कैलासगड | सावळया घाट | Kailasgad | Savlaya Ghat 28-December-2025

२०२५ मध्ये वेळात वेळ काढून भटकंती बऱ्यापैकी झाली पण रोजचा व्यापातून वेळे अभावी प्रवास /भटकंती लिखाण काही झाले नाही. आज वर्षाचा शेवटी किमान ०१ तरी लहान वर्णन लिहू असे ठरवून कैलासगड व सावळया घाट लिहतोय.
अचानक शनिवारी रात्री संजयचा फोन आला व उद्या सकाळी कैलासगड ला जाऊया म्हणाला. मागील ०१ महिन्या भरण्यापासून ट्रेकला ब्रेक लागला होता. त्यामुळे मी लगेच होकार दिला.
त्यातून २०१९ साली मी व माझा मित्र आनंद दोघांनी अचानक निघून संध्याकाळी ०४:३० चा सुमारास कैलासगडचा ट्रेक सुरवात केली होती, पण त्यावेळी रान व कारवी खूप वाढली होती व आता संवर्धन करून फलक लावले आहेत ते देखील न्हवते व संध्याकाळी अंधार पडायला देखील सुरवात झाली होती त्यामुळे आम्हाला हवा तसा गड पाहता आला नाही व आम्ही लवकरच गड उतार झालो होतो.
तेंव्हा पासून हा ट्रेक परत करायचा राहून गेला होता या वेळी मात्र पूर्ण गड फिरायचा असे  मना मध्ये पक्के केले. रविवारी एक मेकाला घेत निघालो व पिरंगुट येथे नाश्ता केला आणि १०:०० वाजता पायथ्याला पोहचलो. वडुस्ते वगातून लांब पल्याचा ट्रेक असल्याने तेथून पुढे असलेल्या इलेक्ट्रिक डीपी व कैलासगड असा फलक लावला आहे तेथूनच गड चढायला सुरवात केली. कारवीच्या व झाडांचा सावली मधील चढाई करून अर्ध्या तासात गडावर येऊन पोहचलो. प्रथम दर्शनी फडकत असलेल्या भगवा ध्वजा पाशी आलो व तेथून दिसणारा मुळशी जलाशयाचा परिसर पाहून माघारी फिरलो. थोडे पुढे आल्या नंतर सरळ समोर जाणारी वाट शिव मंदिराकडे व एक डाव्या बाजूला खाली पाण्याचे टाकेकडे जाते तेथे आलो. तेथे मोठी दोन जोड पाण्याची टाकी पाहायला मिळाली. तेथून माघारी आलो मंदिराच्या दिशेने निघालो. वाटेत काही अवशेष पाहायला मिळाले व आता नव्याने बांधलेल्या शिव मंदिरा मध्ये असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. मंदिरा मध्ये बसून खाऊ खाला व थोडी विश्रांती घेऊन पश्चिम दिशेला असलेली गडावरील नैसर्गिक गुहा पाहायला निघालो.
कैलासगडावरील पाण्याचे टाके
कैलासगडावरील पाण्याचे टाके 

कैलासगडावरील पाण्याचे टाके
कैलासगडावरील पाण्याचे टाके 

कैलासगडावरील शिवलिंग
कैलासगडावरील शिवलिंग 

कैलासगडावरील मंदिर
कैलासगडावरील मंदिर 

तेथे गुहेकडे असा दिशादर्शक फलक आहे पण गडावरती गवत वाढले असल्यामुळे नेमकी कोणती वाट गुहेकडे जाते ती पटकन सापडली नाही.  पुढे ०२-०३ वाटा समोर दरी असल्याने बंद होत्या तिथून माघारी फिरलो. शेवटी एक वाट सापडली व आम्ही थोडे खाली असलेल्या गुहे पाशी येऊन पोहचलो. एक मोठी डोंगराचा कपारीमध्ये तयार झालेली नैसर्गिक गुहा पाहायला मिळाली, पूर्वी या ठिकाणी थोडे बांधकाम करून वापरत असावे असे अवशेष पाहून समजले.
गडावरून गुहेकडे येणाऱ्या वाटेवरूनच एक वाट वडूस्ते गावावरून येणाऱ्या व रत्नाई देवी मंदिराचा वाटे ला जाऊन मिळते. आम्ही मात्र माघारी गडावरती आलो व आल्या वाटेने गड उतार होऊन ०२:०० वाजता पायथ्या पाशी येऊन पोहचलो.
कैलासगडावरील नैसर्गिक गुहा
कैलासगडावरील नैसर्गिक गुहा 

कैलासगडावरील नैसर्गिक गुहा
कैलासगडावरील नैसर्गिक गुहा 

कैलासगडावरील नैसर्गिक गुहा
कैलासगडावरील नैसर्गिक गुहा 

कैलासगडावरील नैसर्गिक गुहा
कैलासगडावरील नैसर्गिक गुहा 

अता सकाळी डोक्यात आज दुसरा मोरगिरी, घनगड, तैलबैला, कोरीगड कोणता गड करायचा असा प्रश्न होता. पण जास्त उशीर नको म्हणून सर्वानी सावळ्या घाट वाट पहायला जायचे ठरवले व निघालो. ०३:०० वाजता परातेवाडी येथे येऊन गाडी लावली व सावळ्या घाटाचा दिशेने निघालो. येथे ठीक ठिकाणी आता दिशादर्शक फलक लावलेले पाहायला मिळाले. थोड्या अंतर चालू आल्या नंतर कुंडलिका व्हॅली पाहिली व पुढे निघालो. थोडे अंतर खाली उतरून आल्या नंतर घाट वाटेवरील कोरड्या पाण्याचे टाके पाहिले. तेथून खाली कातळामध्ये कोरून बनवलेल्या शिवकालीन पायऱ्यांचे अवशेष आज घडी सुस्तिथित व वापरात असलेले पाहून बरे वाटले. तेथे एक पाण्याचे टाके देखील पहिले. तेथूनच खाली आलो व पुढे सावळ्या घाट येथून भिरा डॅम परिसर, देवकुंड धबधबा, रिंग धबधबा, कुंडलिका व्हॅली असा परिसर दिसतो तो पाहून माघारी फिरलो व ०५:०० वाजता परातेवाडी येथे आलो. तेथून पुण्याचा दिशेने निघालो व रात्री ०९:०० वाजता घरी पोहचलो. 

कुंडलिका व्हॅली
कुंडलिका व्हॅली

सावळया घाटातील पाण्याचे टाके
सावळया घाटातील पाण्याचे टाके 
सावळया घाटातील पायरी मार्ग

सावळया घाटातील पायरी मार्ग 

सावळया घाटातील पायरी मार्ग
सावळया घाटातील पायरी मार्ग 



सावळया घाटातील पायरी मार्ग
सावळया घाटातील पायरी मार्ग 

सोबती : संजय शेंडकर, शशीकांत तांदुळकर, अभिषेक शेळके, मयूर .
©सुशील राजगोळकर


कैलासगड | सावळया घाट | Kailasgad | Savlaya Ghat 28-December-2025

२०२५ मध्ये वेळात वेळ काढून भटकंती बऱ्यापैकी झाली पण रोजचा व्यापातून वेळे अभावी प्रवास /भटकंती लिखाण काही झाले नाही. आज वर्षाचा शेवटी किमान ०...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.