वैराटगड २५-जून-२०२१ ⛰️🚩 VAIRATGAD 25-Jun-2021

अजित खूप दिवसापासून बोलत होता खूप दिवस झाले दादा आता ट्रेक करून, मी येतो तू दोन दिवसाचे नियोजन कर. मग मी नियोजन करून अजितला कळवले तसे तो मुंबईवरून गुरुवार २४ जून रात्री माझ्याकडे आला. मग नियोजनाप्रमाणे आम्ही शुक्रवार २६ जून २०२१ रोजी पहाटे ५:३० वाजता गाडी 🏍️ घेऊन पुणे सोडले व वाईच्या दिशेने निघालो.

ट्रेकला जाण्यापूर्वी बनवलेले नियोजन
ट्रेकला जाण्यापूर्वी बनवलेले नियोजन

८:३० वाजता वाई येथे नाश्ता 🍛 उरकून आम्ही पुन्हा त्याच मार्गे थोडे माघारी आलो. व कडेगाव येथून उजवीकडे वळसा घेऊन व्याजवाडी गाठली. तेथे गाडी लावून एका गावकर्‍याला गडाचा मार्ग विचारून घेतला.
०९:०० वाजता आम्ही गडाच्या दिशेने चढाई चालू केली 🧗🏼‍♂️. वाट तशी मळलेली होती. थोडे अंतर पार करताच थोडा रिमझिम पाऊस आला त्या पावसाच्या सरी झेलत गड चढू लागलो. मध्येच एक लहान धबधबा लागला व त्यांचा समोरच एक भगवा ध्वज दिसत होता, तेथे येऊन पोहोचलो.

व्याजवाडी जवळून दिसणारा वैराटगड
व्याजवाडी जवळून दिसणारा वैराटगड

गडाची काही वाट ही घनदाट जंगलाची आहे ती पार करून आम्ही १०:३० वाजता मुख्य दरवाज्यापाशी पोचलो. तेथून एक मुख्य वाट डाव्या बाजूला कापसेवाडी कडे खाली जाताना दिसत होती. आम्ही गडावरती न जाता त्या वाटेने खाली गेलो. व तेथे असलेल्या ३ टाक्या पाहून मुख्य दरवाजाच्या ज्या दिशेला मागे आलो. दरवाज्याच्या चढाईच्या आधी खालील बाजूला असलेले लक्ष्मी माता मंदिर व प्राचीन गुहा पाहीली. मग आम्ही महाद्वारातून प्रवेश केला. गडाचा महाद्वाराची पडझड झालेली आहे पण असलेल्या अवशेषांवरून महाद्वाराची भव्यता लक्षात येते. या महाद्वारातून प्रवेश करता समोर दोन हनुमान मंदिर पाहायला मिळाली🛕.

वैराटगड गडाचा मार्गा वरील पाण्याचा टाक्या
वैराटगड गडाचा मार्गा वरील पाण्याचा टाक्या

वैराटगडाचा मुख्य दरवाजा जवळील प्राचीन गुहा
वैराटगडाचा मुख्य दरवाजा जवळील प्राचीन गुहा

वैराटगडाचा मुख्य दरवाजा जवळील लक्ष्मीमाता मंदिर
वैराटगडाचा मुख्य दरवाजा जवळील लक्ष्मीमाता मंदिर

