उन्हाळा व इतर कारणामुळे खूप दिवस ट्रेकला जाऊ शकलो नाही. शेवटी अजित ला देखील रहावले नाही. आणि त्याने शुक्रवारी दुपारी १ वाजता फोन केला व उद्या कुठेतरी जाऊया असे सांगून लगेच मुंबई सोडून पुण्याला आला. मग रात्री थोडी चर्चा करून सासवड विभागामध्ये फिरायचे नियोजन ठरवले. शनिवारी सकाळी ०५:०० वाजता बाईकला किक मारली. पुढे केतकावळे पुणे येथील बालाजी मंदिरा मध्ये सकाळी ०७:०० वाजता पोहचलो. 🛕 त्या सकाळचा प्रसन्न अशा वातावरणा मध्ये पहिल्या आरती सोबत बालाजीचे दर्शन घेतले व पुढे नारायणपूरकडे निघालो.
|
बालाजी मंदिर - केतकावळे पुणे |
|
बालाजी मंदिर - केतकावळे पुणे |
नारायणपूर - नारायणेश्वर मंदिर व दत्त मंदिर 🛕
नारायणपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे. प्रथम तेथील पुरातन नारायणेश्वर मंदिरा मध्ये दर्शन घेतले. हे मंदिर पूर्णपणे दगडी बांधकाम असलेले पाहायला मिळाले. मंदिरा समोर नंदी आहे कदाचित या नंदी वरती पूर्वी सभामंडप असावा. मंदिरा वरील नक्षीकाम हे पाहण्या सारखे आहे. नारायणेश्वर मंदिरा भोवती पूर्वीची जुनी दगडी तटबंदी आहे. तसेच नारायणेश्वर मंदिरा शेजारी असलेल्या एक मुखी दत्त मंदिरा मध्ये दर्शन घेतले. हे दत्त मंदिर एक धार्मिक तीर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. दोन्ही मंदिरे पाहून झाल्या नंतर तेथून आम्ही पुरंदर किल्ला पाहायला निघालो.
|
नारायणेश्वर मंदिर - नारायणपूर |
|
नारायणेश्वर मंदिर - नारायणपूर |
किल्ले पुरंदर 🏰
०८:३० वाजता पुरंदर किल्ल्यापाशी येऊन पोहचलो पण किल्ला भारतीय सैन्याचा ताब्यात असल्यामुळे १०:०० वाजता पर्यटना साठी चालू झाला. आधिच कडक उन्हाळा म्हणून लवकर आलो होतो पण शेवटी ट्रेक उशीरा चालू झाला. नोंदणी करून सैन्याचा ताब्यात माझा कॅमेरा ठेऊन आम्ही किल्याचा दिशेने पुढे चालू लागलो. सुरवातीला माची वरती असलेले पद्मावती तलाव, चर्च, मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक व समाधी मंदिर, बिनी दरवाजा, महादेव मंदिर, मसनी विहीर, रामेश्वर मंदिर व पुरातन असे पुरंदरेश्वर मंदिर, हनुमान मंदिर पाहीले. माची वरून सर्व पाहात जातांना वरील दिशेला किल्याची तटबंदी स्पष्ट दिसत होती. पुरंदर किल्ला हा छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान. गडावरील पुरंदरेश्वर मंदिरा पासून जवळच आता छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व उद्यान उभारले आहे.
|
मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक व मागे पुरंदर किल्ल्याची तटबंदी |
|
चर्च - किल्ले पुरंदर |
|
बिनी दरवाजा - किल्ले पुरंदर |
|
पुरंदरेश्वर मंदिर - किल्ले पुरंदर |
|
पुरंदरेश्वर मंदिरा जवळील हनुमान मंदिर - किल्ले पुरंदर |
|
छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व उद्यान - किल्ले पुरंदर |
स्मारका पूर्वी उजवीकडे वळून आता बांधून काढलेल्या काही पायऱ्यांची वाट व पुढे थोडी घनदाट झाडीतून जाणारी चढाईची वाट चालत आलो. तेथून पुढे तुटलेल्या जुन्या दगडी वळणदार पायऱ्यांचा वाटेने समोर आल्या नंतर किल्याचा मुख्य दरवाजापाशी आलो. या पहिल्या दरवाजाचा अगदी समोरील तटबंधी मध्ये हनुमानाची मूर्ती स्थापित केलेली पाहायला मिळाली. पहिल्या दरवाजानंतर डाविकडे एक वाट कंदकड्याकडे जाते पण ती वाट भारतीय सैन्यानि बंद केली आहे. पहिला दरवाजा पार करता समोर आणखीन दोन दरवाजे पाहायला मिळाले. असे तिन्ही दरवाजे पारकरून आम्ही किल्या वरती प्रवेश केला. बाजूला असलेला बुरुज, भग्न अवस्थेतील वाड्याचे अवशेष, तलाव, विहीर असे पाहून पुढे चालू लागलो.
