदी व गाभाऱ्या मध्ये पुरातन शिवलिंग आहे त्याचे दर्शन
घेतले व पुढे मेणावली कडे निघालो.
प्रथम "मेणावली" येथे असलेला "नाना
फडणवीस वाडा" पाहिला. 🏛️ वाडा त्यांचा वंवशजांनि वेवस्तीथ ठेवला आहे.
वाडामध्ये मार्गदर्शक आहेत ते वाडाची संपूर्ण माहिती देतात. वाड्याला
प्रशस्त असा महादरवाजा आहे त्या वरती नगारखाना आहे. वाड्या मध्ये शिरता
समोर गणेश चौक, डाव्या बाजूला पडवी तर उजव्या बाजूला विहीर आहे. गणेश चौकात
वाईचा गणपतीची लहान प्रतिकृती ठेवलेली पाहावयास मिळाली. वाडाचा माळा वरती
कचेरी, कलादालन, खलबतखाणा, दप्तर, नक्षीदार लाकडी छत व इतर खोल्या पाहायला
मिळाल्या. तसे वाड्याचा समोर भला मोठा वृक्ष आहे त्याचे नाव गोरखचिंच. 🌳
त्याचे मूळ आफ्रिकेतील असून तेथे त्याचे नाव बाओबाब असे आहे. वाडा पाहून
झाल्यानंतर वाड्याचा मागील बाजूस नदी वरती सुंदर असा घाट बांधलेला आहे,
तेथे एक लहान मंदिर 🛕आहे. शिवलिंगाला नमस्कार करण्यासाठी अंधाऱ्या
गाभाऱ्यामध्ये १० पायऱ्या उतरुन जावे लागले. मंदिरा समोर सुंदर नक्षीकाम
कोरलेला नंदी व एका लहान मंडपामध्ये वसई येथील युद्धात जिंकून घेऊन आलेली
एक घंटा 🔔पाहायला मिळाली.
पुढे वाई पाचगणी मार्गे मॅप्रो 🍓 गार्डन
येथे आलो थोडे थांबून महाबळेश्वर कडे निघालो. उशिर झाल्याने पहिल्या
दिवशीचा मुक्काम महाबळेश्वर येथे करायचे ठरवले. निरवने प्रश्न केला हाँटेल
मध्ये रहायचे ? मि हो म्हणालो. फ्रेश होऊन रात्रीचे जेवण केले व त्या
झगमगत्या महाबळेश्वरचा बाझार पेठेत 🌃 फेरफटका मारून पहिला दिवशीचा मुक्काम
महाबळेश्वर येथे केला.
|
वाईचा गणपती |
|
नाना फडणवीस वाडा - मेणवली |
|
मेणवली घाट |
रविवार ०२ जानेवारी २०२२, दिवस दुसरा : महाबळेश्वर, पंचगंगा मंदिर, प्रतापगड, राजवाडी
पहाटे
लवकरच जुने महाबळेश्वर गाठले व प्रथम तेथे असलेल्या "महाबळेश्वराचे" दर्शन
घेतले🛕, या महाबळेश्वर मंदिरा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेब
जिजामाता यांची सुवर्णतुला केली होती. मंदिरा मधील नंदी व शिवलिंग देखील
वेगळ्या विशिष्ट प्रकारचे पाहायला मिळाले. नंदीचा समोरच एक देवी देखील
कोरलेली पाहायला मिळाली. मंदिरा शेजारी असलेल्या "अतिबळेश्वराचे" 🛕 व पुढे
असलेल्या "महादेव मंदिरा" 🛕 मध्ये दर्शन घेऊन "पंचगंगा मंदिरा" मध्ये
प्रवेश केला🛕. या मंदिरा मधून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि
गायत्री या पाच नद्यांचा उगम झालेला पाहिला. या मंदिराचा मध्य भागी
पाण्याचा कुंड तर भोवताली मोठा खांबावरती उभे पुरातन मंदिर आहे पण छत आता
बसवलेले आहे. तेथून पुढे "कृष्णा देवी मंदिरा" 🛕 कडे गेलो. हे मंदिर खुप
पुरातन असल्याचे जाणवले. हे मंदिर पूर्ण काळया पाषाणामध्ये बांधलेले दिसले.