वैराटगडाचा मुख्य प्रवेश द्वार
वैराटगडाचा मुख्य प्रवेश द्वार

वैराटगडावरील दोन हनुमान मंदिर
वैराटगडावरील दोन हनुमान मंदिर

वैराटगडावरील हनुमानाची मूर्ती
वैराटगडावरील हनुमानाची मूर्ती

वैराटगडावरील हनुमान मंदिरातील मूर्ती
वैराटगडावरील हनुमान मंदिरातील मूर्ती

तेथून डाव्या बाजूला दिसत असलेले वैराटेश्वर मंदिराच्या दिशेला चालू लागलो. मध्येच दोन-तीन पाण्याचे तलाव पाहून वैराटेश्वर मंदिराचे 🛕 दर्शन घेतले. मंदिराबाहेर एक मोठी वीरगळ, नंदी व तुळशीवृंदावन पाहायला मिळाले. बाजूलाच असलेले एक लहान मंदिर व आत मध्ये असलेली लहान विरगळ पाहिली व मंदिरा समोर थोडी डागडुजी करून असलेला मठ पाहिला. तेथे एका तळ घरामध्ये ठेवलेली ज्योतिबा देवाची मूर्ती व एका खोलीमध्ये गुरु दत्ताची मूर्ती पाहायला मिळाली.

वैराटगडावरील पाण्याचा तलाव व मागे दिसत असलेले वैराटेश्वर मंदिर
वैराटगडावरील पाण्याचा तलाव व मागे दिसत असलेले वैराटेश्वर मंदिर

वैराटगडावरील वैराटेश्वर मंदिर
वैराटगडावरील वैराटेश्वर मंदिर

वैराटगडावरील वैराटेश्वर मंदिरातील शिवलिंग
वैराटगडावरील वैराटेश्वर मंदिरातील शिवलिंग

वैराटगडावरील मठ
वैराटगडावरील मठ

वैराटगडावरील मठातील श्री गुरुदत्ताची मूर्ती
वैराटगडावरील मठातील श्री गुरुदत्ताची मूर्ती

वैराटगडावरील मठातील तळ घरातील श्री जोतिबा देवाची मूर्ती
वैराटगडावरील मठातील तळ घरातील श्री जोतिबा देवाची मूर्ती

मठ पाहून झाल्यानंतर गडाच्या पूर्व दिशेचा रुंद अशा तटबंदीवरुन फेरा मारायला सुरुवात केली. पुढे एका ठिकाणी तटबंदी मधून जाणारा चोरदरवाजा पाहायला मिळाला. पुढे गडाला फेरा मारतांना गडाच्या खाली उध्वस्त अवस्थेतील पुरातन घरांचे अवशेष पहायला मिळाले. असा पूर्ण गडाचा फेरा मारून मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो व गड उतरायला सुरुवात केली. साधारण दुपारी १:३० वाजता व्याजवाडी येथे येऊन पोहोचलो व लगोलग पांडवगडाच्या पायथ्याचे गाव गुंडेवाडी कडे निघालो. 
वैराटगडाची तटबंदी
वैराटगडाची तटबंदी

वैराटगडा वरील चोर दरवाजा
वैराटगडा वरील चोर दरवाजा

वैराट गडाच्या खाली उध्वस्त अवस्थेतील पुरातन घरांचे अवशेष
वैराट गडाच्या खाली उध्वस्त अवस्थेतील पुरातन घरांचे अवशेष

व्याजवाडी वरून निघाल्यानंतर वाई येथे पेट्रोल भरून गुंडेवाडी येथे पोहचायला दुपारचे २:३० वाजले होते. भूक तर खूप लागली होती, मग तेथेच बसून आम्ही दुपारचे जेवण उरकले एव्हाना दुपारचे ३:३० वाजले. मग मात्र आम्ही द्विधा मनस्थिती मध्ये अडकलो होतो पांडवगड आज करायचा की नाही ?
कारण पांडवगडाचा पूर्ण मार्ग हा घनदाट जंगलाचा दिसत होता आणि गडावर ती जाऊन खाली उतरेपर्यंत अंधार होणार होता.

वाई - भोर मार्गावरून दिसणारा पांडव गड
वाई - भोर मार्गावरून दिसणारा पांडव गड

म्हणून मग आम्ही गडावरती न जाता आमची गाडी 🏍️ पुन्हा वाई कडे माघारी वळवली. मग वाईमध्ये महागणपतीचे 🛕 दर्शन घेतले व तेथील नदी घाटावरती असलेली इतर पुरातन मंदिरे पाहिली. नंतर वाईपासून ३ किलोमीटर वरती असलेल मेणवली कडे निघालो. मेणवली येथे नाना फडणवीस यांचा वाडा बंद असल्या कारणाने बाहेरूनच पाहायला भेटला. वाड्याच्या मागील बाजूला असलेले पुरातन शिवलिंग मंदिर 🛕 व नदी घाटाचा निवांत शांतते मध्ये तेथे थोडी विश्रांती घेतली.