|
मुख्य दरवाजा - किल्ले पुरंदर |
|
मुख्य दरवाजा येथील वळणदार दगडी पायऱ्यांची वाट - किल्ले पुरंदर |
|
मुख्य दरवाजा येथील हनुमान मुर्ती - किल्ले पुरंदर |
|
दरवाजा - किल्ले पुरंदर |
|
कंदकडा व मागे वज्रगड - किल्ले पुरंदर
|
|
वाड्याचे अवशेष - किल्ले पुरंदर |
|
पाण्याचे टाके - किल्ले पुरंदर |
पुढे वाटेत असलेले पाण्याचे टाके पाहून दुपारचा रखरखत्या उणा मध्ये केदारेश्वर मंदिराचा दिशेने चालू लागलो. वाटेमध्ये एका करवंदीच्या झाडा जवळ करवंद खात सावलीला थोडी विश्रांती घेतली. मंदिराचा दिशेने जातांना डाव्या बाजूला खालील दिशेला केदार दरवाजा, पायऱ्या व दूरवर एक बुरुज दिसत होता. पुढे मंदिराचा आधी असलेल्या दगडी पायऱ्या व बाजूने तटबंधी आज देखील खूप सुंदर व सुस्थितित पाहायला मिळाल्या. केदारेश्वर मंदिरा समोर ४ खांबी लहानशा मंडपा मध्ये नंदी, गाभाऱ्या मध्ये शिवलिंग, गाभारा व पूर्ण मंदिर दगडी बांधकामामध्ये तर छता वरती आज देखील जुनी कौले पाहायला मिळाली. मंदिरा मध्ये थोडी विश्रांती घेतली व पेटपूजा करून गड उतरायला सुरवात केली. पुरंदर किल्ला पाहताना गडाला लागूनच असलेला वज्रगड किल्ला आम्हाला खुणावत होता, पण भारतीय सैन्यांना विचारणा केली असता वज्रगड वरती जाण्यास आता बंदी आहे असे सांगितले. साधारण १:३० वाजता आम्ही गाडी पाशी येऊन पोहचलो व पुढे सासवड कडे निघालो.
|
केदारेश्वर मंदिरा जवळील पायऱ्या - किल्ले पुरंदर |
|
केदारेश्वर मंदिरा जवळील पायऱ्या - किल्ले पुरंदर |
|
केदारेश्वर मंदिर - किल्ले पुरंदर |
श्री चांगावटेश्वर मंदिर🛕
पुरंदर किल्ल्या पासून साधारण १२ किलोमीटर व सासवडचा आधी ३ किलोमीटर वरती असलेले अति प्राचीन श्री चांगावटेश्वर मंदिर पहायला थांबलो. मंदिर एक निसर्ग रम्य अशा वातावरणा मध्ये आहे. समोरून एक पाण्याचा ओढा जातो. मंदिराला बाहेरून दगडी तटबंधी आहे. त्या तटबंधी मधुन मंदिरा मध्ये जाण्यासाठी काही पायऱ्या चढून मंदिरा मध्ये प्रवेश केला. या मंदिराचे खांब हे थोडे वेगळे पाहायला मिळाले. दोन खांब एकमेकाला बिलगून एक खांब व काही चार खांब एकमेकाला बिलगून एक खांब असे पाहायला मिळाले. तर त्या खांब व मंदिरा वरील नक्षी काम इतके अप्रतिम आहे कि फक्त पाहत रहावेसे वाटले. तर इतके निरनिराळे आहे कि दृष्टीला एक सुख देऊन गेले. मंदिरा मध्ये नक्षीदार जवळपास ६ फुटाचा नंदी आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये पुरातन शिवलिंग आहे. साधारण १ तासभर मंदिर पाहून झाल्या नंतर आम्ही पुढे सासवडला संगमेश्वर मंदिर पाहायला निघालो.