तेथूनच तो सकाळचा रम्य सूर्योदय पाहिला 🌅. मंदिराचा मागील बाजूला
असलेल्या देवीची मूर्ती नाग देवीची असावी शरीर देवीचे, डोक्यावर नागफणी व
कंबरे खालील पुर्ण भाग सर्पाचा दिसतो. मंदिराला प्रदक्षिणा मारून माघारी
फिरलो.
|
महाबळेश्वर मंदिर - महाबळेश्वर |
|
अतिबळेश्वर मंदिर - महाबळेश्वर |
|
अतिबळेश्वर मंदिर - महाबळेश्वर |
|
कृष्णा देवी मंदिर - महाबळेश्वर |
|
नाग देवता, कृष्णा देवी मंदिर - महाबळेश्वर |
पुढे
आमची गाडी "प्रतापगड" कडे चालवली. गाडीतळ पासून थोडे पुढे व काही पायऱ्या
चढून जाता महाद्वारातून किल्ल्यावरती प्रवेश केला. 🏰 सर्व शिवकालीन
किल्ल्या प्रमाणेच या किल्ल्याची महाद्वाराची गोमुखी रचना आहे. तेथेच एक
तोफ देखील पाहायला मिळाली. तेथून पुढे असलेला पाण्याचा तलाव व पालखी मार्गा
वरील दरवाजे पाहिले व माघारी येऊन भवानी मातेचा मंदिरा मध्ये प्रवेश केला.
मंदिरामध्ये सरनौबत हंबीरराव मोहिते यांची तलवार ⚔️पाहिली. तसेच मंदिराचा
शेजारी असलेल्या तोफा पाहून बाल्लेकिल्ल्याकडे निघालो. बाल्ले किल्ल्याचा
दरवाजातून प्रवेश करता समोर असलेल्या केदारेश्वर मंदिर 🛕 मध्ये नमस्कार
केला. मंदिराचा गाभाऱ्यामध्ये शिवलिंग व बाहेर गणपती व हनुमानाची मूर्ती
आहे. पुढे मंदिराचा मागिल बाजूला असलेला गुप्त दरवाजा पाहिला व तेथूनच
किल्ल्याचा तटबंदी वरून फेरा मारायला सुरुवात केली. तटबंदी वरून समोर
असलेला आणखीन एक गुप्त दरवाजा पाहिला. पुढे बाल्ले किल्ल्यातील विहिरी
पासून खाली तलाव व टाके पाहून तिहेरी बुरुजापाशी आलो. तेथून दिसणारा बुरुज,
किल्ल्याची तटबंदी, बाल्ले किल्याची तटबंदी पाहून माघारी बालेकील्याचा
तटबंदी वरून फेरा मारत छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती व बागेपाशी आलो.
तेथे थोडी विश्रांती घेतली व गडावरील एका हॉटेल मध्ये जेवण केले. पुढे
प्रतापगडाचे मुख्य आकर्षण असलेल्या बुरुजाकडे गेलो. बुरुजाला दुहेरी तटबंदी
आहे त्याला फेरा मारता येऊ शकतो पण एका बाजूचा दरवाजा बुजलेला आहे. या
तटबंदी मध्ये शिवकालीन सौचकुप देखील आहे. बुरुज पाहून आम्ही गड उतार झालो.
सोमवार ०३ जानेवारी २०२२, दिवस तिसरा : गणपतीपुळे, कवी केशवसुत जन्मस्थान, जयगड, कऱ्हाटेश्वर देवस्थान, जय विनायक मंदिर, रत्नदुर्ग
सकाळी
उठून "श्री देव गणपतीपुळेचे" 🛕 दर्शन घेतले व समुद्र किनारी 🌊 थोडे मोज
मज्जा केली. पुढे सकाळचा नाश्ता केला व हॉटेल सोडले. पुढे मालगुंड या गावी
"कवी केशवसुत यांचे जन्मस्थान" पहायला आलो. त्यांचे कौलारू घर 🏡,
ग्रंथालय 📚 व इतर खूप साऱ्या कवी, कवीयत्री यांचा प्रतिमा व कवितांचे
एकत्र दालन उभारले आहे. येथिल कविता वाचून शाळेमध्ये सुरात गायलेल्या कविता
आठवल्या. येथिल कवितांचे फोटो घेतले व गाडी मध्ये वाचत जयगड पाहायला
निघालो.