महागणपती - वाई
महागणपती - वाई

महागणपती मंदिर वाई
महागणपती मंदिर वाई

नाना फडणवीस वाड्याची मागील बाजू व नदी घाट - मेणवली
नाना फडणवीस वाड्याची मागील बाजू व नदी घाट - मेणवली

नदी घाट व पुरातन मंदिरे - मेणवली
नदी घाट व पुरातन मंदिरे - मेणवली

मंदिरासमोर असलेली जुनी घंटा - मेणवली
मंदिरासमोर असलेली जुनी घंटा - मेणवली

मंदिरासमोर असलेला पुरातन नंदी - मेणवली
मंदिरासमोर असलेला पुरातन नंदी - मेणवली

मंदिरा मधील पुरातन शिवलिंग - मेणवली
मंदिरा मधील पुरातन शिवलिंग - मेणवली

मेणवली येथील गावकऱ्यांना विचारून पांडवगड मेणवली मार्गे चौकशी केली. पण असे समजले मेणवली मार्गे पांडवगड सोपा मार्ग जरी असला तरी खूप लांब पल्ल्याचा आहे. म्हणून आम्ही पुन्हा आमची गाडी गुंडेवाडी कडे वळवळी. गुंडेवाडी कडे जात असताना वाई येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एक शाळा दिसली. तेथे दोन शिक्षक देखील होते, त्यातील म्हसळ सरांनी आमचा अवतार बघून तुम्ही ट्रेकर आहात का असे विचारले ? आम्ही हो म्हणताच त्यांनी त्यांच्या ट्रेकर मुलाला फोन लावून बोलने करून दिले. मग सरांना विचारून आम्ही आमचा पहिल्या दिवसाचा मुक्काम शाळेमध्ये करायचे ठरवले. शाळेच्या व्हरांड्या मध्ये आम्ही आमचा तंबू लावला व जेवण करून झोपी गेलो.

©सुशील राजगोळकर

लोहगड १४-मार्च-२०२१ ⛰️ LOHGAD

चौथ्यांदा.... !!! हो बरोबर चौथ्यांदा लोहगड पाहिला. पाय दुःखीमुळे मी थोडे दिवस ट्रेकला ब्रेक दिला होता. लोणावळ्याला डॉक्टर कडेच गेले होतो. पण निरव खूप दिवसा पासून आग्रह करत होता, म्हणून लोहगड पाहायला गेलो.
बरेच जण असा विचार करतात कि परत परत एकचं ठिकाण का पाहायचे ? पण निसर्ग,🌱 सह्याद्री व गडकोट ⛰️ एकदा पाहून पूर्ण होईल व समजेल असे कोणालाच शक्य नाही. म्हणूनच तर आम्ही भटके एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा भेट देत असतो.

