जुण्या
मुंबई पुणे रोड वरती देहूरोड
पासून साधारण ४ कि.
मी.
अंतरा
वरती सोमाटणेचा धोडेशे अलीकडे
या बुद्ध कालीन लेणी आहेत. रविवार
दिनांक २२ जुलै २०१८ ला आम्ही
सकाळी घोराडेश्वरला निघालो. अप्रतिम
अशी सुंदर सकाळ त्यातूनच
रिमझिम पाऊस चालू होता प्रसन्न
आशे वातावरण होते. अशा
या वातावरणात एक एक पायऱ्या
चढत आम्ही साधारण २० मीनिटांचा
चढाईनंतर लेण्यांन पाशी
पोहचलो. एका
लेणी मध्ये शिवलिंग मंदिर
आहे येथे श्रावण सोमवारी
भक्तांची रिग असते. तसेच
लहान सहान ४ ते ५ लेणी आहेत
इथेच एका लेणी मध्ये संत तुकाराम
महाराज व विट्ठल रखुमाई यांच्या
मूर्ती आहेत. संत
तुकाराम महाराज या ठिकाणी
चिंतन,
नामस्मरण
करण्यासाठी येत होते. टेकडी
वरून जवळच असलेला बिर्ला
गणपती,
तळेगांव
तलाव,
देहूचे
गाथा मंदिर व हिरवेगार डोंगर
असे सगळेकाही धुक्यामध्ये
अंधुक अस्पष्ट पण मस्त असे
दिसत होते.
खूप
दिवसा पासून ट्रेक ला ब्रेक
लागला होता. म्हणून
घरा पासून जवळच असलेल्या
घोराडेश्वरचा लहान पण प्रसन्न
असा ट्रेक केला. सोबत प्रतीक
तळगांवकर.©सुशील राजगोळकर
No comments:
Post a Comment