|
श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
|
श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
|
श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
|
श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
|
श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
|
श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
|
श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
|
श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
|
श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
संगमेश्वर मंदिर 🛕
संगमेश्वर हे मंदिर कऱ्हा व भोगवती नदीचा संगमावरती आहे. संगमेश्वर मंदिराचे बांधकाम देखील हुबेहुब श्री चांगावटेश्वर मंदिरा सारखे आहे पण या मंदिराचा खांबा वरती तितके नक्षीकाम नाही. संगमेश्वर मंदिराचा गाभारा मध्ये मंदिराचा जुना लाकडी कळस पाहायला मिळाला. तसेच नदी संगमावरील आजू बाजूने लहान मोठी मंदिरे आहेत ती पाहिली व पुढे मल्हारगड (सोनोरी किल्ला) पाहायला निघालो.
|
संगमेश्वर मंदिर - सासवड |
|
संगमेश्वर मंदिर - सासवड |
|
संगमेश्वर मंदिराचा गाभाऱ्या मध्ये असलेला लाकडी कळस - सासवड |
|
संगमेश्वर मंदिर - सासवड |
मल्हारगड
माणसाने इतकी प्रगती केली आहे कि आता गाडी मल्हारगडचा तटबंदी जवळ जाते. असो, बुरुजामधून जाणाऱ्या चोर दरवाजाने आम्ही किल्ला मध्ये प्रवेश केला. समोरच किल्ल्याचा मधोमध चौकोनी बांधलेला बालेकिल्ला दिसतो. तर तेथेच एक कोरडी विहीर पाहायला मिळाली. त्या समोर बांधीव तलाव व तेथूनच एका लहान दरवाजामधून बालेकिल्ला मध्ये प्रवेश केला. बालेकिल्ला मध्ये वाड्याचे अवशेष, खंडोबा मंदिर व महादेव मंदिर पाहायला मिळाले. तेथूनच बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजातून बाहेर आलो व समोर असलेल्या काही पायऱ्या उतरून किल्याचा मुख्य दरवाजा पाहिला. या दरवाजातून येणारी वाट हि सोनोरी गावकडून येते. दरवाजातून माघारी तटबंधी वरून चालत झेंडेवाडी कडील आणखीन एका दरवाजातून किल्ला बाहेर आलो. व समोर असलेल्या टेकडीवरील ध्वजस्तंभाजवळ जाऊन बाहेरून किल्ला पाहून माघारी फिरलो. पुढे तटबंधी वरून पूर्ण किल्ल्याला फेरा मारून परतीचा प्रवास चालू केला.
|
चोर दरवाजा - किल्ले मल्हारगड |
|
विहीर - किल्ले मल्हारगड |
|
बांधीव तलाव - किल्ले मल्हारगड |
|
राजवाडा अवशेष - किल्ले मल्हारगड |
|
खंडोबा व महादेव मंदिर - किल्ले मल्हारगड |
|
बाले किल्याचा महादरवाजा - किल्ले मल्हारगड |
|
मुख्य दरवाजाचा आलीत बाजू - किल्ले मल्हारगड |
|
मुख्य दरवाजा - किल्ले मल्हारगड |
|
मुख्य दरवाजाचा आलीत बाजू - किल्ले मल्हारगड
|
माघारी येताना दिवे घाटामध्ये उभारलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली. आम्हा भटक्यांसाठी प्रवासामध्ये सूर्योदय व सूर्यास्त म्हणजे एक सुंदर क्षण. त्यावेळचा तो सूर्यास्त दिवे घाटामधून पाहिला व पुढे कात्रज, वारजे व चांदणी चौकचा ट्राफिक मधून गाडी चालवण्याचे दिव्य पार करत एक दिवसाचा भटकंतीचा प्रवास रात्री ९:०० वाजता संपला.
© सुशील राजगोळकर
|
दिवे घाटातील विठ्ठलाची मूर्ती - सासवड |
|
दिवे घाटातुन सूर्यास्त व मस्तानी तलाव - सासवड |
No comments:
Post a Comment