अता लोहगडचेच पहा ना. ८ वर्षापूर्वी मी एकटा मळवली स्टेशन पासून पायी चालत ट्रेक केला होतो. तेंव्हा तेथील बाकीचे लोक एकटाच कसा आला असेल ? अशा नजरेने पाहत होते 🚶🏻‍♂️. पण एकटा फिरण्याची मज्जाच वेगळी...! पण अवघड ठिकाणी कोणती माहिती न घेता एकट्याने ट्रेक करणे खूप चुकीचे ठरू शकते.
असो, तेंव्हा मनाला खूप खंत वाटली होती. कारण त्यावेळी भाजे लेणी ते लोहगड मधील घाटाचा रस्ता नव्हता. लोहगड गांववाले कसे येत जात होते? आता ज्या गडाला पायथ्या पासून दगडी पायऱ्या आहेत त्या देखील नव्हत्या. तसेच तोफा अस्थ व्यस्थ अवस्थेत होत्या. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे यांचे दिशादर्शक फलक देखील लावलेले नव्हते. एकटाच व खूप दमल्यामुळे त्यावेळी मी विंचूकडा लांबूनच नजरेमध्ये सामावून घेतला व पुढील वेळी पाहायला नक्की येणार असे सांगून परतलो.
परत काही वर्षाने दुसऱ्यांदा (२०१५) लोहगड पाहिला. तेंव्हा घाटाचा रस्ता झाला होता तर पायऱ्यांचे काम चालू होते. या वेळी मात्र विंचूकडा आवर्जून पाहिला.
तिसऱ्यांदा (२०२०) एक वर्षभरा पूर्वी ऑफिस मधील सहकाऱ्यांन सोबत आलो होतो या वेळी मात्र घाटाचा रस्ता पूर्ण खराब झाला होता. गाडी देखील चढत न्हवती. मात्र गडाचा पायथ्याला गावकऱ्यांनी शुल्क पार्किंग चालू केले आहे. तसेच पायऱ्यांचे काम पूर्ण झालेले पाहायला मिळाले. व तोफा देखील व्यवस्थित ठेवलेल्या पहायला मिळाल्या. 
आता चौथ्यांदा मात्र घाट रस्ता देखील व्यवस्थित होता पण मीच अनफिट व रविवारची लोहगडाची गर्दी यामुळे विसापूर कि लोहगड पाहायचा या संभ्रमात होतो. पण विसापूर किल्ला लोहगड किल्या पेक्षा चढायला थोडा अवघड असल्यामुळे निरवला लोहगड दाखवायचा म्हणून निघालो.
लोहगडाचा पुरातत्व खात्याने पायथ्या पासून बनवलेल्या दगडी पायऱ्यांच निरवल्या भावल्या व तो गडाचा दिशेने धावू लागला. कधी एकदाचा पूर्ण गड पाहतोय असे त्याला वाटत होते.

लोहगडाचा पुरातत्व खात्याने पायथ्या पासून बनवलेल्या दगडी पायऱ्यां
लोहगडाचा पुरातत्व खात्याने पायथ्या पासून बनवलेल्या दगडी पायऱ्यां

गडावरती जातांना असलेले गणेश दरवाजा, पाण्याचा टाक्या, हनुमान दरवाजा, तोफा, बुरुज, गडावरून दिसणारे विसापूर किल्ला, तिकोना किल्ला, तुंग किल्ला ⛰️ व पवना धरणाचा जलाशय दाखवत. तर पुढे भगवा ध्वज🚩, हनुमान मंदिर, शिवलिंग, महादेव मंदिर🛕, पाण्याचे टाके व १६ कोणी तलाव असे सर्व काही निरवला दाखवत व समजावून सांगत आम्ही विंचूकडयाच्या दिशेला आलो. यावेळी मात्र निरवने आग्रह करून देखील विंचूकडा लांबूनच पाहिला व पुढील वेळी आपण नक्की जाऊया असे सांगितले व माघारी फिरलो. मात्र यावेळी विशेष म्हणजे या पूर्वी ३ वेळा येऊन देखील पाहायची राहिलेली गडावरील "लक्ष्मी कोठी" पाहिली व मन आणखीनच प्रसन्न झाले.