|
श्री देव गणपतीपुळे मंदिर - गणपतीपुळे |
|
गणपतीपुळे समुद्रकिनारी |
|
कवी केशवसुत जन्मस्थान - मालगुंड |
|
कवी केशवसुत जन्मस्थान - मालगुंड |
🏰
"जयगड" किल्ल्याला प्रवेश करतानाच भर भक्कम बुरुज दिसला त्या बुरजामध्ये
दडलेल्या महाद्वारातून किल्ल्यामध्ये प्रवेश केला. किल्ल्याचा तटबंदी वरून
किल्ल्याला पूर्ण फेरा मारता आला. किल्ला समुद्रकाठी असल्याने फेरा मारताना
समुद्राचे दर्शन झाले. मुख्य किल्याला एकूण १४ बुरुज आहेत. किल्याचा समोर
तसेच बाजूने किल्याला खंदक आहे. किल्ल्यामध्ये गणपती मंदिर 🛕, गोड्या
पाण्याचा
विहिरी, दारूखाना, धान्यकोठार, ब्रिटिशांचा काळातील ईमारत व इतर अवशेष
पाहायला मिळाले.
|
बुरुजामधील महादरवाजा - जयगड |
|
दारू कोठार - जयगड |
|
किल्याची तटबंदी व इतर अवशेष - जयगड |
|
ब्रिटिशांचा काळातील ईमारत व इतर अवशेष - जयगड |
|
धान्यकोठार - जयगड |
|
तटबंदी मधील खोल्या - जयगड |
पुढे
तेथून जवळच JSW कंपनीला वळसा मारून "कऱ्हाटेश्वर देवस्थान" - नांदिवडे
पाहायला गेलो. 🛕 मंदिरा पासून थोडे खाली पायऱ्या उतरून जाता पिण्याचा
पाण्याचा झरा होता. तेथील थंड पाण्यामध्ये ओंजळीने पाणी पिऊन तहान भागवली.
तेथे समुद्र काठी मोठा जांबा दगडाचा खडका वरती बसून थोडी फोटोग्राफी केली.
तेथील एकदम शांत, निर्मल अशा वातावरणा मध्ये मन प्रसन्न झाले. पुढे तेथून
माघारी गणपतीपुळे रोडला निघालो वाटेमध्ये असलेले JSW कंपनीने सुंदरअसे
"श्री जय विनायक मंदिर" 🛕 व उद्यान 🎋🪴🌴 उभारले आहे तेथे थोडे थांबून
पुढे रत्नागिरीकडे निघालो. वाटेत असलेला "अरे वारे" 🏝️ समुद्र किनारा
पाहिला.
|
कऱ्हाटेश्वर देवस्थान - नांदिवडे |
|
कऱ्हाटेश्वर देवस्थान - नांदिवडे |
|
कऱ्हाटेश्वर देवस्थान - नांदिवडे |
|
श्री जय विनायक मंदिर |
|
श्री जय विनायक मंदिर |
|
गणपती मूर्ती गाभारा - श्री जय विनायक मंदिर |
|
हनुमान मूर्ती - श्री जय विनायक मंदिर |
|
श्री जय विनायक मंदिर |
|
श्री जय विनायक मंदिर |
|
अरे वारे समुद्र किनारा
|
पुढे
"रत्नदुर्ग" (भगवती किल्ला) 🛕 पाहायला आलो. रत्नागिरी शहरापासून अवघ्या २
ते ३ कि.मी. वर असणारा रत्नदुर्ग हा त्यावरील अत्यंत सुंदर भगवती
मंदिरामुळे 🛕 पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे. येथून
दिसणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृष्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या
किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे या आकर्षणात भरच पडली आहे. रत्नदुर्ग
रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर
बांधण्यात आला आहे. तसेच किल्ल्या वरती दीपगृह देखील आहे. जायला थोडा वेळ
झाल्याने पूर्ण किल्ला फिरून पाहत आला नाही. पुढे रत्नागिरी येथील "बाळ
गंगाधर टिळक" यांचे जन्मस्थान पाहायला आलो पण सोमवारी ते बंद होते त्या
मुळे बाहेरूनच पाहिले.