लोहगड वरील तोफ
लोहगड वरील तोफ
लोहगड वरील महादेव मंदिरातील शिवलिंग
लोहगड वरील महादेव मंदिरातील शिवलिंग 
लोहगड वरील महादेव मंदिरा
लोहगड वरील महादेव मंदिर
लोहगड वरील विंचूकडा (पप्पा तिकडे जाऊया)
लोहगड वरील विंचूकडा (पप्पा तिकडे जाऊया)
लोहगड वरील "लक्ष्मी कोठी"
लोहगड वरील "लक्ष्मी कोठी"

"हीच ती गडकोटांची खासियत पूर्ण गड पाहिला असे वाटते तरी काहींना काही राहून जाते. प्रत्येक वेळी प्रत्येक ऋतूत काहीतरी नवीन पाहायला मिळते किंवा पहिल्या वेळी पाहिलेल्या गोष्टी सुद्धा, दुसऱ्या वेळी वेगळ्याच रूपात पाहायला मिळतात."
आता निरव विंचूकडा व गडावरून पाहायला मिळालेले इतर किल्ले कधी पाहायला मिळणार याची वाट पाहतोय..........!!

©सुशील राजगोळकर


( लोहगड भटकंती ब्लॉग २०२०)

⛰️लोहगड १४-मार्च-२०२१⛰️ 





हरिश्चंद्रगड HARISHCHANDRAGAD

भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेला हरिश्चंद्रगड पाहायची इच्छा खूप होती, नियोजन काही होत नसल्यामुळे पाहायचा राहिला होता. पण अचानक संजय शेंडकरने प्लान बनवून कळवले. शनिवारी २३-०१-२०२१ रोजी पहाटे ०६:०० वाजता पुणे येथून निघालो. 🛣️ वाटेमध्ये नारायणगांवला नाश्ता 🍲करून ०९:३० वाजता खिरेश्वर या गावी पोहचलो. मुक्ताई मातेच्या मंदिराला 🛕 लागून असलेले अक्षय मुठे यांचे घर व हॉटेल मुक्ताई येथे गाडी लावून आम्ही आमच्या बॅगवर तंबू, चटई बांधून १०:०० वाजता टोलारखिंड मार्गाने हरिश्चंद्रगडाच्या दिशेने चालायला सुरवात केली. 🚶


मुक्ताई मातेचे मंदिर खिरेश्वर
मुक्ताई मातेचे मंदिर खिरेश्वर 

मुक्ताई मातेची मूर्ती - मुक्ताई मंदिर, खिरेश्वर
मुक्ताई मातेची मूर्ती - मुक्ताई मंदिर, खिरेश्वर
गावामधूनच पूर्ण मोठ्या उंच झाडांच्या जंगलामधुन वाट चालू झाली. भटक्यांचा गर्दी मुळे वाट चांगलीच मळलेळी आहे. वाटे मध्ये ठिक ठिकाणी 🍋 लिंबू सरबत, कोकम सरबत, काकडी विकणारे 🥒 गावकरी यांची दुकाने आहेत. त्या जंगलाचा वाटेमध्ये ऐकू येणारे पक्षाचे आवाज 🕊️ ऐकत आम्ही चालत होतो. पुढे एका झाडाखाली थोडे पाणी पिण्यासाठी विसावलो. तेथील शांततेमध्ये अचानक अफाट मधमाशांचा आवाज 🐝 कानावरती ऐकू येताच आम्ही वरती पाहू लागलो तर ते झाड पूर्ण पणे फुलांनी मोहरले होते🌳🌸.
वाटेमधील फुलांनी मोहरलेले झाड
वाटेमधील फुलांनी मोहरलेले झाड

पुढे पायथ्यापासून तासभराच्या चढाई नंतर आम्ही टोलारखिंड येथे येऊन पोहचलो. येथे समोरच वाघ्रशिल्प नजरेस आले🐯.🛕गावकरी याला वाघोबाचे देवस्थान असे म्हणतात. तसेच तेथे एका दगडावरती शिवलिंग पाहायला मिळाले. गड वनक्षेत्र 🎋🌳असल्याने, येथुन वनविभागाकडून प्लास्टिक व इतर तपासणी करून पुढे गडावरती सोडले जाते. टोलारखिंडीतुन खालील बाजूला कोथळे व लव्हाली 🏘️ या गावी वाट जाते. खिंडीमधून वरती गडाचा दिशेला २ मिनिट चालून येताच समोर उभा ठाकतो तो म्हणजे थोडाशा भीतीचा दगडाच्या चढाईचा मार्ग 🧗🏼‍♀️(rock patch). तेथे काही ठिकाणी दगडा मध्ये पायऱ्या बनवलेल्या आहेत. जंगल वाट संपवून पुढे आल्यामुळे दुपारचे ऊन खुप लागत होते. पुढे डोंगराचा काठावरून जाणारी वाट व दगडाच्या चढाईची (rock patch) वाट पार करून एका गुहे मध्ये येऊन विसावलो. तेथून पुढे चालून जाताच पूर्वे कडून गडाचा पठारावती पोहचलो. पुढे दोन वाटा जातात एक डाव्या बाजूने बालेकिल्ला कडून व एक उजव्या बाजूने, दोन्ही वाटा शेवटी मुख्य मंदिरापाशी जातात. आम्ही उजव्या बाजूने चालत वाटेमधील कोरडे ओढे, व आजू बाजूचा परिसर निहालत २:०० वाजता मुख्य मंदिरा पाशी येऊन पोहचलो. मंदिरा जवळील एका वाटेने बरेच लोक एक जात होते, विचारणा केली व थोडे पुढे वाट पाहून आलो. ती वाट पाचनई गावातून येते, सध्या चढाईसाठी सर्वात जवळची व सोपी वाट म्हणून या वाटेचा जास्त उपयोग करत आहेत. गडावरती वनविभागाणे दिलेल्या नियमा प्रमाणे पाचनई मधील गावकऱ्यांनी लहान हॉटेल बनवलेत त्या पैकी कैलास भारमल यांचे हॉटेल राजयोग येथे जाऊन आम्ही आमचा पाठीवरील बोझा उतरविला. तेथेच घरून घेतलेले दुपारचे जेवण उरकून🍲 एक तास भर विश्रांती घेतली. व पुढील नियोजन ठरविले.

तोलारखिंड येथिल वाघ्रशिल्प
तोलारखिंड येथिल वाघ्रशिल्प
तोलारखिंड येथिल शिवलिंग
तोलारखिंड येथिल शिवलिंग
तोलारखिंड नंतर असलेला दगडाचा चढाईचा मार्ग
तोलारखिंड नंतर असलेला दगडाचा चढाईचा मार्ग
वाटेतील गुहा
वाटेतील गुहा

दुपारच्या विश्रांती नंतर आम्ही मुख्य मंदिराचा परिसर पाहायला निघालो. प्रथम केदारेश्वर लेणी व केदारेश्वराचा पाण्यातील लेणी मधील शिवलिंग पाहिले व त्या थंडगार बर्फाळलेल्या पाण्यामधून शिवलींगाला प्रदक्षिणा मारली. या शिवलिंगा भोवती ४ खांब होते त्या पैकी आता एकच खांब पूर्ण शाबूत आहे व बाकीचे ३ खांब भग्न अवस्थेत आहेत.
पुढे गडावरील मुख्य 🛕🛕 हरिश्चंद्रेश्वर मंदिर, गाभाऱ्यातील शिवलिंग, तसेच या मंदिराला दोन बाजूने दरवाजे व त्या समोर नंदी पाहायला मिळतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिरातील गणपती, मंदिरावरील सुबक सुंदर नक्षीकाम, मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या काही गुहा, त्यातील एका गुहेत पुरातन काळातील काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिरा मधील पिण्याच्या पाण्याचे टाके, मंदिराचा बाजूने असलेली लहान मंदिरे पाहून बाहेर आलो.
मुख्य मंदिरा समोरील लहानशा मंदिरा मध्ये देखील गणपती व पाण्याखाली शिवलिंग पाहायला मिळाले. तसेच मंदिरा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी व इतर लहान सहान शिवलिंग व गणपती मंदिरे पाहायला मिळाली.