|
भगवती मंदिर - रत्नदुर्ग (भगवती किल्ला) |
|
कानोजी आग्रे यांची मूर्ती - रत्नदुर्ग (भगवती किल्ला) |
|
भगवती मातेची मूर्ती - रत्नदुर्ग (भगवती किल्ला) |
|
रत्नदुर्ग (भगवती किल्ला) |
|
रत्नदुर्ग (भगवती किल्ला) |
|
लोकमान्य टिळक जन्मस्थान - रत्नागिरी |
|
लोकमान्य टिळक जन्मस्थान - रत्नागिरी |
पुढे
पावस वरून पूर्णगड जवळ जाऊन राहायचे व सकाळी पूर्णगड पाहून पुढे असे ठरवून
निघालो. पण तिथे जवळ पास राहायची काहीच सोय नव्हती. शेवटी तेथून १ ते २
किलोमीटर पुढे गावखडी समुद्राकाठी एक साई अंश रेस्टोरेंट आहे (अभय तोडणकर-
९३२५००५४३६), तेथे मस्त असा मासळी जेवणा वरती ताव मारला 🐟 व त्यांना
विचारून त्यांचा हॉटेल येथे आमचे तंबू ⛺ (टेन्ट) लावले. निरव खूप आनंदी
झाला, त्याला आज टेन्ट व स्लिपिंग बॅग मध्ये रहायला मिळणार म्हणून. निरवने
टेन्ट लावायला मदत केली व तिसऱ्या दिवसाचा मुक्काम टेन्ट 🏕️ मध्ये
रात्रभर समुद्राच्या लाटांचे आवाज ऐकत 🌊🌊.
|
साई अंश रेस्टोरंट - गावखडी |
|
साई अंश रेस्टोरंट, येथे आमचे तंबू - गावखडी |
|
साई अंश रेस्टोरंट - गावखडी |
मंगळवार ०४ जानेवारी २०२२, दिवस चौथा : पूर्णगड, श्री कनकादित्य मंदिर, विजयदुर्ग, कुणकेश्वर
सकाळी
टेन्ट ⛺ दवबिंदुने ओले झाल्यामुळे तिथेच ठेऊन पूर्णगड पाहायला निघालो.
सकाळची कोवळी सूर्यकिरणे 🌅 गाडीमधून पाहताच मन रहावले नाही म्हणून लगेच
गाडी पूर्णगड समुद्र किनार पट्टी 🏝️ वरती थांबवली. तो सकाळचा रम्य
सूर्योदय डोळ्यात सामावून घेतला व मग गाडी माघारी फिरवली.
|
पूर्णगड समुद्र किनारा - पूर्णगड |
|
पूर्णगड समुद्र किनारा - पूर्णगड |
पुढे
"पूर्णगड" 🏰 किल्याचा पायथ्याला असलेल्या "सिद्धेश्वर व राम मंदिर" 🛕
येथे गाडी पार्क केली. इतर कोकणातील मंदिरा प्रमाणे लाकडी खांबावर उभे व
कौलारू मंदिर आहे, दोन्ही मंदिरा मध्ये नमस्कार केला व तेथून ५ ते १०
मिनिटांचा चढाई नंतर पूर्णगड किल्यापाशी पोहचलो. किल्ला सकाळी ९ वाजता खुला
करतात, आम्ही तेथे ८ वाजता पोहचलो होतो. मग तेथे गावकऱ्यांना विचारले व
संतोष शिरवडकर यांच्या कडे किल्ल्याची चावी असते त्यांनी आम्हाला किल्ला
खुला करून दिला. किल्ल्याचा मुख्य दरवाजा बाहेरच एक लहान मारुतीचे मंदिर 🛕
पाहायला मिळाले. दरवाजावर गणेश तसेच चंद्र- सूर्याची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या
आत पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. किल्ला जरी लहान असला तरी अता त्याचा
जीर्णोद्धार खूप छान प्रकारे केलेला आहे. २ दरवाजे व ७ बुरुजांनि सुरक्षित
असा किल्ला पाहायला मिळाला. तटबंदीवरुन
गडाची पूर्ण फेरी मारता येते. किल्ल्याला तटबंदी वरून पूर्ण फेरा मारायला
१५ ते २० मिनिट लागतात. तर किल्ल्याचा बाहेरील बाजूने देखील छान असा फेरा
मारता येऊ शकेल असा जांबा दगडाचे चिरे बसवले आहेत. मराठी आरमाराचे प्रमुख
सरखेल कान्होजी आंग्रे यांनी पूर्णगड किल्ला बांधला.