केदारेश्वर लेणी
केदारेश्वर लेणी

केदारेश्वराचा लेणी मधील पाण्यातील शिवलिंग
केदारेश्वराचा लेणी मधील पाण्यातील शिवलिंग

हरिश्चंद्रेश्वर मंदिर
हरिश्चंद्रेश्वर मंदिर
गाभाऱ्यातील शिवलिंग
गाभाऱ्यातील शिवलिंग
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला गणपती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला गणपती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला नंदी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला नंदी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील एका लहान मंदिर व शिवलिंग
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम

हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील पाण्याचे टाके
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील पाण्याचे टाके
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील गुहे मध्ये असलेल्या पुरातन काळातील काही मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील गुहे मध्ये असलेल्या पुरातन काळातील काही मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा समोरील लहानशे गणपती व शिवलिंग मंदिर
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा समोरील लहानशे गणपती व शिवलिंग मंदिर
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी
पुष्करणीचा मागील बाजूला असलेले गणपती मंदिर
पुष्करणीचा मागील बाजूला असलेले गणपती मंदिर

पुढे तेथूनच जवळ तारामती शिखराच्या पायथ्याला सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुंफेत गणेशाची सुमारे आठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती पाहायला मिळाली. याच गुहेच्या आजुबाजूला अनेक गुहा पाहायला मिळाल्या.

हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली लेणी / गुहा
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली लेणी / गुहा
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
पुढे संध्याकाळचा चहा घेऊन मंदिरा पासून १२०० मीटर लांब व पश्चिम दिशेला असलेला कोकण कडा पाहायला निघालो.⛰️ तो अप्रतिम मनमोहक कोकण कडा पाहून मन प्रसन्न झाले. त्यातच कोकण कडा वरून सूर्यास्त 🌤️पाहणे म्हणजे नयन सुखचं !! कोकण कडा येथे देखील लहान हॉटेल व बऱ्याच प्रमाणात तंबू ⛺ लावलेले दिसले. कोकण कडाच्या सूर्यास्ता नंतर विजेरीचा 🔦 प्रकाशामध्ये आम्ही माघारी फिरलो व मंदिर जवळ मुक्कामाच्या ठिकाणी आलो. मग आम्ही तेथेच अंगणा मध्ये आमचा तंबू ⛺ लावला तो पर्यंत जेवण तयार झाले. मग रात्री त्या गरमा गरम जेवणा वरती ताव मारला आणि मग त्या अंधाऱ्या रात्री शेकोटी पेटवून 🔥गप्पा गोष्टी केल्या.

कोकण कडा
कोकण कडा
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
हरिश्चंद्रेगडा वरील रात्रीचे जेवण
हरिश्चंद्रेगडा वरील रात्रीचे जेवण
तंबूमधील रात्र
तंबूमधील रात्र
हरिश्चंद्रेगडा वरील रात्रीची शेकोटी
हरिश्चंद्रेगडा वरील रात्रीची शेकोटी

दुसरे दिवशी रविवार २४-०१-२०२१ सकाळी पुन्हा ताजे तवाने होऊन चहा घेतला व ०६:०० वाजता अंधारा मध्ये महाराष्ट्रामधील चौथे उंच "तारामती शिखर" चढायला सुरवात केली. अर्धा तास भरात चढाई करून आम्ही शिखरावर सूर्यनारायणाची वाट पाहत बसलो. व ०७:१४ मिनिटाने सुर्य ️ डोंगर रांगेतून बाहेर डोकावून पाहू लागला. तो नयनरम्य सूर्योदयाचा नजारा डोळ्यात सामावून घेतला. व तारामती शिखरावरील शिवलिंग, ध्वजस्तंभ, शिखरावरून दिसणारा कालभैरी डोंगर, कोकणकडा, आजू बाजूची डोंगर रांग️,खाली दिसत असलेले गडावरील मंदिर पाहून शिखराला फेरा मारला व शिखर उतरून आलो. तो पर्यंत सकाळचे ०९:०० वाजले होते. मग आम्ही नाश्ता उरकून आमचा तंबू काढला व बॅग वरती बांधून गड उतरायला सज्ज झालो. सकाळी ०९:३० वाजता राजमार्ग जुन्नर दरवाजाने गड उतरायचा असे ठरवून निघालो. वाटेमध्ये दिसत असलेला बाल्लेकिल्ला पाहत आम्ही चालू लागलो. वेळे अभावी बाल्ले किल्ला वरती चढाई केली नाही. पण खालून बाल्ले किल्याला थोडीशी तटबंधी दिसत होती. राजमार्गाचा रस्ता काही सापडला नाही मग तेथील गावकऱ्यांचा माहिती नुसार आम्ही मार्ग शोधायचा प्रयत्न केला. पण खूप घनदाट झाडीतुन मार्ग शोधत थोडे अंतर आत चालून गेलो. पण कदाचित ती प्राण्याची वाट असावी व पुढे जाऊन ती वाट पण बंद झाली व दुसरी कोणतीच वाट नसल्यामुळे माघारी फिरलो. व ज्या मार्गाने गडावरती आलो होतो त्या मार्गे गड उतरला. गडाखाली पोहचल्या नंतर चौकशी केली असता जुन्नर दरवाजाने आधी जाऊन आलेले किंवा वाटाड्या शिवाय शक्यतो कोणी येत जात नाही असे समजले. पुढे आम्ही पिंपळगाव जोग धरणावरती पोहूण पुन्हा माघारी हॉटेल मुक्ताई येथे आलो. व दुपारचे जेवण उरकुन ०३:०० वाजता पुणे कडे निघालो.

तारामती शिखर वरून सूर्योदय
तारामती शिखर वरून सूर्योदय
तारामती शिखर वरून सूर्योदय पाहताना
तारामती शिखर वरून सूर्योदय पाहताना
तारामती शिखर वरील शिवलिंग
तारामती शिखर वरील शिवलिंग

तारामती शिखर वरील ध्वज स्तंभ
तारामती शिखर वरील ध्वज स्तंभ
तारामती शिखर
तारामती शिखर

तारामती शिखर
तारामती शिखर
सकाळचा नाष्टा
सकाळचा नाष्टा
मुक्कामाचे हॉटेल राजयोग
मुक्कामाचे हॉटेल राजयोग
पठारावरून दिसणारा बाल्ले किल्ला
पठारावरून दिसणारा बाल्ले किल्ला
पिंपळगाव जोग धरण येथील पुरातन शिवलिंग
पिंपळगाव जोग धरण येथील पुरातन शिवलिंग
पिंपळगाव जोग धरणाचा जलाशय व मागे दिसणारा शिंदोळा किल्ला
पिंपळगाव जोग धरणाचा जलाशय व मागे दिसणारा शिंदोळा किल्ला

पूर्ण गड पाहून झाल्या नंतर येथे पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा निर्माण झाली, म्हणूनच कदाचित हरिश्चंद्रगडाला भटक्यांची पंढरी असे म्हणतात........

सोबती: संजय शेंडकर, वैभव सोनावणे, अकाश भोसले.

©सुशील राजगोळकर





"घनगड" ⛰️ निरवचा ५० व्या किल्याची भटकंती. 🚗⛰️ | Ghangad & Tailbailla - Lonavala 11-January-2026

मी माझा बऱ्याच भटकंतीचे वर्णन लिहिले, पण नेमके निरव सोबत केलेल्या भटकंतीचे वर्णन लिहायचे राहिले, आता निरवचे ५० गड भटकंती पूर्ण झाली आहे तर थ...

Note :

भटकंती करणे माझी खूप मोठी आवड आहे, त्याच भटकंती मधील काही भटकंती प्रवास / वर्णन मी इथे लिहिले आहे. काही अधिक माहिती हवी असल्यास Contact Form मार्फत संपर्क करा.