|
सिद्धेश्वर मंदिर - पूर्णगड |
|
सिद्धेश्वर मंदिर - पूर्णगड |
|
राम मंदिर - पूर्णगड |
|
राम मंदिर - पूर्णगड |
|
राम मंदिर - पूर्णगड |
|
किल्याचा महादरवाजा - पूर्णगड किल्ला |
|
हनुमान मंदिर - पूर्णगड किल्ला |
|
समुद्र किनारा दिशेचा दरवाजा - पूर्णगड किल्ला |
|
पूर्णगड किल्ला |
|
पूर्णगड किल्ला |
|
पूर्णगड किल्ला |
|
पूर्णगड किल्ला |
पुढे
पूर्णगड सोडुन परत मुक्कामाचा ठिकाणी आलो व आमचे तंबू ⛺ आवरून कशेळी कडे
निघालो. कशेळी येथील प्रसिद्ध "श्री कनकादित्य मंदिर" 🛕 पाहिले. हे मंदिर
सुमारे १००० वर्षा पूर्वीची साक्ष देत आहे. मंदिरातील आदित्यची मूर्ती हि
सोमनाथ नजीकचा प्रभास पट्टण क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली
असावी. कशेळी गावात कनाका नावाची सूर्यउपासक राहत होती. कनकाबाईने मंदिर
बांधून आदित्याची स्थापना केली. अशी व इतर सविस्तर मंदिराची माहिती
मंदिराचा आवारामध्ये लावलेली आहे. तेथून पुढे आम्ही "विजयदुर्ग" 🏰पाहायला
निघालो.
|
श्री कनकादित्य मंदिर - कशेळी |
|
संक्षिप्त माहिती, श्री कनकादित्य मंदिर - कशेळी
|
|
श्री कनकादित्य मंदिर - कशेळी
|
साधारण
दुपारी २:३० वाजता "विजयदुर्ग" किल्ल्या पाशी येऊन पोहचलो. जवळपास १५ ते
२० बुरुजांनी भरभक्कम असलेला व किल्ल्याचा ३ बाजुंनी समुद्राचा लाटा झेलत
उभा असलेला विजयदुर्ग यावेळी दुसऱ्यांदा पाहत होतो. पूर्ण गड तटबंधी वरून
फेरा मारत फिरायला जवळपास १.३० तास वेळ लागला. प्रवेशव्दारातून आत
शिरल्यावर डाव्या बाजुने गडफ़ेरी चालू केल्यावर प्रथम आपल्याला खलबतखान्याची
इमारत, तेथुन पुढे सदरेची भव्य इमारत, पुढे बुरुजावरच बांधलेल्या दोन मजली
इमारती पहायला मिळाल्या, त्यांना माडी म्हणतात. पुढे राणीवसाची इमारत एका
भव्य बुरुजावर बांधलेली पाहायला मिळली. पुढे तटबंदीवर चढुन चालायला सुरुवात
केल्यावर अनुक्रमे गणेश, राम, हणमंत आणि दर्या बुरुज पाहायला मिळाले.
बुरुज व तटबंदीतील जंग्या, तोफ़ांसाठी ठेवलेले झरोके व बुरुजावर पाण्यासाठी
ठेवलेल्या दगडी डोणी पाहाण्या सारख्या आहेत. दर्या बुरुजाला असलेल्या
पायऱ्यावरुन खाली उतरल्यावर एक चौकोनी विहिर पाहायला मिळाली. त्याच्या पुढे
एक चुन्याचा घाणा आहे. चुन्याचा घाणा पाहून परत तटबंदीवर चढल्यावर
अनुक्रमे तुटका, शिकरा, सिंदे, शहा, व्यंकट, सर्जा, शिवाजी, गगन, मनरंजन
बुरुज पाहायला मिळाले. गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट
समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो. या बुरुजाला खुबलढा किंवा बारातोफा बुरुज
या नावाने ओळखतात. या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला
बोगदा बनवलेला आहे. पुढे एक वास्तू पाहायला मिळते. त्यावर दारुकोठार अस नाव
लिहिलेल आहे. पूर्ण किल्ला पाहून झाल्या नंतर आम्ही पुढे श्री क्षेत्र
कुणकेश्वरला आलो.
|
उधवस्त दरवाजा - विजयदुर्ग |
|
महादरवाजा - विजयदुर्ग |
|
तोफा - विजयदुर्ग
|
|
दारुगोळा कोठार - विजयदुर्ग |
|
बारातोफा, खुबलढा बुरुजाकडे जाणारी वाट - विजयदुर्ग |
|
बालेकिल्ल्याची तटबंदी, चौकोनी विहीर - विजयदुर्ग |
|
चुन्याचा घाणा - विजयदुर्ग |
|
तटबंदी - विजयदुर्ग |
|
तटबंदी - विजयदुर्ग |
|
तटबंदीवरील माडी - विजयदुर्ग |
|
तटबंदीवरील माडी - विजयदुर्ग |
|
सदरेकडील दरवाजा - विजयदुर्ग |
|
सदरेजवळील वास्तू - विजयदुर्ग |
"श्री क्षेत्र कुणकेश्वर" हे
निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आहे, कुणकेश्वराचे मंदिर कोकणात दक्षिण काशी
म्हणून ओळखले जाते. येथील शंकराची पिंड भव्यदिव्य असून, ती निसर्गनिर्मित
आहे असे सांगितले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम
आणि किनार्यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखणेपणात भर
पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज्यांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला
होता. पुढे आम्ही मालवण कडे निघालो. व चौथा दिवसाचा मुक्काम मालवण,
सिंधुदुर्ग किल्ल्या पासून जवळ.
|
कुणकेश्वराचे मंदिर - कुणकेश्वर |
बुधवार ०५ जानेवारी २०२२, दिवस पाचवा : मालवण, सिंधुदुर्ग किल्ला
सकाळी
उशिरा सुरुवात केली व नाष्टा साठी मालवण मधील एक प्रसिद्ध हॉटेल शोधून
घावणे वरती इथेचं ताव दिला. त्या नंतर चालत समुद्र किनारा गाठला. व बोटीतून
समुद्राचा आत मध्ये जाऊन "स्कूबा ड्राइव्ह आणि जलक्रीडा" 🏄🏼♂️
🚣🏻♂️केल्या. समुद्राचा तळाशी जाऊन रंगी बेरंगी लहान मोठे मासे 🐡 🐟 , इतर
जीवप्राणी 🦀🦐 पाहणे म्हणजे एक अविस्मरणीय नयन नजारा होता. स्कूबा
ड्राइव्ह आणि जलक्रीडा संपवून दुपारी हॉटेल मध्ये आलो व पुन्हा संध्याकाळी
ताजेतवाने होऊन "सिंधुदुर्ग किल्ला" 🏰 पाहायला गेलो. सिंधुदुर्ग
किल्ल्याच्या महादरवाजाची बांधणी देखील इतर किल्ल्या प्रमाणे गोमुखी,
शिवकालीन पध्दतीची आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महाद्वारात दगडात कोरलेला
हनुमान 🛕 आहे. महाद्वाराच्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत आल्यावर
उजव्या बाजूस असणाऱ्या पायऱ्या चढून गेल्यावर दोन छोट्या घुमट्या आहेत.
त्यातील खालच्या घुमटीत महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा व वरच्या घुमटीत
उजव्या हाताचा ठसा आहे. प्रवेशद्वारातून सिमेंटच्या बनविलेल्या रस्त्याने
चालत गेल्यास, उजव्या हाताला जरीमरीचे मंदिर, पुढे गेल्यावर महाराष्ट्रात
एकमेव असलेले श्रीशिवराजेश्वराचे मंदिर पाहीले. शिवराजेश्वर मंदिराच्या
मागे श्री महादेव मंदिर व मंदिरातच असलेली विहीर आहे. त्याच पदपथावरुन पुढे
गेल्यावर साखरबाव, दुधबाव व दहीबाव ह्या गोड्या पाण्याच्या विहीरी आहेत.
चारही बाजूंनी समुद्र असून सुध्दा ह्या विहीरींचे पाणी गोड आहे. ह्या
विहीरींच्या पुढे शिवरायांच्या वाड्याचे जोते आहे. वाड्याच्या अवशेषांच्या
पश्चिमेला किल्ल्याच्या तटबंदीपासून वेगळा व आत असलेला उंच बुरुज आहे. या
बुरुजाला दर्याबुरुज किंवा निशाणकाठी (झेंड्याचा) बुरुज म्हणतात. दरवाजातून
बाहेर आल्यावर एक छोटीशी चंद्रकोरीच्या आकाराची पुळण लागते. यास राणीची
वेळा म्हणतात. किल्ल्याला ४२ बुरुज आहेत. बुरुजांमधील तटबंदीची रूंदी ३ ते ४
मीटर आहे. किल्ल्याची नागमोडी तटबंदीची लांबी अंदाजे ४ किमी आहे. या
तटबंदि वरून किल्याला पूर्ण फेरा मारता येतो. किल्ल्याच्या तटबंदीत ४५
अरुंद जिने व कित्येक शौचकुप आहेत. किल्ला फिरून झाल्या नंतर बोटीनेच
माघारी आलो. व तिन दिवसांचा एक बाजूला समुद्र किनार पट्टीचा (कोस्टल रोड)
प्रवास संपवून पुढे कणकवलीला बहीनीकडे घरी जाऊन पाचव्या दिवसाचा मुक्काम
केला.
|
बुरुजामध्ये लपवलेला महादरवाजा - सिंधुदुर्ग किल्ला |
|
महादरवाजा जवळील दक्षिण मुखी हनुमान मंदिर - सिंधुदुर्ग किल्ला |
|
महादेव मंदिर - सिंधुदुर्ग किल्ला
|
|
महादेव मंदिर - सिंधुदुर्ग किल्ला
|
|
गोडया पाण्याची विहीर - सिंधुदुर्ग किल्ला |
|
भगवती देवी मंदिर - सिंधुदुर्ग किल्ला |
|
तटबंदी - सिंधुदुर्ग किल्ला |
|
तटबंदी - सिंधुदुर्ग किल्ला |
|
महादरवाजाची आतील बाजू - सिंधुदुर्ग किल्ला |
|
महादरवाजा वरील नगारखाना - सिंधुदुर्ग किल्ला |
गुरुवार ०६ जानेवारी २०२२, दिवस सहावा : गगनगड, अंबाबाई मंदिर, कोल्हापूर
पुणेला
लवकर पोहोचू म्हणून सकाळी कणकवली वरून लवकरच निघालो. आता समुद्र
किनारपट्टी पासून लांब, नारळाची झाडे, कोकणी वातावरणातील प्रवास संपवून
गगनबावडा घाटातुन जातांना "गगनगड" 🏰 खुणावू लागला. अन् घाट चडून वरती आलो व
गाडी गगनगड कडे वळवली. गाडीतळापासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
पायऱ्या चढून वर गेल्यावर डाव्या हाताला समोरच दगडातील एक प्रशस्त नैसर्गिक
गुहा आहे. गगनगिरी महाराजांचे या गडावर वास्तव्य होते, त्यांनी याच गुहेत
तपसाधना केली होती. त्यामुळे या गुहेत त्यांचे मंदिर बनवण्यात आले आहे.
गुहेच्या बाहेर कातळात कोरलेली भव्य हनुमंताची प्रतिमा आहे. त्याच्या
बाजूला राम, लक्ष्मण, सीता व शंकराची प्रतिमा आहेत. गुहेपासून पायऱ्यांचा
मार्गाने वर चढत गेल्यावर नवग्रह मंदिर आहे. मंदिरा जवळील बुरुजावर २ तोफा
आहेत. पुढे शंकराचे पूरातन मंदीर आहे. पूर्ण किल्ला फिरून माघारी फिरलो व
कोल्हापूरला आलो. थोडे रंकाळा तलावा वरती थांबून पुढे "श्री अंबाबाई मंदिर"
🛕 गाठले व अंबाबाईला नमस्कार करून आशीर्वाद घेतले व पुढे संध्याकाळी पुणे
गाठले आणि आमचा सहा दिवसाचा प्रवासाची सांगता केली.
© सुशील राजगोळकर
|
किल्ले गगनगड
|
|
किल्ले गगनगड
|
|
किल्ले गगनगड
|
|
किल्ले गगनगड
|
|
किल्ले गगनगड
|
|
किल्ले गगनगड
|
|
बुरुजावरील तोफ - किल्ले गगनगड
|
|
महादेव मंदिर - किल्ले गगनगड
|
|
श्री अंबाबाई मंदिर - कोल्हापूर |
|
श्री अंबाबाई मंदिर - कोल्हापूर |